6 दहशतवाद्यांचा मास्टर माईंड मुंबईत, कुटुंबियांना पोलिसांनी घेतले ताब्यात

दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने व उत्तरप्रदेश एटीएसने ताब्यात घेतलेल्या 6 दहशतवाद्यांचा मास्टर माईंड मुंबईतील असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्याच्या कुटुंबियांना मुंबई पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.

मुंबई येथील सायन परिसरात राहणाऱ्या जान मोहमद शेख उर्फ समीर कालिया उर्फ अली मोहमद शेख असे या दहशतवाद्यांचे नाव आहे. जान शेख हा मुख्य सूत्रधार असल्याचे पुढे येत आहे. तसेच हा जान शेख अंडरवर्ल्डच्या संपर्कात होता. त्यासह 2 पाकिस्तानी दहशतवाद्यांच्या देखील संपर्कात होता. त्यांना ही अटक करण्यात आली आहे. दहशतवादी कारवाया करण्यासाठी जान शेख हा तरुणांना पाकिस्तानात पाठवण्याचे काम करत होता. तसेच स्फोटक तस्करीची त्याला माहिती आहे. राजस्थान येथील कोटा येथून जान शेख हा दाऊद गँगचे काम पाहत होता. ऐन सणांच्या पार्श्वभूमीवर मुंबईत तर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर यूपीमध्ये स्फोट करण्याच्या तयारीत होते. मुंबईतून अटक केलेल्या जान शेखच्या कुटुंबियांना मुंबई पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले असून धरावी पोलीस स्थानकात त्यांना चौकशीसाठी नेल्याचे समजते.

*आमच्या TIMES MARATHI NEWS च्या अपडेट तुमच्या Whatsapp वर मिळवण्यासाठी आम्हाला जाॅईन व्हा किंवा 8390380101 या क्रमांकावर HI मेसेज करा*
https://chat.whatsapp.com/H0byh80Nekn2VHl0oUz2tN
https://t.me/joinchat/wy0fp8dr-ts4Mjll
https://wordpress.com/notifications
https://profile.dailyhunt.in/timesmarathinews
https://chat.whatsapp.com/H0byh80Nekn2VHl0oUz2tN

Leave a Comment