सर्व समान्यांना दिलासा नाही, पेट्रोल डिझेल जी एस टी च्या कक्षेत नाही

लखनऊ येथे आज 45 व्या जी एस टी कोन्सिलची बैठक झाली. या बैठकीत पेट्रोल डिझेल जी एस टीच्या कक्षेत घेण्याबाबत चर्चा केली जाणार होती. यासाठी प्रत्येक राज्यातील प्रतिनिधी उपस्थित होते. मात्र सर्वसामान्यांच्या अपेक्षा या बैठकीतही पुर्ण झाल्या नसून पेट्रोल डिझेल पुन्हा जी एस टीच्या कक्षेबाहेरच राहिले. यामुळे पेट्रोल डिझेलचे दर कमी होण्याची शक्यता आता राहिलीच नाही. पेट्रोल डिझेल दर कमी होवून सर्वसामान्यांना दिलासा मिळण्याची शक्यता आता राहिली नसून पुन्हा सर्वसामान्यांच्या पदरी निराशाच पडली आहे.

Leave a Comment