• शहरी भागात इयत्ता 8 वी ते 12 पर्यंतचे वर्ग सुरु केले जाणार आहेत.
• ग्रामीण भागात इयत्ता पाचवी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरु केले जाणार आहेत.
• शाळा सुरु झाल्यानंतर मैदानामध्ये कोणत्याही खेळाला परवानगी नसेल.
• शाळा सुरु करण्यात येत असल्या तरी विद्यार्थ्यांनी उपस्थित राहावे अशी सक्ती केली जाणार नाही.
• तसेच विद्यार्थ्यांना शाळेत हजर राहायचे असेल तर त्यासाठी पालकांची संमती गरजेची असणार आहे.
• शाळा सुरु झाल्यानंतर शिक्षकांच्या लसीकरणाकडे लक्ष दिले जाईल. तसेच शाळांमध्ये हेल्थ ट्रेनिंग दिली जाईल.
• विद्यार्थी शाळेतून घरी गेल्यानंतर त्यांची काळजी घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.
• शक्य असेल तिथे एक दिवसाआड शाळा सुरु ठेवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
• शाळेत आलेल्या विद्यार्थ्याला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले तर त्याला आयसोलेशनमध्ये ठेवले जाणार आहे.
• शाळा सुरु झाल्यानंतर शाळेमध्ये स्थानिक डॉक्टरांचे मोबाईल नंबर उपलब्ध करुन दिले जाणार आहेत.
• शाळा सुरु तसेच बंद करण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडे पूर्ण अधिकार देण्यात आले आहेत.
• शाळेत शिक्षक, कर्मचारी तसेच विद्यार्थ्यांना कोरोना नियम पाळण्याचे आवाहन केले जाणार आहे. नियम पाळूनच शाळा सुरु करण्यात येतील.
• शाळा सुरु करण्यासाठी टास्क फोर्सने ज्या सूचना दिलेल्या आहेत, त्यांचे काटेकोरपणे पालन केले जाणार आहे.
• शाळा प्रत्यक्ष सुरु झाल्यानंतर सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्याला प्राधान्य दिले जाईल.