सलग तिसऱ्या दिवशी सुरू असलेल्या आंदोलनाला भेट देण्यासाठी भाजप आमदार प्रसाद लाड गुरुवारी दुपारी खेड शहरात दाखल होणार आहेत. एस टी कर्मचाऱ्यांची शासनात विलणीकरन करा या प्रमुख मागणीसाठी काम बंद आंदोलन सुरू आहे. त्यांना पाठिंबा देण्यासाठी व न्याय मिळवून देण्यासाठी भाजप आक्रमक झाल्याचे पहावयास मिळत आहे. आझाद मैदानापासून महाराष्ट्रातील प्रत्येक आंदोलन ठिकाणी भाजप भेट देऊन एस टी कार्मचार्यांना पाठिंबा दर्शवत आहे.
टाईम्स नाऊ समिटमध्ये पद्मश्री पुरस्कार मिळाल्यानंतर मुलाखतीसाठी उपस्थित राहिल्यानंतर बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री कंगना रानोतने देशाच्या स्वातंत्र्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केले आहे. 1947 ला देशाला मिळालेले स्वातंत्र्य हे स्वातंत्र्य नसून ती भीक होती, खरे स्वतंत्र्य तर 2014 ला मिळाले आशा प्रकारचे वक्तव्य करून नव्या वादाला तोंड फोडले आहे.
यादरम्यान कंगनाने ती कोणाला सुपरस्टार मानते हे देखील सांगितले. कंगना म्हणाली- ‘मी ज्या कुटुंबातून आले आहे, त्यात पंतप्रधानांना सुपरस्टार मानले जाते. पंतप्रधान माझ्या कुटुंबासाठी सुपरस्टार आहेत आणि नेहमीच असतील. माझ्या आई-वडिलांनी माझ्या चित्रपटाच्या मुहूर्तावर प्रत्येक गोष्टीची काळजी घेतली, तो माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा दिवस होता. तसेच यावेळी कंगनाला विचारले गेले की, ‘सुपरस्टार कंगना रनौतलाही पंतप्रधान सुपरस्टार वाटतात का? जसे तुमच्या कुटुंबाचाही विश्वास आहे.’ उत्तरात कंगना म्हणते की, ‘नक्कीच, पीएम मोदी हे जगातील सर्वात लोकप्रिय नेते आहेत. यात शंका नाही. ते आपल्या देशासाठी आपल्याला मिळाले हे आपले भाग्य आहे. मला वाटते की, त्यांनी आपल्या देशाला अशा ठिकाणी नेले आहे, जिथे उभे राहण्याचा आपल्याला खूप अभिमान आहे.’
नवाब मलिक यांची मुलगी निलोफर आणि मलिकांच्या जावयाने देवेंद्र फडणवीस यांना नोटीस पाठवली आहे. बदनामीकारक आणि खोटे आरोप केल्याबद्दल ही कायदेशीर नोटीस बजावण्यात आली आहे. अब्रूनुकसानीचा खटला दाखल करण्याच्या संदर्भात ही नोटीस असल्याची माहिती समोर आली आहे. या संदर्भात नवाब मलिक म्हणाले, माझ्या जावयाच्या घरात ड्रग्ज सापडले असं वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केलं होतं. मात्र, जावयाच्या घरात कुठल्याही प्रकारचं ड्रग्ज सापडलं नव्हतं. पंचनाम्यातही तसंच म्हटलं आहे तरी सुद्धा फडणवीस हे ड्रग्ज सापडल्याचं म्हणत आहेत. त्यामुळे माझ्या मुलीने त्यांना नोटीस पाठवली आहे. देवेंद्र फडणवीसांनी माफी मागावी अन्यथा मानहानीचा दावा दाखल करणार.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नवाब मलिक यांचं मंत्रिमंडळाच्या बैठकीत जाहीर कौतुक केलं. Good Going नवाब मलिकजी, असं म्हणत त्यांनी आपला हा लढा सुरूच ठेवावा, असं आवाहन मुख्यमंत्री ठाकरेंनी त्यांना केलं. त्यामुळे नवाब मलिक यांच्या लढ्याला मोठं राजकीय पाठबळ मिळाल्याचं मानलं जात आहे. मुख्यमंत्र्यांसह सर्व मंत्र्यांनी मलिक यांचं कौतुकही केलं. गेल्या काही दिवसांपासून नवाब मलिक विरुद्ध एनसीबी आणि त्यानंतर नवाब मलिक विरुद्ध देवेंद्र फडणवीस अशी लढाई महाराष्ट्रात रंगताना दिसत आहे. दोन्ही पक्षांकडून एकमेकांवर आऱोप-प्रत्यारोपाचा फैरी झाडल्या जात आहेत. त्या पार्श्वभूमीवर राज्य मंत्रीमंडळानं नवाब मलिक यांना जाहीर केलेला पाठिंबा ही मोठी राजकीय घडामोड ठरते आहे. मुंबईतील क्रूझ ड्रग्ज प्रकरणानंतर राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक हे सातत्याने एनसीबी, समीर वानखेडे आणि भाजपवर निशाणा साधत आहेत. तर भाजपकडूनही नवाब मलिकांना प्रत्युत्तर देत गंभीर आरोप करण्यात येत आहेत. त्याच दरम्यान आता नवाब मलिकांची मुलगी निलोफर हिने राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना कायदेशीर नोटीस पाठवली आहे.
गुजरात पोलिसांनी केलेल्या कारवाईत कोट्यवधी रुपयांचे ड्रग्ज जप्त करण्यात आले. या ड्रग्जची किंमत साधारण 300 कोटींच्या घरात असल्याचे बोलले जात आहे. यावेळी गुजरात पोलिसांनी द्वारका जिल्ह्यातील खांबालिया येथे केलेल्या कारवाईत ठाण्यातील एका भाजीवाल्याला अटक करण्यात आली आहे.
राजकोट क्षेत्राचे पोलीस उप महानिरीक्षक संदीप सिंह यांनी दिलेल्या माहिती नुसार ठाणे मुंब्रा येथील 44 वर्षीय सज्जाद हा ड्रग्जच्या व्यवहारासाठी येणार असल्याची माहिती गुप्त सूत्रांकडून मिळाली होती. त्याला अटक केल्यानंतर त्याच्या बॅगेतून 19 पॅकेट्स जप्त करण्यात आले. यामध्ये 11.483 किलोग्राम हेरॉईन आणि 6.168 मेथामेफटामाइन आढळून आले. तर इतर दोघांकडून 17.65 किलोग्राम साठा ही जप्त करण्यात आला. सज्जाद हा मुब्रा परिसरातील भाजी विक्रेता असून तीन दिवसापूर्वी अंमली पदार्थांचा साठा घेण्यासाठी तो आला असल्याचे पोलिसांनी सांगितले. अलीकडेच डीआरआयने गुजरातच्या मुंद्रा येथून दोन कंटेनरमधून 2 हजार 922.22 किलो हेरॉईन जप्त केले होते. या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली होती आणि त्यासोबतच काही अफगाणिस्तानी नागरिकांचीही चौकशी केली जात होती. डीआरआयच्या अधिकाऱ्यांना या हेरॉईनच्या संदर्भात गुप्त माहिती मिळाली होती आणि त्यानंतर ही कारवाई करण्यात आली.
दिवाळीपासून राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मान आणि मणक्याच्या त्रास जाणवत आहे. त्यामुळे ते आज गिरगावातील एच एन रिलायन्स रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाले आहेत. त्यांना 19 व्या मजल्यावरील विशेष कक्षात दाखल करण्यात आलं आहे. उद्या सकाळी त्यांची वरिष्ठ आर्थो सर्जन यांच्या सल्ल्याने विविध वैद्यकीय चाचण्या करण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे. मुख्यमंत्र्यांवर केल्या जाणाऱ्या चाचण्यांचे रिपोर्ट आल्यानंतर रुग्णालयातील वरिष्ठ डॉक्टर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करतील. त्यानंतरच मानेच्या दुखण्यावर शस्त्रक्रिया करायची की नाही याचा निर्णय घेतला जाईल. उद्धव ठाकरे यांना मागील काही दिवसांपासून मणका आणि मानेच्या स्नायूंचा त्रास होत आहे. त्यासाठी त्यांनी गेल्या सोमवारी गिरगावातील सर एच. एन. रिलायन्स हॉस्पिटलमध्ये आरोग्य तपासणी केली होती. तसेच यावेळी त्यांनी काही शारीरिक चाचण्या ही केल्या होत्या.
मुंबई गोवा महामार्गावरील लोटेमाळ येथे भरधाव डंपरने दुचाकीला धडक दिल्याने अपघात झाला. या अपघातात दुचाकीवरील तरुणी डंपरखाली चिरडल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. या अपघातानंतर डंपर चालकाने घटनास्थळावरून पलायन केले.
मुंबई गोवा महामार्गावरील लोटेमाळ येथे भरधाव वेगातील डंपरने दुचाकीला धडक दिल्याने अपघात झाला. बुधवारी सायंकाळी 6.15 वा. सुमारास हा अपघात घडला. या अपघातात दुचाकीवरून निघालेले ताजुद्दीन परकर व रुकसार अस्लम चौगुले हे अपघातग्रस्त झाले. या अपघातात रुकसार चौगुले या तरुणीचा डंपरखाली चिरडल्याने जागीच मृत्यू झाला. यावेळी अपघाताची माहिती मिळताच मदत ग्रुपचे प्रसाद गांधी, तेजस मोरे, सिद्धेश शिर्के व विवेक बनकर यांनी घटनास्थळी धाव घेऊन मदत कार्य केले. या अपघातानंतर डंपर क्र. एम एच 08 ए पी 0826 च्या चालकाने घटनास्थळावरून गर्दीचा फायदा घेऊन पलायन केले.
खेडमध्ये एटीएम मधून निघाली बनावट नोट, पोलीस स्थानकात तक्रार दाखल
हीच ती नोट
खेड शहरातील नामांकित बँकेच्या ए टी एम मशीनमधून पैसे काढताना एका ग्राहकाला बनावट नोट मिळून आली. या प्रकरणी संबंधित तरुणाने बँक मँनेजरकडे तक्रार केल्यानंतर त्याने उडवाउडवीची उत्तरे दिल्याने या तरुणाने संबंधित प्रकारची तक्रार पत्रकारांच्या माध्यमातून पोलीस अधिकाऱ्यांकडे केली. या प्रकरणी खेड पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्याची प्रकिया सुरू आहे.
खेड शहरातील पोलीस स्थानकापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या एका मल्टि नॅशनल बँकेच्या शेजारी असणाऱ्या त्याच बँकेच्या ए टी एम सेंटरमधून एका ग्राहकाने बुधवारी सकाळच्या सुमारास पैसे काढले. यावेळी रस्त्याच्या बांधकामाचे काम करणाऱ्या कंपनीत कामला असलेल्या तरुणाचे शहरातील एक नामांकित मल्टि नॅशनल बँकेत खाते आहे. या खात्यातून त्याने बुधवरी सकाळी पैसे काढले. यावेळी त्या संबंधित तरुणाला या पैसामधून चक्क एक 100 रुपयाची नोट बनावट असल्याचे आढळून आली. या प्रकरणाची तक्रार त्या तरुणाने संबंधित बँकेच्या व्यवस्थापकाकडे केली असता त्याने त्याला उडवाउडवीची उत्तरे दिली. यामुळे संतापलेल्या तरुणाने शहरातील एका प्रसिद्ध टी व्ही चॅनेलच्या पत्रकारकडे तक्रार केली. यावेळी पत्रकारांनी संबंधित प्रकारची माहिती पोलीस अधिकाऱ्यांना दिली. या प्रकरणाची खातरजमा बँक व्यवस्थापकाकडे देखील केली असता त्याने या गोष्टीला दुजोरा दिला. या प्रकरणी आता खेड पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली असून खेड पोलीस पुढील कारवाई करत असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे ए टी एम मशीन मधून पैसे काढताना सावधान, आपल्याला मिळणाऱ्या नोटा नक्की खऱ्या आहेत का? असा प्रश्न जनतेसमोर उभा राहिल्यावाचून राहणार नाही.
छत्तीसगढ येथील सुकमा जिल्ह्यातील मराईगुडा येथील लिगांनापल्ली कॅम्पमध्ये CRPF जवनाने आपल्या सहकारी जवानांवर गोळीबार केला. या घटनेत तीन जवानांचा जागीच मृत्यू झाला तर 4 जवान जखमी झाले. मध्यरात्री 3.25 वा. सुमारास CRPF च्या 50 बटालियन कॅम्पमध्येही घटना घडली. रितेश रंजन या जवानानं मध्यरात्री 3 वाजून 25 वाजण्याच्या सुमारास आपल्या सहकारी जवानांवर गोळीबार केला आहे. या घटनेत 3 जवानांचा मृत्यू तर 4 जवान जखमी झाले आहेत. या जखमी जवानांवर तात्काळ भद्राचलम (Bhadrachalam Area Hospital) येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. मृत्यू झालेल्या जवानांची नावं धनजी राजीब मोंडल राजमणी कुमार यादव जखमी झालेल्या जवानांची नावं धनंजय केआर सिंह धर्मेंद्र के.आर. धर्मात्मा कुमार बग मलाया रंजन महाराणा
माहितीच्या अधिकारात मिळालेल्या माहितीनुसार भारतात तब्बल 33 लाखहुन अधिक मुले कुपोषित असून देशात सर्वाधिक कुपोषित मुलांच्या यादीत महाराष्ट्र 1 नंबर वर आहे. यामध्ये देशातील 34 राज्यांसाह केंद्र शासित प्रदेशाचा ही समावेश आहे.
पिटीआय या वृत्त संस्थेने दाखल केलेल्या माहितीच्या अधिकारात धक्कादायक माहिती समोर आली आहे. शासकीय आकड्यानुसार देशात सध्या 33 लाखाहून अधिक कुपोषित बालके असून त्यातील 17.7 लाख मुले ही गंभीररीत्या कुपोषित आहेत. गंभीर रित्या कुपोषित असणाऱ्या मुलांच्या संख्येत महाराष्ट्र, बिहार व गुजरात ही राज्ये अग्रस्थानी आहेत. या गोष्टीची माहिती महिला व बाल विकास मंत्रालयाने माहितीच्या अधिकारात दिली. यामध्ये त्यांनी देशातील 34 राज्य व केंद्र शासित प्रदेशात सुमारे 3323322 इतकी लहान मुले कुपोषित असल्याचे स्पष्ट केले. 14 ऑक्टोम्बर 2021 च्या आकडेवारीनुसार भारतात 17.76 लाख लहान मुले ही अत्यंत तर 15.46 लाख मुले अल्प कुपोषित आहेत. यावेळी माहितीच्या अधिकारात समोर आलेल्या माहितीनुसार देशात सर्वाधिक 6.16 लाख कुपोषित मुले ही महाराष्ट्रातील असून त्यामध्ये 157984 अल्प कुपोषित तर 458788 अत्यंत कुपोषित मुले आहेत. दुसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या बिहार मध्ये 457824 तर तिसऱ्या क्रमांकावर गुजरात असून त्या ठिकाणी 3.20 लाख मुले कुपोषित आहेत. तर इतर राज्यामध्ये आंध्र प्रदेश 267288, कर्नाटक 249463, उत्तरप्रदेश 1.86 लाख, तामिळनाडू 1.78 लाख, आसाम 1.76 लाख, तेलंगणा 152524 तर देशाच्या राजधानीत म्हंजेच दिल्लीत 1.17 लाख मुले ही कुपोषित आहेत.
बीड जिल्ह्यात गेल्या 4 दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप सुरू आहे. दोन दिवसांपूर्वीच बीड जिल्ह्यातीक आष्टीमध्ये एका एसटीचालकाने आत्महत्येचा प्रयत्न केला होता. त्यानंतर आज पुन्हा एकदा एका बसचालकाने विषारी औषध पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केल्याने एकच खळबळ उडाली आहे.
सणासुदीच्या दिवसात एस टी कर्मचाऱ्यांना आपल्या मागण्यांसाठी आंदोलन करावे लागत आहे. तरीही राज्य सरकार या आंदोलनाकडे दुर्लक्ष करत असल्याचे पहावयास मिळत आहे. यामुळे संतप्त झालेल्या अमोल कोकडकर या 35 वर्षीय एसबटी चालकाने, बीडच्या बसस्थानकातील आंदोलनस्थळी विषारी औषध पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. यावेळी अमोल यांनी विषारी औषध प्राशन केल्याचं लक्षात येताच बाजूला असलेल्या कर्मचाऱ्यांनी त्यांना तात्काळ एका मोटारसायकलवर बसवून जिल्हा रुग्णालयात हलवले आहे. सध्या त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असून प्रकृती चिंताजनक आहे. दोन दिवसांपूर्वीच बीड जिल्ह्यात कडा बस स्थानकावर बाळू महादेव कदम (वय 35) या चालकाने आत्महत्येचा प्रयत्न केला होता. तो आष्टी येथील रहिवासी आहे. आष्टी येथील बाळू महादेव कदम हे तीन वर्षांपासून आष्टी आगारात चालक पदावर कार्यरत आहेत. या पूर्वी ते अहमदनगर जिल्ह्यात कार्यरत होते. दुपारी आष्टी आगारातून जामखेड-पुणे बस ( MH 20,BL 2086 ) घेऊन ते निघाले. कडा बसस्थानकात बस चहापाण्यासाठी काही काळ थांबली. याच दरम्यान, चालक बाळू कदम यांनी बसस्थानक परिसरात विषारी द्रव्य प्राशन केले. राज्यभरात एसटी बसचालकांचा संप सुरू आहे, पण तरीही आष्टी बस स्थानक का सुरू आहे, या मागणीसाठी त्याने हे कृत्य केल्याचे समोर आले आहे. कदम यांच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहे
रत्नागिरी जिल्ह्यामधील लांजा तालुक्यातील कोट गावामध्ये घरातली कोंबड्यांच्या खुरड्यात शिरकाव केलेल्या बिबट्याला वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी आटोकाट प्रयत्न करून पिंजऱ्यामध्ये जेरबंद करण्यात यश मिळवले. शनिवारी मध्यरात्री २ वाजण्याच्या सुमारास वन विभागाने ही धाडसी कारवाई करत बिबट्याला जेरबंद केले.
लांजा तालुक्यातील कोट गावामध्ये एका घरात बिबट्याने शिरकाव केल्याची माहिती वन विभागाला प्राप्त झाली होती. वन विभागाने क्षणाचाही विलंब न करता तात्काळ घटनास्थळी धाव घेतली व बिबट्याला जेरबंद केले. विभागीय वन अधिकारी श्री. खाडे, सहाय्यक वन सरंक्षक श्री. निलख यांच्या मार्गदर्शनाखाली वन अधिकारी प्रियांका, लांजा येथील वनपाल आरेकर, पाली येथील वनपाल कांबळे व खेड येथील वनपाल श्री. सुरेश उपरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मध्यरात्री लांजा कोट गावी पोहोचून कोंबड्यांच्या खुरड्यात लपलेल्या बिबट्याला पिंजऱ्यामध्ये जेरबंद केले. वन विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी केलेल्या या धाडसी कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे. दरम्यान पिंजऱ्यामध्ये जेरबंद केलेल्या बिबट्याची वैद्यकीय तपासणी करून त्याला जंगलामध्ये सोडले जाणार असल्याची माहिती वन विभागाच्या वतीने देण्यात आली आहे.
खेड तालुक्यातील कुळवंडी येथील 100 ते 125 ग्रामस्थांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आज रविवार दिनांक 7 नोव्हेंबर रोजी खेड येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालयात पक्ष प्रवेश केला. यावेळी माजी आमदार संजय कदम, जिल्हाध्यक्ष बाबाजीराव जाधव, तालुका अध्यक्ष स. तु. कदम व नुकतेच शिवसेनेतून राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केलेले संदीप राजपुरे हे उपस्थित होते. यावेळी कुलवंडी ग्रा. प. चे सदस्य विष्णू निकम यांच्या सोबत शिंदेवाडी, देऊळवाडी, बौद्धवाडी, पिंपळवाडी, जांभुळगाव, लाववाडी आशा वाड्यातील बहुसंख्य लोकांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पक्ष प्रवेश केला. संपूर्ण गावाने बहुसंख्येने पक्षप्रवेश करून आपली ताकद दाखवून दिली आहे.
मुंबईतील कांदिवली पश्चिम येथील हंसा हेरिटेज या 15 मजली इमारतमधील 14 व्या मजल्याला संध्याकाळी 8.33 मिनिटांनी आग लागल्याची घटना घडली. या आगीत 2 जण गंभीर जखमी झाले होते. त्यांना उपचारासाठी शताब्दी रुग्णालयात नेले आसता रुग्णालय प्रशासनाने दोघांना मृत घोषित केले. या दुर्घटनेची माहिती मिळताच मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी घायनास्थळी धाव घेतली. ही आग विझवण्यासाठी 8 अग्निशामक बंबाद्वारे प्रयत्न सुरू होते. मिळालेल्या प्राथमिक महितीनुसार दिवाळीसाठी वापरण्यात येणाऱ्या पणत्यांद्वारे ही आग लागल्याचे बोलले जात आहे. घटनास्थळी दाखल झालेल्या अग्निशमन दलाच्या 8 गाड्यांच्या मदतीने 2 तासांच्या अथक परिश्रमानंतर आग विझवण्यात आली. घटनास्थळी पोहोचत मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी परिस्थितीचा आढावा घेतला. आग लागली तेव्हा काही लोक आत अडकले होते, त्यापैकी काही जखमी झाले आणि दोन जणांचा मृत्यू झाला. कांदिवलीतील आगीत दोन महिलांचा मृत्यू झाला, त्यातील एक 89 वर्षांची तर दुसरी 45 वर्षांची महिला आहे.
खेड शिवतर रोडवरील मुरडे येथे दुचाकीची इर्टीगा कारला धडक बसून झालेल्या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला. तर अन्य दोघे गंभीर जखमी झाले. या अपघातात प्रभाकर जबरे यांचा जागीच मृत्यू झाला. ते शहराजवळील भरणे नाका येथील लक्ष्मी मसाले या कंपनीत कामाला असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. या अपघातात जखमी झालेल्या अन्य दोघांची नावे मात्र समजू शकली नाहीत.
अहमदनगर जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयाच्या ICU विभागाला आग लागली. या आगीत रुग्णालयात उपचार घेणारे 5 रुग्ण होरपळून मृत्युमुखी पडल्याची घटना घडली आहे. या दुर्घटनेत मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. आग लागली त्यावेळेस रुग्णालयातील ICU विभागात सुमारे 20 रुग्ण उपचार घेण्यासाठी दाखल होते. या घटनेची माहिती मिळताच अग्निशामक विभागाने तात्काळ धाव घेऊन आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न सुरू केला. यावेळी ICU विभागात उपचारासाठी दाखल असलेल्या रुग्णांना डॉक्टर, नर्सेस व वार्डबॉय यांनी तात्काळ इतरत्र हलवण्यास सुरवात केली. ही आग इतकी भीषण होती की संपूर्ण रुग्णालय परिसरात धुराचे लोट पसरल्याचे पहावयास मिळत होते. या आगीचे नेमके कारण स्पष्ट झाले नसले तरी या दुर्घटनेत 5 रुग्णांनाचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. तर सुमते 14 ते 15 जण गंभीर जखमी झाल्याची भिती व्यक्त करण्यात येत आहे. या दुर्घटनेची महिती मिळताच अहमदनगर जिल्हा आपत्ती व्यवस्थापनेच्या टीमने घटनास्थळी धाव घेतली.
प्राप्तिकर विभागाच्या कारवाईत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मुलगा पार्थ पवार यांचे नरिमन पॉईंट येथील निर्मल बिल्डिंग कार्यालय व अजित पवार यांच्या आई, पत्नी, बहीण व जावई यांच्या वेगवेगळ्या 5 ठिकाणच्या मालमत्ता जप्त करण्याचे आदेश दिले आहेत. यामध्ये 1 साखर कारखाना व दिल्लीतील फ्लॅटसह इतर ठिकाणच्या तीन मालमत्ता जप्त करण्याचे आदेश दिल्याची माहिती समोर येत आहे. सुमारे 1000 कोटींच्या प्रॉपर्टीवर इनकम टॅक्स म्हणजेच प्राप्तिकर विभागाने जप्तीची कारवाई केल्याचे समोर येत आहे. या संदर्भात भाजप नेते किरीट सोमय्या यांनी ट्विट करत माहिती दिली.
बेनामी मालमत्ता व्यवहार प्रतिबंधक कायदा, 1988 अंतर्गत आयकर विभागाने राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या सहकारी साखर कारखान्यासह चार मालमत्ता तात्पुरत्या जप्त केल्या आहेत. या मालमत्तांमध्ये एसएसके, गोव्यातील एक रिसॉर्ट, एक कार्यालय आणि दिल्लीतील निवासी मालमत्तेचा समावेश आहे. . वृत्तानुसार, आयकर विभागाने राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्याशी संबंधित 1,000 कोटी रुपयांच्या मालमत्तेची विविध राज्यांतील मालमत्ता जप्त करण्याचे आदेश दिले आहेत. प्राप्तिकर विभागाने संपूर्ण महाराष्ट्रात 27 जमिनी तात्पुरत्या स्वरूपात जप्त केल्या आहेत. या जमिनीची एकत्रित किंमत सुमारे 500 कोटी एवढी आहे. या सर्व मालमत्ता अजित पवार आणि त्यांच्या कुटुंबातील इतर सदस्यांच्या मालकीच्या असल्याचं समजतं.
यामध्ये जरंडेश्वर साखर कारखाना ज्याचा बाजारभाव 600 कोटी रुपये, साऊथ दिल्लीमधील फ्लॅट ज्याचा बाजारभाव 20 कोटी, पार्थ पवार यांचे निर्मल ऑफिस बाजारभाव 25 कोटी रुपये, निलय नावाचे गोव्यातील रिसॉर्ट ज्याचा बाजारभाव 250 कोटी रुपये असून महाराष्ट्रातील वेगवेगळ्या 27 ठिकाणच्या जमिनी ज्यांची बाजारभावाने किंमत सुमारे 500 कोटी रुपये आहे. आयकर विभागाने 7 ऑक्टोम्बर रोजी वेगवेगळ्या 70 पेक्षा जास्त ठिकाणी धाडी टाकत 184 कोटी रुपयाच्या बेहिशोबी संपत्तीची माहिती मिळवली होती. दरम्यान, आयकर विभागानं अजित पवारांची हजारो कोटींची मालमत्ता अटॅच केली आहे. अशातच उपमुख्यमंत्री अजित पवारांना आयकर विभागाकडून 90 दिवसांचा अवधी देण्यात आला आहे. या कालावधीत अजित पवारांना अटॅच करण्यात आलेली संपूर्ण संपत्ती गैरमार्गानं कमावलेली नसल्याचं सिद्ध करावी लागणार आहे. त्यासाठी त्यांना योग्य कागदपत्र सादर करावी लागणार आहेत.
मनी लाँड्रीग प्रकरणात महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची सक्तवसुली संचलनालयाने म्हणजेच ईडीने 12 तासाहून अधिक काळ चौकशी केल्यानंतर त्यांना अटक केली. मंगळवारी सकाळी 11 वाजता त्यांना न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे. ईडी कडून 5 समन्स बाजावल्यानंतर सोमवारी ते ईडी कार्यालयात हजर झाले. यावेळी त्यांचे वकिलही त्यांच्या सोबत उपस्थित होते. या प्रकरणी त्यांचा जवाब देखील नोंदवून घेतल्याचे समोर येत आहे.
100 कोटींच्या कथित खंडणी रॅकेटशी संबंधित मनी लाँड्रीग प्रकरणात महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची 12 तासांहून अधिकचौकशी केल्यानंतर सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) सोमवारी रात्री उशिरा अटक केली. त्यांनी सांगितले की, 71 वर्षीय देशमुख यांना प्रिव्हेन्शन ऑफ मनी लाँडरिंग कायद्याच्या (पीएमएलए) तरतुदी नुसार अटक करण्यात आली आहे. ईडीने असा दावा केला की राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अनिल देशमुख चौकशीदरम्यान टाळाटाळ करत होते. त्यांनी या पूर्वी 5 वेळेस चौकशीसाठी हजार राहण्यास टाळाटाळ केली. गेल्या आठवड्यात मुंबई उच्च न्यायालयाने इडीचे समन्स रद्द करण्यास नकार दिल्याने सोमवारी माजी गृहमंत्री आनिल देशमुख चौकशीसाठी आपल्या वकिलांसह हजर झाले. सीबीआयने मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या विरोधात 100 कोटींच्या वसुली प्रकरणी गुन्हा दाखल केल्यानंतर माजी गृहमंत्री अनिल देशमुख व इतरांच्या विरोधात मणी लँडिंगचा खटला उघड झाला. आज मंगळवारी सकाळी त्यांना येथील स्थानिक न्यायालयात हजर केल्यानंतर एजन्सी ( ईडी ) त्याची कोठडी मागणार आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील जयगड येथील नाविद 2 ही मासेमारी करणारी नौका 26 ऑक्टोबर रोजी मासेमारीसाठी समुद्रात गेली होती. मात्र 5 दिवस उलटूनही बोटीवरील कोनाशीही संपर्क न झाल्याने बोटीचे मालक नासिर हुसेन मिया संसारे यांनी जयगड पोलीस स्थानकात तक्रार दिली. या बोटीचा शोध घेण्यासाठी स्थानिक मच्छिमारांनी शोध मोहीम सुरू केली आहे. यासह प्रशासनाच्यावतीने तीन स्पीड बोटी, कोस्टगार्डची एक स्पीड बोट व काही खासगी बोटी युद्ध पातळीवर शोधकार्य करीत आहेत. या बोटीवर तांडेल दगडू, गोविंद, दत्ता, अमोल, सूर्या व अनिल असे साखरी आगर येथे राहणारे खलाशी आहेत. नाविद 2 या बोटीबाबत कोणालाही काही माहिती मिळाल्यास जयगड पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन देखील करण्यात आले आहे.
जगातील सर्वात प्रसिद्ध सोशल नेटवर्किंग अँप म्हणून ओळखल्या जाणाऱ्या फेसबुकचे नाव बदलून आता मेटावर्स म्हणून ठेवले आहे. या नव्या नावाची घोषणा फेसबुकचे सीईओ मार्क्स झुकरबर्ग यांनी केली आहे. या नव्या नावासह कोणते बदल होणार, कोणते नवे तंत्रज्ञान वापरले जाणार या बाबत स्पष्टीकरण देण्यात आले नाही. मात्र मिळालेल्या माहितीनुसार फेसबुकमध्ये कोणत्याही प्रकारचे बदल होणार नाहीत. तिची ऑपरेटिंग सिस्टिम व गाईडलाईन देखील पहिल्या सारखीच राहणार आहे. याचा व्हाट्स अँप व इन्स्टाग्रामवर कोणताही परिणाम होणार नसल्याचे सीईओ मार्क्स झुकरबर्ग यांनी स्पष्ट केले आहे. फेसबुक हे केवळ सोशल मीडिया अँप म्हणून ओळखले न जाता टेकनोलॉजि कंपनीच्या रूपात ओळखली जावी यासाठी नाव बदलल्याचे समोर येत आहे. तसेच मेटावर्सवर अधिक लोकांना जोडता येणार असून नवीन टेक्नॉलॉजि व काही प्रॉडक्ट्स ची विक्रीही आता मेटावर्स वरून करता येणार आहे. तसेच या प्लॅटफॉर्मवर युझर्सच्या प्रयवेसीलाही सुरक्षा दिली जाणार आहे.
मान्सूनच्या परतीनंतर राज्यात पावसाने उसंत घेतली आहे. पण आता राज्यात पुन्हा एकदा पावसासाठी पोषक हवामान निर्माण होतं आहे. त्यामुळे नोव्हेंबरची सुरुवात पावसाने होणार आहे. हवामान खात्याने 1 आणि 2 नोव्हेंबर रोजी राज्यात काही ठिकाणी पावसाचा इशारा दिला आहे. 1 आणि 2 नोव्हेंबर रोजी हवामान खात्याने दक्षिण कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाचा इशारा दिला आहे. सोमवारी 1 नोव्हेंबर रोजी रत्नागिरी, सातारा, सिंधुदुर्ग, सांगली आणि कोल्हापूर या पाच जिल्ह्यात येलो अलर्ट (Yellow Alert) जारी केला असून याठिकाणी मेघगर्जनेसह मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. तर रायगड, सोलापूर आणि पुण्यातही तुरळक ठिकाणी पावसाच्या सरी कोसळणार आहेत. मंगळवारी राज्यात पावसाची व्याप्ती आणखी वाढण्याची शक्यता आहे. मंगळवारी 2 नोव्हेंबर रोजी राज्यात रत्नागिरी, सातारा, सिंधुदुर्ग, सांगली आणि कोल्हापूर या पाच जिल्ह्यांना पुन्हा येलो अलर्ट जारी केला आहे. यासोबतच पुणे, रायगड, सोलापूर, उस्मानाबाद, लातूर आणि नांदेड या जिल्ह्यांत देखील तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. त्यामुळे संबंधित परिसरात राहणाऱ्या स्थानिक नागरिकांना आणि शेतकऱ्यांनी सतर्क राहण्याचा सल्ला हवामान तज्ज्ञांकडून देण्यात आला आहे. दक्षिण-पूर्ण बंगालच्या उपसागरात 4 ते 10 नोव्हेंबर दरम्यान हवेच्या कमी दाबाचं क्षेत्र सक्रीय होणार आहे. पण हे कमी दाबाचं क्षेत्र तीव्र न होता, सामान्य अवस्थेतचं पश्चिम दिशेनं पुढे सरकणार आहे. त्यामुळे दक्षिण भारतात अनेक ठिकाणी विजांच्या कडकडासह जोरदार पावसाची शक्यता आहे. याचाच परिणाम म्हणून महाराष्ट्रात देखील तुरळक ठिकाणी पावसाच्या सरी कोसळणार आहेत.
आज संपूर्ण राज्यात एस टी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी संपाची घोषणा केली. यामुळे महाराष्ट्राची जीवनवाहिनी म्हणून ओळखली जाणारी एस टी वाहतूक ठप्प झाली. याचा फटका प्रवाशांसह ग्रामीण भागातून शहरात शिक्षणासाठी येणाऱ्या विधयार्थ्याना बसला. एस टी कर्मचाऱ्यांनी त्यांच्या प्रमुख मागन्यासाठी ऐन दिवाळीच्या तोंडावर संप पुकारला आणि महाराष्ट्राची जीवनवाहिनी ठप्प झाली. यामुळे एस टी कर्मचाऱ्यांच्या पुढील प्रमाणे असणाऱ्या मागण्या शासनाने मान्य करून एस टी कर्मचार्यांसह प्रवाशांना दिलासा द्यावा. अशी मागणी रत्नागिरी जिल्हा काँग्रेसचे सचिव जमीर माखजणकार यांनी केली आहे. यामध्ये एस टी महामंडळाचे 100 % राज्य शासनामध्ये विलिगिकरण करावे या प्रमुख मागणीसह दिवाळी बोनस हा 15 हजार रुपये व राज्य सरकारी कर्मचार्याप्रमाणे महागाई भत्ता व 3% या प्रमाणे पगारवाढ व 9% प्रमाणे घरभाडे मिळावे या एस टी कर्मचाऱ्यांच्या प्रमुख मागण्या आहेत.
खेड तालुक्यातील एका मोठ्या राजकीय पक्षाच्या माजी ऊपतालुका प्रमुखाला गेल्या गुरुवारी खारघर पोलिसांनी अटक केले असल्याचे खात्रीलायक वृत्त सूत्रांकडून प्राप्त झाले आहे. या पंचायत समितीच्या माजी सदस्याने चक्क आपल्या मुलाच्या सासऱ्याची सासूच्या संगनमताने फसवणूक करून लाखो रुपये गडप केल्याची चर्चा सध्या सर्वत्र होत आहे.
विशेष सूत्रांकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार खेड तालुक्यातील वाळूचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भागातील एका माजी ऊपतालुका प्रमुखाने आपल्या स्वतःच्याच मुलाच्या सासूला हाताशी धरून सासऱ्याची लाखो रुपयांची प्रॉपर्टी हडप करण्याचा डाव आखला होता. मुलाच्या सासूचे देखील यामध्ये तितकाच सहभाग असल्याची तक्रार तिच्या नवऱ्याने अर्थात या माजी ऊपतालुका प्रमुखांच्या मुलाच्या सासऱ्याने खारघर पोलिसात दिली होती. याच तक्रारीच्या अनुषंगाने या माजी ऊप तालुका प्रमुखाला व तक्रारदाराची बायको म्हणजेच मुलाची सासू या दोघांना खारघर पोलिसांनी ताब्यात घेऊन अटक केल्याचे वृत्त सध्या प्राप्त झाले आहे. या फसवणुकीच्या प्रकारात मुंबई येथील एका नामांकित बिल्डरचा देखील समावेश असून सध्या तो फरार असल्याचे समजते. सध्या अटक असलेल्या दोघांनीही जामीन मिळवण्यासाठी खटाटोप सुरू ठेवला असून अजूनही त्यांना जामीन मिळाला नसल्याचे समजते. मुंबईतील एका अपार्टमेंट तक्रारदाराचा फ्लॅट असून या फ्लॅटमध्ये तक्रारदार हा एकटाच राहत होता. त्याच्या पत्नीच्या मानसिक त्रासाला कंटाळून तक्रारदार हा पत्नीला दापोलीत ठेवून स्वतः मुंबई येथील फ्लॅटमध्ये वास्तव्य करत होता. दरम्यानच्या काळात तक्रादर याची बहीण आजारी असल्याने तक्रारदार हे आपल्या फ्लॅटला कुलूप लावून आपल्या बहिणीकडे 4 दिवस राहण्यासाठी गेले आणि नेमक्या याच संधीचा फायदा उचलून संशयित तीन आरोपींनी फ्लॅटचे कुलूप तोडून त्या फ्लॅटमधील तब्बल 2 लाखांचे साहित्य आणि घराची कागदपत्रे चोरली व नंतर त्या कागदपत्रांमध्ये फेरफार करून तो फ्लॅट फक्त तक्रारदाराच्या पत्नीच्या नावे असल्याची बनावट कागदपत्रे तयार करून रुपये 5 लाखांच्या डिपॉझिट वरती तो भाडेकरराने देण्यात आला. तक्रारदार जेंव्हा बहिणीच्या घरातून आपल्या फ्लॅटकडे परतला त्यावेळी त्यांना फ्लॅटमध्ये येण्यास मज्जाव करण्यात आला त्यावेळी तक्रारदार यांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्यानंतर तक्रारदाराने या फ्लॅटचे विजमिटर नोंदणी ही आपल्याच नावाने झाली आहे याची सर्व कागदपत्रे जमवली व त्याच बरोबर या फ्लॅटची रक्कम बिल्डरला कशा पद्धतीने पोहोच केली याचे पुरावे जमवून याबाबतीत थेट पोलीस ठाण्यात तक्रार केली. तक्रार दाखल झाल्यानंतर संबंधित तीन संशयितांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करून तीन पैकी दोन संशयित आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेत अटक केल्याचे वृत्त सध्या प्राप्त झाले आहे. दरम्यान संशयित आरोपी जो खेडचा ऊपतालुका प्रमुख आहे. त्याने तक्रारदाराला यापूर्वी ठार मारण्याची धमकी देखील दिली असल्याची नोंद तक्रारदाराने आपल्या तक्रारीत नमूद केली आहे. खेड तालुक्यात नेहमी राजकीय वर्तुळात वावरणारा संबंधित माजी ऊपतालुका प्रमुख हा ठेकेदार म्हणून देखील ओळखला जातो. काही वर्षांपूर्वी त्याने सक्शन पंपाद्वारे वाळू उपश्याचा धंदा देखील सुरू केला होता. परंतु प्रशासकीय अधिकाऱ्यांनी त्यावेळेस त्याचा सक्शन पंप पाण्यात बुडवून त्याचा धंदाच बंद पाडला होता. या ठेकेदाराने खेड तालुक्यातील एका मुख्य प्रशासकीय इमारतीचे बांधकाम केले तेच बांधकाम दर्जाहीन असल्याचे या वर्षीच्या पावसाळ्यात उघडकीस देखील आले. पण दर्जाहीन बांधकाम करणाऱ्या या ठेकेदारावर प्रशासनाने आजवर मात्र कोणतीच कारवाई केली नव्हती, कारण या ठेकेदाराच्या डोक्यावर भाई-दादा यांचे आशीर्वाद असल्याचे देखील बोलले जाते. पण आता या फसवणुकीच्या प्रकरणात या माजी ऊपतालुका प्रमुखांला कोणाचाच आधार मिळाला नसल्याची चर्चा आहे. खेड शहरात ज्या ठिकाणी हे माजी ऊपतालुका प्रमुख राहतात त्याच ठिकाणी त्यांचा मुलगा येणाऱ्या नगर परिषद निवडणुकीत उभा राहणार असल्याची चर्चा होत असतानाच त्यांना पोलिसांच्या कारवाईला सामोरे जावे लागल्याचे चर्चिले जात आहे. तक्रारदाराच्या पत्नीने संशयित आरोपीला का साथ दिली, संशयित आरोपी बिल्डरने देखील या प्रकरणात संबंधितांना का साथ दिली, या प्रश्नांची उत्तरे अजूनही मिळाली नसली तरी मुलाच्या सासूला हाताशी धरून मुलाच्या सासऱ्याला चुना लावून त्याला बेघर करणाऱ्या या माजी ऊपतालुका प्रमुखांची सध्या सगळीकडेच जोरदार चर्चा सुरू आहे.
भारतीय मराठा महासंघांच्या खेड तालुक्यांतील मेळाव्यात अध्यक्ष अप्पासाहेब पुंडलिक आहेर यांनी राष्ट्रवादी कॅाग्रेस पक्षाचे अध्यक्ष श्री. शरद पवार यांच्याबाबत बेताल वक्तव्य केले. २३ ॲाक्टोबर रोजी खेड तालुक्यांतील लोटे येथे झालेल्या या मेळाव्याला उपस्थित असलेले राष्ट्रवादी कॅाग्रेसचे माजी आ. संजयराव कदम व राष्ट्रवादीचे नगरसेवक अजय माने यांनी या वक्तव्यावर आक्रमक भुमिका घेत अप्पासाहेब आहेर यांनी मागितल्या शिवाय कार्यक्रमातून हलणार नाही अशी भुमिका घेतली. यावेळी या मेळाव्यात सर्व समाज बांधवासमोर माजी आमदार संजय कदम व अजय माने यांनी जाब विचारत आक्रमक भुमिका घेत त्यांच्या वक्तव्याचा निषेध केला. यावेळी भारतीय मराठा महासंघांचे अध्यक्ष अप्पासाहेब आहेर यांनी देशाचे नेते व राष्ट्रवादी कॅाग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबाबत केलेले वक्तव्य ही अक्षम्य चूक असून त्याची नैतिक जबाबदारी स्विकारून अप्पासाहेब आहेर यांनी भारतीय मराठा महासंघाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला.
मनसे अध्यक्ष श्री. राज ठाकरे यांना कोरोना संसर्गाची लागण झाली असून त्यांच्यासह त्यांच्या आई मधूवंती ठाकरे यांना कोरोनाची लागण झाल्याचे शुक्रवारी स्पष्ट झाले होते. या नंतर त्यांच्या कुटूंबियांनी कोरोना तपासणी केल्यानंतर राज ठाकरे यांची कोरोना चाचणी पॅाझिटिव्ह आली. या दोघांनाही सौम्य प्रकारची लक्षणे असल्यामुळे घरीच त्यांच्यावर उपचार करण्यात येणार आहेत.
राज्यात महिलांवर होणाऱ्या अत्याचाराचे प्रमाण वाढले आहे. यामुळे मा. पोलीस आयुक्त मुबंई यांनी परिपत्रकाव्दारे निर्भया पथक कार्यन्वत करण्याचे आदेश दिले होते. या आदेशाची अंमलबजावणी होणे गरजेचे असल्याचे मत नुतन अध्यक्ष रूपाली चाकणकर यांनी व्यक्त केले आहे. यासाठी महिला आयोग पोलीस स्थानकांना सरप्राईज व्हिजीट देणार असून यावेळी निर्भया पथक कार्यरत आहेत की नाहीत याची पाहणी करण्यात येणार असल्याची माहिती महिला आयोगाच्या नुतन अध्यक्ष रूपाली चाकणकर यांनी दिली.
राज्यातील शाळा सरसकट सुरू करण्याचा प्रयत्न सुरू असून पहिली ते चौथीचे वर्ग सुरू करण्यासाठी शिक्षण विभागाचे अधिकारी सकारात्मक असल्याचे दिसून येत आहे. राज्यातील सर्व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसमवेत राज्य शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी बैठक घेत चर्चा केली. यावेळी शिक्षण विभागाचे अधिकारी सरसकट शाळा सुरू करण्यास सकारात्मक असल्याचे दिसून आले. मात्र शाळा सुरू करण्याबाबत अंतिम निर्णय हा मुख्यमंत्री, मंत्रिमंडळ व टास्क फोर्सच्या बैठकीत होण्याची शक्यता आहे. तसेच राज्यातील जि. प. शाळांचा शैक्षणिक आणि भौतिक विकास साधता येण्यासाठी शासनाने “आर्दश शाळा” हा महत्वपुर्ण उपक्रम हाती घेतला असून यामध्ये प्रत्येक जि. प. च्या CEO ने लक्ष घालण्याचे निर्देश राज्य शिक्षणमंत्र्यांनी दिले आहेत.
पुणे जिल्ह्यातील शिरुर तालुक्यामधील पिंपरखेड येथे भर दिवसा दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास बॅंक ॲाफ महाराष्ट्रवर दरोडा पडला. यावेळी दरोडेखोरांनी बंदुकीचा धाक दाखवत बँकेतील 31 लाख रुपये रोकड तसेच 2 कोटी रुपयांचे सोने पळवून नेल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. संबंधित प्रकार हा बँकेच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. काळ्या रंगाचे कपडे परिधान केलेले जवळपास पाच आरोपी हे बँकेत शिरले. ते चारचाकी वाहनातून आले होते. त्यांनी तोंड बांधलं होतं. ते बँकेत शिरले तेव्हा त्यांनी बँकेतील कर्मचाऱ्यांना बंदुकीचा धाक दाखवत सर्व कॅश पिशवित भरुन द्यायला सांगितली. तसेच त्यांनी बँकेच्या लॉकरमधील सर्व सोनं पिशवीत भरुन चारचाकी गाडीतून पळून गेले.
कोकणातील रासायनिक उद्योगासाठी प्रसिद्ध असणाऱ्या लोटे एमआयडीसी येथील सीईटीपी याठिकाणी महाराष्ट्रातील पहिल्या एअर मॉनेटरिंग युनिट अर्थात हवा प्रदूषण नियंत्रण या अद्यावत प्रणालीचे आज राज्याचे उद्योग मंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते उदघाटन पार पडले.
या कार्यक्रमाला सीईटीपीचे चेअरमन डॉ. सतीश वाघ यांच्यासह गुहागर मतदार संघाचे आमदार भास्कर जाधव, चिपळूण-संगमेश्वर मतदार संघाचे आमदार शेखर निकम यांच्यासह जिल्ह्यातील सर्व शासकीय विभागाचे प्रमुख अधिकारी व लोटे एमआयडीसी येथील उद्योजक उपस्थित होते. गेल्या अनेक वर्षांपासून रत्नागिरी जिल्ह्यातील लोटे एमआयडीसी परिसरात वायू प्रदूषण होत असल्याच्या वारंवार जिल्हा प्रशासनाकडे तक्रारी प्राप्त होत होत्या. या तक्रारीच्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाने लोटे येथील सीईटीपीचे चेअरमन डॉ. सतीश वाघ यांना याबाबत उपाययोजना करण्यासाठी विनंती केली होती. प्रशासनाने केलेल्या विनंतीचा मान ठेवून डॉ. सतीश वाघ यांनी महाराष्ट्रातील पहिला एअर मॉनेटरिंग युनिट याठिकाणी उभारले. एअर मॉनेटरिंग युनिट हे परदेशातून मागवण्यात आले असून यासाठी ७५ लाख रुपयांचा खर्च करण्यात आला आहे. आज या यंत्रणेचे उदघाटन झाले असून इथून पुढे वातावरणातील हवा प्रदूषित करणारे आता या यंत्रणेच्या माध्यमातून उघडकीस येणार आहेत.
उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी या यंत्रणे बाबत डॉ. सतीश वाघ यांचे कौतुक केले व एमआयडीसी येथील सर्व उद्योजकांना शक्य तितके प्रदूषण टाळण्याचे आवाहन केले. या कार्यक्रमाचे औचित्य साधून डॉ. सतीश वाघ यांनी महापुरात उध्वस्त झालेल्या तीन कुटुंबांना प्रत्येकी एक लाख रुपये याप्रमाणे तीन लाखांचे धनादेश उद्योग मंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते वितरित करण्यात आले. त्याच बरोबर मच्छिमारांना मच्छिमारी साठी आवश्यक साहित्याचे वाटप देखील यावेळी करण्यात आले.
सातारा येथील हिरकणी ग्रुपच्या ९ महिला सदस्यांनी नवरात्रोत्सवा निमित्त आदीशक्तीच्या साडेतीन शक्तीपिठांचे दर्शन घेण्याची मोहीम राबवली होती. यासाठी या सर्व महिलांना १ हजार ६८६ किमीचा प्रवास करावा लागणार होता. या प्रवासाठी १० ॲाक्टोबरला सुरवात केली होती. कोल्हापूर येथील महालक्ष्मी व त्यानंतर तुळजापूरच्या तुळजाभवानीचे दर्शन घेवून माहूर गडावरील रेणुका मातेच्या दर्शनाला निघाल्या होत्या. यावेळी नांदेड जवळील अर्धापूर तालुक्यांतील दाभड भोकरफाटा येथे जी जे १२ ए टी ६९५७ या टॅंकरने दुचाकीला धडक दिली. यावेळी दुचाकीवरून प्रवास करणाऱ्या ३२ वर्षीय शुभांगी पवार या खाली पडल्या यावेळी टॅंकर त्यांच्या डोक्यावरून गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.
तब्बल ६८ वर्षानंतर एअर इंडियाची घर वापसी झाली असून त्याची मालकी आता टाटा समूहाकडे परत आली आहे. यावेळेस रतन टाटा यांनी WELCOME BACK AIR INDIA असे ट्विट करत एअर इंडियाचे स्वागत केले आहे. एअर इंडियाचे जनक जेआरडी टाटा यांनी जगतील सर्वाधिक प्रतिष्ठित विमान कंपनी बनवली होती. आता टाटा समूहाला एअर इंडियाची ही ओळख परत मिळवून देण्याची संधी मिळाली आहे. मात्र त्यासाठी खूप कष्ट घ्यावे लागणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
नवरात्रौत्सवाला आजपासून सुरुवात झाली आहे. तसंच राज्यातील मंदिरंही आजपासून उघडण्यात आली आहे. मात्र अशावेळी कोल्हापूरातील अंबाबाई मंदिरात बॉम्ब ठेवल्याचा निनावी फोन आला. त्यामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली. कोल्हापूर पोलिसांसह बॉम्बशोधक पथक मंदिरात दाखल झाले. त्यांच्याकडून मंदिराचा कानाकोपऱ्यात शोध घेण्यात आला. खबरदारीचा उपाय म्हणून संपूर्ण मंदिर परिसर रिकामा करण्यात आला. मात्र, बॉम्बशोधक पथकानं संपूर्ण मंदिर परिसरात पाहणी केल्यानंतर अशी कुठलीही वस्तू किंवा पदार्थ मिळून आला नसल्याचं स्पष्ट झालं आहे. अंबाबाई मंदिरात बॉम्ब ठेवल्याचा निनावी फोन पणजी (गोवा) कंट्रोल रुमला आला होता. या फोनमुळे मंदिर परिसरात एकच खळबळ उडाली होती. फोनवरुन ही माहिती मिळताच मंदिर प्रशासनाने भाविकांसाठी मंदिर तात्काळ बंद केलं. त्यानंतर बॉम्ब शोधक पथकाकडून संपूर्ण मंदिर परिसराची तपासणी करण्यात आली. त्यावेळी बॉम्ब किंवा बॉम्ब सदृश्य कोणतीही वस्तू सापडली नाही. त्यावेळी सर्वांनीच सुटकेचा निश्वास सोडला. अखेर फोन कॉल बोगस असल्याचं सिद्ध झालं आहे. त्यानंतर भाविकांसाठी मंदिर पुन्हा एकदा खुलं करण्यात आलं आहे.
दापोली विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार संजय कदम व खेडचे नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांनी भरणे नाका येथे पत्रकार परिषद घेत रामदास कदमांनी किरीट सोमय्यांना परिवहन मंत्री अनिल परब यांना प्रसाद कर्वे यांच्या मार्फत माहिती पुरवल्याच्या ॲाडिओ क्लिप सादर केल्या.
दक्षिण सोलापूरमधील अंत्रोळी गावचे पत्रकार समीर शेख यांना मनुष्यबळ विकास अकादमी रजिस्टर ट्रस्ट या संस्थेकडून राज्यस्तरीय आदर्श पत्रकार ‘दर्पणरत्न’ पुरस्काराने मंगळवारी आँनलाईन कार्यक्रमाच्या माध्यमातून सन्मानित करण्यात आले. पत्रकारितेच्या क्षेत्रात सातत्याने विधायक कार्य केल्याने त्यांना राज्यस्तरीय आदर्श पत्रकार ‘दर्पणरत्न’ पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. या पुरस्कारासाठी त्यांची निवड केल्याबद्दल त्यांनी मनुष्यबळ विकास अकादमी रजिस्टर ट्रस्ट या संस्थेचे समीर शेख यांनी आभार मानले आहेत.
शिवसेना नेते, परिवहन मंत्री व रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री अनिल परब यांची मंगळवारी सकाळी 11 वाजलेपासून सायंकाळी 7 वाजेपर्यंत ईडीकडून चौकशी करण्यात आली. यावेळी त्यांनी ईडीच्या अधिकाऱ्यांना सर्व प्रश्नाची उत्तरे दिल्याचे सांगत येथुन पुढे ही सहकार्य करणार असल्याचे स्पष्ट केले. पाहूया काय म्हणाले अनिल परब…
कोरोना लसीकरण मोहिमे अंतर्गत 10 लाख लसीकरणाचे डोस पूर्ण झाले आहेत. पाहिला आणि दुसरा असे दोन्ही मिळून 10 लाख रत्नागिरीकरांच्या लसीकरणाचा टप्पा जिल्ह्याने ओलांडला आहे. यामध्ये 6 लाख 98 हजार 995 जणांनी पाहिला तर 3 लाख 3 हजार 922 जणांनी दुसरा डोस घेतला आहे. जानेवारी 2021 पासून सुरू झालेल्या लसीकरण मोहिमेअंतर्गत 27 सप्टेंबर 2021 पर्यंत 10 लसीच्या मात्राचे वितरण पूर्ण झाले. या लसीकरणात कोविशिल्ड लसीची पहिली मात्रा 5 लाख 77 हजार 463 तर दुसरी मात्रा 2 लाख 19 हजार 977 जणांनी घेतली. तसेच कोव्हॅक्सीन लसीची पहिली मात्रा 1 लाख 21 हजार 532 तर दुसरी मात्रा 83 हजार 948 जणांनी घेतली. सरासरी 64 टक्के रत्नागिरीकरांनी लसीची पहिली तर 28 टक्के रत्नागिरीकरांनी लसीची दुसरी मात्रा घेतल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात येत आहे.
नांदेड नागपूर मार्गावर प्रवास करणारी बस उमरखेड येथे पुराच्या पाण्यात वाहून गेली. या बसमध्ये 5 प्रवाशी प्रवास करत होते. त्यामधील 3 जणांना वाचवण्यात स्थानिक नागरिकांना यश आले आहे. तर 2 जण अद्यापही बेपत्ता आहेत. पुराचे पाणी रस्त्यावर असताना चालकाने ही बस पाण्यात टाकल्याने अपघात घडल्याचा प्रकार निदर्शनास येत आहे.
नागपूर नांदेड मार्गावर प्रवास करणारी बस क्र. एम एच 14 बी टी 5018 ही उमरखेड हून पुसदकडे निघाली होती. यावेळी बसमध्ये चालक वाहकासह एकूण 5 जण प्रवास करत असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. हवामान खात्याच्या इशाऱ्यानुसार सोमवारी सायंकाळ पासूनच विदर्भ व मराठवाड्याला पावसाने झोडपून काढले आहे. संततधार कोसळणाऱ्या पावसाने काही ठिकाणी नद्या नाल्यानं पूर आला आहे. उमरखेड शहराजवळील दहागाव पुलावर देखील पुराचे पाणी आले होते. या पुराच्या पाण्यातून बस नेण्याचा प्रयत्न महामंडळाच्या चालकाने केला. मात्र काही अंतरावर गेल्यानंतर ही बस रस्त्यावरून खाली कोसळली. यावेळी येथे उपस्थित असणाऱ्या स्थानिक तरुणांनी धाव घेऊन बसमधील प्रवाशांना वाचवले. या अपघाताचा लाइव्ह विडिओ खास टाइम्स मराठीच्या वाचकांसाठी…
खेड दापोली मार्गावरील फुरुस येथे xuv कारला अपघात झाला. फुरुस गावातील दयाळ फाटा येथे अपघात झाला असून दापोलीच्या दिशेने निघालेली कार रस्त्याशेजारी उलटून अपघात झाला. चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. या कारमधून प्रवास करणारे 5 ही प्रवाशी किरकोळ जखमी झाले आहेत. त्यांना फुरुस येथील एका खासगी रुग्णालयात येथील स्थानिकांनी हलवले आहे.
आपल्या रोखठोक व फटकेबाज भाषणामुळे नेहमीच चर्चेत असणारे अजित दादा पवार हे आज पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. बोलताना त्यांच्याकडून अनावधनाने चूक झाली आणि त्यांनी भर सभेत माफी मागितली.
सातारा जिल्ह्यातील वडूज येथे कोविड सेंटरच्या उदघाटन प्रसंगी ते बोलत होते. या कोविड सेंटरचे उदघाटन त्यांच्या हस्ते झाले. यावेळी बोलताना नेहमीप्रमाणे त्यांनी तुफान फटकेबाजी केली. मात्र यावेळी बोलताना अजित दादांनी ‘मी पाच वर्षे येथे जिल्हाधिकारी म्हणून काम केले असल्यामुळे अनेक जिवाभावाचे सहकारी लाभले” असे वक्तव्य केले. यावेळी त्यांनी पालकमंत्री ऐवजी जिल्हाधिकारी असे वक्तव्य केले. यावर भाषण सुरू असतानाच पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी “जिल्हाधिकारी नाही तर पालकमंत्री असे हवे” अशी चिठ्ठी पाठवली. अजित पवारांनी भाषण सुरू असताना ती चिठ्ठी वाचली, आणि मी जिल्हाधिकारी म्हणालो का? एवढा कुठे शिकलो मी, मी आपला पालकमंत्री होतो, असे स्पष्ट केले. खूप दिवसांनी एवढीशी चूक झाली मागे खूप मोठी चूक झाली होती. त्याची खूप मोठी किंमत चुकवावी लागली होती. त्यावेळी चव्हाण साहेबांच्या समाधी समोर बसलो आणि साहेब चुकलो, साहेब चुकलो असे म्हणालो, असे सांगताच उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. यानंतर थेट अजित दादांनी पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्याकडे पाहत हाथ जोडून साहेब चुकलो असे म्हणत भर सभेत चुकीची कबुली दिली. पाहूया नेमके काय म्हणाले अजित दादा पवार…..
• शहरी भागात इयत्ता 8 वी ते 12 पर्यंतचे वर्ग सुरु केले जाणार आहेत. • ग्रामीण भागात इयत्ता पाचवी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरु केले जाणार आहेत. • शाळा सुरु झाल्यानंतर मैदानामध्ये कोणत्याही खेळाला परवानगी नसेल. • शाळा सुरु करण्यात येत असल्या तरी विद्यार्थ्यांनी उपस्थित राहावे अशी सक्ती केली जाणार नाही. • तसेच विद्यार्थ्यांना शाळेत हजर राहायचे असेल तर त्यासाठी पालकांची संमती गरजेची असणार आहे. • शाळा सुरु झाल्यानंतर शिक्षकांच्या लसीकरणाकडे लक्ष दिले जाईल. तसेच शाळांमध्ये हेल्थ ट्रेनिंग दिली जाईल. • विद्यार्थी शाळेतून घरी गेल्यानंतर त्यांची काळजी घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे. • शक्य असेल तिथे एक दिवसाआड शाळा सुरु ठेवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. • शाळेत आलेल्या विद्यार्थ्याला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले तर त्याला आयसोलेशनमध्ये ठेवले जाणार आहे. • शाळा सुरु झाल्यानंतर शाळेमध्ये स्थानिक डॉक्टरांचे मोबाईल नंबर उपलब्ध करुन दिले जाणार आहेत. • शाळा सुरु तसेच बंद करण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडे पूर्ण अधिकार देण्यात आले आहेत. • शाळेत शिक्षक, कर्मचारी तसेच विद्यार्थ्यांना कोरोना नियम पाळण्याचे आवाहन केले जाणार आहे. नियम पाळूनच शाळा सुरु करण्यात येतील. • शाळा सुरु करण्यासाठी टास्क फोर्सने ज्या सूचना दिलेल्या आहेत, त्यांचे काटेकोरपणे पालन केले जाणार आहे. • शाळा प्रत्यक्ष सुरु झाल्यानंतर सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्याला प्राधान्य दिले जाईल.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद असलेल्या मंदिरांची दारे पुन्हा एकदा उघडणार असून भक्तांना देवाचे दर्शन घेता येणार आहे. 7 ऑक्टोबर पासून मंदिरे उघडण्यास परवानगी देण्याचा निर्णय राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला आहे. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी मंदिराची दारे उघडणार असून आरोग्याचे नियम पाळून भक्तांना देवाचे दर्शन घेता येणार आहे. 7 ऑक्टोबर पासून राज्यातील सर्व धर्मियांची प्रार्थनास्थळे आरोग्याचे नियम पळून उगण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला आहे.
महाबळेश्वर येथे एक अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्यात आला होता. यामधून संबंधित अल्पवयीन मुलगी गरोदर देखील राहिली होती. या पिडितेची प्रस्तुती देखील घरातच करण्यात आली होती. या प्रस्तुतीनंतर संबंधित नवजात बालकाला मुंबईत एकाला दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले असून त्यांना मदत करणाऱ्या सर्वांवर म्हणजेच तब्बल 13 जणांवर पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महाबळेश्वर येथील उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. शीतल खराडे यांना एका खबऱ्याकडून एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची माहिती मिळाली होती. यावेळी उपविभागीय अधिकाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन पिडितेची चौकशी केली. तिला विश्वासात घेऊन सर्व विचारपूस केली असता धक्कादायक महिती समोर आली. तसेच पीडित व तिच्या कुटुंबियाना संशयितांनी तक्रार करू नये म्हणून धमकी दिल्याची गोष्ट ही समोर आली. या प्रकरणी पोलिसांनी मुनारवळ हौसिंग सोसायटी मधून सागर उर्फ बाबा हणमंत गायकवाड व आशुतोष मोहन बिरामने या मुख्य आरोपींना ताब्यात घेतले आहे. या सर्व प्रकारातून जन्माला आलेल्या मुलीला शिवसेना नेते डी एम बावळेकर यांच्या सात्विक आणि योगेश या दोन मुलांनी कांदिवली मुंबई येथील सुनील चौरसिया यांच्याकडे सोपवण्यात मदत केली होती. यामुळे आरोपीला पाठबळ पुरवल्या प्रकरणी यांच्यावर देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या आधी ही महाबळेश्वरचे माजी नगराध्यक्ष व शिवसेना नेते बावळेकर यांचा मुलगा योगेश याच्यावर व्हाट्स अँपवर अश्लील चित्रफीत वायरल केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी पोलिसांनी संजयकुमार जंगम, घनश्याम फरांदे व प्रभाकर हिरवे याना अटक केली आहे. उर्वरित आरोपींचा शोध घेण्यासाठी महाबळेश्वर पोलिसांची पथके रवाना झाली आहेत. या सर्व 13 जणांवर पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुंबई गोवा महामार्गावरून भरणे नाका sms हॉस्पिटल ते काळकाई मंदिर परिसरात मुबाईच्या दिशेने प्रवास करत असाल तर सावधान. काळजी घ्या महामार्गावर एका वाहनातून ऑइल सांडल्याने महामार्गावर वाहने घसरण्याचे प्रकार होत आहेत. वाहने घसरून पडत आहेत. सध्या पावसाचे दिवस असल्याने विशेषतः दुचाकी स्वारांनी काळजी घ्या.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्या विरोधात सिंहगड पोलीस स्थानकात भादवि कलम 501 नुसार तक्रार दाखल केली आहे. महिलाबाबत केलेल्या वक्तव्यामुळे ही तक्रार दाखल करण्यात आली आहे.
पुणे जिल्ह्यातील शिरूर येथे एक कार्यक्रमात विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा रंगलेल्या गालांचा मुका घेणारा पक्ष आहे असे वादग्रस्त वक्तव्य केले होते. यानंतर बरेच दिवस उलटूनही प्रवीण दरेकर यांनी महिलांची माफी न मागितल्याने रुपाली चाकणकर यांनी तक्रार दाखल केली आहे. महिलांच्या मनात लज्जा उत्पन्न होईल असे वक्तव्य करून उर्मटपणाची प्रतिक्रिया दिल्या प्रकरणी त्यांनी ही तक्रार पुणे येथील सिंहगड पोलीस स्थानकात दाखल केली. कायद्याच्या चौकटीत राहुन आम्हा महिलांना न्याय मिळेल या करिता तक्रार दाखल केल्याचे त्यांनी ट्विट करत सांगितले.
परिवहन मंत्री अनिल परब यांनी भाजपचे नेते किरीट सोमय्या यांना 72 तासात माफी मागा अन्यथा तुमच्यावर अब्रू नुकसानीचा दावा दाखल करेन असे सांगितले होते. 72 तास उलटल्यानंतरही किरीट सोमय्या यांनी माफी न मागितल्याने अनिल परब यांनी आज मुंबई हायकोर्टात 100 कोटींचा अब्रु नुकसानीचा दावा दाखल केला आहे. त्याची माहिती त्यांनी ट्विट करून दिली. किरीट सोमय्या यांनी अनिल परब यांच्या विरोधात दापोलीतील रिसॉर्ट, परिवहन खात्यातील बदल्या यावरून गंभीर आरोप केले होते. त्यामुळे मानहानी झाल्याप्रकरणी अनिल परब यांनी 72 तासात आरोप मागे घेऊन माफी मागा अन्यथा अब्रू नुकसानीचा दावा दाखल करण्याचा इशारा नोटिसद्वारे दिला होता.
भारतीय लष्कराचे हेलिकॉप्टर खराब हवामानामुळे कोसळून दुर्घटना घडली. या दुर्घटनेत पायलट व को पायलट गंभीर जखमी झाले होते. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यावेळी उपचार दरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.
लष्कराच्या या हेलिकॉप्टरने नागरोटामधून उड्डाण केले होते. मात्र खराब हवामानामुळे या हेलिकॉप्टरला फोर्स लँडिंग करावे लागले. यावेळी लँडिंग दरम्यान हे हेलिकॉप्टर क्रॅश झाल्याचे समजते. या दुघटनेत लष्कराचे मेजर रोहित कुमार व मेजर अनुज राजपूत यांना आपले प्राण गमवावे लागले. जास्त प्रमाणात धुके असल्याने हेलिकॉप्टर खाली येताना दिसले. मात्र हे हेलीकॉप्टर क्रॅश होऊन खाली कोसळले की त्याचे क्रॅश लँडिंग झाले हे मात्र समजले नाही असे येथील स्थानिकांनी सांगितले. जम्मू काश्मीर मधील उधमपूर जिल्ह्यातील शिवगड धार परिसरातील जंगलमय भागात दुर्घटनाग्रस्त झाले. या दुर्घटनाग्रस्त हेलिकॉप्टर मधील पायलट गंभीर जखमी झाले होते. येथील स्थानिक नागरिकांनी त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. हे दोन्ही पायलट प्रशिक्षण सराव करत होते या दरम्यान हे हेलिकॉप्टर दुर्घटनाग्रस्त झाले.
इमारत बांधकाम करताना काही तांत्रिक दोष राहिल्याने इमारत दुर्घटना घडली. या दुर्घटनेत कोणीही जखमी झाले नसून आर्थिक नुकसान झाले आहे. जळगाव जिल्ह्यातील पाचोरा शहरामधील बाहेरपूरा भागात 5 वर्षांपूर्वी उभारण्यात आलेली इमारत 20 सप्टेंबर रोजी रात्री 10 वाजता कोसळली. रिमझिम कोसळणाऱ्या पावसामुळे इमारतीला तडे गेले होते. यामुळे येथील रहिवाशांनी ही इमारत खाली केली होती. यामुळे या दुर्घटनेत कोणत्याही प्रकारची जीवित हानी झाली नाही. ही इमारत कोसळतानाचा विडिओ येथील नागरिकांनी आपल्या कॅमेऱ्यात कैद केला होता.
मुंबई गोवा महामार्गावरील लोटे एम आय डी सी येथे एका पेट्रोल पंपामध्ये डिझेल भरण्यासाठी आलेल्या ट्रक मधून माल चोरीला जाण्याची घटना घडली. या प्रकरणी काही जणांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतल्याचे देखील समजते. 8 दिवसात पुन्हा चोरी झाल्याने वाहन चालक व मालक धास्तावले आहेत.
संग्रहित छायाचित्र
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार मुंबई गोवा महामार्गावरील लोटे एम आय डी सी येथे एका स्थानिक ट्रक व्यावसायिकाने एम आय डी सी तील एका मोठ्या नामांकित कंपनीचा माल आपल्या वाहनात भरला होता. हा ट्रक चालक घेऊन एम आय डी सी जवळ असणाऱ्या एक पेट्रोल पंपात डिझेल भरण्यासाठी गेला होता. या ठिकाणी डिझेल भरून झाल्यानंतर संबंधित चालकाने आपला ट्रक पंपातच उभा केला होता. यावेळी काही कारणास्तव ट्रक चालक आपल्या गाडीपासून बाजूला गेल्यानंतर हा प्रकार घडल्याचे बोलले जात आहे. या प्रकरणी पोलिसांनी काही जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले असल्याचे समजते. गेल्या काही दिवसांपूर्वी याच परिसरातून एका ट्रकचे पुढील दोन टायर डिस्क सहित चोरीला गेल्याची घटना घडली होती. अशाच प्रकारच्या घटना या ठिकाणी वारंवार होत असून गाड्यांमधील डिझेल, बॅटरी व टायर्स चोरीला जाण्याचे प्रमाण वाढले आहे. आज समोर आलेल्या चोरीत जास्त किमतीचा माल चोरीला गेला नसला तरी आशा भुरट्या चोराचा बंदोबस्त करावा अशी मागणी स्थानिक ट्रक चालक, मालक व ट्रान्सपोर्ट व्यापाऱ्यांमधुन जोर धरत आहे.
मनसे राज्य सरचिटणीस वैभव खेडेकर यांनी शनिवारी झालेल्या पत्रकार परिषदेत रामदास कदम यांच्यावर सरकार पडण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला होता. यावर शिवसेना नेते रामदास कदम यांनी प्रसिद्धी पत्रक काढत मी पाठीत खंजीर खुपसत नाही, तर सांगून समोरून अंगावर जातो असे स्पष्ठ केले आहे.
खेडचे नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांनी केलेले आरोप हे बेछूट आसून माझ्या बाबत खोटी वृत्ते सांगून जनतेत, कुटुंबात व पक्षात गैरसमज पसरवत आहेत. माझ्यावर आरोप करून व जनमानसात गैरसमज पसरवून स्वतःची राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न करीत आहेत. तसेच प्रसाद कर्वे यांचा उपयोग माहितीच्या अधिकारात माहिती घेण्यासाठी केल्याचे ही त्यांनी या प्रसिद्धी पत्रकात स्पष्ट केले आहे. मात्र किरीट सोमय्यांना भेटल्याचे किंवा त्यांचे थोबाड पाहण्याचा प्रश्नच येत नाही असे सांगत त्यांनी वैभव खेडेकर यांनी केलेले आरोप फेटाळून लावले आहे. तसेच सत्य जनतेसमोर आल्यानंतर वैभव खेडेकरांचा भ्रमाचा भोपळा फुटेल असा विश्वास ही त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे. तसेच निवडणुकी पूर्वी त्यांनी मी कोणतेही पद घेणार नाही असे पत्रकार परिषद घेऊन त्यांनी जाहीर केले होते. शिवसेनेने, कोंकणने व महाराष्ट्राने मला भरभरून प्रेम दिले आहे. त्याची परतफेड या जन्मात होऊ शकत नाही. आशा प्रकारच्या बिनबुडाच्या आरोपांना मी भीक घालत नाही असे स्पष्टीकरण शिवसेना नेते रामदास कदम यांनी केले आहे.
शिवसेना नेते आणि राज्याचे माजी पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी महाविकास आघाडीचे सरकार अस्थिर करण्याचे काम केले असून, परिवहन मंत्री आणि रत्नागिरी जिल्ह्याचे पालक मंत्री अनिल परब यांच्या बाबतची माहिती रामदास कदम यांनी प्रसाद कर्वे नामक व्यक्तीच्या माध्यमातून माहितीच्या अधिकाराखाली मिळवून भाजपचे किरीट सोमय्या यांना दिली असा खळबळ जनक आरोप मनसेचे राज्य सरचिटणीस आणि खेडचे नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांनी आज आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत केला आहे. वैभव खेडेकर यांच्या विधानाने कोकणातील राजकीय वातावरण ढवळून निघाले असून रामदास कदम हे शिवसेनेचे नेते असताना महाविकास आघाडीचे सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न केल्याचे देखील खेडेकर म्हणाले. यावेळी रामदास कदम यांचे मित्र किरीट सोमय्या यांनी रामदास कदम यांच्या देखील बेनामी संपत्तीचे माहिती जगासमोर आणावी आणि त्यांची देखील ईडीची चौकशी लावावी असे आवाहन देखील वैभव खेडेकर यांनी केले आहे. काही दिवसांपूर्वी भाजपचे किरीट सोमय्या यांनी अनिल परब यांच्या दापोली येथील अनधिकृत रिसॉर्ट बाबत माहिती उघड केली होती, हे रिसॉर्ट मंत्री परब यांनी बे हिशोबी पैशातून बांधले असल्याचा आरोप करत त्यांनी मंत्री पदावरून पायउतार व्हावे अशी मागणी प्रसार माध्यमांसमोर केली होती. सोमय्या यांना दिलेली सर्व माहिती प्रसाद कर्वे नामक व्यक्तीने माहितीच्या अधिकाराखाली मागवून ती माहिती रामदासभाई कदम यांनी त्यांचे मित्र भाजपचे किरीट सोमय्या यांच्याकडे दिली. सोमय्या हे खरोखर भ्रष्टचाराविरोधात लढत असतील तर त्यांनी रामदास भाईंची देखील ईडीची चौकशी लावावी आपले त्यांना आवाहन आहे असे वैभव खेडेकर यांनी सांगितले.
आपल्या अपात्रतेसाठी रामदासभाई कदम गेली अनेक महिने प्रयत्नात
शिवसेना नेते आणि राज्याचे माजी विरोधीपक्ष नेते रामदासभाई कदम हे पुत्र प्रेमापोटी आंधळे झाले आहेत. खेड शहरातली जनता आपल्यावर आणि पर्यायाने मनसेवर विश्वास ठेऊन आहे. गेली कित्तेक वर्ष खेड नगरपालिकेत मनसेची सत्ता आहे. हे रामदासभाईंना पाहवत नाही. आपल्या पुत्राचा राजकीय प्रवास सुरळीत होण्यासाठी ते हात धुवून आपल्यामागे लागले असल्याचे वैभव खेडेकर म्हणाले, प्रसाद कर्वे हा रामदासभाईंचा खास माणूस आहे, त्यांचा पर्सनल पीए म्हणून देखील काम करत आहेत त्यांच्या करावी खेड नागरपालिकेतून माहितीच्या अधिकाराखाली काही माहिती मागवून अर्धवट माहितीच्या अधिकाराखाली अधिकाऱ्यांवर व नगरसेवकांवर दबाव टाकत आपले राजकीय अस्तित्व संपवण्याचा विडा उचलला आहे.
आपल्या अपात्रतेची कारवाईसाठी रामदास कदम यांचा अधिकाऱ्यांवर प्रचंड दबाव
शिवसेनेच्या नगरसेवकांवर रामदास कदम यांनी दबाव टाकून माझ्या विरोधात तक्रारींच्या प्रस्तावावर सह्या करण्यास त्यांना भाग पाडले असले तरी मला अपात्र करण्याचा कट मी उलथवून टाकेन. मुंबई उच्च न्यायालयाने मला बाजू मांडण्यासाठी आणखी पंधरा दिवसांची मुदत वाढवून दिली असून न्यायालयासमोर आम्ही माझ्या विरोधातील तक्रारीच्या चौकशी प्रक्रियेत रामदास कदम यांनी राजकीय हस्तक्षेप केल्याचे पुरावे दिले आहेत, अशी माहिती नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांनी शनिवारी दि १८ रोजी पालिकेच्या नगराध्यक्ष कक्षात बोलावलेल्या पत्रकार परिषदेत दिली आहे. खेड नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष कक्षात शनिवारी दि १८ रोजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांनी पत्रकार परिषद बोलावली होती. यावेळी ते म्हणाले, वैभव खेडेकरांचे पद जाणार आशा काही लोकांनी भीष्मप्रतिज्ञा केल्या. यंत्रणेला हाताशी धरून माझ्या विरुद्ध षड्यंत्र रचण्यात आले. मात्र मी आता त्यांचा डाव उलथवून टाकला आहे. ज्यांच्या सह्यानी माझ्या विरुद्ध तक्रारी केल्या त्यांनी खासगीत मला भेटून आम्ही रामदास कदम यांच्या दबावाखाली सह्या केल्याचे सांगितले आहे. माझ्या विरुद्ध तक्रार करताना ज्या प्रसाद कर्वे नावाच्या व्यक्तीने माहितीच्या अधिकाराचा वापर करून माहिती मिळवली ती त्याने दुसऱ्याला देऊन माहिती अधिकार कायद्यातील एका कलमाचे उल्लंघन केले आहे. कर्वे यानेच दापोलीत पालकमंत्री अनिल परब यांच्या संदर्भात माहिती अधिकारात माहिती घेऊन रामदास कदम यांना दिली व रामदास कदम यांनी किरीट सोमय्या यांना दिली. रामदास कदम यांच्यासाठी काम करणाऱ्या प्रसाद कर्वे याची चौकशी होणे गरजेचे आहे, असे श्री खेडेकर म्हणाले. ते पुढे म्हणाले की, माझ्या विरोधात करण्यात आलेल्या तक्रारीची चौकशी कायद्याच्या कक्षेत करण्यात आलेली नाही. चौकशी प्रक्रिया बेकायदेशीरपणे आठ महिने चालवण्यात आली. ही चौकशी सुरू असताना अनेक वेळा या प्रक्रियेत कोणताही संबंध नसताना रामदास कदम यांनी सातत्याने पत्र पाठवून हस्तक्षेप केला आहे. माझा न्यायदेवतेवर पूर्ण विश्वास असल्यानेच मी या बेकायदेशीर चौकशी प्रक्रियेवर मुंबई उच्च न्यायालयात दाद मागितली. दि १५ व १६ रोजी न्यायालयात सुनावणी होऊन न्यायालयाने आता मला नगरविकास विभागाकडून देण्यात आलेल्या पंधरा दिवसांच्या मुदतीत आणखी पंधरा दिवस वाढ केली आहे. तसेच यापुढे नगरविकास विभागाकडून माझ्या प्रकरणी होणाऱ्या पुढील करवाईकडे लक्ष ठेवण्यात येणार आहे. उच्च न्यायालया समोर आम्ही माझी चौकशी कशी बेकायदेशीर झाली आहे व त्यामध्ये झालेला राजकीय हस्तक्षेप यांचे पुरावे दिले आहेत. रामदास कदम यांनी केवळ त्यांच्या मुलाच्या आमदारकीच्या काळात खेड पालिकेची सत्ता मिळवता यावी या स्वार्थासाठी माझ्या विरोधात कट रचला आहे. मी लढवय्या आहे. गेल्या पंधरा वर्षे शहरवासीयांनी माझ्यावर विश्वास दाखवला आहे. रामदास कदम स्वतः आमदार होण्यापूर्वी त्यांची आर्थिक परिस्थिती काय होती व आता त्यांच्याकडे हजारो कोटींची मालमत्ता कशी आली याची ईडी मार्फत चौकशी होणे गरजेचे आहे. अधिकाऱ्यांना आपल्या कर्मचाऱ्यांप्रमाणे वापरून रामदास कदम माझ्या सारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्या विरोधात मला राजकारणापासून दूर नेण्याचाह कट रचत आहेत. त्यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी पालिकेच्या निवडणुकीत समोरासमोर लढून जिंकून दाखवावे, खेड शहरासाठी कोरोना साथ, अतिवृष्टी आदी परिस्थितीत मी केलेल्या कामामुळे व विकास कामे यामुळे जनता माझ्या सोबत आहे. दहशतीची राजवट खेडला नको आहे. माझ्या सोबत थोडे कार्यकर्ते असले तरी ते निष्ठावंत आहेत. त्यामुळे मी पुन्हा सत्तेत येईन, असा विश्वास वैभव खेडेकर यांनी यावेळी व्यक्त केला.