भारतात 33 लाख कुपोषित मुले, देशात सर्वाधिक कुपोषित मुले महाराष्ट्रात

माहितीच्या अधिकारात मिळालेल्या माहितीनुसार भारतात तब्बल 33 लाखहुन अधिक मुले कुपोषित असून देशात सर्वाधिक कुपोषित मुलांच्या यादीत महाराष्ट्र 1 नंबर वर आहे. यामध्ये देशातील 34 राज्यांसाह केंद्र शासित प्रदेशाचा ही समावेश आहे.

पिटीआय या वृत्त संस्थेने दाखल केलेल्या माहितीच्या अधिकारात धक्कादायक माहिती समोर आली आहे. शासकीय आकड्यानुसार देशात सध्या 33 लाखाहून अधिक कुपोषित बालके असून त्यातील 17.7 लाख मुले ही गंभीररीत्या कुपोषित आहेत. गंभीर रित्या कुपोषित असणाऱ्या मुलांच्या संख्येत महाराष्ट्र, बिहार व गुजरात ही राज्ये अग्रस्थानी आहेत. या गोष्टीची माहिती महिला व बाल विकास मंत्रालयाने माहितीच्या अधिकारात दिली. यामध्ये त्यांनी देशातील 34 राज्य व केंद्र शासित प्रदेशात सुमारे 3323322 इतकी लहान मुले कुपोषित असल्याचे स्पष्ट केले. 14 ऑक्टोम्बर 2021 च्या आकडेवारीनुसार भारतात 17.76 लाख लहान मुले ही अत्यंत तर 15.46 लाख मुले अल्प कुपोषित आहेत. यावेळी माहितीच्या अधिकारात समोर आलेल्या माहितीनुसार देशात सर्वाधिक 6.16 लाख कुपोषित मुले ही महाराष्ट्रातील असून त्यामध्ये 157984 अल्प कुपोषित तर 458788 अत्यंत कुपोषित मुले आहेत. दुसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या बिहार मध्ये 457824 तर तिसऱ्या क्रमांकावर गुजरात असून त्या ठिकाणी 3.20 लाख मुले कुपोषित आहेत. तर इतर राज्यामध्ये आंध्र प्रदेश 267288, कर्नाटक 249463, उत्तरप्रदेश 1.86 लाख, तामिळनाडू 1.78 लाख, आसाम 1.76 लाख, तेलंगणा 152524 तर देशाच्या राजधानीत म्हंजेच दिल्लीत 1.17 लाख मुले ही कुपोषित आहेत.

Leave a Comment