महाबळेश्वरमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार, 13 जणांवर गुन्हा दाखल

महाबळेश्वर येथे एक अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्यात आला होता. यामधून संबंधित अल्पवयीन मुलगी गरोदर देखील राहिली होती. या पिडितेची प्रस्तुती देखील घरातच करण्यात आली होती. या प्रस्तुतीनंतर संबंधित नवजात बालकाला मुंबईत एकाला दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले असून त्यांना मदत करणाऱ्या सर्वांवर म्हणजेच तब्बल 13 जणांवर पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महाबळेश्वर येथील उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. शीतल खराडे यांना एका खबऱ्याकडून एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची माहिती मिळाली होती. यावेळी उपविभागीय अधिकाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन पिडितेची चौकशी केली. तिला विश्वासात घेऊन सर्व विचारपूस केली असता धक्कादायक महिती समोर आली. तसेच पीडित व तिच्या कुटुंबियाना संशयितांनी तक्रार करू नये म्हणून धमकी दिल्याची गोष्ट ही समोर आली. या प्रकरणी पोलिसांनी मुनारवळ हौसिंग सोसायटी मधून सागर उर्फ बाबा हणमंत गायकवाड व आशुतोष मोहन बिरामने या मुख्य आरोपींना ताब्यात घेतले आहे. या सर्व प्रकारातून जन्माला आलेल्या मुलीला शिवसेना नेते डी एम बावळेकर यांच्या सात्विक आणि योगेश या दोन मुलांनी कांदिवली मुंबई येथील सुनील चौरसिया यांच्याकडे सोपवण्यात मदत केली होती. यामुळे आरोपीला पाठबळ पुरवल्या प्रकरणी यांच्यावर देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या आधी ही महाबळेश्वरचे माजी नगराध्यक्ष व शिवसेना नेते बावळेकर यांचा मुलगा योगेश याच्यावर व्हाट्स अँपवर अश्लील चित्रफीत वायरल केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी पोलिसांनी संजयकुमार जंगम, घनश्याम फरांदे व प्रभाकर हिरवे याना अटक केली आहे. उर्वरित आरोपींचा शोध घेण्यासाठी महाबळेश्वर पोलिसांची पथके रवाना झाली आहेत. या सर्व 13 जणांवर पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave a Comment