कंदिवलीत हंसा हेरिटेजला आग, दोघांचा मृत्यू

मुंबईतील कांदिवली पश्चिम येथील हंसा हेरिटेज या 15 मजली इमारतमधील 14 व्या मजल्याला संध्याकाळी 8.33 मिनिटांनी आग लागल्याची घटना घडली. या आगीत 2 जण गंभीर जखमी झाले होते. त्यांना उपचारासाठी शताब्दी रुग्णालयात नेले आसता रुग्णालय प्रशासनाने दोघांना मृत घोषित केले. या दुर्घटनेची माहिती मिळताच मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी घायनास्थळी धाव घेतली. ही आग विझवण्यासाठी 8 अग्निशामक बंबाद्वारे प्रयत्न सुरू होते. मिळालेल्या प्राथमिक महितीनुसार दिवाळीसाठी वापरण्यात येणाऱ्या पणत्यांद्वारे ही आग लागल्याचे बोलले जात आहे. घटनास्थळी दाखल झालेल्या अग्निशमन दलाच्या 8 गाड्यांच्या मदतीने 2 तासांच्या अथक परिश्रमानंतर आग विझवण्यात आली. घटनास्थळी पोहोचत मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी परिस्थितीचा आढावा घेतला. आग लागली तेव्हा काही लोक आत अडकले होते, त्यापैकी काही जखमी झाले आणि दोन जणांचा मृत्यू झाला. कांदिवलीतील आगीत दोन महिलांचा मृत्यू झाला, त्यातील एक 89 वर्षांची तर दुसरी 45 वर्षांची महिला आहे.

Leave a Comment