अग्ण्येय दिशेकडून येणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्यामुळे व पश्चिमेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यामुळे राज्यात गेल्या 2 ते 3 दिवसापासून हलक्या स्वरूपाचा पाऊस पडत होता. दरम्यान आजपासून पावसाचा जोर कमी होईल. त्यामुळे राज्यातील ढगाळ हवामान कमी होणार असून कोरडे वातावरण निर्माण होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. त्यामुळे किमान तापमान चार ते पाच अंश सेल्सिअसने कमी होण्याचा अंदाज आहे. प्रामुख्याने विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात गारवा वाढण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
*आमच्या TIMES MARATHI NEWS च्या अपडेट तुमच्या Whatsapp वर मिळवण्यासाठी आम्हाला जाॅईन व्हा किंवा 8390380101 या क्रमांकावर HI मेसेज करा*
https://chat.whatsapp.com/H1bXCMqHUYV2v1SygtgWWg