राष्ट्रवादीच्या महिला सरपंचाला मारहाण

गेल्या काही दिवसांपूर्वी पुणे जिल्ह्यात भाजपच्या महिला सरपंचाला मारहाण झाल्याची घटना ताजी असतानाच परत एकदा आणखी एका महिला सरपंचाला मारहाण झाल्याची घटना समोर आली आहे. अहमदनगरच्या उक्कड गावात हा प्रकार झाल्याचे समोर आले आहे. ही मारहाण विरोधी पक्षातील लोकांनी केल्याचे उक्कड गावच्या सरपंचांनी सांगितले.

उक्कड गावच्या सरपंच राणी काथोरे यांना ही मारहाण करण्यात आली आहे. बुधवार 8 सप्टेंबर रोजी गावचा तंटामुक्ती अध्यक्षाची निवड करण्यावरून ही मारहाण झाल्याचे सरपंच राणी काथोरे यांनी सांगितले. यावेळी त्यांनी विरोधी पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून ही मारहाण झाल्याचे सांगितले. या प्रकारा बाबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी ट्विटर अकाउंट वरून हा व्हिडिओ शेअर करत या मारहाणी विरोधात आवाज उठवला आहे.

*आमच्या TIMES MARATHI NEWS च्या अपडेट तुमच्या Whatsapp वर मिळवण्यासाठी आम्हाला जाॅईन व्हा किंवा 8390380101 या क्रमांकावर HI मेसेज करा*
https://chat.whatsapp.com/H0byh80Nekn2VHl0oUz2tN
https://t.me/joinchat/wy0fp8dr-ts4Mjll
https://wordpress.com/notifications
https://profile.dailyhunt.in/timesmarathinews
https://chat.whatsapp.com/H0byh80Nekn2VHl0oUz2tN

Leave a Comment