रामदास कदमांना शिवसेनेत किंमत नाही – नगराध्यक्ष वैभव खेडेकर

राज्याचे माजी पर्यावरण मंत्री रामदास कदम यांना शिवसेना पक्षात किंमत नाही. यामुळेच त्यांची रवानगी जामगे येथे केल्याचा आरोप खेडचे नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांनी केला आहे. शनिवारी सकाळी ते नगराध्यक्ष दालनात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

यावेळी त्यांनी रामदास कदम यांनी राज्यातील सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला. तसेच त्यांनी प्रसाद कर्वे नामक व्यक्ती कडून माहितीच्या अधिकारात महिती मागवून ती किरीट सोमय्या याना पुरवल्याचा गौफ्यस्फोट देखील केला. तसेच परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर देखील कारवाई करण्यासाठी प्रसाद कर्वे नामक व्यक्तीकडून महितीच्या अधिकारात महिती मागवून ती किरीट सोमय्यांना पुरवल्याचा आरोप केला आहे. प्रसाद कर्वे यांनी माहितीच्या अधिकाराचा नियमभंग केला असून कलम 11 चे उल्लंघन केले आहे.

*आमच्या TIMES MARATHI NEWS च्या अपडेट तुमच्या Whatsapp वर मिळवण्यासाठी आम्हाला जाॅईन व्हा किंवा 8390380101 या क्रमांकावर HI मेसेज करा*
https://chat.whatsapp.com/H0byh80Nekn2VHl0oUz2tN
https://t.me/joinchat/wy0fp8dr-ts4Mjll
https://wordpress.com/notifications
https://profile.dailyhunt.in/timesmarathinews
https://chat.whatsapp.com/H0byh80Nekn2VHl0oUz2tN

Leave a Comment