रत्नागिरीतील बचत गट मॉल राज्यभर राविण्याच्या सूचना – मुख्यमंत्री शिंदे

राज्यातील महिलांच्या सबलीकरणासाठी महिला सशक्तीकरण अभियान राबविण्यात येत आहे. महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी त्यांना बाजारातील मागणी असणाऱ्या वस्तुंच्या निर्मितीचे प्रशिक्षण देणे, भांडवल उपलब्ध करणे आणि त्या वस्तुंचे ब्रांडिंग, मार्केटिंग करणे यासाठी मदत करण्यात येणार आहे. तसेच बचत गटांना त्यांच्या मालाची विक्री करता यावी याकरिता जिल्हा प्रशासनाद्वारे तात्पुरते स्टॉल उपलब्ध करुन द्यावेत. राज्यातील बस स्थानक, रेल्वे स्थानक आणि मॉल्स मध्ये काही स्टॉल तातडीने बचत गटांना कसे उपलब्ध करुन देता येतील, याचे नियोजन करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी दिल्या. दीर्घकालीन उपाययोजना म्हणून रत्नागिरी जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या बचत गट मॉल ही संकल्पना सुद्धा इतर जिल्ह्यात राबविण्याचे निर्देशही त्यांनी दिले. या अभियानातून जास्तीत जास्त महिलांना बचत गटांच्या चळवळीत सहभागी करुन घेण्याचे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले. राज्यातील महिला सशक्तीकरण अभियान राबविण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक वर्षा शासकीय निवासस्थान येथे झाली. यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. या बैठकीला उद्योगमंत्री उदय सामंत यांच्यासह, विविध विभागांचे सचिव, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, महापालिकांचे आयुक्त दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.

आमच्या ताज्या बातम्या मिळवण्यासाठी पुढील चॅनल लिंकवर क्लिक करा https://whatsapp.com/channel/0029Va5hOLUJUM2Z6aRJ613C

Leave a Comment