
आज संपूर्ण राज्यात एस टी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी संपाची घोषणा केली. यामुळे महाराष्ट्राची जीवनवाहिनी म्हणून ओळखली जाणारी एस टी वाहतूक ठप्प झाली. याचा फटका प्रवाशांसह ग्रामीण भागातून शहरात शिक्षणासाठी येणाऱ्या विधयार्थ्याना बसला. एस टी कर्मचाऱ्यांनी त्यांच्या प्रमुख मागन्यासाठी ऐन दिवाळीच्या तोंडावर संप पुकारला आणि महाराष्ट्राची जीवनवाहिनी ठप्प झाली. यामुळे एस टी कर्मचाऱ्यांच्या पुढील प्रमाणे असणाऱ्या मागण्या शासनाने मान्य करून एस टी कर्मचार्यांसह प्रवाशांना दिलासा द्यावा. अशी मागणी रत्नागिरी जिल्हा काँग्रेसचे सचिव जमीर माखजणकार यांनी केली आहे. यामध्ये एस टी महामंडळाचे 100 % राज्य शासनामध्ये विलिगिकरण करावे या प्रमुख मागणीसह दिवाळी बोनस हा 15 हजार रुपये व राज्य सरकारी कर्मचार्याप्रमाणे महागाई भत्ता व 3% या प्रमाणे पगारवाढ व 9% प्रमाणे घरभाडे मिळावे या एस टी कर्मचाऱ्यांच्या प्रमुख मागण्या आहेत.