रत्नागिरी भिवंडी बस चालकांवर गुन्हा दाखल

मुंबई गोवा महामार्गावरील कशेडी घाटात 30 ऑगस्ट रोजी रत्नागिरी भिवंडी एस टी बस व डंपर यांच्यात धडक होवून अपघात झाला. आपल्या ताब्यातील बस क्र. एम एच 20 बी झेड 2459 ही घेवून चालक खुशाल यशवंत सूर्यवंशी (नाशिक) भिवंडी ते रत्नागिरी असे जात होते. यावेळी लोटे येथून महाडकडे जाणाऱ्या डंपरला कशेडी घाटात धडक दिल्याने अपघात झाला. या प्रकरणी एस टी बस चालक खुशाल सूर्यवंशी विरोधात अपघातास कारणीभूत ठरल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या अपघातात 21 प्रवाशी जखमी झाले होते. यामध्ये 5 जण गंभीर तर 16 जण किरकोळ जखमी झाले होते.

*आमच्या TIMES MARATHI NEWS च्या अपडेट तुमच्या Whatsapp वर मिळवण्यासाठी आम्हाला जाॅईन व्हा किंवा 8390380101 या क्रमांकावर HI मेसेज करा*
https://chat.whatsapp.com/H0byh80Nekn2VHl0oUz2tN
https://t.me/joinchat/wy0fp8dr-ts4Mjll
https://wordpress.com/notifications
https://profile.dailyhunt.in/timesmarathinews
https://chat.whatsapp.com/H0byh80Nekn2VHl0oUz2tN

Leave a Comment