
अमरावती जिल्ह्यातील श्री क्षेत्र झुंज येथील वर्धा नदीत नाव उलटून 11 जणांना जलसमाधी मिळाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. 14 सप्टेंबर रोजी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली. यामध्ये आता पर्यंत 3 जणांचे मृतदेह हाती लागले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार 13 सप्टेंबर रोजी एकाच कुटुंबातील 11 जण गडेगाव येथे दशक्रिया विधीसाठी गेले होते. कालचा दशक्रिया विधी आटपून ते सर्वजण आज सकाळी वरुड येथे फिरायला जाण्यास निघाले होते. मात्र वर्धा नदीतून नावेने जात असताना त्यांची नाव अचानक उलटली. यामुळे नावेत स्वार असणाऱ्या 11 जणांना जलसमाधी मिळाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. या ठिकाणी शोध कार्य सुरू असून आतापर्यंत 3 जणांचे मृतदेह हाती लागले असून उर्वरित 8 जणांचा शोध सुरू आहे.
*आमच्या TIMES MARATHI NEWS च्या अपडेट तुमच्या Whatsapp वर मिळवण्यासाठी आम्हाला जाॅईन व्हा किंवा 8390380101 या क्रमांकावर HI मेसेज करा*
https://chat.whatsapp.com/H0byh80Nekn2VHl0oUz2tN
https://t.me/joinchat/wy0fp8dr-ts4Mjll
https://wordpress.com/notifications
https://profile.dailyhunt.in/timesmarathinews
https://chat.whatsapp.com/H0byh80Nekn2VHl0oUz2tN