शिवसेना नेते आणि माजी पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनीच मंत्री अनिल परब यांच्याबाबत किरीट सोमय्या यांना दिली माहिती, सोमय्यांनी रामदास भाईंची देखील ईडीची चौकशी लावावी, मनसेचे राज्य सरचिटणीस आणि खेड चे नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांच्या विधानाने खळबळ रामदास कदम सेनेत नाराज असून सरकार अस्थिर करण्याचे काम त्यांनी केले.

शिवसेना नेते आणि राज्याचे माजी पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी महाविकास आघाडीचे सरकार अस्थिर करण्याचे काम केले असून, परिवहन मंत्री आणि रत्नागिरी जिल्ह्याचे पालक मंत्री अनिल परब यांच्या बाबतची माहिती रामदास कदम यांनी प्रसाद कर्वे नामक व्यक्तीच्या माध्यमातून माहितीच्या अधिकाराखाली मिळवून भाजपचे किरीट सोमय्या यांना दिली असा खळबळ जनक आरोप मनसेचे राज्य सरचिटणीस आणि खेडचे नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांनी आज आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत केला आहे. वैभव खेडेकर यांच्या विधानाने कोकणातील राजकीय वातावरण ढवळून निघाले असून रामदास कदम हे शिवसेनेचे नेते असताना महाविकास आघाडीचे सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न केल्याचे देखील खेडेकर म्हणाले. यावेळी रामदास कदम यांचे मित्र किरीट सोमय्या यांनी रामदास कदम यांच्या देखील बेनामी संपत्तीचे माहिती जगासमोर आणावी आणि त्यांची देखील ईडीची चौकशी लावावी असे आवाहन देखील वैभव खेडेकर यांनी केले आहे. काही दिवसांपूर्वी भाजपचे किरीट सोमय्या यांनी अनिल परब यांच्या दापोली येथील अनधिकृत रिसॉर्ट बाबत माहिती उघड केली होती, हे रिसॉर्ट मंत्री परब यांनी बे हिशोबी पैशातून बांधले असल्याचा आरोप करत त्यांनी मंत्री पदावरून पायउतार व्हावे अशी मागणी प्रसार माध्यमांसमोर केली होती. सोमय्या यांना दिलेली सर्व माहिती प्रसाद कर्वे नामक व्यक्तीने माहितीच्या अधिकाराखाली मागवून ती माहिती रामदासभाई कदम यांनी त्यांचे मित्र भाजपचे किरीट सोमय्या यांच्याकडे दिली. सोमय्या हे खरोखर भ्रष्टचाराविरोधात लढत असतील तर त्यांनी रामदास भाईंची देखील ईडीची चौकशी लावावी आपले त्यांना आवाहन आहे असे वैभव खेडेकर यांनी सांगितले.

आपल्या अपात्रतेसाठी रामदासभाई कदम गेली अनेक महिने प्रयत्नात

शिवसेना नेते आणि राज्याचे माजी विरोधीपक्ष नेते रामदासभाई कदम हे पुत्र प्रेमापोटी आंधळे झाले आहेत. खेड शहरातली जनता आपल्यावर आणि पर्यायाने मनसेवर विश्वास ठेऊन आहे. गेली कित्तेक वर्ष खेड नगरपालिकेत मनसेची सत्ता आहे. हे रामदासभाईंना पाहवत नाही. आपल्या पुत्राचा राजकीय प्रवास सुरळीत होण्यासाठी ते हात धुवून आपल्यामागे लागले असल्याचे वैभव खेडेकर म्हणाले, प्रसाद कर्वे हा रामदासभाईंचा खास माणूस आहे, त्यांचा पर्सनल पीए म्हणून देखील काम करत आहेत त्यांच्या करावी खेड नागरपालिकेतून माहितीच्या अधिकाराखाली काही माहिती मागवून अर्धवट माहितीच्या अधिकाराखाली अधिकाऱ्यांवर व नगरसेवकांवर दबाव टाकत आपले राजकीय अस्तित्व संपवण्याचा विडा उचलला आहे.

आपल्या अपात्रतेची कारवाईसाठी रामदास कदम यांचा अधिकाऱ्यांवर प्रचंड दबाव

शिवसेनेच्या नगरसेवकांवर रामदास कदम यांनी दबाव टाकून माझ्या विरोधात तक्रारींच्या प्रस्तावावर सह्या करण्यास त्यांना भाग पाडले असले तरी मला अपात्र करण्याचा कट मी उलथवून टाकेन. मुंबई उच्च न्यायालयाने मला बाजू मांडण्यासाठी आणखी पंधरा दिवसांची मुदत वाढवून दिली असून न्यायालयासमोर आम्ही माझ्या विरोधातील तक्रारीच्या चौकशी प्रक्रियेत रामदास कदम यांनी राजकीय हस्तक्षेप केल्याचे पुरावे दिले आहेत, अशी माहिती नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांनी शनिवारी दि १८ रोजी पालिकेच्या नगराध्यक्ष कक्षात बोलावलेल्या पत्रकार परिषदेत दिली आहे. खेड नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष कक्षात शनिवारी दि १८ रोजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांनी पत्रकार परिषद बोलावली होती. यावेळी ते म्हणाले, वैभव खेडेकरांचे पद जाणार आशा काही लोकांनी भीष्मप्रतिज्ञा केल्या. यंत्रणेला हाताशी धरून माझ्या विरुद्ध षड्यंत्र रचण्यात आले. मात्र मी आता त्यांचा डाव उलथवून टाकला आहे. ज्यांच्या सह्यानी माझ्या विरुद्ध तक्रारी केल्या त्यांनी खासगीत मला भेटून आम्ही रामदास कदम यांच्या दबावाखाली सह्या केल्याचे सांगितले आहे. माझ्या विरुद्ध तक्रार करताना ज्या प्रसाद कर्वे नावाच्या व्यक्तीने माहितीच्या अधिकाराचा वापर करून माहिती मिळवली ती त्याने दुसऱ्याला देऊन माहिती अधिकार कायद्यातील एका कलमाचे उल्लंघन केले आहे. कर्वे यानेच दापोलीत पालकमंत्री अनिल परब यांच्या संदर्भात माहिती अधिकारात माहिती घेऊन रामदास कदम यांना दिली व रामदास कदम यांनी किरीट सोमय्या यांना दिली. रामदास कदम यांच्यासाठी काम करणाऱ्या प्रसाद कर्वे याची चौकशी होणे गरजेचे आहे, असे श्री खेडेकर म्हणाले. ते पुढे म्हणाले की, माझ्या विरोधात करण्यात आलेल्या तक्रारीची चौकशी कायद्याच्या कक्षेत करण्यात आलेली नाही. चौकशी प्रक्रिया बेकायदेशीरपणे आठ महिने चालवण्यात आली. ही चौकशी सुरू असताना अनेक वेळा या प्रक्रियेत कोणताही संबंध नसताना रामदास कदम यांनी सातत्याने पत्र पाठवून हस्तक्षेप केला आहे. माझा न्यायदेवतेवर पूर्ण विश्वास असल्यानेच मी या बेकायदेशीर चौकशी प्रक्रियेवर मुंबई उच्च न्यायालयात दाद मागितली. दि १५ व १६ रोजी न्यायालयात सुनावणी होऊन न्यायालयाने आता मला नगरविकास विभागाकडून देण्यात आलेल्या पंधरा दिवसांच्या मुदतीत आणखी पंधरा दिवस वाढ केली आहे. तसेच यापुढे नगरविकास विभागाकडून माझ्या प्रकरणी होणाऱ्या पुढील करवाईकडे लक्ष ठेवण्यात येणार आहे. उच्च न्यायालया समोर आम्ही माझी चौकशी कशी बेकायदेशीर झाली आहे व त्यामध्ये झालेला राजकीय हस्तक्षेप यांचे पुरावे दिले आहेत.  रामदास कदम यांनी केवळ त्यांच्या मुलाच्या आमदारकीच्या काळात खेड पालिकेची सत्ता मिळवता यावी या स्वार्थासाठी माझ्या विरोधात कट रचला आहे.  मी लढवय्या आहे. गेल्या पंधरा वर्षे शहरवासीयांनी माझ्यावर विश्वास दाखवला आहे. रामदास कदम स्वतः आमदार होण्यापूर्वी त्यांची आर्थिक परिस्थिती काय होती व आता त्यांच्याकडे हजारो कोटींची मालमत्ता कशी आली याची ईडी मार्फत चौकशी होणे गरजेचे आहे. अधिकाऱ्यांना आपल्या कर्मचाऱ्यांप्रमाणे वापरून रामदास कदम माझ्या सारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्या विरोधात मला राजकारणापासून दूर  नेण्याचाह कट रचत आहेत. त्यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी पालिकेच्या निवडणुकीत समोरासमोर लढून जिंकून दाखवावे, खेड शहरासाठी कोरोना साथ, अतिवृष्टी आदी परिस्थितीत मी केलेल्या कामामुळे व  विकास कामे यामुळे जनता माझ्या सोबत आहे. दहशतीची राजवट खेडला नको आहे. माझ्या सोबत थोडे कार्यकर्ते असले तरी ते निष्ठावंत आहेत. त्यामुळे मी पुन्हा सत्तेत येईन, असा विश्वास वैभव खेडेकर यांनी यावेळी व्यक्त केला.

It was Shiv Sena leader and former environment minister Ramdas Kadam who informed Kirit Somaiya about Minister Anil Parab. Somaiya should also investigate Ramdas Bhai’s ED. 

Shiv Sena leader and former state environment minister Ramdas Kadam has worked to destabilize the Mahavikas Aghadi government.  The allegations were made by MNS state general secretary and Khed mayor Vaibhav Khedekar at a press conference here today.  Vaibhav Khedekar’s statement has stirred the political atmosphere in Konkan and when Ramdas Kadam was the leader of Shiv Sena, he also tried to destabilize the Mahavikas Aghadi government.  Vaibhav Khedekar has also appealed to Kirit Somaiya, a friend of Ramdas Kadam, to bring to the notice of the world the details of Ramdas Kadam’s anonymous assets and also to investigate his ED.  A few days back, BJP’s Kirit Somaiya had leaked information about Anil Parab’s unofficial resort in Dapoli.  All the information given to Somaiya was requested by a person named Prasad Karve under the right to information and Ramdasbhai Kadam gave that information to his friend Kirit Somaiya of BJP.  Vaibhav Khedekar said that if Somaiya is really fighting against corruption, he should also investigate Ramdas Bhai.

Ramdasbhai stepped in for several months trying to disqualify him

Shiv Sena leader and former state opposition leader Ramdasbhai Kadam’s son has gone blind due to love.  The people of Khed are believing in us and alternatively MNS.  MNS has been in power in Khed municipality for the last several years.  It does not see Ramdasbhai.  Vaibhav Khedekar said that he has washed his hands of his son’s political journey and followed him. Prasad Karve is a special person of Ramdasbhai, he is also working as his personal PA. Vida is on the verge of ending its political existence.

Ramdas Kadam puts tremendous pressure on the authorities to take action for his disqualification

Though Ramdas Kadam put pressure on Shiv Sena corporators to sign the motion of complaint against me, I will reverse the plot to disqualify me.  “The Mumbai High Court has given me another 15 days to present my case. We have given evidence before the court that Ramdas Kadam has interfered in the investigation of the complaint against me,” Mayor Vaibhav Khedekar told a press conference on Saturday.  Mayor Vaibhav Khedekar had called a press conference on Saturday 18th in the mayor’s room of Khed Municipal Council.  At this time, he said, some people pledged their allegiance to Vaibhav Khedekar.  A conspiracy was hatched against me by holding the system in hand.  But now I have overturned their innings.  Those whose signatures complained against me have privately met me and told us that we signed under the pressure of Ramdas Kadam.  While filing a complaint against me, a person named Prasad Karve, who obtained information using the right to information, has violated one section of the Right to Information Act by giving it to another.  It was Karve who took information from the RTI regarding Dapoli Guardian Minister Anil Parab and gave it to Ramdas Kadam and Ramdas Kadam gave it to Kirit Somaiya.  Prasad Karve, who works for Ramdas Kadam, needs to be questioned, said Mr. Khedekar.  He further said that the complaint against me has not been investigated within the ambit of law.  The inquiry process was run illegally for eight months.  Ramdas Kadam has repeatedly interfered in the process by sending letters several times without any involvement in the process.  As I have full faith in the God of justice, I appealed to the Mumbai High Court against this illegal inquiry process.  Hearing in the court on 15th and 16th, the court has now extended the period of fifteen days given to me by the Urban Development Department for another fifteen days.  Also, the Urban Development Department will keep an eye on the next course of action in my case.  Before the High Court, we have given evidence of how my inquiry has become illegal and the political interference in it.  Ramdas Kadam has hatched a conspiracy against me for the sake of gaining power of Khed Municipality only during his son’s tenure as MLA.  I am a fighter.  For the last fifteen years the townspeople have shown faith in me.  The ED needs to inquire into the financial situation of Ramdas Kadam himself before he became an MLA and how he came to have assets worth thousands of crores.  By using the authorities as his staff, Ramdas Kadam is plotting against ordinary activists like me to take me away from politics.  If they have the courage, they should fight and win the municipal elections face to face. The people are with me because of the work I have done and the development work for the city of Khed.  The reign of terror is not to be played.  Although I have a few activists with me, they are loyal.  Therefore, I will come to power again, said Vaibhav Khedekar.

खैरतस्करी करणारा ट्रक पकडला, 3 लाख 47 हजारांचा मुद्देमाल जप्त!रोहा वनविभागाची कारवाई

महाड तालुक्यातील मौजे कापडे येथे महाबळेश्वर पोलादपूर मार्गावर खैराचे सोलिव लाकुड वाहतूक करत असताना शुक्रवारी सायंकाळी 7.30 वाजण्याच्या सुमारास रोहा वन विभागाच्या पथकाने कारवाई केली. यात टाटा 407 टेम्पो क्रमांक MH. 04 EL. 2288 आणि खैराचे 231 सोलिव नग 2.916 घनमीटर ज्याची किंमत 347047/- रुपयांचा मुद्देमाल वाहनासह जप्त करण्यात आला आहे.

या प्रकरणी टेम्पो चालक व मालक गजानन यशवंत दिघे (रा. ढालकाठी, ता. महाड) व निलेश गंगाराम साळवी (रा. रेपोली) सहआरोपी दीपक महाडिक (रा. दापोली) यांच्यावर वन विभागाने गुन्हा दाखल केला आला आहे. या बाबत अधिक माहिती अशी की, उपवसंरक्षक रोहा व सहाय्यक वनरक्षक रोहा यांच्या मार्गदर्शनाखाली फिरते पथक रोहा यांना मिळालेल्या गुप्त माहिती नुसार शुक्रवारी सायंकाळी 7.30 वा. टाटा 407 टेम्पो क्रमांक MH/04/EL/2288 ला मौजे कापडे येथे महाबळेश्वर पोलादपूर मार्गावर थांबवून तपासले असता त्यामधे खैराची सोलिव लाकडे विनापरवाना आढळून आली. यामुळे संबंधित वाहनावर वनविभागाच्या फिरत्या पथकाने कारवाई करत वनक्षेत्रपाल महाड यांचे कार्यालय येथे वाहन मालासह जप्त  करून आणले. ही कारवाई  उपवसंरक्षक रोहा श्री. अप्पासाहेब निकत व सहाय्यक वनसंरक्षक रोहा श्री. विश्वजित जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली वनक्षेत्रपाल फिरते पथक रोहा श्री. इच्छात कांबळी, वनरक्षक फिरते पथक रोहा अजिंक्य कदम, वनरक्षक पोपट करांडे यांच्या विशेष पथकाने केली. पुढील तपास चालू आहे.

रामदास कदमांना शिवसेनेत किंमत नाही – नगराध्यक्ष वैभव खेडेकर

राज्याचे माजी पर्यावरण मंत्री रामदास कदम यांना शिवसेना पक्षात किंमत नाही. यामुळेच त्यांची रवानगी जामगे येथे केल्याचा आरोप खेडचे नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांनी केला आहे. शनिवारी सकाळी ते नगराध्यक्ष दालनात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

यावेळी त्यांनी रामदास कदम यांनी राज्यातील सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला. तसेच त्यांनी प्रसाद कर्वे नामक व्यक्ती कडून माहितीच्या अधिकारात महिती मागवून ती किरीट सोमय्या याना पुरवल्याचा गौफ्यस्फोट देखील केला. तसेच परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर देखील कारवाई करण्यासाठी प्रसाद कर्वे नामक व्यक्तीकडून महितीच्या अधिकारात महिती मागवून ती किरीट सोमय्यांना पुरवल्याचा आरोप केला आहे. प्रसाद कर्वे यांनी माहितीच्या अधिकाराचा नियमभंग केला असून कलम 11 चे उल्लंघन केले आहे.

*आमच्या TIMES MARATHI NEWS च्या अपडेट तुमच्या Whatsapp वर मिळवण्यासाठी आम्हाला जाॅईन व्हा किंवा 8390380101 या क्रमांकावर HI मेसेज करा*
https://chat.whatsapp.com/H0byh80Nekn2VHl0oUz2tN
https://t.me/joinchat/wy0fp8dr-ts4Mjll
https://wordpress.com/notifications
https://profile.dailyhunt.in/timesmarathinews
https://chat.whatsapp.com/H0byh80Nekn2VHl0oUz2tN

सर्व समान्यांना दिलासा नाही, पेट्रोल डिझेल जी एस टी च्या कक्षेत नाही

लखनऊ येथे आज 45 व्या जी एस टी कोन्सिलची बैठक झाली. या बैठकीत पेट्रोल डिझेल जी एस टीच्या कक्षेत घेण्याबाबत चर्चा केली जाणार होती. यासाठी प्रत्येक राज्यातील प्रतिनिधी उपस्थित होते. मात्र सर्वसामान्यांच्या अपेक्षा या बैठकीतही पुर्ण झाल्या नसून पेट्रोल डिझेल पुन्हा जी एस टीच्या कक्षेबाहेरच राहिले. यामुळे पेट्रोल डिझेलचे दर कमी होण्याची शक्यता आता राहिलीच नाही. पेट्रोल डिझेल दर कमी होवून सर्वसामान्यांना दिलासा मिळण्याची शक्यता आता राहिली नसून पुन्हा सर्वसामान्यांच्या पदरी निराशाच पडली आहे.

वैभव खेडेकरांना न्यायालयाचा दिलासा

ऐन नगरपालिका निवडणुकांच्या तोंडावर खेड शिवसेनेने डिझेल घोटाळ्यात अडकवून वैभव खेडेकरांचे राजकीय अस्तित्व संपवण्याचा प्रयत्न केला होता. मात्र उच्च न्यायालयाने त्यांच्यावर केलेल्या आरोपाला स्थगिती देत विद्यमान नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांना दिलासा दिला आहे. तर यामुळे शिवसेनेच्या स्वप्नांवर विरजण पडले आहे.

खेडचे विद्यमान नगराध्यक्ष व मनसेचे राज्य सरचिटणीस वैभव खेडेकर यांच्यावर शिवसेनेने डिझेल घोटाळा केल्याचा आरोप करत त्यांच्या राजकीय कारकीर्द संपवण्याचा घाट घातला होता. ते अपात्र होणार 6 वर्षे त्यांच्यावर बंदी येणार. असे एक ना अनेक प्रकारचे आरोप त्यांच्या बाबत करत त्यांना संपवण्याचा प्रयत्न केला होता. त्यांना राजकारणातून संपवल्याच्या चर्चा ही खेड शहरात रंगल्या होत्या. मात्र “सत्य परेशान होता है पराजित नाही” किंवा “उसके घर मे देर है लेकीन अंधेर नही” या वाक्याप्रमाणे माननीय उच्च न्यायालयाने त्यांना दिलासा दिला आहे. खेड शहरातून मनसे व वैभव खेडेकर यांना संपवण्याचा विरोधकांचा मनसुबा मात्र उधळला. त्यांच्या या स्वप्नांवर मा. उच्च न्यायालयाच्या निकालाने विरजन पडले आहे.

*आमच्या TIMES MARATHI NEWS च्या अपडेट तुमच्या Whatsapp वर मिळवण्यासाठी आम्हाला जाॅईन व्हा किंवा 8390380101 या क्रमांकावर HI मेसेज करा*
https://chat.whatsapp.com/H0byh80Nekn2VHl0oUz2tN
https://t.me/joinchat/wy0fp8dr-ts4Mjll
https://wordpress.com/notifications
https://profile.dailyhunt.in/timesmarathinews
https://chat.whatsapp.com/H0byh80Nekn2VHl0oUz2tN

पेट्रोल 25 रुपयांनी स्वस्त होऊ शकते

45 व्या जी एस टी परिषदेची बैठक अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांच्या अध्यक्षतेखाली लखनौऊ येथे पार पडत आहे. या बैठकीत पेट्रोल आणि डिझेल जी एस टी च्या कक्षेत आणण्याचा निर्णय होण्याची शक्यता आहे. जर असे झाले तर पेट्रोल 25 रुपयांनी स्वस्त होऊ शकते. यामुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किंमतीमुळे सर्वसामान्य जनता त्रस्त झाली आहे. देशात बहुतांशी शहरात पेट्रोलची शंभरी तर डिझेल शंभर च्या घरात गेल्याचे पहावयास मिळत आहे. आजच्या 45 व्या जी एस टी परिषदेच्या बैठकीत यावर चर्चा होणार असल्याचे बोलले जात आहे. जर पेट्रोल आणि डिझेल जी एस टी च्या कक्षेत आणले तर त्याच्या किमतीत मोठ्या प्रमाणात घट होऊ शकते. सध्या पेट्रोल आणि डिझेल वर अबकारी, वॅट आणि उपकर असे तीन प्रकारचे कर आकारले जात आहेत. वॅटच्या माध्यमातून मिळणारे उत्पन्न हे सुमारे 41 टक्के असून ते राज्य सरकारच्या वाट्याला येते. पेट्रोलवर सुमारे 50 टक्के कर आकारला जात आहे. जर पेट्रोल आणि डिझेलचा जी एस टी च्या उच्च स्लॅबच्या कक्षेत समावेश केला तरी तो कर 28 टक्क्यांपर्यंत येईल. म्हणजेच आताच्या करारानुसार हा कर 50 टक्क्यांवर येईल. यामुळे सर्व सामान्य जनतेच्या खिशातून जाणारे 25 रुपये हे वाचणार असून पेट्रोल डिझेलच्या किमती 25 रुपयांनी कमी होण्याची शक्यता आहे. आजच्या बैठकीत जर हा निर्णय घेतला गेला तर देशाच्या प्रांतप्रधानांनी त्यांच्या जन्मदिनी देशवासियांना दिलासा स्वरूपात ही भेट दिली म्हटले तर वावगे ठरू नये. या बैठकीत होणारा निर्णय अर्थमंत्री निर्मला सीतारामन या सायंकाळी 6 वाजता पत्रकार परिषद घेऊन जाहीर करणार आहेत.

*आमच्या TIMES MARATHI NEWS च्या अपडेट तुमच्या Whatsapp वर मिळवण्यासाठी आम्हाला जाॅईन व्हा किंवा 8390380101 या क्रमांकावर HI मेसेज करा*
https://chat.whatsapp.com/H0byh80Nekn2VHl0oUz2tN
https://t.me/joinchat/wy0fp8dr-ts4Mjll
https://wordpress.com/notifications
https://profile.dailyhunt.in/timesmarathinews
https://chat.whatsapp.com/H0byh80Nekn2VHl0oUz2tN

गणपतीपुळे समुद्रात 4 जण बुडाले, 1 चा मृत्यू

गणपतीपुळे येथे पर्यटनासाठी आलेले 4 तरुण समुद्रात बुडल्याची घटना घडली. यावेळी येथील जीव रक्षकांना 3 जणांना वाचवण्यात यश आले. तर एकाच मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी सकाळी 11.45 वा. घडली.

कोल्हापूर व सांगली येथील 4 तरुण खासगी गाडीने बुधवारी सायंकाळी 6 वाजता गणपतीपुळे येथे फिरण्यासाठी आले होते. गुरुवारी सकाळी 11.45 वा. ते श्री क्षेत्र गणपतीपुळे येथील मंदिराजवळील समुद्रात आंघोळीसाठी गेले होते. यावेळी पाण्याचा अंदाज न आल्याने एकजण गटांगळ्या खाऊ लागला. यावेळी या 4 ही जणांनी आरडाओरड करण्यास सुरुवात केली. त्यांचा आवाज ऐकून समुद्र किनाऱ्यावर असलेले जीवरक्षक रोहित चव्हाण, ओंकार गवाणकर, अक्षय माने, अनिकेत चव्हाण, मयुरेश देवरुखकर यांनी समुद्रात उड्या मारून या 4 ही जणांना त्यांनी पाण्याबाहेर काढले. यावेळी प्रणेश मुकुंद वसगडेकर (वय 23 रा. सांगली) याच्या नाका तोंडात पाणी गेल्याने त्याचा मृत्यू झाला. यावेळी त्याच्या सोबत ओमकार उत्तम मेहत्तर (वय 26 रा. कोल्हापूर), वैभव जगताप (वय 25 रा. सांगली) व पृथ्वीराज पाटील ( वय 24 रा. सांगली) या तिघांना वाचवण्यात यश आले आहे. या घटनेची महिती मिळताच गणपतीपुळे पोलीस स्थानकाचे मधुकर सरगर व सागर गिरीगोसावी यांनी घटनास्थळी धाव घेतली. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस हवालदार राहुल जाधव करीत आहेत.

*आमच्या TIMES MARATHI NEWS च्या अपडेट तुमच्या Whatsapp वर मिळवण्यासाठी आम्हाला जाॅईन व्हा किंवा 8390380101 या क्रमांकावर HI मेसेज करा*
https://chat.whatsapp.com/H0byh80Nekn2VHl0oUz2tN
https://t.me/joinchat/wy0fp8dr-ts4Mjll
https://wordpress.com/notifications
https://profile.dailyhunt.in/timesmarathinews
https://chat.whatsapp.com/H0byh80Nekn2VHl0oUz2tN

T-20 वर्ल्डकप नंतर कॅप्टनसी सोडणार – विराट कोहली

T-20 वर्ल्डकप स्पर्धा तोंडावर असताना विराट कोहली कर्णधारपद सोडणार आसल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. मात्र आज त्या खऱ्या ठरल्या. या प्रकरणी विराट कोहली यांनी स्वतः ट्विट करत T-20 वर्ल्डकप स्पर्धेनंतर कर्णधार पद सोडणार असल्याचे जाहीर केले. तसेच तो फक्त T-20 चे कर्णधार पद सोडणार असून वन डे आणि कसोटी सामन्यांच्या खेळाच्या कर्णधारपदी कायम राहणार असल्याचे ही स्पष्ट केले.

*आमच्या TIMES MARATHI NEWS च्या अपडेट तुमच्या Whatsapp वर मिळवण्यासाठी आम्हाला जाॅईन व्हा किंवा 8390380101 या क्रमांकावर HI मेसेज करा*
https://chat.whatsapp.com/H0byh80Nekn2VHl0oUz2tN
https://t.me/joinchat/wy0fp8dr-ts4Mjll
https://wordpress.com/notifications
https://profile.dailyhunt.in/timesmarathinews
https://chat.whatsapp.com/H0byh80Nekn2VHl0oUz2tN

मिलिंद नार्वेकर तिरुपती देवस्थानाच्या ट्रस्टवर

भारतातील सर्वात श्रीमंत आणि प्रसिद्ध असणाऱ्या तिरूमाला तिरुपती देवस्थानच्या नव्या ट्रस्ट बोर्डाची स्थापना बुधवारी करण्यात आली. या नव्या कमिटीवर महाराष्ट्रातून एकाची सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली. या सदस्य पदी मुख्यमंत्र्यांचे जवळचे विश्वासू म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांची निवड करण्यात आली. या कमिटीवर संपूर्ण देशातून 24 जणांची नियुक्ती केली जाते.

आंध्रप्रदेश सरकारने अधिकृत अधिसूचना काढत नव्या तिरुमाला तिरुपती देवस्थान ट्रस्टच्या नव्या सदस्यांच्या नावाची यादी जाहीर केली. सर्वाधिक प्रसिद्ध आणि श्रीमंत असणाऱ्या या देवस्थानच्या यादीत स्थान मिळवण्यासाठी देशातून मोठी चढाओढ असते. यामुळे प्रत्येक राज्याचे मुख्यमंत्री आंध्रप्रदेश च्या मुख्यमंत्र्यांच्या संपर्कात राहून या नियुक्तीसाठी नवे सुचवत असतात. याच प्रकारे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांच्या नावाची शिफारस करण्यात आली होती. यानंतर 24 सदस्यांच्या यादीत मिलिंद नार्वेकर यांच्या नावाचा समावेश करण्यात आला.

*आमच्या TIMES MARATHI NEWS च्या अपडेट तुमच्या Whatsapp वर मिळवण्यासाठी आम्हाला जाॅईन व्हा किंवा 8390380101 या क्रमांकावर HI मेसेज करा*
https://chat.whatsapp.com/H0byh80Nekn2VHl0oUz2tN
https://t.me/joinchat/wy0fp8dr-ts4Mjll
https://wordpress.com/notifications
https://profile.dailyhunt.in/timesmarathinews
https://chat.whatsapp.com/H0byh80Nekn2VHl0oUz2tN

आरवली येथे गॅस सिलेंडरचा ट्रक उलटला, चालक जखमी

मुंबई गोवा महामार्गावरील आरवली गावाजवळ मंगळवारी रात्री एच पी कंपनीच्या गॅस सिलेंडरचा ट्रक क्र. एम एच 10 झेड 3879 हा उलटल्याने अपघात झाला. या अपघातात ट्रक चालक जखमी झाला असून सुदैवाने अनर्थ टळला आहे. या अपघातानंतर ट्रक मधील सिलेंडर महामार्गा शेजारी विखुरलेले पहावयास मिळाले. या अपघाताची माहिती मिळताच महामार्ग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन वाहतूक सुरळीत केली. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवित हानी झाली नसून मोठा अनर्थ ही टळला.

*आमच्या TIMES MARATHI NEWS च्या अपडेट तुमच्या Whatsapp वर मिळवण्यासाठी आम्हाला जाॅईन व्हा किंवा 8390380101 या क्रमांकावर HI मेसेज करा*
https://chat.whatsapp.com/H0byh80Nekn2VHl0oUz2tN
https://t.me/joinchat/wy0fp8dr-ts4Mjll
https://wordpress.com/notifications
https://profile.dailyhunt.in/timesmarathinews
https://chat.whatsapp.com/H0byh80Nekn2VHl0oUz2tN

6 दहशतवाद्यांचा मास्टर माईंड मुंबईत, कुटुंबियांना पोलिसांनी घेतले ताब्यात

दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने व उत्तरप्रदेश एटीएसने ताब्यात घेतलेल्या 6 दहशतवाद्यांचा मास्टर माईंड मुंबईतील असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्याच्या कुटुंबियांना मुंबई पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.

मुंबई येथील सायन परिसरात राहणाऱ्या जान मोहमद शेख उर्फ समीर कालिया उर्फ अली मोहमद शेख असे या दहशतवाद्यांचे नाव आहे. जान शेख हा मुख्य सूत्रधार असल्याचे पुढे येत आहे. तसेच हा जान शेख अंडरवर्ल्डच्या संपर्कात होता. त्यासह 2 पाकिस्तानी दहशतवाद्यांच्या देखील संपर्कात होता. त्यांना ही अटक करण्यात आली आहे. दहशतवादी कारवाया करण्यासाठी जान शेख हा तरुणांना पाकिस्तानात पाठवण्याचे काम करत होता. तसेच स्फोटक तस्करीची त्याला माहिती आहे. राजस्थान येथील कोटा येथून जान शेख हा दाऊद गँगचे काम पाहत होता. ऐन सणांच्या पार्श्वभूमीवर मुंबईत तर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर यूपीमध्ये स्फोट करण्याच्या तयारीत होते. मुंबईतून अटक केलेल्या जान शेखच्या कुटुंबियांना मुंबई पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले असून धरावी पोलीस स्थानकात त्यांना चौकशीसाठी नेल्याचे समजते.

*आमच्या TIMES MARATHI NEWS च्या अपडेट तुमच्या Whatsapp वर मिळवण्यासाठी आम्हाला जाॅईन व्हा किंवा 8390380101 या क्रमांकावर HI मेसेज करा*
https://chat.whatsapp.com/H0byh80Nekn2VHl0oUz2tN
https://t.me/joinchat/wy0fp8dr-ts4Mjll
https://wordpress.com/notifications
https://profile.dailyhunt.in/timesmarathinews
https://chat.whatsapp.com/H0byh80Nekn2VHl0oUz2tN

6 दहशतवाद्यांना अटक, महाराष्ट्रात पहिली अटक

ऐन गणेशोत्सवात दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने व उत्तरप्रदेश एटीएसने केलेल्या संयुक्त कारवाईत 6 दहशतवाद्यांना अटक करण्यात आली. यातील पहिला दहशतवादी महाराष्ट्रातून तर उर्वरीत 5 जणांना दिल्ली व उत्तरप्रदेश मधून अटक करण्यात आली. याबाबत स्पेशल सेलचे सीपी नीरज ठाकूर यांनी पत्रकार परिषद घेऊन या कारवाई बाबत माहिती दिली.

स्पेशल सेलने अटक केलेल्या 6 दहशतवाद्यांना अंडरवर्ल्डचा संबंध आहे. यातील दोघांनी पाकिस्तानात ट्रेनिंग घेतल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. यातील पहिली अटक ही महाराष्ट्रातून करण्यात आली होती. त्यानंतर मिळालेल्या माहितीनुसार 2 जण दिल्ली तर 3 जण उत्तरप्रदेश मधील असून त्यांना अटक करण्यात आली. या कारवाई दरम्यान स्पेशल सेलनी स्फोटके व शास्त्रात्रे जप्त केली आहेत. या 6 जणांना अंडरवर्ल्ड मधून हवाला मार्फत पैसा पुरवण्यात येत असल्याचे तपासात उघड झाल्याचे सीपी नीरज ठाकूर यांनी सांगितले. प्रयागराज येथील करेली भागात छापा टाकून ही कारवाई केली. गेल्या एक महिण्यापासून हे ऑपरेशन सुरू होते. दिल्ली, यूपी आणि महाराष्ट्रात फिरुन त्यांनी रेकी केली होती. स्लीपर सेलच्या माध्यमातून यांच्या दहशतवादी कारवाया सुरू होत्या. देशातील वेगवेगळ्या भागात त्यांचा घातपात घडवण्याचा प्रयत्न होता. या सर्वांनी मोठा कट सुद्धा रचल्याचे समोर येत आहे.

*आमच्या TIMES MARATHI NEWS च्या अपडेट तुमच्या Whatsapp वर मिळवण्यासाठी आम्हाला जाॅईन व्हा किंवा 8390380101 या क्रमांकावर HI मेसेज करा*
https://chat.whatsapp.com/H0byh80Nekn2VHl0oUz2tN
https://t.me/joinchat/wy0fp8dr-ts4Mjll
https://wordpress.com/notifications
https://profile.dailyhunt.in/timesmarathinews
https://chat.whatsapp.com/H0byh80Nekn2VHl0oUz2tN

नाव उलटून 11 जणांना जलसमाधी

अमरावती जिल्ह्यातील श्री क्षेत्र झुंज येथील वर्धा नदीत नाव उलटून 11 जणांना जलसमाधी मिळाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. 14 सप्टेंबर रोजी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली. यामध्ये आता पर्यंत 3 जणांचे मृतदेह हाती लागले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार 13 सप्टेंबर रोजी एकाच कुटुंबातील 11 जण गडेगाव येथे दशक्रिया विधीसाठी गेले होते. कालचा दशक्रिया विधी आटपून ते सर्वजण आज सकाळी वरुड येथे फिरायला जाण्यास निघाले होते. मात्र वर्धा नदीतून नावेने जात असताना त्यांची नाव अचानक उलटली. यामुळे नावेत स्वार असणाऱ्या 11 जणांना जलसमाधी मिळाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. या ठिकाणी शोध कार्य सुरू असून आतापर्यंत 3 जणांचे मृतदेह हाती लागले असून उर्वरित 8 जणांचा शोध सुरू आहे.

*आमच्या TIMES MARATHI NEWS च्या अपडेट तुमच्या Whatsapp वर मिळवण्यासाठी आम्हाला जाॅईन व्हा किंवा 8390380101 या क्रमांकावर HI मेसेज करा*
https://chat.whatsapp.com/H0byh80Nekn2VHl0oUz2tN
https://t.me/joinchat/wy0fp8dr-ts4Mjll
https://wordpress.com/notifications
https://profile.dailyhunt.in/timesmarathinews
https://chat.whatsapp.com/H0byh80Nekn2VHl0oUz2tN

प्रवीण दरेकर माफी मागा नाहीतर थोबाड रंगवू – रुपाली चाकणकर

काय म्हणालेत प्रवीण दरेकर ते पाहूया….

राष्ट्रवादी काँग्रेस हा रंगलेल्या गालांचे मुके घेणारा पक्ष असे विधान विधानसभेचे विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी केले आहे. ते पुणे जिल्ह्यातील शिरूर येथे क्रांतीविर राजे उमाजी नाईक यांच्या 230 व्या जयंतीनिमित्त आयोजित मेळाव्यात बोलत होते. यावेळी त्यांनी सुभेदार, कारखानदार, बँका व उद्योगपतींचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असल्याचा आरोप ही केला. मात्र त्यांनी महिलांच्या बाबत केलेल्या या आक्षेपार्ह विधानामुळे राष्ट्रवादीच्या महिला नेत्या रुपाली चाकणकर चांगल्याच भडकल्या आहेत. त्यांनी यावेळेस थेट प्रवीण दरेकरांनी महिलांची माफी मागावी अन्यथा राष्ट्रवादी पक्षाच्या महिला गाल आणि थोबाड रंगवून दाखवतील असा इशारा ट्विटरच्या माध्यमातून दिला आहे. पाहूया नेमके काय म्हणाल्या त्या या विडिओ मध्ये….

*आमच्या TIMES MARATHI NEWS च्या अपडेट तुमच्या Whatsapp वर मिळवण्यासाठी आम्हाला जाॅईन व्हा किंवा 8390380101 या क्रमांकावर HI मेसेज करा*
https://chat.whatsapp.com/H0byh80Nekn2VHl0oUz2tN
https://t.me/joinchat/wy0fp8dr-ts4Mjll
https://wordpress.com/notifications
https://profile.dailyhunt.in/timesmarathinews
https://chat.whatsapp.com/H0byh80Nekn2VHl0oUz2tN

हिवाळी अधिवेशनात शक्ती कायदा आणणार – गृहमंत्री

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज्य सरचिटणीस वैभव खेडेकर यांच्या घरात विराजमान झालेले बाप्पा

मुंबईत झालेल्या बलात्कार आणि हत्या प्रकरणामुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. महिलांवर वारंवार होणाऱ्या अत्याचाराला आळा घालण्यासाठी हिवाळी अधिवेशनात शक्ती कायदा आणणार असल्याची माहिती गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली.

राज्यात महिलांवर होणारे अत्याचार, प्रतिबंध उपाय योजना याबाबत जिल्हानिहाय व आयुक्तालय पातळीवर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आढावा घेतला. तसेच राज्यातील कायदा सुव्यवस्थेचा त्यांनी आढावा घेतला. यावेळी त्यांनी महिला अत्याचारा बाबत तात्काळ दखल घेऊन कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. तसेच यावेळी मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी वाढत्या अत्याचाराच्या घटना लक्षात घेऊन मुंबई पोलिसांना अतिदक्षतेच्या सूचना दिल्या आहेत. तसेच यावेळी महिलां संबंधीत गुन्ह्यात कलम ३५४, ३६३, ३७६, ५०९ भादवि व पोस्को कायद्याअंतर्गत अटक आरोपींचा स्वतंत्र अभिलेख तयार करण्यात यावा व अशा सर्व आरोपींवर योग्य ती प्रतिबंधक कारवाई करण्यात यावी असे आदेश राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली.

*आमच्या TIMES MARATHI NEWS च्या अपडेट तुमच्या Whatsapp वर मिळवण्यासाठी आम्हाला जाॅईन व्हा किंवा 8390380101 या क्रमांकावर HI मेसेज करा*
https://chat.whatsapp.com/H0byh80Nekn2VHl0oUz2tN
https://t.me/joinchat/wy0fp8dr-ts4Mjll
https://wordpress.com/notifications
https://profile.dailyhunt.in/timesmarathinews
https://chat.whatsapp.com/H0byh80Nekn2VHl0oUz2tN

फास्ट ट्रॅक कोर्टात केस चालवणार – मुख्यमंत्री

मुंबईतील साकिनाका येथील खैरणी रोडवर झालेला प्रकार हा दुर्देवी आसून माणुसकीला काळिमा फासणारा प्रकार आहे. या घटनेतील पीडितेला न्याय मिळवून देण्यासाठी हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्याचे आश्वासन दिले. तसेच तपासला गती देण्याचे निर्देश राज्याचे मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी दिले आहेत.

*आमच्या TIMES MARATHI NEWS च्या अपडेट तुमच्या Whatsapp वर मिळवण्यासाठी आम्हाला जाॅईन व्हा किंवा 8390380101 या क्रमांकावर HI मेसेज करा*
https://chat.whatsapp.com/H0byh80Nekn2VHl0oUz2tN
https://t.me/joinchat/wy0fp8dr-ts4Mjll
https://wordpress.com/notifications
https://profile.dailyhunt.in/timesmarathinews
https://chat.whatsapp.com/H0byh80Nekn2VHl0oUz2tN

मुंबईच्या निर्भयाचा उपचारा दरम्यान मृत्यू

मुंबईतील साकिनाका परिसरातील खैरणी रोड परिसरात 9 सप्टेंबरच्या रात्री 32 वर्षीय महिलेवर बलात्कार करून तिच्या गुप्तांगात लोखंडी सळी टाकण्याचा अमानुष प्रकार 10 सप्टेंबरला समोर आला होता. या पीडितेला पोलिसांनी राजावाडी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. या पिडितेची प्रकृती गंभीर होती. अखेर आज 11 सप्टेंबर रोजी उपचारा दरम्यान तिचा मृत्यू झाल्याची घटना घडली. अखेर आज पुन्हा एका निर्भयाचा या अमानुष कृत्याने बळी घेतला आहे.

देशाची राजधानी दिल्ली येथे गेल्या काही वर्षांपूर्वी असाच निर्दयी प्रकार समोर आला होता. या घटनेची पुनरावृत्ती देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईत घडली. या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला आहे. 9 सप्टेंबरच्या रात्री साकिनाका परिसरातील खैरणी रोड परिसरात ही घटना घडली. ही संपूर्ण घटना सी सी टी व्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून हा सर्व प्रकार त्या ठिकाणी उभ्या असलेल्या मालवाहू टेम्पोत घडल्याचे दिसून आले. या प्रकरणी पोलिसांनी मोहन चौहान या व्यक्तीला ताब्यात घेतले आहे. या पीडितेला 13 आणि 16 वर्षाच्या दोन मुली आसून ती सध्या आपल्या आई सोबत राहत आहे. ही पीडित महिला गेल्या 10 ते 12 वर्षांपासून टेम्पोजवळ सापडलेल्या इसमा सोबत राहत होती. त्यांच्यात वारंवार भांडणे देखील होत होती आशी माहिती समोर येत आहे. या पिडितेची मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी रुग्णालयात जाऊन पीडितेच्या प्रकृतीची चौकशी केली. पीडित महिला अति रक्तस्त्राव झाल्यामुळे बेशुद्ध अवस्थेतच होती. तिची प्रकृती चिंताजनक असल्याचे महापौर किशोरी पेडणेकर यांनी सांगितले होते. या प्रकरणी मुंबई पोलीस अधिक तपास करीत आहेत.

*आमच्या TIMES MARATHI NEWS च्या अपडेट तुमच्या Whatsapp वर मिळवण्यासाठी आम्हाला जाॅईन व्हा किंवा 8390380101 या क्रमांकावर HI मेसेज करा*
https://chat.whatsapp.com/H0byh80Nekn2VHl0oUz2tN
https://t.me/joinchat/wy0fp8dr-ts4Mjll
https://wordpress.com/notifications
https://profile.dailyhunt.in/timesmarathinews
https://chat.whatsapp.com/H0byh80Nekn2VHl0oUz2tN

राष्ट्रवादीच्या महिला सरपंचाला मारहाण

गेल्या काही दिवसांपूर्वी पुणे जिल्ह्यात भाजपच्या महिला सरपंचाला मारहाण झाल्याची घटना ताजी असतानाच परत एकदा आणखी एका महिला सरपंचाला मारहाण झाल्याची घटना समोर आली आहे. अहमदनगरच्या उक्कड गावात हा प्रकार झाल्याचे समोर आले आहे. ही मारहाण विरोधी पक्षातील लोकांनी केल्याचे उक्कड गावच्या सरपंचांनी सांगितले.

उक्कड गावच्या सरपंच राणी काथोरे यांना ही मारहाण करण्यात आली आहे. बुधवार 8 सप्टेंबर रोजी गावचा तंटामुक्ती अध्यक्षाची निवड करण्यावरून ही मारहाण झाल्याचे सरपंच राणी काथोरे यांनी सांगितले. यावेळी त्यांनी विरोधी पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून ही मारहाण झाल्याचे सांगितले. या प्रकारा बाबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी ट्विटर अकाउंट वरून हा व्हिडिओ शेअर करत या मारहाणी विरोधात आवाज उठवला आहे.

*आमच्या TIMES MARATHI NEWS च्या अपडेट तुमच्या Whatsapp वर मिळवण्यासाठी आम्हाला जाॅईन व्हा किंवा 8390380101 या क्रमांकावर HI मेसेज करा*
https://chat.whatsapp.com/H0byh80Nekn2VHl0oUz2tN
https://t.me/joinchat/wy0fp8dr-ts4Mjll
https://wordpress.com/notifications
https://profile.dailyhunt.in/timesmarathinews
https://chat.whatsapp.com/H0byh80Nekn2VHl0oUz2tN

2021 च्या लालबागच्या राजाचे दर्शन टाइम्स मराठी न्युजच्या वाचकांसाठी

लालबागचा राजा

*आमच्या TIMES MARATHI NEWS च्या अपडेट तुमच्या Whatsapp वर मिळवण्यासाठी आम्हाला जाॅईन व्हा किंवा 8390380101 या क्रमांकावर HI मेसेज करा*
https://chat.whatsapp.com/H0byh80Nekn2VHl0oUz2tN
https://t.me/joinchat/wy0fp8dr-ts4Mjll
https://wordpress.com/notifications
https://profile.dailyhunt.in/timesmarathinews
https://chat.whatsapp.com/H0byh80Nekn2VHl0oUz2tN

महिलेवर बलात्कार करून गुप्तांगात रॉड घुसवला, निर्भया घटनेची पुनरावृत्ती

मुंबईत दिल्लीतल्या निर्भया घटनेची पुनरावृत्ती घडली असून साकिनाका परिसरात एका 32 वर्षीय महिलेवर बलात्कार करून तिच्या गुप्तांगात रॉड घुसवल्याची घटना घडली. या महिलेची प्रकृती गंभीर असून तिला रुग्णालतात दाखल करण्यात आले आहे. साकिनाका येथील खैराणी रोड परिसरात घडलेल्या घटनेमुळे मुबईसह महाराष्ट्रात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी मुबई पोलिसांना पहाटे 3.30 च्या सुमारास साकिनाका परिसरातील खैराणी रोडवर एक महिला रक्ताच्या थारोळ्यात बेशुद्ध पडल्याचा फोन कन्ट्रोल रूम ला आला होता. या घटनेची माहिती मिळताच पोलिस उपयुक्त व अतिरिक्त पोलीस आयुक्तांनी घटनास्थळी धाव घेतली. या ठिकाणी पोहचल्यानंतर पोलिसांनी त्या पीडित महिलेला घाटकोपरच्या राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी एका आरोपीला ताब्यात घेतले असून या प्रकरणात अन्य काहीजण सहभागी असल्याचा संशय पोलिसांना आहे. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.

*आमच्या TIMES MARATHI NEWS च्या अपडेट तुमच्या Whatsapp वर मिळवण्यासाठी आम्हाला जाॅईन व्हा किंवा 8390380101 या क्रमांकावर HI मेसेज करा*
https://chat.whatsapp.com/H0byh80Nekn2VHl0oUz2tN
https://t.me/joinchat/wy0fp8dr-ts4Mjll
https://wordpress.com/notifications
https://profile.dailyhunt.in/timesmarathinews
https://chat.whatsapp.com/H0byh80Nekn2VHl0oUz2tN

भारतीय शरीर सौष्ठव संघात महाराष्ट्रातल्या दोघांची निवड

जागतिक शरीरसौष्ठव स्पर्धेसाठी भारताचा 77 खेळाडूंचा जम्बो संघ तयार, 1 ते 7 ऑक्टोबरमध्ये होणार “मिस्टर वर्ल्ड”

भारतीय शरीरसौष्ठव संघ आता आगामी 12 व्या जागतिक शरीरसौष्ठव अजिंक्यपद स्पर्धेसाठी पूर्ण ताकदीनिशी सज्ज होतोय. करोनाच्या संकटामुळे अनेकदा लांबणीवर पडलेली स्पर्धा येत्या 1 ते 7 ऑक्टोबरला उझबेकिस्तानच्या ताश्कंद शहरात होणार आहे. या स्पर्धेसाठी भारताचा 77 सदस्यीय संघ निवडण्यात आला असून त्यात महाराष्ट्राच्या सचिन पाटील, सुजन पिळणकर, सुभाष पुजारीसारख्या तयारीतल्या खेळाडूंची निवड करण्यात आली आहे.

कोरोना महामारीमुळे 12 वी जागतिक शरीरसौष्ठव स्पर्धा अनेकदा पुढे ढकलण्यात आली होती. दिवसेंदिवस वाढत असलेल्या करोना संकटामुळे गतवर्षीच्या सर्व स्पर्धा रद्द करण्यात आल्या होत्या. मात्र आता जागतिक शरीरसौष्ठव संघटनेच्या अथक परिश्रमानंतर उझबेकिस्तानच्या ताश्कंद शहरात या स्पर्धेची तयारी सुरू करण्यात आली आहे. अनंत अडचणींवर मात करीत ही स्पर्धा होत असून या स्पर्धेच्या तयारीसाठीही खेळाडूंना फार कमी वेळ मिळाला होता. त्या वेळेतही खेळाडूंनी प्रचंड मेहनत घेत स्पर्धेसाठी तयारी करण्याचे धाडस दाखविले. जागतिक स्पर्धेसाठी भारतातून मोठ्या संख्येने खेळाडू तयारी करत असल्याची माहिती भारतीय शरीरसौष्ठव संघटनेच्या सरचिटणीस हिरल शेठ यांनी दिली.

या स्पर्धेच्या तयारीसाठी खेळाडूंना अपेक्षित वेळ मिळाला नाही. तरी भारताने 77 खेळाडूंसह सर्व गटांसाठी आपल्या दमदार खेळाडूंची निवड केली आहे. पुरूषांच्या आणि महिलांच्या शरीरसौष्ठव स्पर्धेबरोबर 40 ते 60 वर्षे वयोगटातील मास्टर्स शरीरसौष्ठव स्पर्धेतही भारताचे अनेक दिग्गज आपले नशीब आजमावताना दिसतील. “मि. वर्ल्ड” साठी भारताचा संघ पूर्ण तयारीनिशी उतरतोय. शरीरसौष्ठवाच्या मुख्य गटात कुंदन गोपे, रामकृष्ण, इ कार्तिक, समीरं नंदी, मोहम्मद अश्रफ, जावेदअली खान यांच्यासारखे दिग्गज आपले पीळदार देह दाखवण्यासाठी सज्ज झाले आहेत. तर मास्टर गटात महाराष्ट्राचा सुभाष पुजारी, नामांकित बोरून यमनम, बलदेव कुमार यांच्यासारखे अनुभवी खेळाडूही दिसतील. महिलांच्या गटांमध्ये भाविका प्रधान झरना राय, करिष्मा चानू सुप्रतिक अर्चर्जी यांच्याकडून पदकाची अपेक्षा आहे. त्याचप्रमाणे मॉडेल फिजिक गटात अनिल सती, मनिकंदन, स्वराज सिंग हे भारताचे प्रतिनिधित्व करतील. त्यामुळे यंदा भारताच्या जंबो संघाने उज्बेकिस्तान गाजवले तरी आश्चर्य वाटणार नाही.

*आमच्या TIMES MARATHI NEWS च्या अपडेट तुमच्या Whatsapp वर मिळवण्यासाठी आम्हाला जाॅईन व्हा किंवा 8390380101 या क्रमांकावर HI मेसेज करा*
https://chat.whatsapp.com/H0byh80Nekn2VHl0oUz2tN
https://t.me/joinchat/wy0fp8dr-ts4Mjll
https://wordpress.com/notifications
https://profile.dailyhunt.in/timesmarathinews
https://chat.whatsapp.com/H0byh80Nekn2VHl0oUz2tN

हेदलीच्या तंटामुक्ती अध्यक्ष पदी राजू घाणेकर बिनविरोध

खेड तालुक्यातील हेदली गावच्या तंटामुक्ती अध्यक्ष पदी राजू बळवंत घाणेकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. राजू घाणेकर हे सलग 9 वर्षे बिनविरोध तंटामुक्ती अध्यक्ष आहेत. हेदली गावच्या तंटामुक्ती अध्यक्ष पदी ते गेले 11 वर्षे कार्यरत आहेत.

त्यांची पुन्हा तंटामुक्ती अध्यक्ष पदी निवड झाल्याने हेदली ग्रामस्थ व तालुक्यातील नागरिक व राजकीय पदाधिकारी यांच्या कडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. त्यांनी त्यांच्या अध्यक्ष पदाच्या कारकिर्दीच्या सुरवातीलाच म्हणजे 2009 साली राज्य शासनाचा तंटा मुक्ती गाव हा पुरस्कार मिळवून दिलेला आहे.

*आमच्या TIMES MARATHI NEWS च्या अपडेट तुमच्या Whatsapp वर मिळवण्यासाठी आम्हाला जाॅईन व्हा किंवा 8390380101 या क्रमांकावर HI मेसेज करा*
https://chat.whatsapp.com/H0byh80Nekn2VHl0oUz2tN
https://t.me/joinchat/wy0fp8dr-ts4Mjll
https://wordpress.com/notifications
https://profile.dailyhunt.in/timesmarathinews
https://chat.whatsapp.com/H0byh80Nekn2VHl0oUz2tN

आता लालबागच्या राजाचे दर्शन ऑनलाइन, 1935 ची “श्री” प्रतिमा खास आमच्या वाचकांसाठी

मुबईसह महाराष्ट्रात प्रसिद्ध असणारा लालबागच्या राजाचे यंदा 88 वे वर्ष आहे. सर्व सामान्यांसह सिने कलाकार व राजकीय पुढारी व नेते मंडळी ही आवर्जून लालबागच्या राजाचे दर्शन घेतात. दरवर्षी किमान 50 लाख भाविक या ठिकाणी दर्शनासाठी येतात. 1932 साली स्थापन करण्यात आलेल्या या मंडळाचे यंदा 88 वे वर्ष आहे. लालबागचा राजा हा नवसाला पावणारा गणपती म्हणून देखील ओळखला जातो.

आता आपल्या लाडक्या लालबागच्या राजाचे दर्शन आपल्याला घरबसल्या घेता येणार आहे. लालबागच्या राजा मंडळाने भाविकांसाठी आता ऑनलाइन दर्शनाची सोय केली आहे. या वेबसाईटवर जावून तुम्ही आता आपल्या लाडक्या लालबागच्या राजाचे दर्शन घर बसल्या घेऊ शकता. यासाठी पुढील लिंक वर क्लिक करून दर्शन घेऊ शकता. https://www.lalbaugcharaja.com/MR/

https://www.lalbaugcharaja.com/MR/ या संकेतस्थळावर जाऊन तुम्ही ऑनलाइन लाइव्ह दर्शन घेऊ शकता. 10 सप्टेंबर सकाळी 11 वाजल्यापासून 19 सप्टेंबर सकाळी 7 वाजेपर्यंत 24 तास भाविकांना या लिंक वरून लालबागच्या राजाचे दर्शन घेता येईल. 1932 पासून 1990 पर्यंत लालबागच्या राजाच्या गणेश मूर्तीचे रंग व स्वरूप बदलते असायचे. मात्र 1990 नंतर लालबागच्या राजाचे स्वरूप व रंग हे बदलण्यात आले नाही. याचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे ही मूर्ती बाहेरून खरेदी केली जात नाही तर ज्या ठिकाणी ती स्थानापन्न होते त्याच ठिकाणी तिला बनवले जाते. आमच्या टाइम्स मराठी च्या वाचकांसाठी 1935 साली स्थानापन्न करण्यात आलेल्या लालबागच्या राजाचा संग्रहित फोटो.

*आमच्या TIMES MARATHI NEWS च्या अपडेट तुमच्या Whatsapp वर मिळवण्यासाठी आम्हाला जाॅईन व्हा किंवा 8390380101 या क्रमांकावर HI मेसेज करा*
https://chat.whatsapp.com/H0byh80Nekn2VHl0oUz2tN
https://t.me/joinchat/wy0fp8dr-ts4Mjll
https://wordpress.com/notifications
https://profile.dailyhunt.in/timesmarathinews
https://chat.whatsapp.com/H0byh80Nekn2VHl0oUz2tN

मुंबई गोवा महामार्ग अवजड वाहनांसाठी बंद

कोकणातील सर्वात मोठा सण गणेशोत्सव आता अवघ्या काही दिवसांवर आला आहे. गणेशोस्तवासाठी चाकरमानी मोठ्या संख्येने कोकणात दाखल होतात. यामुळे महामार्गावर वाहतूक कोंडी होऊ नये, यासाठी राज्य शासनाकडून पनवेल ते सावंतवाडी दरम्यान 8 सप्टेंबर ते 20 सप्टेंबर पर्यंत वाळू व तत्सम गौण खनिजांची वाहतूक करणाऱ्या वाहनांना पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. तसेच इतर अवजड वाहनांना निर्बंध लागू करण्यात आले आहेत. यामध्ये 8 ते 10 सप्टेंबर दरम्यान 16 टन क्षमतेचे व त्यापेक्षा अधिक वजनाची वाहतूक करणाऱ्या वाहनांना बंदी करण्यात आली आहे. तर या वाहनांना 14 ते 15 सप्टेंबर रोजी देखील महामार्गावर बंदी असणार आहे. त्यानंतर पुन्हा 19 व 20 सप्टेंबर रोजी महामार्गावर वाहतुकीस निर्बंध लागू करण्यात आले आहेत. मात्र या निर्बंधातून दूध, पेट्रोल, डिझेल, गॅस सिलेंडर, लिक्विड मेडिकल ऑक्सिजन, अन्न धान्य, भाजीपाला व नाशवन्त पदार्थांची वाहतूक यांना सूट देण्यात आली आहे. महामार्गाच्या दुरुस्ती व रुंदी करणाच्या कामकाजातील साहित्य ने आण करणाऱ्या वाहनांना सूट देण्यात आली. तसेच मुबई गोवा महामार्गावरील ज्या ठिकाणी 2 + 2 लेनचे काम पूर्ण झाले आहे. त्या ठिकाणी गणेशभक्तांचा व महामार्गाची परिस्थिती लक्षात घेवून पोलीस आयुक्त नवी मुंबई आणि जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षकांनी त्या स्तरावर निर्बंध शिथिल करण्याबाबत निर्णय घ्यावा असा आदेश काढण्यात आला.

*आमच्या TIMES MARATHI NEWS च्या अपडेट तुमच्या Whatsapp वर मिळवण्यासाठी आम्हाला जाॅईन व्हा किंवा 8390380101 या क्रमांकावर HI मेसेज करा*
https://chat.whatsapp.com/H0byh80Nekn2VHl0oUz2tN
https://t.me/joinchat/wy0fp8dr-ts4Mjll
https://wordpress.com/notifications
https://profile.dailyhunt.in/timesmarathinews
https://chat.whatsapp.com/H0byh80Nekn2VHl0oUz2tN

दापोली शहरातील केळस्कर नाक्यात ढगफुटी सदृश पावसामुळे आलेले पाणी

*आमच्या TIMES MARATHI NEWS च्या अपडेट तुमच्या Whatsapp वर मिळवण्यासाठी आम्हाला जाॅईन व्हा किंवा 8390380101 या क्रमांकावर HI मेसेज करा*
https://chat.whatsapp.com/H0byh80Nekn2VHl0oUz2tN
https://t.me/joinchat/wy0fp8dr-ts4Mjll
https://wordpress.com/notifications
https://profile.dailyhunt.in/timesmarathinews
https://chat.whatsapp.com/H0byh80Nekn2VHl0oUz2tN

हर्णे येथे बोट जलसमाधी घेताना थोडक्यात बचावली

खवळलेल्या समुदात हर्णे बंदरात मंगळवारी सकाळी गया गंगेश्वरी ही बोट जलसमाधी घेता घेता थोडक्यात बचावली. स्थानिक नागरिक व मच्छिमारांच्या प्रयत्नामुळे ही बोट जलसमाधी घेताना बचावली. मात्र ही बोट समुद्रात भरकटली असून बोटीचे ही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. गोवर्धन पावसे यांच्या मालकीची ही बोट असल्याचे समजते.

*आमच्या TIMES MARATHI NEWS च्या अपडेट तुमच्या Whatsapp वर मिळवण्यासाठी आम्हाला जाॅईन व्हा किंवा 8390380101 या क्रमांकावर HI मेसेज करा*
https://chat.whatsapp.com/H0byh80Nekn2VHl0oUz2tN
https://t.me/joinchat/wy0fp8dr-ts4Mjll
https://wordpress.com/notifications
https://profile.dailyhunt.in/timesmarathinews
https://chat.whatsapp.com/H0byh80Nekn2VHl0oUz2tN

खवळलेल्या समुद्रात बोट फुटली, रत्नागिरीतील घटना

रत्नागिरीच्या खवळलेल्या समुद्रात बैतुल रिझवान ही मासेमारी करणारी बोट मिरकवाडा बंदरात परतत असताना बंद पडली. रस्सी बांधून तिला दुसऱ्या बोटीच्या साहाय्याने बंदरात घेऊन येत असताना रस्सी तुटली. खवळलेल्या समुद्रात उंचच उंच उसळणाऱ्या लाटांमुळे या बोटीवरील नियंत्रण सुटले. या अजस्त्र लाटांच्या तडाख्यात बोट मात्र सोमवारी सकाळी 11 वाजता फुटली. सुदैवाने या बोटीवरील 4 खलशानी वेळीच पाण्यात उडया टाकल्याने कोणतीही जीवित हानी झाली नाही.

*आमच्या TIMES MARATHI NEWS च्या अपडेट तुमच्या Whatsapp वर मिळवण्यासाठी आम्हाला जाॅईन व्हा किंवा 8390380101 या क्रमांकावर HI मेसेज करा*
https://chat.whatsapp.com/H0byh80Nekn2VHl0oUz2tN
https://t.me/joinchat/wy0fp8dr-ts4Mjll
https://wordpress.com/notifications
https://profile.dailyhunt.in/timesmarathinews
https://chat.whatsapp.com/H0byh80Nekn2VHl0oUz2tN

दापोलीत ढगफुटी सदृश पाऊस

रत्नागिरी जिल्ह्यात सोमवारी सायंकाळ पासूनच जोरदार पाऊसास सुरवात झाली. मात्र सोमवारी रात्री दापोली शहरात ढगफुटी सदृश अति मूसळधार पाऊस पडल्याचे पहावयास मिळाले. या पावसामुळे सखल भागासह नागरिकांच्या घरात पाणी शिरले. रस्त्याना नद्यांचे स्वरूप आले होते. या मुसळधार पावसामुळे दापोली शहरातील केलस्कर नाका, जलगाव, भारत नगर, नागर बुडी, शिवाजी नगर परिसर जलमय झाला. यावेळी परिसरातील लोकांच्या घरात पाणी शिरले. तसेच शहरातील रस्त्यावर नदीचे स्वरूप आल्याने 3 ते 4 फूट पाण्याचा लोंढा रस्त्यावरून वाहत होता. पाहूया या पावसाची भयानक दृश्ये

*आमच्या TIMES MARATHI NEWS च्या अपडेट तुमच्या Whatsapp वर मिळवण्यासाठी आम्हाला जाॅईन व्हा किंवा 8390380101 या क्रमांकावर HI मेसेज करा*
https://chat.whatsapp.com/H0byh80Nekn2VHl0oUz2tN
https://t.me/joinchat/wy0fp8dr-ts4Mjll
https://wordpress.com/notifications
https://profile.dailyhunt.in/timesmarathinews
https://chat.whatsapp.com/H0byh80Nekn2VHl0oUz2tN

सर्व राजकीय व धार्मिक कार्यक्रम स्थगित करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आवाहन

कोरोनाचा संसर्ग रोखणे, राज्यातील नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेणे महत्वाचे आहे. यासाठी सर्व प्रकारच्या गर्दी होणाऱ्या कार्यक्रमांना स्थगित करण्याचे आवाहन राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे.

कोरोनाची दुसरी लाट ओसरत असून राज्यात काही प्रमाणात निर्बंध शिथिल होत आहेत. सध्या सर्वत्र सण उत्सव साजरे करण्यात येत आहेत. तसेच विविध राजकीय व सामाजिक कार्यक्रम ही जोरदार सुरू आहेत. यामुळे कोरोनाचा संसर्ग वाढू शकतो. यामुळे राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात कोरोना परिस्थिती बाबत चिंता व्यक्त केली आहे. यावेळी त्यांनी कोरोना संसर्गातील वाढ परिस्थिती बिघडवू शकते. त्यामुळे जनतेचे आरोग्य महत्वाचे असून उत्सव नंतरही साजरे करु, गर्दीला निमंत्रण देणारे सर्व राजकिय, धार्मिक कार्यक्रम स्थगित करण्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी परत एकदा राज्यातील पक्ष व संघटनांना कळकळीचे आवाहन केले आहे.

*आमच्या TIMES MARATHI NEWS च्या अपडेट तुमच्या Whatsapp वर मिळवण्यासाठी आम्हाला जाॅईन व्हा किंवा 8390380101 या क्रमांकावर HI मेसेज करा*
https://chat.whatsapp.com/H0byh80Nekn2VHl0oUz2tN
https://t.me/joinchat/wy0fp8dr-ts4Mjll
https://wordpress.com/notifications
https://profile.dailyhunt.in/timesmarathinews
https://chat.whatsapp.com/H0byh80Nekn2VHl0oUz2tN

अवैद्य खैराचा अड्डा उध्वस्त, वनविभागाची कारवाई

मुंबई गोवा महामार्गावर वनविभागाने गेल्या काही दिवसांपूर्वी अवैद्य खैराची वाहतूक करणारा ट्रक पकडला होता. या नंतर पुन्हा पत्रकार समीर बारगुडे यांनी सॉलिव्ह खैर तस्करीचा अड्डा वनविभागाच्या साथीने उध्वस्त केला.

रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यामध्ये उसर परिसरात अवैद्य खैर तस्करी सूरु असल्याची माहिती पत्रकार समीर बारगुडे यांना मिळाली होती. या परिसरातील खासगी क्षेत्रात सोलीव खैराची तस्करी होत असल्याची माहिती पुढे आली होती. याची माहिती बारगुडे यांनी दूरध्वनी वरून वन विभागाला दिली. वनविभागाने ही तात्काळ त्या ठिकाणी पोहचून खैराचा अड्डा उध्वस्त केला. तर ही अवैद्य तोड करणाऱ्यांवर गुन्हा ही दाखल केला. यावेळी या कारवाईत जप्त करण्यात खैर हा सुडकोली विक्री आगार येथे ठेवण्यात आला आहे. ही कारवाई रोहा वनविभागाच्या वतीने करण्यात आली. यावेळी 0.525 घन मीटरचे 58 नग सोलीव खैर जप्त करण्यात आला. त्याची अंदाजे किंमत 7312 रुपये इतकी आहे.

*आमच्या TIMES MARATHI NEWS च्या अपडेट तुमच्या Whatsapp वर मिळवण्यासाठी आम्हाला जाॅईन व्हा किंवा 8390380101 या क्रमांकावर HI मेसेज करा*
https://chat.whatsapp.com/H0byh80Nekn2VHl0oUz2tN
https://t.me/joinchat/wy0fp8dr-ts4Mjll
https://wordpress.com/notifications
https://profile.dailyhunt.in/timesmarathinews
https://chat.whatsapp.com/H0byh80Nekn2VHl0oUz2tN

मुंबई दापोली बसला अपघात, चालक जखमी

मुंबईहून दापोली येथे येणारी परळ दापोली या बसला पहाटे 5 च्या सुमारास मंडणगड तालुक्यातील म्हाप्रळ येथे अपघात झाला. चालकाचे नियंत्रण सुटल्याने ही बस रस्त्याशेजारी उलटून अपघात झाला. या अपघातात चालक किरकोळ जखमी झाला असून सर्व प्रवासी सुखरूप आहेत. या बसमधून साधारण 20 ते 25 प्रवासी प्रवास करत असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.

*आमच्या TIMES MARATHI NEWS च्या अपडेट तुमच्या Whatsapp वर मिळवण्यासाठी आम्हाला जाॅईन व्हा किंवा 8390380101 या क्रमांकावर HI मेसेज करा*
https://chat.whatsapp.com/H0byh80Nekn2VHl0oUz2tN
https://t.me/joinchat/wy0fp8dr-ts4Mjll
https://wordpress.com/notifications
https://profile.dailyhunt.in/timesmarathinews
https://chat.whatsapp.com/H0byh80Nekn2VHl0oUz2tN

कोविडच्या तिसऱ्या लाटेबाबत रविवारी  टास्क फोर्सची ‘माझा डॉक्टर’ ऑनलाईन वैद्यकिय परिषद

राज्यातील सर्व डॉक्टर्स होणार सहभागी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे करणार उद्घाटन, समाज माध्यमातून प्रसारण, चर्चा सर्वांना पाहता येणार

कोविडच्या संभाव्य तिसऱ्या लाटेला रोखण्याच्या उपाययोजनांबाबत कोविड राज्य कृती दलाने उद्या रविवार ५ सप्टेंबर रोजी ‘माझा डॉक्टर’ ऑनलाईन वैद्यकीय परिषद आयोजित केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे परिषदेत सहभागी होणार,असून त्यांच्या संबोधनाने परिषदेचे उद्घाटन होणार आहे. यावेळी आरोग्य मंत्री राजेश टोपे, वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख उपस्थित राहणार आहेत.

रविवारी सकाळी ११ ते दुपारी १ या वेळेत होणारी परिषद समाज माध्यमांवरून प्रसारित केली जाणार आहे. राज्यातील सर्व फॅमिली डॉक्टर्स, वैद्यकीय व आरोग्य क्षेत्रात कार्यरत विविध घटक तसेच नागरिकांनाही परिषदेस ऑनलाईन पद्धतीने उपस्थित राहता येणार आहे. या परिषदेतील चर्चेमुळे कोविडच्या तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने शंका तसेच घ्यावयाची काळजी अशा विविध बाबींची माहिती घेता येणार आहे. *या परिषदेसाठी http://www.facebook.com/onemdhealth यावर प्रश्न पाठवता येतील.* या परिषदेत कोविड राज्य कृती दलाचे अध्यक्ष डॉ. संजय ओक, सदस्य डॉ राहूल पंडित, डॉ शशांक जोशी, डॉ. अजित देसाई, मुलांसाठीच्या राज्य कृती दलाचे अध्यक्ष डॉ सुहास प्रभू, तसेच अमेरिकेतील डॉ मेहुल मेहता सहभागी होणार आहेत. परिषदेत राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे, सार्वजनिक आरोग्य विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास उपस्थित राहणार आहेत. *ही परिषद cmomaharashtra यांच्या ट्विटर, फेसबुक व युट्युब https://youtube.com/c/CMOMaharashtra वरुन देखील पाहता येईल*.

*आमच्या TIMES MARATHI NEWS च्या अपडेट तुमच्या Whatsapp वर मिळवण्यासाठी आम्हाला जाॅईन व्हा किंवा 8390380101 या क्रमांकावर HI मेसेज करा*
https://chat.whatsapp.com/H0byh80Nekn2VHl0oUz2tN
https://t.me/joinchat/wy0fp8dr-ts4Mjll
https://wordpress.com/notifications
https://profile.dailyhunt.in/timesmarathinews
https://chat.whatsapp.com/H0byh80Nekn2VHl0oUz2tN

सतीश उर्फ पप्पू चिकणे शिवसेनेत

खेड राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष सतीश चिकणे यांनी माजी विरोधी पक्ष नेते रामदास कदम यांच्या हस्ते शिवसेनेत पक्ष प्रवेश केला. या बाबत सर्व प्रथम टाइम्स मराठी ने अंदाज वर्तवला होता. शनिवारी दुपारी खेड शहरातील सभापती निवासमध्ये त्यांनी शिवसेना पक्षात प्रवेश केला.

*आमच्या TIMES MARATHI NEWS च्या अपडेट तुमच्या Whatsapp वर मिळवण्यासाठी आम्हाला जाॅईन व्हा किंवा 8390380101 या क्रमांकावर HI मेसेज करा*
https://chat.whatsapp.com/H0byh80Nekn2VHl0oUz2tN
https://t.me/joinchat/wy0fp8dr-ts4Mjll
https://wordpress.com/notifications
https://profile.dailyhunt.in/timesmarathinews
https://chat.whatsapp.com/H0byh80Nekn2VHl0oUz2tN

पप्पू चिकणेंचा राष्ट्रवादीला “जय महाराष्ट्र”

राष्ट्रवादी काँग्रेसचे खेड शहराध्यक्ष सतीश उर्फ पप्पू चिकणेंनी आपल्या शहराध्यक्ष पदाचा व सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याचे पत्रकार परिषद घेऊन जाहीर केले. यावेळी त्यांनी पक्षाचे वरिष्ठ पदाधिकारी विश्वासात घेत नसून आपल्याला डावलले जात असल्याचे आरोप त्यांनी यावेळी केला. या नंतर कोणत्या पक्षात प्रवेश करणार हे ते आपल्या कुटुंबाशी चर्चा करून ठरवणार असल्याचे सांगत असले तरी ते आज दुपारी 2 वाजता ते शहरातील मोठ्या राजकीय पक्षात प्रवेश करणार असल्याची चर्चा ऐकावयास मिळत आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मध्यमातून गेली 22 वर्षे राजकारण व समाजकारण करणारे पप्पू चिकणे स्वतः 10 वर्षे खेड नगरपालिकेत नगरसेवक म्हणून निवडून देखील आले होते. 2004 साली त्यांच्याकडे विद्यार्थी संघटनेचे तालुकाध्यक्ष हे पद 5 वर्षे होते. त्या कालावधीत त्यांनी राष्ट्रवादी पक्षाचा जी एस देखील आय सी एस कॉलेज मध्ये निवडून आणला होता. राज्यात महाविकास आघाडी असताना येत्या नगर पालिका निवडणुकात शहर पातळीवर काय करायचे हा प्रश्न त्यांच्यासमोर उभा होता. यासाठी त्यांनी वारंवार पक्षातील वरिष्ठ पदाधिकारी व नेते यांच्याशी चर्चा करण्याचा प्रयत्न केला. मात्र पक्षाकडून त्यांना कोणत्याही प्रकारची मदत व सल्ला याबाबत देण्यात आला नसल्याने ते नाराज झाले होते. त्यातच पक्षीय स्तरावर शहरातील निर्णयात देखील त्यांना डावलले जात असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. पदाधिकाऱ्यांकडून डावलले जात असल्याचा ठपका ठेवत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला जय महाराष्ट्र केला. मात्र त्यांनी यावेळी आपण राजकारण सोडणार नसून 90 टक्के समाजकारण व 10 राजकारण करणार असल्याचे स्पष्ट केले. यावेळी त्यांनी कोणत्या पक्षात प्रवेश करणार हे स्पष्टपणे सांगितले नसले तरी ते शिवसेनेत जाणार असल्याची चर्चा ऐकावयास मिळत आहे. आज शनिवारी दुपारी ते तालुक्यातील एक मोठ्या पक्षात प्रवेश करणार असल्याचे बोलले जात आहे. या पत्रकार परिषदेवेळी त्या ठिकाणी असणारी कार्यकर्त्यांची उपस्थिती यावर शिक्का मोर्तब करते.

*आमच्या TIMES MARATHI NEWS च्या अपडेट तुमच्या Whatsapp वर मिळवण्यासाठी आम्हाला जाॅईन व्हा किंवा 8390380101 या क्रमांकावर HI मेसेज करा*
https://chat.whatsapp.com/H0byh80Nekn2VHl0oUz2tN
https://t.me/joinchat/wy0fp8dr-ts4Mjll
https://wordpress.com/notifications
https://profile.dailyhunt.in/timesmarathinews
https://chat.whatsapp.com/H0byh80Nekn2VHl0oUz2tN

उद्योजकांनी उलगडली उद्योमागची दृष्टी, जेसीआय दापोली चा अभिनव उपक्रम संपन्नजेसीआय दापोली चा अभिनव उपक्रम संपन्न

जेसीआय दापोलीच्या वतीने सभासदांसाठी व्यवसाय सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेसाठी मँगो इन जालगावचे उद्योजक ययाती बापट हे प्रमुख पाहुणे म्हणून व्यासपीठावर उपस्थित होते. या सभेमध्ये जेसीआय दापोलीच्या सभासदांनी स्वतःच्या व्यवसायाची माहिती द्रुकमाध्यम व चित्रफितीद्वारे संवाद स्वरूपामध्ये सादर केली.

कोकणामध्ये जैव विविधता मोठ्या प्रमाणामध्ये आढळते, इथले निसर्गसौंदर्य, स्वच्छ समुद्रकिनारे, हे इथल्या पर्यटनाचे मुख्य घटक आहेत.  कोकणामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये फळबागा देखील उपलब्ध आहेत, यावर आधारित अनेक उद्योग उभारले जाऊ शकतात. कृषिपर्यटन, फळप्रक्रिया उद्योग, ग्रामीण पर्यटन, संस्कृती पर्यटन, साहसी पर्यटन इत्यादी उद्योगांकडे तरुणांनी सकारात्मक दृष्टीकोणातून पाहणे आवश्यक आहे असे मत बापट यांनी व्यक्त केले. कोरोना काळामध्ये व्यवसायावर झालेले परिणाम व पुनर्वउभारणीसाठी  व्यवसायाचे स्त्रोत निर्माण मोठ्या संख्येने निर्माण व्हावेत याकरिता या विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळेस एकूण वीस सभासदांनी उपस्थिती दर्शवत सादरीकरण केले, या अभिनव उपक्रमासाठी जेसीआय दापोलीचे अध्यक्ष जेसी कुणाल मंडलिक, जेसी. समीर कदम, सचिव जेसी.अतुल गोंदकर कार्यक्रम समन्वयक खुलेश जैन, जेसी मयुरेश शेठ, जेसी प्रसाद दाभोळे व जेसी ऋत्विक बापट यांनी विशेष मेहनत घेतली.

*आमच्या TIMES MARATHI NEWS च्या अपडेट तुमच्या Whatsapp वर मिळवण्यासाठी आम्हाला जाॅईन व्हा किंवा 8390380101 या क्रमांकावर HI मेसेज करा*
https://chat.whatsapp.com/H0byh80Nekn2VHl0oUz2tN
https://t.me/joinchat/wy0fp8dr-ts4Mjll
https://wordpress.com/notifications
https://profile.dailyhunt.in/timesmarathinews
https://chat.whatsapp.com/H0byh80Nekn2VHl0oUz2tN

बदली न झाल्यास आत्मदहणाचा इशारा देणारा पोलीस कर्मचारी बेपत्ता

राज्यात नुकत्याच झालेल्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या बदल्याबाबत मोठ्या प्रमाणात नाराजीचा सूर आहे. जालना जिल्हयातील घनसावंगी पोलीस स्थानकात पोलीस हवालदार म्हणून कार्यरत असलेले गोविंद कुलकर्णी हे बेपत्ता आहेत. गोविंद कुलकर्णी यांनी काही दिवसांपूर्वी पोलीस अधीक्षक विनायक देशमुख यांची भेट घेत विनंती बदलीचा अर्ज केला होता. त्यांनी अर्ज केल्यानंतर आतापर्यंत दोन तीन बदल्यांच्या याद्या निघाल्या. मात्र त्यांची काही बदली झाली नाही यामुळे ते नाराज होते. यामुळे त्यांनी एक व्हाट्स अप ग्रुपवर स्वतःचा विडिओ पाठवला होता. त्यामध्ये त्यांनी माझी सायंकाळ पर्यंत बदली झाली नाही तर मी अज्ञात ठिकाणी जाऊन आत्महत्या करण्याचा इशारा दिला होता. त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. मात्र त्यांच्या या इशाऱ्याची दखल घेतली गेल्याचे दिसून आले नाही. संध्याकाळ पासून पोलीस हवालदार गोविंद कुलकर्णी हे बेपत्ता असल्याने संपूर्ण पोलीस विभागात खळबळ उडाली आहे.

*आमच्या TIMES MARATHI NEWS च्या अपडेट तुमच्या Whatsapp वर मिळवण्यासाठी आम्हाला जाॅईन व्हा किंवा 8390380101 या क्रमांकावर HI मेसेज करा*
https://chat.whatsapp.com/H0byh80Nekn2VHl0oUz2tN
https://t.me/joinchat/wy0fp8dr-ts4Mjll
https://wordpress.com/notifications
https://profile.dailyhunt.in/timesmarathinews
https://chat.whatsapp.com/H0byh80Nekn2VHl0oUz2tN

भाजपच्या महिला सरपंचाला मारहाण

पुणे जिल्ह्यातील लोणी काळभोर येथील कदमवाक वस्ती गावच्या लोकनिर्वाचित सरपंच गौरी गायकवाड यांना एक इसमाने मारहाण केल्याचा प्रकार उघड झाला. या मारहाणीचा विडिओ भाजप प्रदेश उपाध्यक्षा चित्र वाघ यांनी हा प्रकार समोर आला आहे. गौरी गायकवाड ह्या परिवर्तन फौंडेशनच्या उपाध्यक्षा आहेत. तसेच नारी शक्ती फौंडेशनच्या त्या अध्यक्षा आहेत. या विडिओ मध्ये एक पुरुष इसम सरपंच गौरी गायकवाड यांना अमानुष मारहाण करत असल्याचे दिसत आहे. यावेळी काही महिलांनी त्यांना या इसमाच्या तावडीतून त्यांना सोडवले. ही मारहाण नेमकी कधी झाली आणि मारहाण करणार इसम नेमका कोण आहे हे अद्याप स्पष्ट झाले नाही.

*आमच्या TIMES MARATHI NEWS च्या अपडेट तुमच्या Whatsapp वर मिळवण्यासाठी आम्हाला जाॅईन व्हा किंवा 8390380101 या क्रमांकावर HI मेसेज करा*
https://chat.whatsapp.com/H0byh80Nekn2VHl0oUz2tN
https://t.me/joinchat/wy0fp8dr-ts4Mjll
https://wordpress.com/notifications
https://profile.dailyhunt.in/timesmarathinews
https://chat.whatsapp.com/H0byh80Nekn2VHl0oUz2tN

आंबा उत्पादकांना मिळणार दिलासा

रत्नागिरी जिल्ह्यातील आंबा उत्पादक शेतकर्यांच्या अडचणी आता शासन दरबारी पोहचल्या असून त्याची दखल शासनाकडून घेण्यात आल्याचे पहावयास मिळत आहे. आज राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. यावेळी कृषिमंत्री दादाजी भुसे, सिंधुदुर्गचे पालकमंत्री उदय सामंत उपस्थित होते. अवकाळी पावसामुळे आंब्याचे अतोनात नुकसान झाले आहे. जिल्ह्यातील आंबा उत्पादकांना दिलासा देण्यासाठी सकारात्मक मार्ग काढण्याचे आश्वासन राज्याचे मुखमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले.

*आमच्या TIMES MARATHI NEWS च्या अपडेट तुमच्या Whatsapp वर मिळवण्यासाठी आम्हाला जाॅईन व्हा किंवा 8390380101 या क्रमांकावर HI मेसेज करा*
https://chat.whatsapp.com/H0byh80Nekn2VHl0oUz2tN
https://t.me/joinchat/wy0fp8dr-ts4Mjll
https://wordpress.com/notifications
https://profile.dailyhunt.in/timesmarathinews
https://chat.whatsapp.com/H0byh80Nekn2VHl0oUz2tN

एस टी कर्मचाऱ्यांचे पगार होणार, 500 कोटींचा निधी तातडीने वितरित- अजित पवार

गेल्या दोन महिन्यांपासून थकीत असलेले वेतन एस टी कर्मचाऱ्यांना मिळणार आहे. यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी 500 कोटी चा निधी देण्याचा निर्देशानंतर तातडीने हा निधी वितरीत करण्यात आला. यामुळे एस टी कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे. आर्थिक तणावामुळे व तुटपुंज्या पगारामुळे एस टी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्याच्या घटना घडल्या होत्या.

*आमच्या TIMES MARATHI NEWS च्या अपडेट तुमच्या Whatsapp वर मिळवण्यासाठी आम्हाला जाॅईन व्हा किंवा 8390380101 या क्रमांकावर HI मेसेज करा*
https://chat.whatsapp.com/H0byh80Nekn2VHl0oUz2tN
https://t.me/joinchat/wy0fp8dr-ts4Mjll
https://wordpress.com/notifications
https://profile.dailyhunt.in/timesmarathinews
https://chat.whatsapp.com/H0byh80Nekn2VHl0oUz2tN

रायगडमध्ये लसीकरणासाठी रात्रीची गर्दी, रात्री पासून नंबर, पहाटे येताहेत लसीचे नंबर

राज्यात सर्वत्र राज्य सरकार व आरोग्य विभाग लसीकरणावर जोर देत आहे. यासाठी सर्वत्र आवश्यक त्या प्रमाणात लस उपलब्ध करून दिली जात आहे. मात्र रायगड जिल्ह्यातील सुधागड पाली येथे रात्रीच लसीकरणासाठी रांग व नंबर लावले जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर येत आहे. काही जणांनी तर स्वतः पहाटे 4 वाजता लस घेतल्याचे सांगितले आहे. यामुळे रायगड जिल्हा प्रशासन व आरोग्य विभाग नेमके करते तरी काय हा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे.

रायगड जिल्ह्यातील कोरोना प्रतिबंधात्मक नियम आता कुठे शिथिल होत आहेत. दुसरी लाट आटोक्यात येत आहे. अजूनही कोरोनवर ठोस अशी उपाय योजना नसल्याने केवळ लस हाच एक पर्याय आता सर्वांसमोर राहिला आहे. यामुळे सध्या सर्वत्र नागरिक लसीकरणासाठी गर्दी करत असताना पहावयास मिळत आहेत. राज्य सरकार ही सध्या लसीकरणावर जोर देत असल्याचे सर्वत्र पहावयास मिळत आहे. मात्र या मोफत लसीकरणाचा फायदा स्थानिक पातळीवरील नेते आपला राजकीय स्वार्थ साधण्यासाठी करताना पहावयास मिळत आहे. आपल्या मर्जीतील लोकांना लस कशी उपलब्ध करून देता येईल याचा प्रयत्न करताना पहावयास मिळत आहेत. आपल्या मतदार संघातील प्रभागातील लोकांना डायरेक्ट लसीकरण केंद्रात घुसवून लस उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करताना राज्यात बऱ्याच ठिकाणी दिसून येत आहेत.

हा फ़ोटो 26 ऑगस्ट 2021 चा असून वरील प्रथमिक आरोग्य केंद्राबाहेर लावलेला बोर्ड आज ही केंद्रावर रात्रीची गर्दी होते हे सिद्ध करण्यास पुरेसा आहे.

असाच काहीसा प्रकार रायगड जिल्ह्यातील सुधागड पाली येथे दिसून येत आहे. या ठिकाणी नागरिक रात्रीच्या वेळेस लसीकरण केंद्रावर जमून नंबर लावत आहेत. एक व्यक्ती येऊन 6 ते 7 जणांचे नंबर लावून जात आहेत. तर काही जण या लसीकरण केंद्राबाहेरच मुक्कामी थांबत आहेत. यात कळस म्हणजे पाली प्राथमिक आरोग्य केंद्रा बाहेर रात्रीची लिस्ट ग्राह्य धरली जाणार नाही असा फलकच उभारण्यात आला आहे. टोकन वाटप सकाळी 9 वाजता करण्यात येणार असल्याचे त्यांनी या फलकात नमूद केले आहे. मात्र रात्री नोंद करण्यासाठी नागरिकांना रजिस्टर कोठून मिळते. त्यांची नोंद रात्री कोण करून घेते असे एक ना अनेक प्रश्न सध्या सुधागड तालुक्यातील जनतेसमोर उभे आहेत. याच तालुक्यातील एक हेल्थ वर्करने आपण स्वतः पहाटे 4 वाजता लस घेतल्याचे सांगितले आहे. यामुळे सुधागड पाली येथे रात्रीचे पण लसीकरण सुरू असते का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. तालुका आरोग्य अधिकारी, तहसीलदार यांच्या ढिसाळ नियोजनाचा नाहक त्रास सध्या सुधागड तालुक्यातील जनतेला सहन करावा लागत आहे. रात्री 9 वाजल्यापासून त्या ठिकाणी नागरिक झोपायलाच येतात. तर काही नागरिक डोंगर पड्यातून या ठिकाणी लस घेण्यासाठी येतात. रात्री अपरात्री येताना त्यांचा अपघात झाल्यास त्याची जबाबदारी कोण घेणार असा प्रश्न सध्या उपस्थित होत आहे. यामुळेच जिल्ह्याच्या पालकमंत्री अदिती तटकरे, राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन प्रशासनाला योग्य त्या सूचना देण्याची गरज असल्याचे नागरिकांमधून बोलले जात आहे. तसेच रात्रीच्या वेळेस शासकीय रजिस्टर बाहेर आणून त्या मध्ये नोंद करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे. तसेच या लसीकरण कार्यक्रमात होणार राजकीय हस्तक्षेप व वशीलेबाजना आळा घालण्याची गरज असल्याचे मत सर्वसमन्यातून व्यक्त करण्यात येत आहे.

*आमच्या TIMES MARATHI NEWS च्या अपडेट तुमच्या Whatsapp वर मिळवण्यासाठी आम्हाला जाॅईन व्हा किंवा 8390380101 या क्रमांकावर HI मेसेज करा*
https://chat.whatsapp.com/H0byh80Nekn2VHl0oUz2tN
https://t.me/joinchat/wy0fp8dr-ts4Mjll
https://wordpress.com/notifications
https://profile.dailyhunt.in/timesmarathinews
https://chat.whatsapp.com/H0byh80Nekn2VHl0oUz2tN

सावर्डेत येणार खैराचा ट्रक पकडला

मुंबई गोवा महामार्गावरील कोलाड सुपर मार्केट येथे खैराची वाहतूक करणारा ट्रक वनविभागाने सापळा रचून पकडला. हा ट्रक भिवंडी येथून चिपळून सावर्डे येथे निघाला होता.

या बाबत मिळालेल्या महितीनुसार भिवंडी पडघा येथून ट्रक क्र. जि जे 15 ए टी 7851 हा अवैद्य रित्या खैर भरून चिपळूण सावर्डे कडे जाणार असलयाची माहिती दक्षिण रायगड भरारी पथकाला मिळाली होती. या नुसार त्यांनी सापळा रचून कोलाड येथील सुपर मार्केट जवळ बुधवार दि. 1 सप्टेंबर रोजी दुपारी 12 वाजता हा ट्रक पकडून कारवाई केली. ही कारवाई दक्षिण रायगड भरारी पथक प्रमुख इशांत कांबळी, अजिंक्य कदम, प्रविण शिंदे, किशोर पाटील व कोलाड वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी सापळा रचून केली. यावेळी ट्रक चालक निजामुद्दीन याला ताब्यात घेतले असून अधिक तपास कोलाड वनविभागाचे अधिकारी करीत आहेत.

*आमच्या TIMES MARATHI NEWS च्या अपडेट तुमच्या Whatsapp वर मिळवण्यासाठी आम्हाला जाॅईन व्हा किंवा 8390380101 या क्रमांकावर HI मेसेज करा*
https://chat.whatsapp.com/H0byh80Nekn2VHl0oUz2tN
https://t.me/joinchat/wy0fp8dr-ts4Mjll
https://wordpress.com/notifications
https://profile.dailyhunt.in/timesmarathinews
https://chat.whatsapp.com/H0byh80Nekn2VHl0oUz2tN

कौन बनेगा करोडपती मध्ये 7 कोटी साठी विचारला हा प्रश्न

सर्व सामान्यांना कोट्याधीश बनण्याचे स्वप्न कौन बानेग करोडपती या टी व्ही शो ने पूर्ण केले. या शोचे स्टार नायक अमिताभ बच्चन यांच्या मुळे त्याची प्रसिद्धी शिखरावर पोहचली. सध्या या कार्यक्रमाचा 13 वा पर्व सुरू असून या पार्वतला पहिला करोडपती या मंगळवार 31 ऑगस्ट रोजी हिमानी बुंदेला याच्या रूपाने या कार्यक्रमाला मिळाला. हिमानी बुंदेला या अंध असून त्या 7 कोटींच्या प्रश्ना पर्यंत पोहोचल्या होत्या.

हिमानी बुंदेला या मंगळवार 31 ऑगस्ट रोजी कौन बनेगा करोडपती या कार्यक्रमात रोलओव्हर स्पर्धक म्हणून हॉट सीटवर बसल्या होत्या. यावेळी त्यांनी मोठ्या आत्मविश्वासाने एकामागोमाग एक आशा 15 प्रश्नांची उत्तरे देऊन 1 कोटींचे बक्षिसापर्यंत त्या पोहचल्या. आता वेळ होती अमिताभ बच्चन यांनी 7 कोटी के आपका आगला सवाल बोलण्याची. मात्र या स्पर्धेच्या नियमानुसार या प्रश्नाला त्यांना कोणतीच लाइफ लाइन वापरता येणार न्हवती. यामुळे हिमानी बुंदेला यांनी KBC चा 16 व्या प्रश्नाचे उत्तर देण्याऐवजी माघार घेणे पसंद केले. माघार घेतल्यानंतर त्यांनी त्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा प्रयत्न केला. मात्र ते उत्तर चुकीचे होते. त्यांनी समजूतदारपणे माघार घेतली म्हणून त्यांना 1 कोटींचे बक्षीस मिळाले नाहीतर त्यांना ते पण गमवावे लागले असते. मूळच्या आग्रा येथील हिमानी बुंदेला या जन्मापासून अंध नसून 2011 साली एक अपघातात त्यांना दृष्टी गमवावी लागल्याचे समजते.

2021 च्या 13 पर्वात हिमानी बुंदेला या 7 कोटी रुपयांसाठी विचारण्यात आलेला 16 व प्रश्न पुढील प्रमाणे – डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी 1923 मध्ये लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मधून डॉक्टरेट मिळवली होती. त्या वेळी त्यांनी सादर केलेल्या प्रबंधाचं शीर्षक काय होते? A. द वांट्स अँड मिन्स ऑफ इंडिया B. द प्रॉब्लेम ऑफ द रुपी C. नॅशनल डिविडंड ऑफ इंडिया D. द लाँ अँड लाँयर्स या प्रश्नाचे बरोबर उत्तर हे “B” द प्रॉब्लेम ऑफ द रुपी हे होते.

*आमच्या TIMES MARATHI NEWS च्या अपडेट तुमच्या Whatsapp वर मिळवण्यासाठी आम्हाला जाॅईन व्हा किंवा 8390380101 या क्रमांकावर HI मेसेज करा*
https://chat.whatsapp.com/H0byh80Nekn2VHl0oUz2tN
https://t.me/joinchat/wy0fp8dr-ts4Mjll
https://wordpress.com/notifications
https://profile.dailyhunt.in/timesmarathinews
https://chat.whatsapp.com/H0byh80Nekn2VHl0oUz2tN

कल्पिता पिंपळेंची राज ठाकरे यांनी घेतली घेतली भेट

ठाणे महानगर पालिकेच्या सहाय्यक आयुक्ता कल्पिता पिंपळेंची मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ठाणे येथील ज्युपिटर रुग्णालयात जाऊन भेट घेतली. त्यांच्या तब्येतीची विचारपूस करत काळजी घ्या असे ही त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी मनसे पक्षाकडून त्या फेरीवल्यावर योग्य ती कारवाई केली जाईल असे आश्वासन ही त्यांनी दिले. यावेळी पोलीस उपयुक्तांशी चर्चा करून सर्व प्रकारची माहिती घेतली. तसे पोलीस ही त्या फेरीवाल्यावर पोलीस योग्य ती कारवाई करतील अशी अपेक्षा ही त्यांनी व्यक्त केली.

*आमच्या TIMES MARATHI NEWS च्या अपडेट तुमच्या Whatsapp वर मिळवण्यासाठी आम्हाला जाॅईन व्हा किंवा 8390380101 या क्रमांकावर HI मेसेज करा*
https://chat.whatsapp.com/H0byh80Nekn2VHl0oUz2tN
https://t.me/joinchat/wy0fp8dr-ts4Mjll
https://wordpress.com/notifications
https://profile.dailyhunt.in/timesmarathinews
https://chat.whatsapp.com/H0byh80Nekn2VHl0oUz2tN

आमदार नितेश राणेंचा ठाकरे सरकारवर प्रहार

जगभरातील निवडक प्रसिद्धी माध्यमांच्या अपप्रचारास चोख प्रत्युत्तर देत देशातील तब्बल ६५ कोटी १५ लाख लोकसंख्येच्या लसीकरणाचा विक्रमी टप्पा गाठणाऱ्या मोदी सरकारच्या महत्वाकांक्षी लसीकरणात महाराष्ट्र मात्र अजूनही रेंगाळलेलाच आहे. लस मिळविण्याकरिता राज्यातील जनतेची केविलवाणी धडपड सुरू आहे. संपूर्ण देशाच्या तुलनेत आठव्या क्रमांकावर असूनही लसीकरणाबाबत स्वतःची पाठ थोपटून घेणाऱ्या ठाकरे सरकारने लसीकरणाचा निश्चित कालबद्ध कार्यक्रम आखून कोरोना रोखण्याच्या केंद्राच्या यशाचा कित्ता गिरवावा अशी मागणी भाजपचे आमदार श्री. राणे यांनी बुधवारी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे.

भारतासारख्या गरीब देशात ऑगस्टपूर्वी ६० कोटी लसीकरणाचा टप्पा गाठला जाणार नाही, असा अपप्रचार काही आंतरराष्ट्रीय वाहिन्यांवरून सुरू होता. मात्र, ३१ ऑगस्ट रोजी तब्बल ६५ कोटी १२ लाख लोकांचे लसीकरण पूर्ण करून मोदी सरकारने या अपप्रचारास चोख चपराक लगावली आहे. याच वेगाने राज्यांनीदेखील लसीकरण करावे व निश्चित धोरण आखून राज्यातील सर्व नागरिकांना वेळेवर लस उपलब्ध करून द्यावी. याकरिता लशीच्या मात्रांचे नियोजनबद्ध वाटपही केंद्र सरकारने केले असून महाराष्ट्रास गरजेहून अधिक मात्रा उपलब्ध झाल्याचे केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे. ऑगस्ट महिन्यात महाराष्ट्रास ८६ लाख ७४ हजार लस मात्रा वितरित करण्यात येणार होत्या, त्याऐवजी प्रत्यक्षात ९१.८१ लाख म्हणजे पाच लाखांहून अधिक मात्रा पुरविण्यात आल्याचे केंद्र सरकारने म्हटले आहे. असे असतानाही, राज्याच्या अनेक लसीकरण केंद्रांवरून आजही नागरिकांना हात हलवत परतावे लागत आहे. तर अनेक केंद्रांवर लस नसल्याचे कारण देत ऐनवेळी लसीकरण थांबविले जात आहे. ठाकरे सरकारकडे लसीकरणाचा नेमका कार्यक्रम नाही आणि मोफत व सशुल्क लसीकरण वाटपाचे धोरणही नाही त्यामुळे जनतेचे हाल सुरूच आहेत, असा आरोप आमदार राणे यांनी या प्रसिद्धी पत्रकाद्वारे केला आहे.

केवळ कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची भीती दाखवून जनतेस घराबाहेर पडण्यापासून रोखणे एवढा एककलमी कार्यक्रम ठाकरे सरकार राबवत असल्याने महाराष्ट्र पुन्हा बेरोजगारी, मंदी आणि नैराश्याच्या सावटात ढकलला जात आहे. त्यातच, मोफत लसीकरण केंद्रांवर लस नाही आणि खाजगी केंद्रावर सशुल्क लसीकरण मात्र उपलब्ध असल्याने लसीकरणाच्या मोहिमेविषयी संशय व्यक्त होत असून सामान्य नागरिकांना मोफत लस उपलब्ध करून देण्यात राज्य सरकार जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोपही श्री. राणे यांनी केला.
कोरोनासंबंधात केंद्र सरकारच्या सूचनांचा पाढा वाचत स्वतःचा केविलवाणा बचाव करण्याकरिता राज्याचे दैनंदिन जनजीवन थांबवून लसीकरण मोहिमेतील सरकारी ढिसाळपणावर पांघरूण घालण्याचा ठाकरे सरकारचा प्रयत्न आहे. लसीकरणाचे धोरणच नसल्यामुळेच महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यांत कोरोनाचा संसर्ग वाढताना दिसत असून कोरोना रोखण्याच्या राष्ट्रीय मोहिमेस पुन्हा महाराष्ट्रातून खीळ बसले, अशी भीती त्यांनी या पत्रकाद्वारे व्यक्त केली आहे. देशात महत्वाकांक्षी लसीकरणाचा विक्रमी टप्पा पूर्ण करून जगासमोर आदर्श उभा केल्याबद्दल श्री.राणे  यांनी या प्रसिद्धी पत्रकाद्वारे पंतप्रधान मोदी यांचे अभिनंदन केले आहे.

*आमच्या TIMES MARATHI NEWS च्या अपडेट तुमच्या Whatsapp वर मिळवण्यासाठी आम्हाला जाॅईन व्हा किंवा 8390380101 या क्रमांकावर HI मेसेज करा*
https://chat.whatsapp.com/H0byh80Nekn2VHl0oUz2tN
https://t.me/joinchat/wy0fp8dr-ts4Mjll
https://wordpress.com/notifications
https://profile.dailyhunt.in/timesmarathinews
https://chat.whatsapp.com/H0byh80Nekn2VHl0oUz2tN

सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाणांच्या घरावर दगडफेक

राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्या नांदेड येथील घरावर दगडफेक झाल्याचा प्रकार घडला आहे. बुधवारी सकाळच्या सुमारास एक अज्ञात महिलेने ही दगडफेक केल्याचे समजते. या दगडफेकीत अशोक चव्हाण यांच्या घराबाहेरील सुरक्षा रक्षकांच्या केबिनची काच फुटली आहे. या दगडफेकीत कोणालाही दुखापत झाली नसून सी सी टी व्ही फुटेजच्या आधारे पोलीस या महिलेचा शोध घेत आहे.

*आमच्या TIMES MARATHI NEWS च्या अपडेट तुमच्या Whatsapp वर मिळवण्यासाठी आम्हाला जाॅईन व्हा किंवा 8390380101 या क्रमांकावर HI मेसेज करा*
https://chat.whatsapp.com/H0byh80Nekn2VHl0oUz2tN
https://t.me/joinchat/wy0fp8dr-ts4Mjll
https://wordpress.com/notifications
https://profile.dailyhunt.in/timesmarathinews
https://chat.whatsapp.com/H0byh80Nekn2VHl0oUz2tN

कारची ट्रकला धडक, चालक जागीच ठार

मुंबई गोवा महामार्गावरील रायगड जिल्ह्यातील पेन बायपास येथील गणपतवाडी येथे कारची ट्रकला धडक बसून अपघात झाला. या अपघातात कार चालकाचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात मंगळवारी सायंकाळी 5 च्या सुमारास झाला. महामार्गाच्या अर्धवट कामामुळे हा अपघात झाल्याचा ग्रामस्थानकडून बोलले जात आहे. या अपघातानंतर संतप्त ग्रामस्थांनी रास्ता रोको केल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

*आमच्या TIMES MARATHI NEWS च्या अपडेट तुमच्या Whatsapp वर मिळवण्यासाठी आम्हाला जाॅईन व्हा किंवा 8390380101 या क्रमांकावर HI मेसेज करा*
https://chat.whatsapp.com/H0byh80Nekn2VHl0oUz2tN
https://t.me/joinchat/wy0fp8dr-ts4Mjll
https://wordpress.com/notifications
https://profile.dailyhunt.in/timesmarathinews
https://chat.whatsapp.com/H0byh80Nekn2VHl0oUz2tN

रत्नागिरी भिवंडी बस चालकांवर गुन्हा दाखल

मुंबई गोवा महामार्गावरील कशेडी घाटात 30 ऑगस्ट रोजी रत्नागिरी भिवंडी एस टी बस व डंपर यांच्यात धडक होवून अपघात झाला. आपल्या ताब्यातील बस क्र. एम एच 20 बी झेड 2459 ही घेवून चालक खुशाल यशवंत सूर्यवंशी (नाशिक) भिवंडी ते रत्नागिरी असे जात होते. यावेळी लोटे येथून महाडकडे जाणाऱ्या डंपरला कशेडी घाटात धडक दिल्याने अपघात झाला. या प्रकरणी एस टी बस चालक खुशाल सूर्यवंशी विरोधात अपघातास कारणीभूत ठरल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या अपघातात 21 प्रवाशी जखमी झाले होते. यामध्ये 5 जण गंभीर तर 16 जण किरकोळ जखमी झाले होते.

*आमच्या TIMES MARATHI NEWS च्या अपडेट तुमच्या Whatsapp वर मिळवण्यासाठी आम्हाला जाॅईन व्हा किंवा 8390380101 या क्रमांकावर HI मेसेज करा*
https://chat.whatsapp.com/H0byh80Nekn2VHl0oUz2tN
https://t.me/joinchat/wy0fp8dr-ts4Mjll
https://wordpress.com/notifications
https://profile.dailyhunt.in/timesmarathinews
https://chat.whatsapp.com/H0byh80Nekn2VHl0oUz2tN

कार्यालयावरील हल्याप्रकरणी खेड भाजपा ची पाहिली प्रतिक्रिया, भाजपाचे कार्यकर्ते आक्रमक

खेड भाजप कार्यालयावर युवासेनेचा हल्ला, 3 जणांनी केला हल्ला, कार्यालयाबाहेरील पोस्टर फाडले, युवासेना जिल्हाधिकारी अजिंक्य मोरेंसह अन्य दोघांनी फाडले बॅनर, महिला कर्मचाऱ्यावर केली दादागिरी