ऐन गणेशोत्सवात दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने व उत्तरप्रदेश एटीएसने केलेल्या संयुक्त कारवाईत 6 दहशतवाद्यांना अटक करण्यात आली. यातील पहिला दहशतवादी महाराष्ट्रातून तर उर्वरीत 5 जणांना दिल्ली व उत्तरप्रदेश मधून अटक करण्यात आली. याबाबत स्पेशल सेलचे सीपी नीरज ठाकूर यांनी पत्रकार परिषद घेऊन या कारवाई बाबत माहिती दिली.

स्पेशल सेलने अटक केलेल्या 6 दहशतवाद्यांना अंडरवर्ल्डचा संबंध आहे. यातील दोघांनी पाकिस्तानात ट्रेनिंग घेतल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. यातील पहिली अटक ही महाराष्ट्रातून करण्यात आली होती. त्यानंतर मिळालेल्या माहितीनुसार 2 जण दिल्ली तर 3 जण उत्तरप्रदेश मधील असून त्यांना अटक करण्यात आली. या कारवाई दरम्यान स्पेशल सेलनी स्फोटके व शास्त्रात्रे जप्त केली आहेत. या 6 जणांना अंडरवर्ल्ड मधून हवाला मार्फत पैसा पुरवण्यात येत असल्याचे तपासात उघड झाल्याचे सीपी नीरज ठाकूर यांनी सांगितले. प्रयागराज येथील करेली भागात छापा टाकून ही कारवाई केली. गेल्या एक महिण्यापासून हे ऑपरेशन सुरू होते. दिल्ली, यूपी आणि महाराष्ट्रात फिरुन त्यांनी रेकी केली होती. स्लीपर सेलच्या माध्यमातून यांच्या दहशतवादी कारवाया सुरू होत्या. देशातील वेगवेगळ्या भागात त्यांचा घातपात घडवण्याचा प्रयत्न होता. या सर्वांनी मोठा कट सुद्धा रचल्याचे समोर येत आहे.
*आमच्या TIMES MARATHI NEWS च्या अपडेट तुमच्या Whatsapp वर मिळवण्यासाठी आम्हाला जाॅईन व्हा किंवा 8390380101 या क्रमांकावर HI मेसेज करा*
https://chat.whatsapp.com/H0byh80Nekn2VHl0oUz2tN
https://t.me/joinchat/wy0fp8dr-ts4Mjll
https://wordpress.com/notifications
https://profile.dailyhunt.in/timesmarathinews
https://chat.whatsapp.com/H0byh80Nekn2VHl0oUz2tN