
प्रसिध्दी रुग्णवाहिकेकडून प्रथम वर्धापनदिनाच्या हार्दिक शुभेच्छा
खेड तालुक्यातील भरणे नाका येथे गेल्या वर्षी सुरू झालेल्या रॉयल हॉस्पिटलला जानेवारी २०२४ मध्ये एक वर्ष पूर्ण झाले. गेल्या एका वर्षात साधारणतः २५०० रुग्णांनी रॉयल हॉस्पिटल च्या आरोग्य सेवेचा लाभ घेतला.

गेल्या वर्षभरातील रुग्णसेवेतुन असे लक्षात आले कि, काही आर्थिक दृष्ट्या दुर्बल रुग्ण पैश्यांच्या अभावी निरंतर आरोग्य सेवा घेऊ शकत नाहीत. अशा रुग्णांना आरोग्य सेवा देता यावी यासाठी सामाजिक बांधिलकी च्या नात्याने रॉयल हॉस्पिटल ने चॅरिटी ओपीडी सुरु केली आहे . या उपक्रमाद्वारे सर्वसामान्य गरीब रुग्णांना स्पेशालिस्ट फिजिशियन डॉक्टरांचा सल्ला घेता येणार आहे. चॅरिटी ओपीडी आठवड्याच्या दर मंगळवारी सकाळी १० ते दुपारी १ आणि संद्याकाळी ५ ते रात्री ८ वाजेपर्यंत चालू असेल. ओपीडी साठीचे शुल्क फक्त २५ रुपये ठेवण्यात आले असून, औषधें ,रक्त तपासण्या किंवा इतर क्ष किरण तपासण्यांवर सुद्धा रुग्णांना सूट देण्यात येणार आहे. रॉयल हॉस्पिटल चे संस्थापक डॉ . शिवाजी डुबे यांनी सर्व खेड वासियांना या उपक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे.
या सोबतच खेड मधील बरेच रुग्ण सुपर स्पेशियालिटी डॉक्टरांचा सल्ला घेण्यासाठी पुण्या-मुंबई सारख्या मोठ्या शहरांकडे धाव घेतात . यामध्ये रुग्णांना बराच आर्थिक, शारीरिक व मानसिक त्रास सहन करावा लागतो तसेच वेळेचाही अपव्यय होतो. रुग्णांची हि अडचण दूर करण्यासाठी रॉयल हॉस्पिटल ने विशेष विनंती करून मुंबईच्या नामांकित हॉस्पिटल्स मध्ये सेवा देणारे सुपर स्पेशियालिटी डॉक्टर आता खेड मध्ये उपलब्ध करून दिले आहेत. यामध्ये कॅन्सर तज्ञ , हृदय विकार तज्ञ, मेंदू विकार तज्ञ , किडनी विकार तज्ञ , रोबोटिक शस्त्रक्रिया तज्ञ , मणका विकार तज्ञ , स्त्री रोग तज्ञ इत्यादी डॉक्टरांचा समावेश आहे. या सर्व डॉक्टरांचा सल्ला माफक दरामध्ये उपलब्ध करून देणार असल्याचे डॉ. शिवाजी डुबे यांनी सांगितले.