देशाच्या स्वातंत्र्यावर कंगना रनौतचे आक्षेपार्ह वक्तव्य

टाईम्स नाऊ समिटमध्ये पद्मश्री पुरस्कार मिळाल्यानंतर मुलाखतीसाठी उपस्थित राहिल्यानंतर बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री कंगना रानोतने देशाच्या स्वातंत्र्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केले आहे. 1947 ला देशाला मिळालेले स्वातंत्र्य हे स्वातंत्र्य नसून ती भीक होती, खरे स्वतंत्र्य तर 2014 ला मिळाले आशा प्रकारचे वक्तव्य करून नव्या वादाला तोंड फोडले आहे.

यादरम्यान कंगनाने ती कोणाला सुपरस्टार मानते हे देखील सांगितले. कंगना म्हणाली- ‘मी ज्या कुटुंबातून आले आहे, त्यात पंतप्रधानांना सुपरस्टार मानले जाते. पंतप्रधान माझ्या कुटुंबासाठी सुपरस्टार आहेत आणि नेहमीच असतील. माझ्या आई-वडिलांनी माझ्या चित्रपटाच्या मुहूर्तावर प्रत्येक गोष्टीची काळजी घेतली, तो माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा दिवस होता. तसेच यावेळी कंगनाला विचारले गेले की, ‘सुपरस्टार कंगना रनौतलाही पंतप्रधान सुपरस्टार वाटतात का? जसे तुमच्या कुटुंबाचाही विश्वास आहे.’ उत्तरात कंगना म्हणते की, ‘नक्कीच, पीएम मोदी हे जगातील सर्वात लोकप्रिय नेते आहेत. यात शंका नाही. ते आपल्या देशासाठी आपल्याला मिळाले हे आपले भाग्य आहे. मला वाटते की, त्यांनी आपल्या देशाला अशा ठिकाणी नेले आहे, जिथे उभे राहण्याचा आपल्याला खूप अभिमान आहे.’

Leave a Comment