खेड नगरपरिषद उपनगराध्यक्षपदी सतिश उर्फ ‘पप्पू’ चिकणे

खेड नगरपरिषद उपनगराध्यक्ष पदाच्या निवड प्रक्रियेला गुरुवारी वेग आला असून शिवसेना पक्षाचे अनुभवी नगरसेवक सतीश उर्फ पप्पू चिकणे यांनी अधिकृतरीत्या नामनिर्देशन पत्र दाखल केले. विशेष म्हणजे, खेड नगरपरिषद निवडणुकीत महायुतीने 21-0 असा अभूतपूर्व विजय मिळवून एकहाती सत्ता स्थापन केली होती. या एकहाती सत्तेमुळे उपनगराध्यक्षपदासाठी शिवसेनेच्या उमेदवाराची निवड सहज आणि बिनविरोध होणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.

नामनिर्देशन प्रक्रियेच्या वेळी नगरपरिषद परिसरात मोठी उत्सुकता आणि उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. शिवसेना पक्षाकडून उपनगराध्यक्ष पदासाठी फक्त एकच नामनिर्देशन पत्र दाखल झाल्याने कोणत्याही प्रकारची स्पर्धा दिसून आली नाही. त्यामुळे सतीश उर्फ पप्पू चिकणे यांची उपनगराध्यक्षपदी निवड आता केवळ औपचारिकता राहिली असून त्यांची निवड निश्चित मानली जात आहे. नामनिर्देशन दाखल करताना नगराध्यक्षा माधवी बुटाला, शिवसेना गटनेते निकेतन पाटणे तसेच शिवसेनेचे सर्व नगरसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. संपूर्ण नगरपरिषदेत शिवसेनेची एकजूट आणि संघटनशक्ती स्पष्टपणे जाणवत होती. यावेळी शहरप्रमुख कुंदन सातपुते, संजय मोदी, मिनार चिखले यांच्यासह अनेक शिवसैनिक हजर होते.


पप्पू चिकणे हे खेड नगरपरिषदेतील लोकप्रिय आणि अनुभवी नेते मानले जातात. त्यांनी गेल्या अनेक वर्षांत विविध विकासकामांमध्ये पुढाकार घेत नगरपरिषद प्रशासनात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. शांत स्वभाव, प्रभावी समन्वयक क्षमता आणि सर्वसमावेशक दृष्टीकोन या गुणांमुळे कार्यकर्त्यांमध्ये त्यांची चांगली छाप आहे. उपनगराध्यक्ष पदाची सूत्रे त्यांच्या हाती आल्यावर खेड शहरातील प्रलंबित कामांना गती मिळेल, असा विश्वास नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे.
21-0 या महायुतीच्या ऐतिहासिक विजयामुळे खेड नगरपरिषदेतील सत्तेची समीकरणे पूर्णपणे बदलली असून विपक्षाचा आवाज गायब झाला आहे. त्यामुळे आगामी काळात शहरातील विकासकामांबाबत निर्णय प्रक्रियेला अडथळ्याविना गती मिळण्याची शक्यता आहे. पाणीपुरवठा, रस्ते तसेच शहरातील अनेक प्रलंबित महत्वाच्या विषय लवकरच पूर्णत्वास जातील अशी चर्चा शहरात सुरू आहे.
उपनगराध्यक्षपदाच्या निवडणुकीची अधिकृत घोषणा गुरुवारी दुपारी 2.30 होणार आहे. मात्र सर्व राजकीय परिस्थिती पाहता सतीश उर्फ पप्पू चिकणे हेच खेड नगरपरिषदेचे नवे उपनगराध्यक्ष बनणार हे निश्चित झाले आहे. शिवसेनेची एकहाती सत्ता आणि संघटनातील एकजूट यामुळे खेडच्या राजकारणात नव्या पर्वाची सुरूवात झाल्याची चर्चा शहरभर रंगली आहे.

भजनी कलाकारांना सरकारशी जोडणारा सक्षम दुवा – मंत्री नितेश राणे

कोकणातील भजनी परंपरा, वारकरी संप्रदाय आणि सांस्कृतिक वारशाची खरी ओळख व्यापक पातळीवर पोहोचवण्याचे कार्य संतोष कानडे सातत्याने करत आहेत. भजनी कलाकार समितीचे अध्यक्ष म्हणून त्यांनी आपल्या पदाची जबाबदारी समर्थपणे पार पाडत कलाकारांना सरकारशी जोडणारा सशक्त दुवा निर्माण केला आहे, अशा शब्दांत पालकमंत्री नितेश राणे यांनी त्यांचा गौरव केला.

कणकवली तालुकास्तरीय पालकमंत्री चषक भजन स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्यात नितेश राणे बोलत होते. त्यांनी सांगितले की, संतोष कानडे यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भजन परंपरा जपण्यासाठी आणि भजनी कलाकारांना शासनमान्यता तसेच विविध योजना मिळवून देण्यासाठी अथक परिश्रम घेतले आहेत. प्रत्येक अधिवेशनात त्यांनी कलाकारांच्या समस्या, मागण्या आणि अडचणी प्रभावीपणे मांडल्या असून, असे एकही अधिवेशन नाही की त्यांनी कलाकारांचे प्रश्न सरकारसमोर उपस्थित केले नाहीत.

नितेश राणे म्हणाले, “सरकारकडे मदत देण्याची क्षमता आणि इच्छा आहे, मात्र त्या गरजा योग्य प्रकारे समोर मांडल्या गेल्या पाहिजेत. महाराष्ट्रातील इतर कलांसारखेच कोकणातील समृद्ध भजन परंपरेचेही जतन व संवर्धन आवश्यक आहे. सांस्कृतिक वारसा जपण्यासाठी शासनाने गांभीर्याने पावले उचलली पाहिजेत.”
महायुती सरकारला पुढील चार वर्षे ठोस काम करण्याची संधी असून या काळात भजनी कलाकारांसाठी जास्तीत जास्त योजना, सुविधा आणि कार्यशाळा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. सध्या सत्तेत असणारी माणसे कार्यक्षम असून विरोधकांकडून कामात कोणताही अडथळा नसल्याने विकासाला वेग देता येईल, असे राणे म्हणाले.

“कोकणातच सांस्कृतिक मंत्री असणे हीदेखील अनुकूल बाब आहे. माझी जिद्द, इच्छाशक्ती आणि या परंपरेबद्दलची बांधिलकी लक्षात घेता भजनी कलाकारांच्या हक्कांच्या आणि न्यायाच्या प्रश्नांवर समाधानकारक तोडगा निघेल, असा मला विश्वास आहे,” असे त्यांनी ठासून सांगितले.
उद्घाटन सोहळ्यास भाजपा तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) जिल्हाध्यक्ष अबिद नाईक, नगरसेवक राकेश राणे, ह. भ. प. गावंडळकर महाराज, भजनी कलाकार संस्थेचे अध्यक्ष संतोष कानडे, उपाध्यक्ष प्रकाश पारकर, माजी सभापती बुलंद पटेल, सुरेश सावंत यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती. कार्यक्रमाला भजनी कलाकार, वारकरी व स्थानिक नागरिकांची उत्स्फूर्त उपस्थिती लाभली.

रत्नागिरीत 3 कोटी 10 लाखांचे अंबरग्रीस जप्त, 3 आरोपींना अटक

रत्नागिरी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने एम.आय.डी.सी. परिसरात केलेल्या कारवाईत तब्बल ₹3 कोटी 10 लाख 30 हजार रुपयांचे “लुप्तप्राय प्रजातीच्या माशाची उलटी” म्हणजेच अंबरग्रीस जप्त करण्यात आले असून, तिघा आरोपींना अटक करण्यात आली आहे. या कारवाईने जिल्ह्यातील वन्यजीव उत्पादक वस्तूंच्या अवैध व्यापारावर मोठा आळा बसला आहे.

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला दिनांक 31 ऑक्टोबर रोजी गुप्त माहिती मिळाली की काही इसम एम.आय.डी.सी., रत्नागिरी परिसरात बाफना मोटर्सजवळ अंबरग्रीस विक्रीसाठी येणार आहेत. त्यानुसार पोलिस निरीक्षक नितीन डेरे यांच्या मार्गदर्शनाखाली तातडीने पथक तयार करण्यात आले आणि एम.आय.डी.सी. परिसरात सापळा रचण्यात आला. पथकाने कारवाई करत तिघांना पकडले. अटक केलेल्या आरोपींची नावे – रोहित रमेश चव्हाण (रा. आंबेशेत), आसिफ अस्लम मोरस्कर (रा. पिंपरी बुद्रुक, चिपळूण) आणि तेजस परशुराम कांबळे (रा. आडरे, चिपळूण) अशी आहेत. त्यांच्या ताब्यातून सुमारे 3 किलो 4 ग्रॅम वजनाचे अंबरग्रीस आणि एक चारचाकी वाहन असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. जप्त केलेल्या वस्तूची एकूण किंमत ₹3,10,30,000 इतकी असल्याचे पोलिसांनी सांगितले.

या तिघांकडे कोणतीही परवानगी नसताना त्यांनी विक्रीच्या उद्देशाने अंबरग्रीस बाळगले असल्याने त्यांच्या विरोधात रत्नागिरी ग्रामीण पोलिस ठाण्यात वन्यजीव (संरक्षण) अधिनियम 1972 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई मा. पोलिस अधीक्षक नितीन दत्तात्रय बगाटे, अपर पोलिस अधीक्षक बी.बी. महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक नितीन डेरे यांच्या नेतृत्वात करण्यात आली. या कारवाईत श्रेणी. पो.ऊ.नि. प्रशांत बोरकर, पो.हेकॉ. बाळू पालकर, गणेश सावंत, प्रवीण खांबे, सत्यजित दरेकर आणि चालक पो.कॉ. अतुल कांबळे यांनी सहभाग घेतला.

खेडचे शिवसैनिक नेमके भाईंचे की भास्कर जाधवांचे?

सन्माननीय भास्कर शेठ जाधव म्हणून केला उल्लेख

खेड तालुक्यातील सुसेरी जिल्हापरिषद गटात आयोजित जाहीर सभेत गुहागर विधानसभा मतदार संघाचे आमदार भास्कर जाधव यांनी शिवसेना नेते रामदास भाई कदम यांच्यावर एकेरी भाषेत टीकाटिप्पणी केली. नुसती एकेरी भाषेत टीका करून थांबले नाहीत तर अगदी खालच्या पातळीवर जाऊन प्रश्न देखील उपस्थित केला. यावर प्रत्युत्तर देताना मात्र खेड तालुका शिवसेना पक्षाच्या पत्रकार परिषदेमध्ये जिल्हाप्रमुख शशिकांत चव्हाण यांनी मात्र त्यांना सावरून घेत आदरार्थी टीका केल्याचे पहावयास मिळाले. यामुळे भाईंचे शिवसैनिक नेमके भाईंचे की भास्कर जाधवांचे असा प्रश्न निर्माण झाला आहे.

खेड तालुका शिवसेना कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेवेळी शिवसेना जिल्हाप्रमुख शशिकांत चव्हाण यांनी शिवसेना नेते रामदास कदम यांच्यावर एकेरी टीका करणाऱ्या भास्कर जाधवांचा मात्र जिल्हाप्रमुखांनी आदरणीय भास्कर शेठ म्हणत उल्लेख केला. यामुळे जिल्हाप्रमुख नेमके भाईंचे की भास्कर जाधवांचे असा प्रश्न उपस्थित झाला. नेमके काय म्हणाले हे पुढील व्हिडिओमध्ये पहावयास मिळेल. https://youtube.com/shorts/dpgDe0_PNfA?feature=share

शिवसेना किंवा शिवसैनिक म्हटले की आक्रमक व्यक्तिमत्व डोळ्यासमोर उभे राहतें. शिवसैनिक म्हटले की शिवसेनाप्रमुखांचे वाघ. मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी झगडणारी संघटना म्हणजे शिवसेना. पक्षाच्या, नेत्याच्या किंवा शिवसैनिकांच्या अंगावर येणाऱ्या प्रत्येकाला शिंगावर घेणाऱ्या वाघांची संघटना म्हणून शिवसेना पक्षाची आणि कार्यकर्त्यांची एक वेगळी ओळख आहे. मात्र काही दिवसापूर्वी खेड तालुक्यातील सुसेरी जिल्हा परिषद गटात झालेल्या सभेत आ. भास्कर जाधव यांनी आक्रमक होत शिवसेना नेते रामदास कदम, गृहराज्यमंत्री योगेश कदम आणि माजी जि. प. सभापती चंद्रकांत कदम यांच्यावर टीकास्त्र सोडले. या टीकेला प्रत्युत्तर देण्यासाठी दोन दिवसानंतर शिवसेनेच्या वतीने पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. मात्र ही पत्रकार परिषद बघितल्यानंतर खेडचे शिवसैनिक शेळी झाल्याचे चित्र पाहावयास मिळाले. ही आयोजित पत्रकार परिषद म्हणजे केवळ औपचारिकता होती की काय? असा प्रश्न या पत्रकार परिषदेनंतर उपस्थित झाला आहे.

सध्या महाराष्ट्रात शिवसेना वि. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आमने सामने असल्याचे पहावयास मिळत आहे. गेल्या काही दिवसापूर्वी दसरा मेळाव्यात शिवसेना नेते रामदास भाई यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नामुळे राज्यातील राजकारणात खळबळ उडाली होती. यानंतर गुहागर विधानसभेचे आ. भास्कर जाधव यांनी सातत्याने शिवसेना नेते रामदास कदम यांच्यावर एकेरी आणि खालच्या शब्दात टीका टिपण्णी करणे सुरू केली आहे. मात्र ही मुंबईसह महाराष्ट्रात त्यांनी केल्याचे पहावयास मिळत होते. मात्र आता गेल्या काही दिवसापासून त्यांनी भाईंच्या बालेकिल्ल्यात म्हणजे खेडमध्ये येऊन टीका टिपण्णी करणे सुरू केली आहे. त्यावर देखील खेडमधील शिवसेना पदाधिकारी मुग गिळून गप्प बसल्याचे पहावयास मिळत होते. आधी तळे विभागात मग सुसेरी इथे झालेल्या सभेत अगदी खालच्या शब्दात टीका टिपण्णी केली होती. त्यावर मात्र तब्बल दोन दिवसानंतर उत्तर देऊन शिवसैनिकांनी आपल्या नेत्याविषयी आपल्या मनात किती प्रेम आहे हे आधीच दाखवून दिले होते आणि या मिळमिळीत पत्रकार परिषदेनंतर यावर शिक्कामोर्तब देखील त्यांनी केले.

खरेतर शिवसेना नेते रामदास भाई कदम आणि गृहराज्यमंत्री योगेश दादा कदम खेड तालुक्यात आले असता त्यांच्या सभोवताली शेंकडोंच्या संख्येने कार्यकर्त्यांची गर्दी असते. मात्र जेव्हा त्यांच्यावर टीका केली जाते तेव्हा मात्र हे कार्यकर्ते नेमके कुठे गायब झालेले असतात याचे उत्तर मात्र अद्याप समोर आलेले नाही. त्यामुळे नक्की या कार्यकर्त्यांची आपल्या नेत्यावर निष्ठा आहे की नाही असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे. काल झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये शिवसेना जिल्हाप्रमुखांनी आरोप करणाऱ्या विरोधकांचा सन्माननीय भास्कर शेठ जाधव असा उल्लेख करून या सर्व प्रश्नांना जागा निर्माण करून दिली आहे.

खालच्या आणि एकेरी भाषेत टीका करणाऱ्या भास्कर जाधव यांचा खरेतर खेड मधील शिवसैनिकांनी अत्यंत कठोर आणि कडक शब्दात समाचार घेणे अपेक्षित होते. ज्या नेत्यांना बघून तुम्ही राजकारणात सक्रिय झाला कमीत कमी त्या नेत्यांचा आक्रमकपणा तरी खेडमधील शिवसैनिकांनी अंगिकारला पाहिजे होता असे मत चक्क विरोधकांमधून व्यक्त करण्यात येत आहे. तर पक्षातील इतर पदाधिकाऱ्यांकडून हे काय बोलले, असे उत्तर देतात का? नक्की काय प्रकार आहे? असे प्रश्न देखील उपस्थित करण्यात आले. तर या पत्रकार परिषदे वेळी जिल्हा प्रमुख शशिकांत चव्हाण यांच्या सोबत असलेल्या सहकार्यानी देखील आपल्याला काही बोलणे पटलेले नाही, एवढ्या सौम्य शब्द कुठे उत्तर देतात का? नक्की जिल्हाप्रमुखांची भूमिका काय? असे एक ना अनेक प्रश्न उपस्थित देखील केले जात आहेत.

नक्की कशी होती त्यांची ही पत्रकार परिषद पाण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा – https://youtu.be/0WKQm1zvqEs

परिवहन मंत्र्यांची कठोर कारवाई : ३४ आगारप्रमुखांवर शिस्तभंगाची धडक कार्यवाही

राज्यभरात मुसळधार पावसामुळे अतिवृष्टीची परिस्थिती निर्माण झाली आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये रस्ते वाहतुकीसह सर्वसामान्यांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. या गंभीर परिस्थितीत राज्य सरकारकडून बचावकार्य व जनतेला मदत पुरवण्यासाठी विविध विभाग कार्यरत आहेत. अशा वेळी एसटी महामंडळाच्या २५१ पैकी ३४ आगारांतील आगारप्रमुख हे आपल्या कर्तव्यातून गैरहजर राहिल्याचे स्पष्ट झाले आहे. ही गंभीर व निष्काळजी वागणूक मानली जाऊन संबंधितांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश परिवहन मंत्री प्रभात सरनाईक यांनी दिले आहेत.

परिवहन मंत्री सरनाईक म्हणाले की, या अतिवृष्टीमुळे जनतेसमोर अनेक अडचणी निर्माण झालेल्या आहेत. अशा स्थितीत आगारप्रमुखांनी आपल्या जबाबदारीचे भान ठेवून उपस्थित राहणे अपेक्षित असताना, अनेकांनी अनुपस्थित राहून गैरजबाबदारपणा दाखवला आहे. त्यामुळे तातडीने चौकशी करून दोषींवर निलंबनासह कठोर शिस्तभंगाची कारवाई होईल. आगारप्रमुखांच्या गैरहजेरीमुळे प्रशासन अडचणीत आले असून, महामंडळाच्या प्रतिष्ठेलाही तडा गेला आहे.

राज्याच्या अनेक भागांमध्ये रस्ते पाण्याखाली गेले आहेत, वाहतूक ठप्प झाली असून प्रवाशांचे मोठे हाल होत आहेत. अशा स्थितीत आगारप्रमुखांची उपस्थिती अत्यावश्यक असते. कारण त्यांच्या मार्गदर्शनाखाली कर्मचारी प्रवासीसेवा सुरळीत ठेवण्यासाठी प्रयत्नशील राहतात. मात्र काही आगारप्रमुख गैरहजर राहिल्याने परिस्थिती हाताळणे कठीण झाले. यामुळे सामान्य जनतेला मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागला आहे. सरकारी यंत्रणेप्रमाणे एसटी महामंडळालाही बचावकार्य आणि आवश्यक सुविधा पुरविण्यात मोलाची भूमिका बजवावी लागते. त्यामुळे जबाबदारी टाळणाऱ्या अधिकाऱ्यांना सोडले जाणार नाही, असा स्पष्ट इशारा देत प्रभात सरनाईक यांनी यापुढे कोणतीही निष्काळजीपणा सहन केला जाणार नाही, असेही सांगितले.

याप्रकरणी दोषींवर कडक शिस्तभंगाची कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले असून, विभागीय नियंत्रकांकडून तपास अहवाल मागविण्यात आला आहे. शिस्तीचा अभाव आणि निष्काळजीपणामुळे जनतेला होणारा त्रास टाळण्यासाठी प्रशासन ठोस पावले उचलणार असल्याचे परिवहन मंत्री सरनाईक यांनी नमूद केले.

राज्यात ३० सप्टेंबरपर्यंत पावसाची तीव्रता वाढणार; कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात अतिवृष्टीचा इशारा

भारतीय हवामान विभागाने राज्यातील अनेक जिल्ह्यांसाठी पुढील काही दिवस महत्त्वाचा इशारा दिला आहे. ३० सप्टेंबरपर्यंत कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा या भागांमध्ये पावसाची तीव्रता वाढणार असून, व्यापक पावसासोबतच काही ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या किनारी जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसामुळे शहरी पुराची स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी विशेष सतर्कता बाळगावी, असे आवाहन राज्य आपत्कालीन कार्य केंद्राकडून करण्यात आले आहे.

नागरिकांनी या काळात अधिकृत सूचनांचे पालन करणे अत्यावश्यक आहे. पूरप्रवण किंवा धोकादायक भागात जाणे टाळावे. विजांचा कडकडाट होत असताना झाडाखाली थांबू नये. पूराच्या परिस्थितीत बचावासाठी आवश्यक ती सर्व खबरदारी घेणे महत्त्वाचे असून, गरज भासल्यास स्थानिक निवारा केंद्रांचा उपयोग करावा. तसेच नदी-नाल्यांवरुन पाणी वाहत असताना पुल ओलांडण्याचा प्रयत्न करू नये. पूरस्थितीत अनावश्यक पर्यटन टाळावे आणि सोशल मीडियावर पसरवल्या जाणाऱ्या अफवांवर विश्वास ठेवू नये, असे स्पष्ट आवाहन प्रशासनाने केले आहे.

आज ७ सप्टेंबर रोजी वर्षातील दुसरे चंद्रग्रहण –  श्री. श्री. १००८ महामंडलेश्वर डॉ. योगेश्वरानंदगिरी महाराज

भाद्रपद पौर्णिमेच्या दिवशी म्हणजेच रविवार, ७ सप्टेंबर २०२५ रोजी वर्षातील दुसरे चंद्रग्रहण लागणार आहे. हे ग्रहण भारतात स्पष्टपणे दिसणार असल्याने त्याला धार्मिक आणि ज्योतिषशास्त्रीय दृष्टीने मोठे महत्त्व आहे. भारतीय वेळेनुसार हे ग्रहण रात्री ९ वाजून ५८ मिनिटांनी सुरू होऊन पहाटे १ वाजून २६ मिनिटांपर्यंत राहील. एकूण ३ तास २९ मिनिटे अशी या ग्रहणाची कालावधी असेल.

या चंद्रग्रहणाचा सूतक काल दुपारी १२ वाजून ५७ मिनिटांनीच सुरू झाला आहे. सूतक काळात सर्व शुभकार्ये वर्ज्य मानली जातात. तसेच या काळात अन्नग्रहण न करण्याची सूचना शास्त्रात केली आहे. याशिवाय ग्रहणाच्या दिवशी संध्याकाळी ५ वाजून १० मिनिटांपासून ते ६ वाजून ३५ मिनिटांपर्यंत राहुकालही राहणार आहे.

ज्योतिषशास्त्रानुसार हे चंद्रग्रहण कुंभ राशीत व पूर्वाभाद्रपद नक्षत्रात लागेल. त्या वेळी चंद्र व राहु युतीत असल्याने ग्रहणयोगाची निर्मिती होणार आहे. यामुळे या ग्रहणाचा परिणाम तीव्र राहील असे मानले जाते. या अशुभ प्रभावापासून मुक्तीसाठी व मानसिक शांतीसाठी चंद्रदेवांच्या १०८ नामांचा स्मरण किंवा मंत्रजप करणे अत्यंत हितकारक असल्याचे सांगितले जाते. ग्रहण आणि सूतक काळात विशेषतः लहान मुले, गर्भवती महिला, वृद्ध आणि आजारी व्यक्तींनी घराबाहेर न पडता काळजी घेणे आवश्यक असल्याची सविस्तर माहिती श्री. श्री. १००८ महामंडलेश्वर डॉ. योगेश्वरानंदगिरी महाराज यांनी दिली आहे.

“कर्तृत्व, करुणा आणि कुशल व्यवस्थापनाचा संगम – सौ. स्वप्ना प्रशांत यादव यांचा गौरव सोहळा”

एखाद्या व्यक्तीचे कर्तृत्व हे तिच्या वैयक्तिक यशातच नव्हे तर समाजाला दिलेल्या दिशेत, उभारीत आणि निर्माण झालेल्या विश्वासात मोजले जाते. चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आणि वाशिष्ठी डेअरीच्या मुख्य प्रवर्तक सौ. स्वप्ना प्रशांत यादव यांचा १ सप्टेंबर हा जन्मदिवस अशाच एका विलक्षण व्यक्तिमत्त्वाचा साक्षीदार ठरला. कर्तृत्व, करुणा आणि कुशल व्यवस्थापनाचा संगम असलेल्या या “मिसेस परफेक्शनिस्ट” यांना वाढदिवसाच्या शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
सौ. स्वप्ना यादव या सहकारमहर्षी मा. सुभाषराव चव्हाण यांच्या कन्या. वडिलांकडून मिळालेला प्रामाणिकपणा, शिस्त आणि समाजाशी असलेले नाते हे त्यांचे सर्वात मोठे भांडवल मानून त्यांनी आपल्या कार्यशैलीत त्याचा वारसा जपला आहे.
राजकीय क्षेत्रातही त्यांचे योगदान तितकेच महत्त्वाचे आहे. पती श्री. प्रशांत यादव यांच्या राजकीय प्रवासात त्या सदैव आधारस्तंभ ठरल्या आहेत. नुकत्याच झालेल्या चिपळूण-संगमेश्वर विधानसभा निवडणुकीतील प्रचार नियोजन असो वा १९ ऑगस्ट रोजी यादव साहेबांच्या भाजप प्रवेश सोहळ्याचे व्यवस्थापन – प्रत्येक ठिकाणी स्वप्ना ताईंनी केलेले परिश्रम आणि काटेकोर नियोजन दिसून आले. तब्बल १६०० समर्थकांसह ५८७ गाड्यांचा ताफा मुंबईत सुरक्षित ने-आण करण्याचे नियोजन त्यांच्या व्यवस्थापन कौशल्याची जाणीव करून देणारे ठरले.
उद्योजकतेतही त्यांनी वेगळी ओळख निर्माण केली आहे. चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेच्या कारभारातील पारदर्शकता आणि विश्वासार्हतेबरोबरच वाशिष्ठी डेअरीच्या उभारणीत शेतकरी, महिला आणि युवकांना रोजगाराची संधी देण्याचे त्यांचे योगदान लक्षणीय आहे. केवळ उद्योग नव्हे तर समाजाच्या फायद्यासाठी त्यांनी दोन भव्य कृषी महोत्सवांचे यशस्वी आयोजन केले, ज्यातून शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञान व नव्या प्रयोगांची माहिती मिळाली.
स्वप्ना मॅडम यांचे व्यवस्थापन कौशल्य केवळ अधिकाऱ्यांना व कर्मचाऱ्यांनाच नव्हे तर कार्यकर्त्यांनाही प्रेरणा देते. महिला सक्षमीकरणासाठी त्यांनी बचत गटांच्या माध्यमातून महिलांना आधार दिला आहे. कृषी महोत्सवात महिलांसाठी मोफत स्टॉल उपलब्ध करून देऊन त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्याची संधी दिली. त्यामुळे कार्यकर्त्यांपासून महिलांपर्यंत सर्वजण त्यांना आत्मीयतेने “ताई” म्हणून संबोधतात.
समाजकार्य, उद्योग, राजकारण आणि कौटुंबिक जबाबदाऱ्या अशा सर्व क्षेत्रांमध्ये समतोल राखणाऱ्या सौ. स्वप्ना यादव यांचे व्यक्तिमत्त्व प्रेरणादायी आहे. संघर्षातून उमललेले फूल, व्यवस्थापनातून उजळलेला दीपस्तंभ आणि समाजाशी असलेला जिव्हाळा – ही त्यांची खरी ओळख आहे.
त्यांच्या वाढदिवसानिमित्त केवळ शुभेच्छाच नव्हे, तर त्यांच्या कार्याचा गौरव समाजात होत आहे. त्यांच्या आयुष्याला उत्तम आरोग्य, निरंतर आनंद आणि अखंड कर्तृत्व लाभो, अशी प्रार्थना यानिमित्ताने करण्यात येत आहे.

पाचाड येथे गुरांच्या गोठ्यात ९ फूट लांबीचा अजगर; वन विभागाने सुरक्षितपणे रेस्क्यू करून नैसर्गिक अधिवासात सोडला

दिनांक २० ऑगस्ट २०२५ रोजी पाचाड येथे ग्रामस्थांना मोठा धोका टळला. श्री. सहदेव चिले यांच्या गुरांच्या गोठ्यात माळ्यावर ठेवलेल्या पेंढ्यामध्ये तब्बल ८ ते ९ फूट लांबीचा अजगर आढळून आला. हा प्रकार लक्षात येताच त्यांनी तत्काळ वन विभागास माहिती दिली. माहिती मिळताच वन विभागाचे मा. वन परिक्षेत्र अधिकारी, चिपळूण श्री. एस. एस. खान, वनरक्षक रामपूरचे श्री. राहुल गुंठे, वाहन चालक श्री. नंदकुमार कदम आणि सर्पमित्र श्री. प्रथमेश पवार हे तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी सावधगिरीने आणि कौशल्यपूर्ण पद्धतीने सदर अजगर सुरक्षितरीत्या पकडून रेस्क्यू केला. तपासणीत अजगर सुस्थितीत असल्याची खात्री झाल्यानंतर त्याला पुन्हा त्याच्या नैसर्गिक अधिवासात मुक्त करण्यात आले.

ही संपूर्ण कारवाई मा. विभागीय वन अधिकारी रत्नागिरी (चिपळूण) सौ. गिरिजा देसाई व मा. सहाय्यक वन संरक्षक रत्नागिरी (चिपळूण) यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. स्थानिक ग्रामस्थांनी वन विभागाच्या तत्परतेचे आणि सर्पमित्रांच्या धाडसाचे कौतुक केले आहे.

चिपळूण काळंबस्ते येथे १२ फूट लांब मगरीला जीवदान

वाशिष्ठी नदीचे पुराचे पाणी ओसरल्यानंतर मौजे काळंबस्ते येथे शेतात तब्बल १२ फूट लांबीची मगर आढळून आली. हा प्रकार आज शुक्रवार दि. २२ ऑगस्ट रोजी घडला. शेतकरी श्री. प्रशांत घोरपडे यांच्या शेतात मगर दिसताच त्यांनी तत्काळ वन विभागास याची माहिती दिली.

या घटनेची माहिती मिळताच वन विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. या बचाव मोहिमेत मा. वन परिक्षेत्र अधिकारी, चिपळूण श्री. एस. एस. खान, वनरक्षक रामपूर येथील श्री. राहुल गुंठे, वनरक्षक फिरते पथकातील श्री. दत्ताराम सुर्वे, श्री. विशाल पाटील, श्री. प्रणित कोळी, वनरक्षक आबलोली येथील श्री. कुमार पवार, वाहन चालक श्री. नंदकुमार कदम, वॉचमन श्री. संजय अंबोकर, श्री. सचिन भैरवकर तसेच सर्पमित्र श्री. शिवराज शिर्के, श्री. प्रणित काळकुटकी, श्री. प्रथमेश पवार आणि श्री. सुरेंद्र भोंडवे यांनी सहभाग घेतला. यावेळी या मगरीस पिंजऱ्यात जेरबंद करून सुरक्षित रित्या ताब्यात घेण्यात आले. तपासणीत ती सुस्थितीत असल्याची खात्री झाल्यानंतर मगरीस तिच्या नैसर्गिक अधिवासात पुन्हा मुक्त करण्यात आले.

ही संपूर्ण बचाव मोहीम मा. विभागीय वन अधिकारी चिपळूण सौ. गिरिजा देसाई व मा. सहाय्यक वन संरक्षक सौ. प्रियांका लगड यांच्या मार्गदर्शनाखाली पार पाडण्यात आली. वन विभागाच्या तत्पर कारवाईमुळे मोठी दुर्घटना टळली असून स्थानिक ग्रामस्थांनी वन विभागाच्या या कार्याचे कौतुक केले आहे.

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जादा भाडे आकारणाऱ्याखासगी कंत्राटी प्रवासी बस व रिक्षा यांचे विरुध्द तक्रार करा


आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जादा भाडे आकारणाऱ्या खासगी कंत्राटी प्रवासी बस व रिक्षा यांचे विरुध्द वाहन क्रमांक व प्रवासाच्या तपशीलासह उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या ई-मेल आयडी dyrto.08-mh@gov.in अथवा 8275101779 या कार्यालयाच्या व्हॉटसअप क्रमांकावर तक्रार दाखल करावी, असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी राजवर्धन करपे यांनी केले आहे.

जिल्हयातील प्रवाशी रिक्षांच्या मनमानी भाडे आकारणी बाबत प्रादेशिक परिवहन प्राधिकरणातर्फे तयार करण्यात आलेला भाडेदर तक्ता (मीटरप्रमाणे व शेअर रिक्षा) हा जिल्हयातील विविध रिक्षा थांब्यावर प्रदर्शित करण्यात आला आहे.

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे त्या त्या संवर्गातील टप्पा वाहतुकीचे सद्यस्थितीचे भाडेदर विचारात घेवून खाजगी कंत्राटी परवाना वाहनाचे त्या संवर्गासाठी संपूर्ण बससाठी येणाऱ्या प्रति कि. मी. भाडेदराच्या 50 टक्के पेक्षा अधिक राहणार नाही असे कमाल भाडेदर 27 एप्रिल 2018 रोजीच्या शासन निर्णयानुसार निश्चित केले आहेत.

दापोलीतील मौजे आंजर्ले, मंडणगडमधील मौजे वेळास समुद्र किनाऱ्याच्या ठिकाणी जैवविविधता वारसा स्थळ घोषित करण्याचा निर्णय

वारसा स्थळ घोषित केल्यास जैवविविधता ऱ्हास रोखण्यास मदत –जिल्हाधिकारी


आंजर्ले ता. दापोली आणि वेळास ता. मंडणगड येथील समुद्रकिनाऱ्यांना जैवविविधता वारसा स्थळ म्हणून घोषित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जिल्हाधिकारी एम. देवेंद्र सिंह यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय जैविक विविधता व्यवस्थापन समितीची बैठक संपन्न झाली.
या बैठकीत जिल्हाधिकारी श्री. सिंह म्हणाले की, जैवविविधता ही पर्यावरणीय सुरक्षा आणि मानवी कल्याणाशी निगडीत असल्याने अशा ठिकाणांची नोंद घेऊन त्यांना वारसा स्थळ म्हणून घोषित करणे अत्यंत गरजेचे आहे. त्यामुळे नैसर्गिक संपत्तीचे रक्षण होईल तसेच जलद गतीने होणारा जैवविविधतेचा ऱ्हास रोखता येईल. मौजे आंजर्ले आणि मौजे वेळास या ठिकाणी ऑलिव्ह रिडले कासवांची अंडी घालण्याची ठिकाणे प्रसिद्ध असून, या कासवांच्या संवर्धनासाठी स्थानिक लोकसहभाग वाढविणे आवश्यक आहे. यामुळे कासवांचे संरक्षण होऊन पर्यटनालाही चालना मिळेल, असे ते म्हणाले. या ठिकाणी जैवविविधता वारसा स्थळ घोषित करण्यासाठी आवश्यक प्रस्ताव प्राप्त झाल्यानंतर ना हरकत प्रमाणपत्र समितीच्या मंजुरीने तातडीने देण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. या बैठकीत विभागीय वन अधिकारी, रत्नागिरी (चिपळूण) यांनी ऑलिव्ह रिडले कासव संवर्धन व त्याचे महत्त्व याबाबत सादरीकरण केले.

आंजर्ले आणि वेळास समुद्र किनाऱ्याच्या ठिकाणी जैवविविधता वारसा स्थळ घोषित करण्याचा निर्णय

गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांना टोलमाफी

‘गणेशोत्सव २०२५-कोकण दर्शन’ विशेष पास

सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचा महत्त्वपूर्ण निर्णय

यंदाच्या गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांना मोठा दिलासा मिळाला आहे. सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी 23 ऑगस्ट ते 8 सप्टेंबर 2025 या कालावधीत मुंबई-बेंगळूरू राष्ट्रीय महामार्ग, मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग, तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग आणि महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या अखत्यारीतील रस्त्यांवरील टोल नाक्यांवर टोलमाफी जाहीर केली आहे. ही सवलत कोकणात जाणाऱ्या सर्व खासगी वाहनांना आणि एसटी बसेसना लागू असणार आहे.



या सवलतीसाठी “गणेशोत्सव 2025 – कोकण दर्शन” नावाचे विशेष टोलमाफी पास उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या पासवर वाहन क्रमांक आणि वाहन मालकाची माहिती नोंदवली जाईल. हे पास प्रादेशिक परिवहन कार्यालय, पोलीस आणि वाहतूक विभागाकडे उपलब्ध असतील. परतीच्या प्रवासासाठीही हेच पास वैध राहील. या निर्णयामुळे कोकणातील गणेशोत्सव साजरा करण्यासाठी गावी जाणाऱ्या लाखो गणेशभक्तांना आर्थिक दिलासा मिळणार आहे. दरवर्षी गणेशोत्सवात कोकणात मोठ्या संख्येने जात असतात. या टोलमाफीमुळे त्यांचा प्रवास अधिक सुलभ आणि खर्चात बचत होणार आहे. मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी गणेशोत्सवाच्या काळात घेतलेल्या या निर्णयामुळे कोकणातील गणेशभक्तांच्या उत्साहात निश्चितच भर पडणार आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातील नद्या धोक्याच्या पातळीवर

चिपळूण
राजापूर

रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील अनेक नद्या धोक्याच्या पातळीवर पोहोचल्या आहेत. पाटबंधारे विभागाने दिलेल्या अहवालानुसार आज सकाळी ९.३० वाजेपर्यंत विविध नद्यांची पाणीपातळी वाढलेली असून काही ठिकाणी ती धोक्याच्या वर गेली आहे.

राजापूर

जगबुडी नदीची पाणीपातळी खेड-भरणे पुलावर ७.१० मीटर इतकी नोंदली असून ती धोक्याच्या पातळीवर गेली आहे. तर वाशिष्ठी नदी चिपळूण बाजार पुलावर ४.६८ मीटर, शास्त्री नदी संगमेश्वर पुलावर ६.५० मीटर, काजळी नदी लांजा-अंजनारी पुलावर तब्बल १६.०७ मीटर, कोदवली नदी राजापूर पुलावर ८.५५ मीटर तसेच बावनदी नदी संगमेश्वर येथे ९.१० मीटर इतकी पातळी नोंदवली गेली असून या सर्व नद्या इशारा पातळीच्या वर गेल्या आहेत.

चिपळूण

दरम्यान, सोनवी नदी व मुक्कुंडी नदी धोक्याच्या पातळीच्या खाली असली तरी सातत्याने वाढत आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
नद्यांचा वाढता वेग व पातळी पाहता नदीकाठच्या गावांमध्ये पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. जिल्हा प्रशासनाने आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सज्ज ठेवली असून नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

राजापूर

असोंड-कुंभारवाडी रस्ता व मोरी अतिवृष्टीत वाहून; शेकडो नागरिकांचा संपर्क तुटला

दापोली तालुक्यातील वाकवली–उन्हावरे मुख्य रस्त्यावर असणाऱ्या असोंड गावातील एसटी स्टँडवरून कुंभारवाडीकडे जाणारा रस्ता आणि मोरी अतिवृष्टीमुळे पूर्णपणे वाहून गेली. त्यामुळे गणेशवाडी तसेच अर्धी कुंभारवाडी या वस्त्यांचा गावाशी संपर्क तुटला असून शेकडो नागरिक अडचणीत आले आहेत.१६ व १७ ऑगस्ट रोजी झालेल्या मुसळधार पावसामुळे रस्त्याशेजारील ओढा भरून वाहू लागला. प्रचंड पाण्याच्या लाटांनी मोरी वाहून गेली आणि त्याचबरोबर रस्ताही खचून गेला. या रस्त्यावरील मोरीवरूनच नळपाणी योजनेचा मार्ग असल्याने पाणीपुरवठाही विस्कळीत झाला आहे. रस्त्यालगत असलेली गावाची पिण्याच्या पाण्याची विहीर देखील आता नागरिकांसाठी दुर्गम ठरली आहे.



हा रस्ता वाकवली–असोंड–उन्हावरे मुख्य रस्त्याला जोडणारा असल्याने नेहमीच वाहतुकीने गजबजलेला असतो. दोन वर्षांपूर्वी या रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले होते. त्याचवेळी ग्रामपंचायतीने मोरीच्या जागी पुलाची मागणी केली होती. मार्च २०२३ पूर्वी जिल्हा परिषद विभागाकडेही या संदर्भात लेखी पत्र पाठवण्यात आले होते. मात्र अद्याप मंजुरी न मिळाल्यामुळेच ही आपत्ती ओढवली असल्याचे स्थानिक ग्रामस्थांचे म्हणणे आहे.



या घटनेनंतर असोंड-शिवनारी ग्रुप ग्रामपंचायतीचे उपसरपंच दिपक देवरुखकर, माजी सरपंच व विद्यमान सदस्य मनिषा करमरकर, तसेच दिपक परबलकर यांनी सांगितले की, “दरवर्षी पावसाळ्यात हा रस्ता खचतो. पुलाची मागणी वारंवार केली असूनही शासन व जिल्हा परिषद विभागाकडून कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही. शासनाने तातडीने पावले उचलली नाहीत तर नागरिकांचे हाल आणखी वाढतील.” या घटनेची माहिती मिळताच सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायतीचे सदस्य तसेच गावातील प्रकाश माणके, चंद्रकांत परबलकर, रघुनाथ परबलकर, मनोहर परबलकर यांसह अनेक ग्रामस्थांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली.

याबाबत जिल्हा परिषद दापोली बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, सदरचा रस्ता हा असोंड ग्रामपंचायतीच्या अख्त्यारीत येतो. घटनास्थळाची माहिती घेतली जाईल आणि तात्पुरत्या स्वरूपात रस्ता तयार करून नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी उपाययोजना केली जातील.

कोकण, मुंबई महानगर प्रदेश, आणि पश्चिम महाराष्ट्रातील घाट परिसरात 18-19 ऑगस्ट रोजी मुसळधार पावसाचा अंदाज

कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील घाट परिसरात धरण साठ्यात वाढ, नदी-नाल्यांना पूर, आणि दरड कोसळण्याची शक्यता असल्यामुळे नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन

मध्य भारतावर एक कमी दाबाचा पट्टा निर्माण होत आहे आणि याच्या प्रभावामुळे कोकण, मध्य महाराष्ट्र (प्रामुख्याने घाट परिसर),  मुंबई महानगर प्रदेश, आणि मराठवाड्यात (प्रामुख्याने पश्चिम आणि दक्षिण भाग) 18 ते 19 ऑगस्ट दरम्यान जोरदार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. यात प्रामुख्याने कोकणातील सर्वच जिल्हे; नाशिक, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, पालघर, ठाणे, उर्वरित मुंबई महानगर; सोलापूर, धाराशिव, आणि लातूर जिल्ह्यांचा काही भाग यांचा समावेश आहे.  या दरम्यान खान्देश आणि उर्वरित मराठवाड्यात देखील मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे. तुलनेत विदर्भात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस अपेक्षित आहे. या दरम्यान कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील घाट परिसरातील धरण साठ्यात वाढ होऊन नदी-नाल्यांना पूर येण्याची शक्यता आहे. तसेच काही प्रमाणात दरड कोसळणे, आणि सखल भागांमध्ये पूरस्थिती निर्माण होऊ शकते, ज्यामुळे नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून करण्यात आले आहे.

खेड तालुक्यात जगबुडी आणि नारंगी नदीला पूर, सुसेरी व आष्टी मार्ग ठप्प

रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पावसाचा जोर कायम असून खेड तालुक्यातील नारंगी आणि जगबुडी नदी धोक्याच्या पातळीवरून वाहू लागल्या आहेत. परिणामी ग्रामीण भागातील अनेक अंतर्गत रस्त्यांवर पाणी वाहू लागल्याने वाहतूक विस्कळीत झाली आहे.
खेड–बहिरवली मार्गावरील सुसेरी गावाजवळ नारंगी नदीचे पाणी रस्त्यावरून वाहू लागल्याने हा मार्ग पूर्णपणे ठप्प झाला आहे. त्यामुळे खडीपट्ट्यातील अंदाजे १५ ते २० गावांचा संपर्क खेड शहराशी तुटला आहे. या भागातील लोकांना आवश्यक सेवांसाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.

खेड आष्टी मार्गावर पुराचे पाणी व्हिडिओ लिंक 👇👇 https://youtube.com/shorts/w0ChLD33tGM?si=KbFB9z4WpSbmkHJ4


दरम्यान, खेड शहराला पाणी पुरवठा करणारे आणि ब्रिटिशकालीन धरण म्हणून ओळखले जाणारे बोरज धरण पावसाच्या पाण्याने ओसंडून वाहू लागले आहे. धरण ओव्हरफ्लो झाल्यामुळे खेड–आष्टी मार्गावर पाणी आले असून आष्टी गावाचा संपर्क देखील खेड शहराशी तुटला आहे.
सतत कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे परिस्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. प्रशासनाकडून नागरिकांना खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले असून संबंधित विभागांकडून बचाव आणि मदतकार्य तत्परतेने सुरू करण्यात आले आहे.

खेड सुसेरी मार्गावरील पूर व्हिडिओ लिंक 👇👇 https://youtube.com/shorts/L3N9WH1QpUA?si=F9dHdaG9Ikw9EhH3

ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा

https://chat.whatsapp.com/CEeDRKqaMDTBB15bt7AuLg?mode=ems_copy_c

खेड तालुका पत्रकार संघात फूट; दिवाकर प्रभू मराठी पत्रकार संघाचे नवनिर्वाचित अध्यक्ष

खेड तालुका पत्रकार संघात अध्यक्षपदाच्या निवडीवरून निर्माण झालेल्या वादामुळे संघात फूट पडली असून, तालुक्यात नव्या पत्रकार संघटनेची स्थापना करण्यात आली आहे. मराठी पत्रकार संघ खेड या नव्या संघटनेच्या अध्यक्षपदी गुरुवर्य दिवाकर प्रभू यांची एकमताने निवड करण्यात आली.

अवघ्या दोन दिवसांपूर्वी खेड तालुका पत्रकार संघाच्या अध्यक्षपदासाठी नावे जाहीर करण्यात आली होती. मात्र, काही सदस्यांचा आरोप आहे की या निवडी प्रक्रियेत अन्य सदस्यांना विश्वासात न घेता मनमानी करण्यात आली. या प्रकारामुळे नाराज झालेल्या पत्रकारांनी स्वतंत्र पत्रकार संघटना स्थापन करण्याचा निर्णय घेतला.

रविवारी जिल्हा परिषद विश्रामगृहात झालेल्या बैठकीत सर्वसहमतीने मराठी पत्रकार संघ स्थापन करण्यात आला. यावेळी गुरुवर्य दिवाकर प्रभू यांची अध्यक्षपदी, गोविंद राठोड आणि ज्ञानेश रोकडे यांची उपाध्यक्षपदी, देवेंद्र जाधव यांची सचिवपदी, तर जितेश कोळी यांची सहसचिवपदी निवड करण्यात आली.

संघटनेच्या स्थापनेनंतर नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा शिवसेना शहराध्यक्ष कुंदन सातपुते आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते विनायक निकम यांनी शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला आणि संघटनेच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. नव्या संघटनेच्या स्थापनेमुळे तालुक्यातील पत्रकारांसाठी नवे पर्व सुरू झाल्याचे मानले जात आहे.

जर जीव गेला तर जबाबदारी कोणाची?

खेड शहरात सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या दोन विविध संस्थांनी आपले विविध महोत्सव एकाच वेळी जवळ जवळ ठेवल्याने सर्वत्र चर्चेचा विषय बनला आहे. खेड शहरात असणाऱ्या महाड नाका परिसरातील मैदानात होणाऱ्या कार्यक्रमांना नेहमीच मोठ्या प्रमाणात गर्दी होते. या कार्यक्रमासाठी येणारे नागरिक आपल्या विविध वाहनांसह या ठिकाणी येतात. सध्या शहरात फेस्टिवलची क्रेझ सुरू आहे. वर्षाच्या सुरुवातीला खेड वासीयांना अपेक्षित असलेला आणि जिव्हाळ्याचा फेस्टिवल दरवर्षी याच मैदानात भरतो. यंदा मात्र फेस्टिवलसह क्रीडा कार्यक्रमांचे देखील या ठिकाणी अन्य एका संस्थेने आयोजन केले आहे. दरवर्षी पार्किंग साठी वापरण्यात येणाऱ्या जागेत यंदा क्रीडा स्पर्धा होणार आहेत. मात्र समोरासमोर असणाऱ्या दोन्ही जागेच्या मध्ये असणारा रस्ता हा देखील अरुंद असून या ठिकाणी जाण्यास असणारा मार्गही मुख्य मार्गापासून अरुंद आहे. या कार्यक्रमादरम्यान एखादी आपत्ती उद्भवल्यास या ठिकाणी मदत कार्य पोहोचणे देखील मुश्किल होणार आहे. तसेच याच परिसरात शहरातील एकमेव कॉर्डियोलॉजिस्ट दवाखाना असल्याने अत्यंत गंभीर परिस्थितीत असणारे रुग्ण देखील या ठिकाणी उपचारासाठी दाखल होतात. हृदयविकाराचा झटका आल्यानंतर खेड वासीयांना असणारा एकमेव आधार म्हणून या रुग्णालयाकडे पाहिलं जाते. मात्र यंदा आयोजित करण्यात आलेल्या विविध कार्यक्रमामुळे या रुग्णालयाच्या मार्गावर वाहतूक कोंडी होणार यात तीळ मात्र देखील शंका नाही.

नेहमीच सामाजिक कार्य करणाऱ्या या संस्था या ठिकाणी आपले महोत्सव साजरे करत असताना जर एखाद्या व्यक्तीला हृदयविकाराचा झटका आला आणि उपचारासाठी रुग्णालयात या मार्गावरून जात असताना या ठिकाणी झालेली गर्दी व वाहतूक कोंडीमुळे एखाद्या रुग्णाचा जीव दगावला तर त्याची जबाबदारी कोण घेणार? असा प्रश्न आता सर्वसामान्य जनतेतून उपस्थित केला जात आहे. खरे तर दोन्ही संघटनांनी शहरासाठी काम करत असताना सर्वप्रथम शहरवासी यांचा विचार करणे गरजेचे असताना देखील सद्यस्थितीला या संघटना व त्यांचे पदाधिकारी केवळ स्वतःचा आणि स्वतःच्या संघटनांच्या कार्यक्रमाचा विचार करताना पाहावयास मिळत आहेत. त्यामुळे या कार्यक्रमा दरम्यान एखाद्या रुग्णाचा रुग्णालयात जाताना किंवा या परिसरात एखादी दुर्घटना घडल्यास मदतीआभवी जर एखाद्याचा जीव गेला तर त्याची जबाबदारी कोण घेणार? याची माहिती या दोन्ही संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी माध्यमांसमोर येऊन शहरासह तालुक्यातील जनतेला द्यावी अशी अपेक्षा देखील सर्वसामान्य जनतेतून व्यक्त करण्यात येत आहे.

खेडमध्ये जेसी आणि लायन्सचा वाद चव्हाट्यावर,लायन्स कडून जेसीआय ला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न

एकाच वेळी दोन्ही संस्थांचे समोरासमोर कार्यक्रम

राकेश कोळी –

खेड सारख्या अधूनिक शहरात जिथे लहान मुलांच्या मनोरंजना साठी साधा बगीचा उपलब्ध नसलेल्या शहरात होणारे फेस्टिवल हेच केवळ शहरवासीयांच्या मनोरंजनाचे साधन शिल्लक राहिले आहे. यापूर्वी शहरात केवळ जेसीआय खेड यांच्याकडून जेसी फेस्टिव्हलचे आयोजन करण्यात येत होते. मात्र सन 2024  जानेवारीमध्ये लायन्स फेस्टिव्हलचे देखील लायन्स या सामाजिक संस्थेकडून आयोजन करण्यात आले होते. त्यामुळे शहरवासीयांना ह्या वर्षी दोन वेगवेगळ्या फेस्टिवलच्या माध्यमातून मनोरंजनाचा लाभ घेता आला होता. मात्र या दोन संस्थेमध्ये डिसेंबर 2023 मध्ये बॅनर लावण्याच्या शुल्लक कारणावरून वाद झाल्याचे शहरवासीयांनी पाहिले होते. त्यावेळे पासून या दोन्ही संस्था एकमेकांसोबत स्पर्धा करीत असल्याचे चित्र दिसून येत आहे. याबाबतचे वृत्त देखील टाईम्स मराठी न्यूज ने प्रसिद्ध केले होते. मात्र यंदा आयोजित करण्यात येत असलेल्या फेस्टिवल दरम्यान या दोन संस्थांमध्ये आता जोरदार स्पर्धा सुरू झाल्याचे चित्र दिसून येत आहे. यावेळी दोन्ही संस्थांनी वेगवेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन केले असले तरी दोन्ही कार्यक्रम एकाच वेळी होणार असल्याने यांच्यातील स्पर्धा किंवा वाद आता जगजाहीर झाला असे म्हटले तरी वावगे ठरू नये. कारण शहरात गेल्या वर्षभरात विविध सामाजिक उपक्रम राबवून खेड लायन्सचे माजी अध्यक्ष रोहन विचारे यांनी लायन्स संघटनेचे महत्त्व वाढवले होते. या उपक्रमातून त्यांना चांगली प्रसिद्धी आणि नावलौकिक देखील प्राप्त झाले होते. मात्र यंदा होणाऱ्या जेसी फेस्टिवल वेळी त्यांनी आपल्या क्रीडा मोहत्सवाचे आयोजन करून त्यांनी जेसी सोबत स्पर्धा करीत असल्याचे दाखवून दिले. खरेतर दोन्ही संघटनेने काल गुरुवार 26 डिसेंबर रोजी सायंकाळी विविध माध्यमातून आपले कार्यक्रम जाहीर केले.

लायन्स क्लब पत्रकार परिषद
जेसीआय खेड पत्रकार परिषद

यामध्ये जेसीसने आपल्या फेस्टिवल कार्यालयाचे उद्घाटन करून तर लायन्सने पत्रकार परिषद घेवून क्रीडा मोहत्सव जाहीर केला. मात्र जेसीस या सामाजिक संस्थेने खेड शहरात विविध ठिकाणी बॅनरबाजी करून आपल्या तारखा यापूर्वीच म्हणजे 17 डिसेंबरला जाहीर केल्या होत्या. तर लायन्सने 26 डिसेंबर रोजी पत्रकार परिषद घेवून आपल्या तारखा जाहीर केल्या. हा वाद एवढ्या पुरता मर्यादित न राहता दोन्ही संघटनांनी आपले कार्यक्रम शहरातील एकच मैदानावर घेतल्याने यांच्यातील स्पर्धा आता टोकाला पोहचल्याचे पहावयास मिळत आहे. खरेतर शहरतील महाड नाका येथील एस टी डेपोचे ग्राउंड म्हणजे गोळीबार मैदान म्हणून परिचित असणाऱ्या मैदानात हे फेस्टिवल आयोजित केले जातात. तर त्या बाजूलाच असणाऱ्या क्रीडा संकुलाच्या जागेत फेस्टीवलसाठी येणारे नागरिक आपली वाहने पार्किंग करीत असतात. फेस्टिवलच्या कालावधीत नेहमी अंधारात असलेले हे मैदान मात्र झगमगुन उठते. मात्र यंदा सर्वात आधी जेसी फेस्टिवलने आपल्या कार्यक्रमाची तारीख जाहीर केली असताना देखील लायन्सने आपला क्रीडा मोहत्सव याच दरम्यान जाहीर केला. एवढ्यावरच न  थांबता जेसी फेस्टिवल होणाऱ्या ग्राउंड समोरील क्रीडा संकुलाचे ग्राऊंडवर ही क्रीडा स्पर्धा आयोजित केली. खरेतर या क्रीडा संकुलाच्या मैदानाचा वापर गेले अनेक वर्षे जेसीआय ने फेस्टीवलसाठी येणाऱ्या नागरिकांच्या वाहनांच्या पार्किंग केला होता. इतकेच नव्हे तर 2024 मध्ये पार पडलेल्या लायन्स मोहत्सवामध्ये देखील याच जागेचा वापर वाहन पार्किंग साठी करण्यात आला होता. मात्र आता ही जागा क्रीडा मोहत्सवास घेवून एकप्रकारे लायन्सने जेसीआय खेडची कोंडी करण्याचा प्रयत्न केल्याचे पहावयास मिळत आहे.

याबाबत दोन्ही संघटनेच्या पदाधिकाऱ्यां कडून अधिक माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला असता दोन्ही संघटनेने आपले कार्यक्रम हे पूर्व नियोजित असल्याचे स्पष्टपणे सांगितले. तर खेड जेसिस फेस्टिवल देखील पूर्व नियोजित असून 5 ऑक्टोंबर रोजी सर्व प्रथम फेस्टिवलच्या तारखांची माहिती शहरातील व्हॉट्स ऍप या सोशल मीडियावर जाहीर केल्याचे पदाधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. तर लायन्सच्या पदाधिकाऱ्यांनी देखील आपले वर्षभरातील कार्यक्रम जुलै मध्ये शेड्युल्ड केल्याचे सांगितले. सर्व प्रथम आम्ही सोशल मीडियाच्या माध्यमातून लायन्स मिसळ फेस्टिव्हलचे आयोजन केल्याचे सांगत असताना त्यांनी जेसी फेस्टिव्हलची तारीख जाहीर झाल्याने आपला मिसळ फेस्टिवल रद्द करून मोठ्या प्रमाणात साजरा होणाऱ्या जेसी फेस्टीवलसाठी आम्ही एक पाऊल मागे घेवून आमचा मिसळ फेस्टिवल रद्द केल्याचे देखील त्यांनी यावेळी बोलताना आठवणीने सांगितले. तर यावेळी बोलताना दोन्ही संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी एकमेकांच्या संघटनेची नावे देखील आपल्या तोडत घेणे टाळल्याचे पहावयास मिळत होते. तसेच दोन्ही संघटनेच्या पदाधिकाऱ्यांकडून आमच्या कोणतेही मतभेद नसून आमच्यात सलोखा आहे हेही त्यांनी आवर्जुन सांगितले. माञ बोलणे आणि कृती यातून त्यांच्यातील मतभेद हे स्पष्ट पणे जाणवत होते. यावेळी या दोन्ही संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना एकमेकांशी चर्चा करून हे कार्यक्रम रिषेड्युल्ड करता येतात का पाहा असे सांगताच त्यांनी मात्र आता आमचे नियोजन पूर्ण झाले असून आता कार्यक्रम आम्ही रिषेड्युल्ड करू शकत नसल्याचे देखील सांगितले. मात्र मिसळ मोहत्सव्
रिश्येड्युल्ड होता तर क्रीडा मोहत्त्सव कुठून आला. जर लायन्स ने एक पाऊल मागे घेवून मिसळ मोहत्सव रद्द केला तर मग क्रीडा मोहत्सव का? असा प्रश्न देखील या निमित्त उपस्थित होत आहे. यावेळी दोन्ही संघटनेच्या पदाधिकाऱ्यांकडून ठीक आहे आम्ही विचार करतो काही करता येते का ते पाहतो असे सांगण्याचे  साधे औपचारिकता देखील न दाखवल्याने यांच्यातील स्पर्धा, संघर्ष किंवा वाद याच्यावर शिक्कामोर्तब होतो हे मात्र निश्चित.


या दोन्ही संघटनेतील वादामुळे किंवा अपापसातल्या स्पर्धेमुळे नुकसान मात्र या दोन्ही संघटनेचे व तालुका वसियांचे होणार हे मात्र निश्चित. कारण हे दोन्ही कार्यक्रम एकच वेळी आयोजित केल्याने क्रीडा वासियांना व तालुकावासियांना एकावेळी एकच कार्यक्रमाचा लाभ घेता येणार आहे. क्रीडाप्रेमी आपल्या कुटुंबासह फेस्टीवलला भेट देतील की क्रीडा स्पर्धांचा आनंद घेतील हा प्रश्न आता सर्वसामान्य जनतेला पडल्यावाचून राहणार नाही. तर हे दोन्ही कार्यक्रम एकाच वेळी आयोजित केल्याने कार्यक्रमंना येणारे पब्लिक देखील विभागले जाण्याची शक्यता देखील वर्तविण्यात येत आहे. यांच्या आपसातील स्पर्धेमुळे उत्कृष्ठ काम करणाऱ्या सामाजिक संस्थांच्या नावाला देखील हानी पोहचण्याची शक्यता असल्याचे सध्या चर्चिले जात आहे. त्यामुळे या दोन्ही संस्थांनी एकमेकांशी पुन्हा समन्वय साधून आपल्या कार्यक्रमाच्या तारखा ऍडजस्ट होतात का हे पाहावे जेणेकरून तालुकावासियांना या दोन्ही कार्यक्रमाचा लाभ घेता येईल असे मत सध्या शहरातील नागरिकांमधून व्यक्त करण्यात येत आहे.

©️2024 Times Marathi News, Media Network

Editor – Rakesh Koli

Rg.No.MH-28-0054845

Khed, Ratnagiri 

ताज्या बातम्या आणि घडामोडींची माहिती मिळवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करून सबस्क्राईब करा 

खेड भाजपामध्ये फुट, मुख्यमंत्र्यांसाठी केलेला नवस फेडताना तालुकाप्रमुखच गैरहजर

मोजकेच कार्यकर्ते नवस फेडताना

दापोली विधानसभा मतदारसंघात महायुतीमध्ये बिघाडी असल्याचे चित्र निवडणुकी आधीपासूनच पहावयास मिळत आहे मात्र आता भाजपा मध्येच बिघाडी झाल्याचे समोर येत असून देवेंद्र फडणवीस यांना राज्याचे मुख्यमंत्री पद मिळावे यासाठी केलेला नवस फेडताना खेड तालुका भाजपचे पदाधिकारी गैरहजर असल्याचे चित्र दिसून आले आहे 
याबाबत भाजपचे खेड तालुका अध्यक्ष ऋषिकेश मोरे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री पद मिळावे यासाठी नवस केल्याचे मान्य करत लवकरच तो नवस फेडणार असल्याचे त्यांनी सांगितले मात्र त्यांच्याच पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मिळून हा नवस फेडल्याची त्यांना पुसटशीही कल्पना नसल्याचे दिसून आले खरे तर गेल्या काही दिवसांपूर्वी महायुतीच्या मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात आला यानिमित्त खेड शहर शिवसेनेच्या वतीने मोठा जल्लोष देखील करण्यात आला मात्र यावेळी देखील खेड तालुका भाजपचा एकही पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित असल्याचे पहावयास मिळाले नाही त्यामुळे महायुतीमध्ये बिघाडी आहे हे पुन्हा एकदा यावरून उघडकीस आले तर काल कशेडी येथे असलेल्या श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मठामध्ये फेडण्यात आलेल्या नवसा वेळी देखील खेड तालुका भाजपचे पदाधिकारी गैरहजर असल्यामुळे भाजपामध्ये पण बिघाडी असल्याचे पहावयास मिळत आहे या संदर्भात भाजपच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी तात्काळ बैठकीचे आयोजन केल्याची माहिती देखील खात्रीशीर सूत्रांकडून प्राप्त झाली असून आता पुढे काय होते याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे

रामदास कदमांसह शिवसेनेचे ४० स्टार प्रचारक मैदानात..

राज्यात विधानसभा निवडणुकीची जोरदार रणधुमाळी सुरू आहे. आज निवडणुकीसाठी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता. त्यानंतर आता प्रचाराला खऱ्या अर्थाने सुरूवात देखील झाली आहे. प्रचारासाठी सर्वच राजकीय पक्षांच्या स्टार प्रचारकांची यादी तयार झाली आहे. सेलिब्रिटींपासून ते वरिष्ठ राजकीय नेत्यांचा या स्टार प्रचारकांच्या यादीमध्ये समावेश आहे. शिवसेना शिंदे गटाच्या स्टार प्रचारकांची यादी समोर आली आहे.

रविवारपासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रचाराला सुरूवात करणार आहे. मुंबईतल्या कुर्ला येथे मुख्यमंत्र्यांची पहिली सभा होणार आहे. शिवसेना उमेदवारांच्या प्रचारासाठी एकूण ४० स्टार प्रचारक मैदानात उतरले आहेत. या सर्वाची तोफ राज्यभर धडाडणार आहे. स्वत: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अभिनेता गोविंदा, अभिनेते शरद पोंक्षेसह अनेक राजकीय नेत्यांचा या यादीमध्ये समावेश आहे. प्रचाराचे दिवस शिवसेनेसाठी खूपच महत्वाचा असणार आहे. जास्तीत जास्त मतदारसंघातील मतदारांपर्यंत पोहण्याचा प्रयत्न यावेळी केला जाणार आहे.

एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या स्टार प्रचारकांची यादी

१.एकनाथ शिंदे
२.रामदास कदम
३.गजानन किर्तीकर
४.आंदनराव आडसूळ
५.प्रताप जाधव
६.गुलाबराव पाटील
७.निलम गोऱ्हे
८.मिना कांबळी
९.उदय सामंत
१०.शंभूराज देसाई
११.दीपक केसरकर
१२.तानाजी सावंत
१३.दादा भुसे
१४.संजय राठोड
१५.अब्दुल सत्तार
१६.भरत गोगावले
१७.संजय शिरसाट
१८.श्रीकांत शिंदे
१९.धैर्यशील माने
२०.नरेश मस्के
२१.श्रीरंग बारणे
२२.मिलिंद देवरा
२३.किरन पावसकर
२४.राहुल शेवाळे
२५.शरद पोंक्षे
२६.मनीषा कायंदे
२७.गोविंदा
२८.कृपाल तुमाणे
२९.दीपक सावंत
३०.अनंद जाधव
३१.ज्योती वाघमारे
३२.शीतल म्हात्रे
३३.राहुल लोंढे
३४.हेमंत पाटील
३५.हेमंत गोडसे
३६.राजू वाघमारे
३७.मिनाक्षी शिंदे
३८.ज्योती मेहर
३९.अक्षय भोसले
४०.तेजस्विनी केंद्रे

दम नव्हता तर उभं राहायचं नव्हतं ना मग, मी पण दाखवली असती माझी ताकद…

कोल्हापूर जिल्ह्याचे काँग्रेस नेते सतेज पाटील यांना निवडणुकीच्या आधीच मोठा धक्का बसला आहे. कोल्हापूर उत्तर विधानसभेच्या काँग्रेसच्या उमेदवार मधुरिमाराजे यांनी त्यांचा अर्ज मागे घेतल्याने काँग्रेसकडे उमेदवारच राहिला नाही. त्यानंतर मात्र सतेज पाटील हे चांगलेच भडकल्याचं दिसून आलं. ‘दम नव्हता तर उभारायचं नव्हतं ना मग, मी पण दाखवली असती माझी ताकद’ असं म्हणत सतेज पाटलांनी त्यांचा राग व्यक्त केला.

दम नव्हता तर उभ रहायच नव्हतं…

कोल्हापूरच्या राजकारणात मोठा ट्विस्ट आला असून कोल्हापूर उत्तर विधानसभेच्या अधिकृत उमेदवार मधुरिमाराजे छत्रपती यांनी शेवटच्या क्षणी त्यांचा अर्ज मागे घेतला. काँग्रेसचे बंडखोर उमेदवार राजेश लाटकर यांनी त्यांचा अर्ज मागे घ्यायला नकार दिल्यानंतर मधुरिमाराजे यांनी त्यांचा अर्ज मागे घेतल्याची चर्चा आहे. काँग्रेसचे नेते सतेज पाटील यांच्यासाठी मात्र हा धक्का असल्याचं समजलं जातंय. सुरूवातीला काँग्रेसने माजी नगरसेवक राजेश लाटकर यांच्या नावाची घोषणा केली होती. मात्र त्यांच्या नावाला अनेक नगरसेवकांनी विरोध केल्यानंतर मात्र काँग्रेसला उमेदवार बदलावा लागला. त्या ठिकाणी मधुरिमाराजे छत्रपती यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. आता बदललेल्या उमेदवारानेच अर्ज मागे घेतल्यानंतर सतेज पाटील मात्र चांगलेच भडकले आहेत. काँग्रेसच्या अधिकृत उमेदवारांनेच अर्ज मागे घेतल्यानंतर आता काँग्रेसकडे कोणताही उमेदवार नाही. त्यामुळे बंडखोरी केलेले अपक्ष उमेदवार राजेश लाटकरांनाच पाठिंबा द्यावा लागणार आहे. कोल्हापूर उत्तर मतदारसंघामध्ये शिवसेना शिंदे गटाने माजी आमदार राजेश क्षीरसागर यांना उमेदवारी दिली आहे.

खेड उबाठा शहराध्यक्षांचा राजीनामा, शिंदेच्या शिवसेनेत करणार प्रवेश

Breaking News

खेड शहर उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे शहराध्यक्ष दर्शन अजित महाजन यांनी मंगळवारी सकाळी अचानक आपल्या शहराध्यक्ष पदाचा राजीनामा दिला असून मंगळवारीच ते शिवसेना पक्षात अधिकृत पक्ष प्रवेश करणार असल्याची माहिती खात्रीशीर सूत्रांकडून मिळत आहे. उबाठा गटाच्या शहराध्यक्षांनी अचानक राजीनामा देवून घेतलेल्या निर्णयामुळे खेड तालुक्यातील उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेला आणि जिल्हाप्रमुख सांजयराव कदम यांना मोठा धक्का बसला आहे. एक आक्रमक तरुण नेतृत्व, चांगले वक्ते यांच्या माध्यमातून शिवसेना उबाठा गटाने गमावले असून त्याचा फायदा आता शिवसेना शिंदे पक्षाला होणार आहे. शहराध्यक्ष म्हणून काम करीत असताना दर्शन महाजन यांनी अनेक आंदोलने आणि उपोषणे करून प्रशासनाचे लक्ष वेधून सर्व सामान्यांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांच्या राजीनाम्याने उबाठा पक्षाला खेड शहरात मोठा धक्का बसला असून आगामी विधान परिषद निवडणुकीत याचा फायाड शिवसेना पक्षाला व आ. योगेश कदम यांना मात्र नक्की होईल.

रत्नागिरीतील खलाशाचं मुंडक कापून बोटीवर ठेवलं, बोटीला लावली आग, मृत खलाशी गुहागरमधील

मानसिक संतुलन बिघडलेल्या खलाशाने चक्क तांडेलचे डोके कापून बोट पेटवून दिल्याची धक्कादायक घटना देवगड समुद्रात सोमवारी दुपारी घडली. या घटनेने संपूर्ण कोकणात एकच खळबळ उडाली आहे. कोस्टगार्डच्या मदतीने बाकीच्या खलाशांना वाचविण्यात यश आले आहे. सिंधुदुर्गातील देवगडच्या समुद्रात रत्नागिरीतील खलाशाचा खून केल्याची घटना सोमवार 28 रोजी दुपारी घडली. झारखंड येथील निर्दयी खालाशाने रत्नागिरी गुहागर येथील खालाचे मुंडके कापले त्यानंतर त्याने रागाच्या भरात बोटीलाच आग लावून दिल्याने भर समुद्रात बोटीचा थरार अंगावर काटा आणणारा होता. या धक्कादायक प्रकाराने रत्नागिरीसह सिंधुदुर्ग जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. रवींद्र नाटेकर गुहागर असे ठार झालेल्या या व्यक्तीचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, खोल समुद्रात मासेमारी करिता गेलेल्या नौकेवरील खलाशी व तांडेल यांचेमध्ये आपापसात झालेला वाद विकोपाला जाऊन नौकेवरील तांडेलचा खून करून नौका पेटवल्याची घटना कुणकेश्वर पासून खोल समुद्रात १५ वावाच्या अंतरावर दुपारी २.४५ वाजण्याच्या सुमारास घडली असून बोटीचे सुमारे दीड कोटीचे नुकसान झाल्याचे समजते.

संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा


मिळालेल्या माहितीनुसार या घटनेतील संशयित आरोपी जयप्रकाश विश्वकर्मा राहणारा छत्तीसगड हा मानसिक रुग्ण असल्याचे समजते. ते नौकेवरील तांडेलाचा खून करून नौकेला आग लागल्यानंतर नौकेच्या पाठीमागील बाजूस असलेल्या छोट्या होडीत जाऊन बसला.दरम्यान घटनास्थळी गस्तीनौकेने गेलेल्या पोलिसांनी ताब्यात घेतले. व देवगड येथे देवगड बंदरात आणले व त्याला उपचारासाठी देवगड ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
अधिक माहिती अशी की रत्नागिरी येथील राजीवाडा येथील नुमान रफिक फणसोफकर यांच्या मालकीची नुझत राबिया ही नौका रविवारी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास मिरकर वाडा येथून मासेमारी करिता निघाली होती.सोमवारी कुणकेश्वर येथे खोल समुद्रात मच्छीमारी करताना खलाशी व तांडेल यांच्यात वाद झाला.हा वाद विकोपाला गेल्यानंतर नौकेवरील खलाशी जयप्रकाश विश्वकर्मा यांनी तांडेल रवींद्र नाटेकर राहणारा गुहागर याचा खून करून नौका पेटवून दिली. विश्वकर्मा याने नौका पेटविल्यानंतर नौकेमागील असलेल्या छोट्या होडीत जाऊन बसला.नौकेने पेट घेतल्याचे निदर्शनास येताच व नौकेवरील खलाशांनी जीवाच्या आकांताने केलेली आरडाओरड ऐकून नजीकच्या नौकांनी घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळविण्याचा व नौकेवरील खलाशांना वाचविण्याचा प्रयत्न केला. या नौकेवरील तांडेल धरून एकूण २६ खलाशी होते.
याबाबतची माहिती मत्स्य व्यवसाय अधिकारी पोलीस प्रशासन यांना देण्यात आली .त्यानुसार मत्स्य व्यवसाय अधिकारी पार्थ तावडे यांनी देवगड बंदर येथे येऊन सागर पोलीस शाखेस माहिती दिली. सागर पोलीस शाखेच्या गस्तीनौकेने तात्काळ घटनास्थळी जाऊन त्या संशयित आरोपीला ताब्यात घेऊन देवगड बंदरात आणले.

©️2024 Times Marathi News, Media Network
Editor – Rakesh Koli
Rg.No.MH-28-0054845
Khed, Ratnagiri

ताज्या बातम्या आणि घडामोडींची माहिती मिळवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करून सबस्क्राईब करा

🪀 व्हाट्सअप ग्रुप लिंक
https://chat.whatsapp.com/CEeDRKqaMDTBB15bt7AuLg

👤 फेसबुक पेज लिंक
https://www.facebook.com/share/D44NdYnfuQVHqqY9/?mibextid=qi2Omg

🌀 इंस्टाग्राम लिंक
https://www.instagram.com/rakesh0946?igsh=emZodDkzc25peWVm

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
👉🏻 आपल्या परिसरातील बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क क्रमांक  8390380101

दुसऱ्या यादीतही गुहागरचा उमेदवार नाही, संभ्रम कायम

राज्यात सध्या विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असल्याचे पहावयास मिळत आहे. रत्नागिरी जिल्ह्यात देखील विविध राजकीय पक्षांकडून आपापले उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत. मात्र गुहागर विधानसभा जागेवर शिवसेनेकडून अद्यापही उमेदवारी जाहीर करण्यात आली नाही. उद्या 28 ऑक्टोबर रोजी राजेश बेंडल हे आपला उमेदवारी अर्ज सादर करणार असल्याची खात्रीशीर माहिती समोर येत आहे. मात्र या जागेवर यापूर्वी शिवसेनेकडून विपुल कदम यांच्या नावाची देखील चर्चा झाली होती.

शिवसेना पक्षाची दुसरी यादी रविवारी सायंकाळी जाहीर झाली असून यामध्ये विविध 20 जागांवर उमेदवार निश्चित करण्यात आले आहेत. मात्र या दुसऱ्या यादीत देखील गुहागर विधानसभा मतदारसंघाचा उमेदवार जाहीर न झाल्याने या ठिकाणी पुन्हा संभ्रम निर्माण झाला आहे. गुहागर विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचा उमेदवार नक्की कोण असा प्रश्न आता येथील जनतेसह शिवसैनिकांसमोर उपस्थित झाला आहे. गुहागर विधानसभेच्या जागेवर शिवसेना पक्षाकडून राजेश बेंडल की विपुल कदम कोणाची वर्णी लागते याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. 29 ऑक्टोबर ही उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख असून 28 ऑक्टोबर रोजी दुपारनंतर या जागेचा उमेदवार जाहीर होण्याची शक्यता देखील राजकीय वर्तुळातून वर्तवण्यात येत आहे.

©️2024 Times Marathi News, Media Network
Editor – Rakesh Koli
Rg.No.MH-28-0054845
Khed, Ratnagiri

ताज्या बातम्या आणि घडामोडींची माहिती मिळवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करून सबस्क्राईब करा

🪀 व्हाट्सअप ग्रुप लिंक
https://chat.whatsapp.com/CEeDRKqaMDTBB15bt7AuLg

👤 फेसबुक पेज लिंक
https://www.facebook.com/share/D44NdYnfuQVHqqY9/?mibextid=qi2Omg

🌀 इंस्टाग्राम लिंक
https://www.instagram.com/rakesh0946?igsh=emZodDkzc25peWVm

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
👉🏻 आपल्या परिसरातील बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क क्रमांक  8390380101

उबाठाचा दापोलीतील उमेदवार बदलणार – योगेश कदम

संजय कदमांना AB फॉर्म दिला नाही

कोकण हा शिवसेनेचा बालेकिल्ला असून पक्ष फुटीनंतर येथील शिवसेनेत ही दोन गट पडले आहेत. एकीकडे शिवेसना नेते आणि माजी खासदार विनायक राऊत, वैभव नाईक, राजन साळवी यांच्या नेतृत्वात शिवसेना ठाकरे गट तर दुसरीकडे शिवसेना नेते रामदास कदम, विद्यमान मंत्री दीपक केसरकर आणि मंत्री उदय सामंत यांच्या नेतृत्वात शिंदेंची शिवसेना सक्रीय आहे. त्यातच, आता शिंदेंच्या शिवसेनेत निलेश राणेंचा प्रवेश झाल्यामुळे कोकणातील राजकारण वेगळ्याच वळणावर गेलंय. दरम्यान, विधानसभा निवडणुकांसाठी कोणताील उमेदवारांची नावे जाहीर होत आहेत. शिवसेना ठाकरे गटाच्या पहिल्याच यादीत 5 उमेदवारांची नावे जाहीर झाली असून दापोली मतदारसंघातून संजय कदम यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. मात्र, संजय कदम यांची उमेदवारी बदलली जाईल, असा दाव शिवसेना युवा नेते योगेश कदम यांनी केला आहे. योगेश कदमांच्या या दावाने कोकणातील राजकारणात खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे, आदित्य ठाकरेंचा दौरा रद्द होण्यामागे हेच कारण असल्याचंही त्यांनी सूचवलंय. माजी मंत्री आणि शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांचा दौरा रद्द का झाला याबाबत मला माहिती नाही. दापोलीमधून उद्धव गटाचा उमेदवार बदलला जाऊ शकतो, असे योगेश कदम यांनी म्हटले आहे. संजय कदम यांनी केवळ उमेदवारी अर्ज भरलाय त्यांना पक्षाकडून एबी फॉर्म देण्यात आलेला नाही, असा खळबळजनक दावा शिंदे गटाचे दापोलीचे उमेदवार आमदार योगेश कदम यांनी केला आहे. 29 तारखेनंतर आदित्य ठाकरे दापोली दौऱ्यावरती येतील, त्यांच्या मनातल्या उमेदवाराला एबी फॉर्म देतील, अशी माझ्याकडे खात्रीलायक माहिती आहे, असा दावाच दापोलीतील शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार योगेश कदम यांनी केलाय. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी कोकणला झुकते माप दिल्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या काळात कोकणातून धनुष्यबाण हद्दपार झाले, असे टीका करणाऱ्यांना ही मोठी चपराक असल्याचंही योगेश कदम यांनी म्हटले आहे. तसेच, कोकणातील जनता शिवसेनेसोबत आहे, हे 23 तारखेला पुन्हा एकदा सिद्ध होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केलाय.

संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

https://youtube.com/shorts/C7REyurt8Rk?feature=share

डंपरने चिरडल्याने दोघांचा जागीच मृत्यू

रत्नागिरी हातखंबा रस्त्यावरील टीआरपी पेट्रोल पंपाजवळ शुक्रवार दिनांक २५ ऑक्टोबर २०२४ सकाळी नऊ वाजता भीषण अपघात झाला. या अपघातात डंपरने दुचाकीवरून जाणाऱ्या दोन जणांना चिरडले यात दोघांचाही जागीच होण्याची दुर्दैवी घटना घडली. मुक्तेश्वर सहदेव ठीक (58, रा प्रशांतनगर रत्नागिरी) व राघो कृष्णा धुरी (68, रा साईनगर रत्नागिरी) अशी या अपघातात मृत पावलेल्या दोघांची नावे आहेत. मुक्तेश्वर हे महावितरण चे कर्मचारी होते.


रत्नागिरी ते हातखंबा मार्गावर दिवस-रात्र प्रचंड वर्दळ असते. सकाळच्या सुमारास गाव-खेड्यातील नागरिक आपल्या दैनंदिन कामासाठी शहरात येत असतात. यातच सध्या चौपदरीकरणाचे काम सुरू असल्याने सर्वच भागातील रस्ते एकाच वेळी खोदल्याने रस्त्यावरील प्रवास वाहन चालकां साठी जीवघेणा ठरत आहे.

©️2024 Times Marathi News, Media Network
Editor – Rakesh Koli
Rg.No.MH-28-0054845
Khed, Ratnagiri

ताज्या बातम्या आणि घडामोडींची माहिती मिळवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करून सबस्क्राईब करा

🪀 व्हाट्सअप ग्रुप लिंक
https://chat.whatsapp.com/CEeDRKqaMDTBB15bt7AuLg

👤 फेसबुक पेज लिंक
https://www.facebook.com/share/D44NdYnfuQVHqqY9/?mibextid=qi2Omg

🌀 इंस्टाग्राम लिंक
https://www.instagram.com/rakesh0946?igsh=emZodDkzc25peWVm

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
👉🏻 आपल्या परिसरातील बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क क्रमांक  8390380101

शेल्डी वाघणवाडी ग्रामस्थांचा मनसेत प्रवेश

महाराष्ट्र नवनिर्माण सेना राज्य सरचिटणीस व खेडचे माजी नगराध्यक्ष मा. श्री.वैभवजी खेडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली खेड तालुका अध्यक्ष श्री.संदीपजी फडकले यांच्या उपस्तितीत आज दि. 05 सोमवार रोजी शेल्डी गावातील नवनाथ मायनाक यांच्या माध्यमातून शेल्डी वाघणवाडी येथील संपूर्ण वाडीतील ग्रामस्थांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत पक्षप्रवेश केला.

महारष्ट्र नवनिर्माण सेनेचे पक्ष प्रमुख हिंदू जननायक श्री.राज ठाकरे यांच्या विचारांनी प्रेरित होवून खेड तालुक्यातील शेलदी वाघनवडी येथील ग्रामस्थांनी खेडचे माजी नगराध्यक्ष व मनसे राज्य सरचिटणीस मा श्री.वैभवजी खेडेकर, यांच्या मार्गदर्शनाखाली शेल्डी गावातील नवनाथ मायनाक यांच्या माध्यमातून शेल्डी वाघणवाडी येथील संपूर्ण वाडीतील तरुण मंडळ, महिला मंडळ व ग्रामस्थ सुनिल कांदेकर,संदेश आंबेकर,मनोज इंचले,योगेश आंबेकर,भास्कर पवार,मंगेश येसरे, अक्षय आंबेकर,रोहन खांबे, विनोद इंचले, राहुल येसरे,रोहित येसरे, प्रेम बोबले, हरिश्चंद्र खांबे, नारायण इंचले, तुकाराम कांदेकर, गंगाराम बोबले,अर्जुन मायनाक तसेच महिला वंदना कांदेकर, मनीषा येसरे, भारती उदेग, वासंती पवार, अर्चना खांबे, सुरेखा इंचले, साधना येसरे, सुवर्णा खांबे, सुरेखा इंचले, योगिता आंबेकर,bसाक्षी बोबले, रंजना इंचले, चंद्रभागा बोबले, अनिता येसरे, वैशाली खांबे, ज्योती धुळे, सुनीता येसरे, स्वरा कांदेकर या सर्वांनी राज साहेबांच्या विचारावर प्रेरित होऊन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत पक्ष प्रवेश केला या प्रसंगी सर्व महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.

रॉयल हॉस्पिटलला १वर्ष पुर्ण, २५०० रुग्णांनी घेतला लाभ

प्रसिध्दी रुग्णवाहिकेकडून प्रथम वर्धापनदिनाच्या हार्दिक शुभेच्छा

खेड तालुक्यातील भरणे नाका येथे गेल्या वर्षी सुरू झालेल्या रॉयल हॉस्पिटलला जानेवारी २०२४ मध्ये एक वर्ष पूर्ण झाले. गेल्या एका वर्षात साधारणतः २५०० रुग्णांनी रॉयल हॉस्पिटल च्या आरोग्य सेवेचा लाभ घेतला.

गेल्या वर्षभरातील रुग्णसेवेतुन असे लक्षात आले कि, काही आर्थिक दृष्ट्या दुर्बल रुग्ण पैश्यांच्या अभावी निरंतर आरोग्य सेवा घेऊ शकत नाहीत. अशा रुग्णांना आरोग्य सेवा देता यावी यासाठी सामाजिक बांधिलकी च्या नात्याने रॉयल हॉस्पिटल ने चॅरिटी ओपीडी सुरु केली आहे . या उपक्रमाद्वारे सर्वसामान्य गरीब रुग्णांना स्पेशालिस्ट फिजिशियन डॉक्टरांचा सल्ला घेता येणार आहे. चॅरिटी ओपीडी आठवड्याच्या दर मंगळवारी सकाळी १० ते दुपारी १ आणि संद्याकाळी ५ ते रात्री ८ वाजेपर्यंत चालू असेल. ओपीडी साठीचे शुल्क फक्त २५ रुपये ठेवण्यात आले असून, औषधें ,रक्त तपासण्या किंवा इतर क्ष किरण तपासण्यांवर सुद्धा रुग्णांना सूट देण्यात येणार आहे. रॉयल हॉस्पिटल चे संस्थापक डॉ . शिवाजी डुबे यांनी सर्व खेड वासियांना या उपक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे.
या सोबतच खेड मधील बरेच रुग्ण सुपर स्पेशियालिटी डॉक्टरांचा सल्ला घेण्यासाठी पुण्या-मुंबई सारख्या मोठ्या शहरांकडे धाव घेतात . यामध्ये रुग्णांना बराच आर्थिक, शारीरिक व मानसिक त्रास सहन करावा लागतो तसेच वेळेचाही अपव्यय होतो. रुग्णांची हि अडचण दूर करण्यासाठी रॉयल हॉस्पिटल ने विशेष विनंती करून मुंबईच्या नामांकित हॉस्पिटल्स मध्ये सेवा देणारे सुपर स्पेशियालिटी डॉक्टर आता खेड मध्ये उपलब्ध करून दिले आहेत. यामध्ये कॅन्सर तज्ञ , हृदय विकार तज्ञ, मेंदू विकार तज्ञ , किडनी विकार तज्ञ , रोबोटिक शस्त्रक्रिया तज्ञ , मणका विकार तज्ञ , स्त्री रोग तज्ञ इत्यादी डॉक्टरांचा समावेश आहे. या सर्व डॉक्टरांचा सल्ला माफक दरामध्ये उपलब्ध करून देणार असल्याचे डॉ. शिवाजी डुबे यांनी सांगितले.

आंबवली येथे वरिष्ठ पुरुष व महिला गट अजिंक्यपद व निवड चाचणी कब्बड्डी स्पर्धा संपन्न

न्यू इंग्लिश स्कूल अँड ज्यु. कॉलेज आंबवली आणि खेड तालुका कबड्डी असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने तालुका स्तरीय कबड्डी खुल्या गटातील अजिंक्य पद निवड चाचणी पुरुष व महिला स्पर्धा नुकतीच न्यू इंग्लिश स्कूल आंबवलीच्या क्रीडांगणात संपन्न झाली.

या स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी आंबवली गावच्या सरपंच सौ.राजश्रीताई यादव,उपसरपंच श्री. विजय यादव, संस्थेचे अध्यक्ष श्री. प्रकाश श्रीपत महाडिक, कार्यकारी मंडळाचे चेअरमन श्री.विश्वास रामचंद्र कदम, शाळा समिती चेअरमन श्री. विजय गोगावले सचिव श्री.दिपक बळीराम यादव, कोषाध्यक्ष श्री. संतोष यादव,आस्तान गावचे उपसरपंच श्री.ऋषिकेश मोरे, वरवली गावचे उपसरपंच श्री.आखाडे, आंबवलीचे पोलीस पाटील श्री.संदिप यादव, हुंबरी गावचे पोलीस पाटील श्री.पालकर, विश्वस्त मंडळ सचिव श्री.संजय यादव, संस्था संचालक श्री. चंद्रशेखर यादव, श्री.संतोष यशवंत कदम, श्री.अनिल लक्ष्मण यादव,ठाणे जिल्हा ज्येष्ठ राष्ट्रीय पंच श्री.मनोहर यादव शाळेचे मुख्याध्यापक श्री.कांबळे सर, श्री.आव्हाड सर, क्रीडा शिक्षक श्री.संतोष शिर्के सर, कर्मचारी वृंद , खेड तालुका कबड्डी असोसिएशनचे सचिव श्री.रवींद्र बैकर, कोषाध्यक्ष श्री. दाजी राजगुरू, सहसचिव श्री. शरद भोसले, राज्य पंच श्री.स्वप्नील बैकर, समाज सेवक श्री.विकास कृष्णा यादव सर्व शिक्षकेतर कर्मचारी तसेच इतर मान्यवर, क्रीडाप्रेमी ग्रामस्थ, आजी – माजी विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.

यावेळी श्री. ऋषिकेश मोरे व संस्था अध्यक्ष श्री. प्रकाश महाडिक यांनी मनोगत व्यक्त करत सर्व खेळाडूंना मार्गदर्शन केले. या निवडचाचणी स्पर्धामध्ये एकूण १२ संघांनी सहभाग झाले. स्पर्धेतील विजेता श्री.काळकाई कला, क्रीडा केंद्र भरणे, उपविजेता श्री.झोलाई युवा प्रतिष्ठान आंबवली ठरला तर जय गणेश खेड, सोमजाई क्रीडा मंडळ वरवली व अष्टविनायक क्रीडा मंडळ तिसंगी हे संघ सुद्धा पारितोषिकचे मानकरी ठरले. सर्व विजयी संघाना मान्यवरांच्या हस्ते आकर्षक चषक देऊन गौरवण्यात आले. सदर निवड चाचणी स्पर्धा यशस्वी करण्यासाठी खेड तालुका कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष श्री.सतीश उर्फ पप्पुशेठ चिकणे, सचिव श्री. रवींद्र बैकर, उपाध्यक्ष श्री. महेशराव भोसले, श्री. आनंद उर्फ भाई हंबीर, कोषाध्यक्ष श्री. दाजी राजगुरू,कार्याध्यक्ष श्री. संमद बरोंडकर, सहसचिव श्री. शरद भोसले कार्यकारणी सदस्य श्री. सुभाष आंबेडे, श्री. दीपक यादव, श्री.सु.रा.पवार, श्री.अमोल दळवी,श्री. स्वप्नील सैतवडेकर, सौ. संपदा गुजराथी यांचे मार्गदर्शन लाभले.
निवड चाचणी स्पर्धा यशस्वीतेसाठी विशेष सहकार्य करणारे सर्व मान्यवर, संस्था पदाधिकारी, आर्थिक व अन्य मदत करणारे क्रीडा प्रेमी, ग्रामस्थ या सर्वांना खेड तालुका कबड्डी असोसिएशनच्या वतीने धन्यवाद देण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन व आभार प्रदर्शन आंबवली हायस्कूलचे क्रीडाशिक्षक कबड्डी राज्यपंच श्री.संतोष शिर्के सर यांनी केले.

बोरज येथे 2 ट्रकच्या समोर समोर धडकेत 1 ठार

अधिक माहिती साठी पुढील लिंक वर क्लिक करा https://bit.ly/3uh64MC

कशेडी घाटात टँकर दरीत कोसळून चालक जागीच ठार

सविस्तर माहितीसाठी खालील लिंक वर क्लिक करा https://youtu.be/g9Qx2iB5Wr0?si=zCZbw_NFOKGbAW8B

खेड आगाराला 55 हजारांचा दंड

वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी RTO विभागाची कारवाई, 2017 पासून केलेल्या कारवाई बाबत नाराजी

महाराष्ट्राची जीवनवाहिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लाल परीवर RTO विभागाने कारवाई केल्याने चालक वाहक व महामंडळाच्या कर्मचारी वर्गामधून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. 2017 विविध प्रकारच्या वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केल्याबाबत RTO विभागाने खेड आगाराला 55 हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. सदरचा दंड हा संबधित व्यक्तीकडून वसूल करण्याचे आदेश रत्नागिरी विभागाने दिल्याने कर्मचारी वर्गातून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

महाराष्ट्र राज्य परिवहन महांडळाच्या खेड आगाराला RTO विभागाकडून रस्ते वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी सुमारे 55 हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. सदरचा दंड हा सीट बेल्ट, अतिवेगाने वाहन चालवणे, वेग मर्यादेचे उल्लंघन करणे, धोकादायक स्थितीत वाहने उभी करणे आशा विविध कारणांसाठी ठोठावला आहे. एकूण 24 वाहनांना हा दंड ठोठावण्यात आला असून या दंडाची रक्कम संबधित व्यक्ती कडून वसूल करण्याचे आदेश राज्य परिवहन महामंडळाच्या रत्नागिरी विभागाने दिली आहे. यामुळे चालकांच्या मधून नाराजीचा सूर उमटत आहे. मुळात RTO विभागाने गाड्या पासिंग करताना सीट बेल्ट नसताना कशा काय पसिंग केल्या? असा प्रश्न चालकांमधून उपस्थित करण्यात येत आहे. तसेच आम्हाला दंड ठोठावण्या पूर्वी संबधित कार्य शाळेवर दंडात्मक कारवाई करण्याची मागणी चालक वर्गातून होत आहे. खेड आगारातील कारवाई करण्यात आलेल्या वाहनांची अवस्था सुस्थितीत नसताना देखील पासिंग होत असल्याने कर्मचारी वर्गातून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. तसेच 2017 पासूनचा दंड वसूल करण्यासाठी इतके वर्षे का लागली असा प्रश्न खेड आगारातील कर्मचाऱ्यांकडून उपस्थित करण्यात येत आहे.

धाडसी पोलीस कर्मचारी संपत गितेंचा आम. योगेश कदम व खेड लायन्स कडून सत्कार

खेड तालुक्यातील हेदली येथे रविवार दि. 21 जानेवारी रोजी झालेल्या बैलगाडा स्पर्धेत बैल उधळून स्पर्धा पाहण्यासाठी आलेल्या प्रेक्षकांमध्ये शिरला होता. या दुर्घटनेत एका 5 वर्षाच्या मुलीला दुखापत झाली होती. यावेळी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता त्या मुलीला खांद्यावर टाकून 300 मीटर धावत येवून तिला तत्काळ उपचारासाठी रुग्णालयात हलवले. अशा धाडसी पोलीस कर्मचारी संपत गीते यांचा दापोली खेड मंडणगड चे आमदार योगेश रामदास कदमलायन्स क्लब ऑफ खेड सिटीच्या यांच्या वतीने आज सोमवार दि. 22 रोजी खेड शहरातून निघालेल्या शोभायात्रे दरम्यान शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देवून सक्तार करून सन्मान करण्यात आला.

सरकार पुन्हा जनतेला बैलगाडीत बसवणार – प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील

कोंकण केसरी राज्यस्तरीय बैलगाडा स्पर्धा आज दि. 21 रोजी खेड तालुक्यातील हेडली गावात मोठ्या उत्साहात पार पडल्या. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी हे सरकार पुन्हा जनतेला बैलगाडीत बसवेल असे वक्तव्य यावेळी केली.

https://youtu.be/7mymSwk4Xy0?si=hr0bJ_EQSzqyGQ9d

देशात पूर्वी इंधनाचे दर नियत्रित होते. मात्र हे सरकार आल्यापासून इंधनाचे दर गगनाला भिडले आहेत. त्यामुळे जनतेवर पुन्हा बैलगाडी वापरण्याची वेळ येईल असे वक्तव्य या स्पर्धमध्ये त्यांनी व्यक्त केले. या कोंकण केसरी राज्यस्तरीय स्पर्धेत एकूण 130 बैलगाड्यानी सहभाग घेतला होता. या स्पर्धा यशस्वी होण्यासाठी अमित कदम यांच्यासह शर्वर कुदुपकर व उमेश कदम यांनी विशेष मेहनत घेतली. या स्पर्धा यशस्वी होण्यासाठी हेडली सावेनी येथील ग्रामस्थांनी विशेष मेहनत घेतली. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे, माजी आदा. संजय कदम यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

मनसेकडून वैष्यभूषण पुरस्कार प्राप्त झालेल्या मान्यवरांचे अभिनंदन

रत्नागिरी जिल्हा वैष्य वाणी समाज संघ यांच्याकडून समाजात भरीव कामगिरी करणाऱ्या व सामाजिक स्तरावर स्वतःचे व समाजाचे नाव रोशन करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान करण्यात येणार आहे. समाजाच्या वतीने विविध पुरस्कार देवून समाजातील या सामजिक व्यक्तिमत्त्वाना गौरविण्यात येणार आहे. हा पुरस्कार प्राप्त झालेल्या मान्यवर व्यक्तिंचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज्य सरचिटणीस वैभव खेडेकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी भेट घेवून अभिनंदन केले.

रत्नागिरी जिल्हा वैष्य वाणी समाज संघ यांच्याकडून समाजात भरीव कामगिरी करणाऱ्या व सामाजिक स्तरावर स्वतःचे व समाजाचे नाव रोशन करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान दि. 21 जानेवारी रोजी चिपळूण येथे होणाऱ्या महामेवळव्यात करण्यात येणार आहे. यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून वैश्य भूषण, वैश्य उद्योजक व वैश्य रत्न पुरस्कार प्राप्त झालेले बिपिन दादा पाटणे, अरविंद शेठ तोडकरी, परागजी चिखले व मिनारजी चिखले यांची भेट घेवून पुष्पगुच्छ देवून अभिनंदन करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज्य सरचिटणीस वैभवजी खेडेकर, शैलेशजी धारिया, ॲड. मिलींदजी नांदगावकर, प्रदीप भोसले यांच्यासह कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.

मला अटक करा, पण कुटुंबाला का अडकवता? – आम. राजन साळवी

राजापूर लांजा मतदारसंघातील ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांच्या घरी गुरुवारी सकाळीच एसीबीच्या पथकाने धडक देत चौकशी सुरू केल्याने मोठी खळबळ उडाली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने साळवीं सह त्यांची पत्नी अनुजा साळवी आणि मोठा मुलगा शुभम साळवी यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. यावेळी त्यांनी मला अटक करा पण कुटुंबाला का अडकवाता असा भावनिक प्रश्न पत्रकारांशी बोलताना उपस्थित केला.

“मी शिंदे गटासोबत आलो नाही, म्हणून तुम्ही राग काढला असेल, हे मी समजू शकतो. पण त्यासाठी माझ्यावर राग काढा, मला अटक करा, जेलमध्ये टाका, काहीही करा, पण माझ्या पत्नी आणि मोठ्या मुलावर गुन्हा दाखल करताय, जनता आणि आम्ही सोडणार नाही” अशी प्रतिक्रिया आम. राजन साळवी यांनी दिली. राजन साळवी यांच्यावर साडेतीन कोटी रुपयांच्या बेनामी संपत्ती जमवल्या प्रकरणी एसीबीने त्यांच्यावर कारवाई केली आहे. ज्ञात संपत्तीच्या तुलनेत ११८ टक्के जास्त रक्कम जमा असल्याचा आरोप आम. साळवी यांच्यावर आहे. यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना आम. राजन साळवी यांनी माझ्यावर गुन्हा दाखल करा, कारण मी एक लोकप्रतिनिधी आहे, त्यांच्या दृष्टीने मी काही गुन्हा केला असेल, पण राजन साळवी काय आहे, कसा आहे हे माझ्या कुटुंबाला माहिती आहे, पक्षाला, जनतेला आणि मतदार संघाला ही माहिती आहे, परंतु माझी पत्नी व मोठ्या मुलावर गुन्हा दाखल करणे ही खेदाची आणि दुर्दैवाची गोष्ट आहे, याचे परिणाम सरकारला निश्चितपणे भविष्यात भोगावे लागतील” अशी प्रतिक्रिया आम. राजन साळवी यांनी यावेळेस दिली.

स्फोटात 1 ठार, 5 जखमी

ठाण्यातील बदलापूर खरवई येथील महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या (एमआयडीसी) प्लांटमध्ये आज पहाटे 5 वा. सुमारास स्फोट झाला. या स्फोटात 1 कामगाराचा मृत्यू झाला असून 5 जण जखमी झाले आहेत. या कंपनीत मोठा स्फोट झाला तेव्हा आजूबाजूच्या तीन ते चार किलोमीटर परिसरातील इमारती हादरल्या. या सोबतच केमिकल कंपनीच्या बाहेर उभ्या असलेल्या दोन टेम्पो वाहनांना आग लागल्याचे वृत्त समोर येत आहे.

ठाणे जिल्ह्यातील बदलापूर एमआयडीसीमध्ये असलेल्या विकी केमिकल फॅक्टरीत आज गुरुवारी सकाळी पहाटे 5 वाजता घडली असून त्याचा प्रभाव 4 किमीपर्यंत दिसत असल्याचे सांगण्यात येत आहे. वृत्तानुसार, स्फोटात 1 कामगार ठार झाला असून 5 इतर कामगार जखमी झाले आहेत. अग्निशमन दल आणि पोलीस घटनास्थळी पोहोचले. ठाणे शहर पोलीसही परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी केमिकल फॅक्टरीत पोहोचले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, हा स्फोट इतका जबरदस्त होता की त्याचा परिणाम चार ते पाच किलोमीटरच्या परिसरातही दिसून आला. या स्फोटामुळे संपूर्ण बदलापूर शहर हादरले असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेवूनआग आटोक्यात आणण्याचे काम केले. बदलापूर आगीत जखमी झालेल्या कामगारांना तातडीने कंपनीतून बाहेर काढून रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, एका कामगाराचा मृत्यू झाला आहे. स्फोटाचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही.

दापोली शिवसेनेत 70 पेक्षा अधिक जणांचा आम. योगेश कदम यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश

दापोली शहरातील खोंडा प्रभाग क्रमांक 4 व अहमदनगर प्रभाग क्रमांक 2 येथील जवळपास 70 हून अधिक नागरिकांनी आज दापोली खेडचे आमदार योगेश दादा कदम यांच्या विकासकामांवर प्रेरित होऊन आज शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला. यावेळी सर्व पक्ष प्रवेशकर्त्यांचे शिवसेना पक्षात आमदार योगेश दादा कदम यांनी स्वागत केले. दापोली येथील शहर शिवसेनेच्या शाखेमध्ये हा पक्षप्रवेश सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला.

यावेळी माजी समाजकल्याण सभापती भगवान घाटगे, तालुकाप्रमुख उन्मेषा राजे, माजी नगराध्यक्ष व माजी शहरप्रमुख राजेंद्र पेटकर, विधानसभा क्षेत्र संघटक प्रदीप सुर्वे, उपजिल्हाप्रमुख सुधीर कालेकर, महिला आघाडी शहर संघटिका रसिका पेटकर, माजी नगराध्यक्ष परवीन शेख, माजी नगरसेविका शबनम मुकादम, नगरसेविका रूपा घाग, प्रीती शिर्के, शिवानी खानविलकर, शहरप्रमुख प्रसाद रेलेकर, युवा सेना शहर अधिकारी स्वप्नील पारकर, माजी सभापती ममता शिंदे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष रोहिणी दळवी, कोकण कृषी विद्यापीठ कार्यकारिणी सदस्य सुनील दळवी, युवासेना उपजिल्हाधिकारी अमित पार्दुले, युवासेना सचिव किरण बांद्रे, माजी शहरप्रमुख सुहास खानविलकर, उप तालुकाप्रमुख चंद्रकांत कामथेकर, शहर समन्वयक प्रकाश साळवी, अल्पसंख्याक शहरप्रमुख नदीम मुकादम, जावेद भाई सारंग, दीपक सूर्यवंशी, शशांक घाग, राजू बोथरे, युवती शहर अधिकारी कीर्ती परांजपे, माजी समाजकल्याण सभापती चारुता कामठेकर आदिंसह शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमात नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना आमदार योगेश कदम यांच्या हस्ते नियुक्तिपत्र प्रदान करण्यात आले व पक्षात त्यांचे स्वागत करण्यात आले.

यावेळी मनोगत व्यक्त करताना आमदार योगेश कदम यांनी दापोली शहरातील विकासकामांवर भाष्य करताना नगरपंचायत निवडणुकीत मतदारांनी आपल्या उमेदवारांना दिलेल्या भरघोस प्रतिसादाबद्दल समाधान व्यक्त केले. तसेच आज ज्या नागरिकांनी आपल्या पक्षात प्रवेश केला आहे त्यांना कधीही विकासकामांची कमतरता भासू देणार नाही असा शब्द दिला. दापोली शहरातील प्रत्येक विकासकाम करण्याची धमक आमदार योगेश कदम यांच्यामध्ये आहे हा विश्वास जनतेने दाखवला आहे आणि हा विश्वास आमदार म्हणून मी नक्कीच सार्थ ठरवेन असे आश्वासन आमदार योगेश कदम यांनी उपस्थिताना केले. सर्व प्रवेशकर्त्यांचे पक्षात स्वागत करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमाला शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

राज्यस्तरीय कोंकण केसरी बैलगाडा शर्यतीचे आयोजन

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी दापोली विधानसभा

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संस्थापक अध्यक्ष मा. शरदचंद्रजी पवार यांच्या 83 व्या वाढदिवसाचे औचित्य साधून दापोली विधानसभा राष्ट्रवादी पार्टीने राज्यस्तरीय कोंकण केसरी बैलगाडा शर्यतीचे आयोजन दि. 21 जानेवारी रोजी केले आहे.

राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष मा. शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या 83 व्या वाढदिवसाचे औचित्य साधून दापोली विधानसभा मतदार संघातील कार्यकर्ते व पदाधिकारी यांच्याकडून राज्यस्तरीय कोंकण केसरी बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा रत्नागिरी जिल्हा बैलगाडा असोसिएशनच्या मान्यतेने होणार असून या स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक हे रुपये १,११,१११/-, द्वितीय पारितोषिक रुपये ७७,७७७/-, तृतीय पारितोषिक रुपये ५५,५५५/-, चतुर्थ पारितोषिक रुपये ३३,३३३/- व पंचम पारितोषिक हे रुपये २२,२२२/- इतके असणार असून या शिवाय अनेक आकर्षक पारितोषिके व चषक देण्यात येणार आहे. या स्पर्धा हेदली काणेकर मोहल्ला येथे रविवार दि. 21 जानेवारी रोजी सकाळी 10 वा. आयोजित करण्यात आले असून या स्पर्धेसाठी राष्ट्रवादी पक्षाचे वरिष्ठ नेते प्रमुख पाहुणे म्हणून हजर राहणार असल्याचे समजते.

मराठा आरक्षणासाठी “चलो मुंबई” जरांगे पाटलांचा लाँग मार्च, 26 जानेवारी पासून उपोषण, असा आहे लाँग मार्चचा मार्ग

मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील आता थेट मुंबईत धडकणार आहे. या आंदोलनाचा मार्ग नेमका कसा असणार आहे, याची माहिती स्वतः मनोज जरांगे पाटील यांनी दिली आहे. 20 जानेवारीला सकाळी 9.00 वाजता अंतरवाली सराटीपासून पद यात्रा सुरू होईल. दुपारी कोळगाव, ता. गेवराई येथे भोजन आणि मातोरी, ता. शिरूर येथे रात्री मुक्काम असणार आहे.

प्रजासत्ताक दिनीच भगवं वादळ मुंबईत धडकणार, जरांगेंचा लाँग मार्च, असं आहे वेळापत्रक

21 जानेवारी
दुपारी भोजन – तनपुरवाडी, ता. पाथर्डी
रात्री मुक्काम – बाराबाभली ( करंजी घाट )

22 जानेवारी
दुपारी भोजन – सुपा
रात्री मुक्काम – रांजणगाव ( गणपती )

23 जानेवारी
दुपारी भोजन – कोरेगावं भीमा
रात्री मुक्काम – चंदननगर (खराडी बायपास) पुणे

मनोज जरांगे पाटलांनी लाँग मार्च संदर्भात स्वतः दिली माहिती

24 जानेवारी
पुणे शहर – जगताप डेअरी – डांगे चौक – चिंचवड – देहूफाटा
रात्री मुक्काम – लोणावळा

25 जानेवारी
दुपारी भोजन – पनवेल
रात्री मुक्काम – वाशी

26 जानेवारी रोजी चेंबूर वरून पदयात्रा निघून थेट आझाद मैदान किंवा शिवाजी पार्क येथे दाखल होत मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण सुरु होणार आहे.

उबाठाच्या संघटकपदी बिलाल म्हाळूनकर

उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाच्या दापोली विधानसभा मतदार संघाच्या संघटक पदी म्हाप्रल येथील बिलाल म्हळूनकर यांची निवड करण्यात आली आहे. माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते, जिल्हाध्यक्ष सचिन कदम यांनी नियुक्ती पात्र देवून ही नियुक्ती जाहीर केली. बिलाल म्हाळूनकर यांची संघटकपदी निवड झाल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. म्हाळूनकर यांनी यापूर्वी तालुका, जिल्हा व राज्य स्तरावरील विविध पदे भूषवली आहेत. त्यांचा समाजातील दांडगा जनसंपर्क व त्यांच्या कामाच्या अनुभवाचा उपयोग उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाला संघटना वाढीसाठी निश्चित होईल असे मत सर्वसामान्य कार्यकर्त्यां मधून व्यक्त करण्यात येत आहे

रत्नागिरीतील बचत गट मॉल राज्यभर राविण्याच्या सूचना – मुख्यमंत्री शिंदे

राज्यातील महिलांच्या सबलीकरणासाठी महिला सशक्तीकरण अभियान राबविण्यात येत आहे. महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी त्यांना बाजारातील मागणी असणाऱ्या वस्तुंच्या निर्मितीचे प्रशिक्षण देणे, भांडवल उपलब्ध करणे आणि त्या वस्तुंचे ब्रांडिंग, मार्केटिंग करणे यासाठी मदत करण्यात येणार आहे. तसेच बचत गटांना त्यांच्या मालाची विक्री करता यावी याकरिता जिल्हा प्रशासनाद्वारे तात्पुरते स्टॉल उपलब्ध करुन द्यावेत. राज्यातील बस स्थानक, रेल्वे स्थानक आणि मॉल्स मध्ये काही स्टॉल तातडीने बचत गटांना कसे उपलब्ध करुन देता येतील, याचे नियोजन करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी दिल्या. दीर्घकालीन उपाययोजना म्हणून रत्नागिरी जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या बचत गट मॉल ही संकल्पना सुद्धा इतर जिल्ह्यात राबविण्याचे निर्देशही त्यांनी दिले. या अभियानातून जास्तीत जास्त महिलांना बचत गटांच्या चळवळीत सहभागी करुन घेण्याचे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले. राज्यातील महिला सशक्तीकरण अभियान राबविण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक वर्षा शासकीय निवासस्थान येथे झाली. यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. या बैठकीला उद्योगमंत्री उदय सामंत यांच्यासह, विविध विभागांचे सचिव, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, महापालिकांचे आयुक्त दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.

आमच्या ताज्या बातम्या मिळवण्यासाठी पुढील चॅनल लिंकवर क्लिक करा https://whatsapp.com/channel/0029Va5hOLUJUM2Z6aRJ613C

राज्यातील धार्मिक स्थळे, शहरी – ग्रामीण भागाच्या स्वच्छतेसाठी कायमस्वरुपी योजना राबवणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

राज्यातील सर्व धार्मिक स्थळांना लाखोच्या संख्येने भाविक भेट देत असतात. भाविकांचे श्रद्धास्थान असणारे ही ठिकाणे स्वच्छ आणि सुंदर राहिली पाहिजेत. त्यासाठी या धार्मिक स्थळांच्या स्वच्छतेसाठी कायमस्वरुपी योजना राबविण्याची आणि यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करुन देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.

यावेळी मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, राज्यातील धार्मिक स्थळांवरील इमारतींची स्वच्छता संबधित ट्रस्टमार्फत होत असते. परंतू बाहेरील भागात अस्वच्छता कायम राहते. यामुळे भाविकांना त्रास होत असतो. याची गंभीर दखल घेत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी धार्मिक स्थळांना स्वच्छ आणि सुंदर बनविण्याचे आवाहन केले. या आवाहनाला प्रतिसाद देत राज्यात तातडीने जिल्हाधिकारी यांच्या पुढाकारातून धार्मिक स्थळांची स्वच्छता मोहिम राबवावी. तसेच मंदिर परिसरात विशेष स्वच्छता मोहिम राबवून विद्युत रोषणाई करण्यात यावी. आठवडाभरात हा बदल दिसायला हवा. तसेच धार्मिक स्थळांवर कायमस्वरुपी स्वच्छता राखण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून विशेष योजना तयार करण्याच्या आणि या योजनेला जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून निधी उपलब्ध करण्याच्या सूचना दिल्या. या योजनेसाठी महसूल विभागाच्या माध्यमातून नोडल अधिकारी नेमून राज्य स्तरावरुन लक्ष ठेवावे, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

शहरा बरोबरच ग्रामीण भागाच्या स्वच्छतेसाठी अभियान

आपल्या राज्याला स्वच्छता अभियानात देशात पहिला क्रमांक मिळाला आहे. हा क्रमांक आपल्या राज्याला कायम ठेवायचा आहे. यात सखोल स्वच्छता मोहीम महत्वाची ठरणार आहे. राज्यातील शहरी भागात ही मोहिम आपण राबवत आहोत. या मोहिमेद्वारे एकाच वेळी जादा मनुष्यबळ आणि संसाधने वापरून स्वच्छता करण्यात येत आहे. यामुळे प्रदूषणासोबतच रोगराई सुद्धा कमी होत असून या मोहिमेला जनतेचा चांगला प्रतिसाद लाभत आहे. तसेच यासाठी नगरविकास विभागातर्फे नोडल अधिकाऱ्याची नियुक्ती करुन लक्ष ठेवण्यात येणार आहे. स्वच्छता अभियानात सफाई कर्मचाऱ्यांचे मोठे योगदान आहे. त्यांना प्रोत्साहन द्यायला हवे तेव्हा त्यांच्याकडून अधिक चांगले काम होणार आहे, या मोहिमेचे ते खरे हिरो ठरले आहेत. तसेच राज्यात ही स्वच्छता केवळ शहरी भागापूरती मर्यादित राहायला नको. यासाठी शहराच्या हद्दीलगत तसेच ग्रामीण भागात देखील स्वच्छता मोहिम राबविण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले. या भागांच्या स्वच्छतेसाठी देखील कायमस्वरुपी योजना राबविण्याचे आणि जिल्हा नियोजन समिती माध्यमातून निधी उपलब्ध करुन देण्यात यावा. त्याचप्रमाणे राज्याच्या किनारपट्टी भागातील जिल्ह्यांना किनारा स्वच्छतेसाठी १४ युनिट उपलब्ध तातडीने करुन देण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या.

चालकांच्या आंदोलनाला वैभव खेडेकर यांचा जाहीर पाठिंबा

हिट अँड रन या काळ्या कायद्या विरोधात 9 जानेवारी पासून खेड तालुक्यातील चालकांनी स्टेरिंग छोडो आंदोलनाला सर्वात केली होती. त्या आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी चालकांनी शहरातील सर्व वाहतूक संघटनांशी चर्चा करण्यासाठी बैठक आयोजित केली होती. या बैठकीला भेट देत आपण चालकांच्या पाठीशी ठामपणे उभे असल्याचे सांगत मनसे नेते वैभव खेडेकर यांनी आपला पाठिंबा त्यांना जाहीर केला.

स्टेरिंग छोडो आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी खेड शहरातील चालकांनी एकत्र येत भरणे नका येथील काळकाई मंदिराच्या सभागृहात बैठक आयोजित केली होती. यावेळी या बैठकीला भेट देवून चालकांच्या विविध प्रश्नांवर चर्चा करत मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी हा कायदा लादला जात असेल तर चुकीचे आहे. चालक हा जाणीवपूर्वक अपघात करत नसून अपघात हे घडतात. क्वचितच काही अपघात हे घडवले जात असून त्यांना शासन करण्यासाठी न्याय व्यवस्था आहे. हा जुलमी कायदा लागू होऊ नये यासाठी चालक बंधू जो काही प्रयत्न करतील किंवा आंदोलन करतील तेव्हा त्यांच्या पाठीशी आपण ठामपणे उभे राहणार असल्याचे सांगितले. केंद्र शासनाच्या या जुलमी कायद्याला विरोध करण्यासाठी सर्व चालक बांधवांनी आता कंबर कसली असून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज्य सरचिटणीस वैभव खेडेकर यांनी पाठिंबा दिल्याने आता चालक बांधवांच्या आंदोलनाला बळकटी मिळण्याची शक्यता अध्यक्ष सुनील शिंदे यांनी व्यक्त केली आहे. यावेळी मनसेचे शहराध्यक्ष ऋषिकेश कानडे, मनसे वाहतूक संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजा जोयसर हे उपस्थित होते.

थंडीत वाढ होण्याची शक्यता – हवामान विभाग

अग्ण्येय दिशेकडून येणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्यामुळे व पश्चिमेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यामुळे राज्यात गेल्या 2 ते 3 दिवसापासून हलक्या स्वरूपाचा पाऊस पडत होता. दरम्यान आजपासून पावसाचा जोर कमी होईल. त्यामुळे राज्यातील ढगाळ हवामान कमी होणार असून कोरडे वातावरण निर्माण होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.  त्यामुळे किमान तापमान चार ते पाच अंश सेल्सिअसने कमी होण्याचा अंदाज आहे. प्रामुख्याने विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात गारवा वाढण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

साई रिसॉर्ट पाडायला उच्च नायायलायची स्थगिती

खेड तालुक्यातील भरणे येथील बहुचर्चित असलेले साई रिसॉर्टचे बांधकाम पडण्यास मा. उच्च न्यायालय मुंबई यांनी स्थगिती दिली आहे. रिसार्टवर कोणतीही कठोर कारवाई करु नये, असे निर्देश देत अतिरिक्त कोकण आयुक्तांना यावर उत्तर देण्याचे निर्देश देत हायकोर्टानं 2 फेब्रुवारीपर्यंत यासंदर्भातील सुनावणी तहकूब केली आहे. नाहक तक्रारी रोखण्यासाठी आम्हाला हस्तक्षेप करावाचा लागेल, असं परखड मत व्यक्त करत खेड येथील साई रिसॉर्टचे बांधकाम पाडण्याच्या नोटीसला मुंबई उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. न्यायमूर्ती मिलिंद जाधव यांच्या एकलपीठानं नुकतीच यावर सुनावणी झाली. तूर्तास या रिसार्टवर कोणतीही कठोर कारवाई करु नये, असे निर्देश देत अतिरिक्त कोकण आयुक्तांना यावर उत्तर देण्याचे निर्देश देत हायकोर्टानं 2 फेब्रुवारीपर्यंत यासंदर्भातील सुनावणी तहकूब केली आहे.

खेड येथील साई रिसॉर्टची जागा ही मेसर्स साई स्टार डिस्ट्रिब्युटर्स कंपनीने साल 2007 मध्ये खरेदी केली होती. या कंपनीत पाच भागीदार होते. या जागेवर बांधकाम करण्याआधी विभागीय कार्यालयाकडून एनए परवानगी घेण्यात आली होती. या एनए परवानगीचे उल्लंघन झाल्याची तक्रार अतिरिक्त जिल्हाधिकारी यांच्याकडे करण्यात आली. ही तक्रार कंपनीचे निवृत्त भागीदार विजय भोसले यांनी केली. या तक्रारीची दखल घेत अतिरिक्त जिल्हाधिकारी यांनी एनए परवानगी 24 नोव्हेंबर 2023 रोजी रद्द केली होती. त्या विरोधात सदानंद कदम यांनी अपील दाखल केलेलं आहे. 6 डिसेंबर 2023 रोजी रिसॉर्टचे बांधकाम पाडण्याची नोटीस देण्यात आली. या नोटीसलाही सदानंद कदम यांनी याचिकेद्वारे आव्हान दिलेलं आहे. या बाबत एनए परवानगीचे उल्लंघन झाल्याची तक्रार एका निवृत्त भागीदारानं केली होती. सध्या या जागेची मालकी कदम यांच्याकडेच आहे. त्यामुळे निवृत्त भागीदारानं केलेल्या तक्रारीत काहीच तथ्य राहत नाही. तसेच एनए परवानगी असतानाही बांधकाम पाडण्याची नोटीस देण्यात आली आहे. या सर्व गोष्टी धक्कादायक व गंभीर आहेत, असं निरीक्षण न्यायालयानं नोंदवलेलं आहे. त्यामुळे उगाच केल्या जाणा-या तक्रारी रोखण्यासाठी आम्हाला हस्तक्षेप करावाचा लागेल, असं परखड मत व्यक्त करत खेड येथील साई रिसॉर्टच्या बांधकाम पाडण्याच्या नोटीसला मुंबई उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे.

मराठी फलकांसाठी मनसेचे 26 जानेवारीला उपोषणाचा इशारा

प्रांताधिकारी जयश्री मोरे यांना दिले निवेदन

दुकानावर मराठी पाट्या लावण्या संदर्भात सुप्रीम कोर्टाने 4 महिन्यापूर्वी निर्णय दिला होता. मात्र गेल्या 4 महिन्यात या संदर्भात खेड तालुक्यात कोणतीही कारवाई केल्याचे दिसून आले नसल्याने मनसेचे राज्य सरचिटणीस वैभव खेडेकर यांच्या हस्ते या संदर्भात खेडचे प्रांताधिकारी, तहसीलदार व पोलीस निरीक्षक यांना उपोषणास बसणार असल्याचे निवेदन देण्यात आले. महाराष्ट्रातील दुकानावर मराठी पाट्या लवल्या पाहिजेत असा निर्णय मा. सुप्रीम कोर्टाने दिले होते. मात्र खेड तालुक्यातील दुकानावर असलेल्या इतर भाषेतील फलक बदलले गेले नसून त्यावर खेड तालुका प्रशासनाने कोणत्याही प्रकारची कारवाई केल्याचे दिसून न आल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पुढील 7 दिवसात कारवाई न केल्यास येत्या 26 जानेवारी रोजी बेमुदत उपोषणाला बसण्याचा इशारा या निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. यावेळी मनसेचे महाराष्ट्र राज्य सरचिटणीस वैभव खेडेकर, रत्नागिरी जिल्हा सचिव संतोष नलावडे, दादू नांदगावकर, जयेश गुहागरकर यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.