महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे महाराष्ट्र राज्य सर चिटणीस वैभव खेडेकर यांनी आपल्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह खेड शहरातील एस टी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला भेट देऊन पाठिंबा दर्शवला. कमी पगारात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे करावे तेवढे कौतुक कमी आहे. पगार वेळेत न मिळूनही अखंडित सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांचे मानावे तेवढे आभार कमीच आहेत. आज राज साहेब ठाकरे एस टी कर्मचाऱ्यांच्या शिष्ट मंडळाशी चर्चा केली आहे. यावेळी त्यांनी एस टी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या थांबवाव्या म्हणजे आपण शासन दरबारी प्रयत्न करू असा शब्द मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एस टी कर्मचऱ्यांना दिला. सर्वसामान्यांची लाडकी लालपरी लवकरात लवकर रस्त्यावर पूर्ववत यावी यासाठी पक्षाध्यक्ष राज ठाकरे व मनसैनिक सर्वोत्तपरी प्रयत्न करणार असल्याचे मत माणसे राज्य सर चिटणीस व खेडचे नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांनी यावेळी व्यक्त केले. यावेळी त्यांच्या समवेत तालुकाप्रमुख नाना चाळके, ऋषीकेश कानडे, नंदू साळवी, प्रसाद शेट्ये, सिद्धेश साळवी, गणेश बेलोसे, राजा जॉयसर, शैलेश धारिया यांच्यासह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

आधी आत्महत्या थांबवा – राज ठाकरे
एस टी कर्मचाऱ्यांनी आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेऊन आपल्या व्यथा मांडल्या. 7 वा वेतन आयोग लागू करण्याची कळकळीची विंनती ही त्यांनी यावेळी केली. यावेळी राज ठाकरेंनी पहिला आत्महत्या थांबवा मगच आपण शासन दरबारी प्रयत्न करू असा शब्द मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एस टी कामगारांना दिला. यावेळी कामगारांकडून राज ठाकरेंना आश्वासन देण्यात आलं आहे की, यापुढे एकही कामगार आत्महत्या करणार नाही. परंतू ही परिस्थिती म्हणजेच विलगीकरणाचा निर्णय होत नाही तोपर्यंत एक आयोग करावा आणि राज्य सरकारच्या वाहन चालकांना जे वेतन मिळत आहे तेच वेतन एसटीच्या चालकांना आणि वाहकांना मिळावं अशी मागणी केली.

















































