अमेरिकेने अफगाणिस्थानला सोडले वाऱ्यावर, आम्ही आमचा बदला घेतला – जो बाईडन

अफगाणिस्थानातून अमेरिकन सैन्य परत फिरल्यानंतर तालिबानी आतंकवाद्यांनी कब्जा केला. यानंतर त्यांच्या भीतीने लाखो लोक अफगाणिस्थान सोडून इतरत्र पलायन करण्याचा प्रयत्न करत आहेत. आज अफगाण वर आलेल्या परिस्थितीला अमेरिका जबाबदार असल्याची टीका सर्वत्र होत होती. यावर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बाईडन यांनी मंगळवारी रात्री 2 वाजता जगा समोर येत आम्ही आमचा बदल घेतला. ओसामा बिन लादेन व त्याच्या साथीदारांना संपवले असे सांगत अफगाणिस्थानला वाऱ्यावर सोडले आहे.

अमेरिकेतील वर्ल्ड ट्रेड सेन्टरवर झालेल्या हल्ल्यानंतर अमेरिकेने अफगाणिस्थानात आपले सैन्य घुसवले होते. या ठिकाणी अमेरिकन सैन्याने अल कायदा नावाच्या अतेरेकी संघटनेचा म्होरक्या ओसामा बिन लादेन शोधून मारले होते. या देशातील सैन्यावर अमेरिकन सैन्याचे नियंत्रण होते. त्यांना घाबरून हे तालिबानी दहशतवादी बिळात लापुन बसले होते. तब्बल 20 वर्षे अमेरिकन सैन्याचे वास्तव्य अफगाणिस्थानात होते. 15 ऑगस्ट रोजी तालिबान्यांनी अफगाणिस्थानची राजधानी काबुल वर ताबा मिळवत अफगाणीस्थानची सत्ता ताब्यात घेतली. यामुळे सर्वत्र अमेरिकेवर टीकेची झोड उठली होती. या सर्वांवर उत्तर देण्यासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बाईडन यांनी आज सर्वांसमोर येत आतापर्यंत अमेरिकेने अफगाणिस्थानला सर्वोत्तपरी मदत केली. पण आता कायम स्वरूपी आम्ही आमचे सैनिक व पैसे त्यांच्यासाठी खर्च करू शकत नाही.

अफगाणिस्थानच्या सैन्याला आवश्यक ते सर्व प्रशिक्षण व हथ्यारे अमेरिकन सैन्याने दिले होते. दिले नाही ते फक्त इच्छाशक्ती. त्यांना त्यांच्या देशासाठी, लोकांसाठी काही करण्याची इच्छा नाही. अफगाणिस्थानला एअर फोर्सची पण ताकद अमेरिकेने दिली. तालिबानकडे एअर फोर्सची ताकदच न्हवती. 3 लाख संख्याबळ असलेले सैन्य केवळ 70 हजार तालिबान्यांसामोर हतबल झाला. त्यांचे राष्ट्राध्यक्ष तर न लढताच पळून गेले. ही लढाई त्यांची आहे. याचा सामना देखील त्यांनीच करावा. मी अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष आहे अफगाणिस्थांचा नाही. मी माझ्या राष्ट्राचा व सैन्याचा सर्व प्रथम विचार करेन. अफगाणिस्थांनसाठी अमेरिकन सैन्याला धोक्यात घालण्याची इच्छा नाही. तरीही आज काबुल एअर पोर्टवर अमेरिकेचे 6 हजार सैनिक तैनात आहेत. आजून 1000 सैनिकांची कुमक तेथे पाठवणार असल्याचे त्यांनी सांगितले. अफगाणिस्थांमध्ये अडकलेल्या हजारो अमेरिकन्सन सुरक्षित बाहेर काढल्यानंतरच तेथील सैन्य काढणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच 1000 हुन अधिक अफगाणी नागरीकाना अमेरिकेचा व्हिसा दिल्याचे ही त्यांनी यावेळी सांगितले. यामुळे आता अमेरिकेने सध्या तरी अफगाणिस्थानाची साथ सोडल्याचे दिसत आहे. येथील अफगाणी नागरिकांचे भविष्य आता या घुसखोर तालिबान्यांच्या हाती आहे.

*आमच्या TIMES MARATHI NEWS च्या अपडेट तुमच्या Whatsapp वर मिळवण्यासाठी आम्हाला जाॅईन व्हा किंवा 8390380101 या क्रमांकावर HI मेसेज करा*
https://chat.whatsapp.com/H0byh80Nekn2VHl0oUz2tN
https://t.me/joinchat/wy0fp8dr-ts4Mjll
https://wordpress.com/notifications
https://profile.dailyhunt.in/timesmarathinews
https://chat.whatsapp.com/H0byh80Nekn2VHl0oUz2tN

भारतीयांना केले एअरलिफ्ट, C-17 भारतात परतले

काबुल विमान तळावर अडकलेल्या 130 नागरिकांना भारतीय वायू दलाने एअरलिफ्ट केले असून वायू दलाचे C-17 हे विमान दिल्लीत परतले आहे.

अफगाणिस्थानवर तालिबानने कब्जा मिळवल्यांनंतर संपूर्ण जग हादरले होते. जगातील प्रत्येक देश आपल्या नागरिकांना ठेथुन सुरक्षित बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करत आहेत. अफगानच्या काबुलमध्ये अडकलेले सुमारे 130 नागरिक व दुतवासातील अधिकारी यांना सुरक्षित भारतात आणण्याचे आव्हान देशासमोर होते. या भयाण परिस्थितीत ही भारतीय वायू दलाने आपल्या नागरिकांना एअरलिफ्ट करत देशात परत आणले आहे. अमेरिकन सैन्याने काबुल एअर पोर्टचा ताब घेतल्यामुळे आपल्या भारतीय नागरिकांना C-17 या ग्लोबमास्टर या लढाऊ विमानाने देशात परत आणले.

*आमच्या TIMES MARATHI NEWS च्या अपडेट तुमच्या Whatsapp वर मिळवण्यासाठी आम्हाला जाॅईन व्हा किंवा 8390380101 या क्रमांकावर HI मेसेज करा*
https://chat.whatsapp.com/H0byh80Nekn2VHl0oUz2tN
https://t.me/joinchat/wy0fp8dr-ts4Mjll
https://wordpress.com/notifications
https://profile.dailyhunt.in/timesmarathinews
https://chat.whatsapp.com/H0byh80Nekn2VHl0oUz2tN

स्वातंत्र्यदिनी 3 ठिकाणी आत्मदहणाचा प्रयन्त, सर्वत्र खळबळ

अमृतमोहस्तवी वर्षात देश जात असताना आजही शेतकऱ्यांना आत्मदहन करावे लागते. कृषिप्रधान देशात या सारखी कोणतीच गंभीर बाब नाही. 75 व्या स्वातंत्र्य दिनाचा ध्वजारोहण सोहळा संपल्यानंतर जळगाव येथील एका शेतकऱ्याने मंत्रालयाच्या परिसरात आत्मदहणाचा प्रयन्त केला. तर सातारा जिल्ह्यातील कोरेगाव येथे जमीन हडपल्या प्रकरणी 7 जणांनी व तुळजापूर येथे मुलीच्या मृत्यू प्रकरणी तिच्या कुटुंबीयांनी आत्मदहणाचा प्रयत्न केला.

मुंबई

जळगाव येथील सुनील गुजर हे शेतकरी आहेत. सोयाबीन व मक्याच्या व्यवहारात अडचणी येत असल्याने त्यांनी आज आत्मदहणाचा प्रयत्न केला. या शेतकऱ्याचे घर ही गहाण आहे. यामुळेच त्यांनी आत्मदहणाचा मार्ग अवलंबला असल्याचे समजते. मात्र देशाला स्वातंत्र्य मिळून आज 74 वर्षे पूर्ण झालीत. आता 75 व्या अमृत मोहतस्तवी वर्षात पदार्पण करत असताना देशातील शेतकऱ्यांना आशा प्रकारे स्वतःचे जीवन संपवावे लागत आहे. ही खरोखरच विचार करण्याची गोष्ट आहे. कृषिप्रधान देशातच शेतकऱ्यांना स्वतःचे राहते घर गहाण ठेवावे लागते या सारखे दुर्देव नाही. आपल्या समस्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी शेतकऱ्यांना आत्मदहना सारख्या टोकाच्या पर्यायाचा अवलंब करावा लागतो. ही नक्कीच खेदाची बाब आहे. या प्रकारांनंतर मरीन ड्राईव्ह पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.

सातारा

सातारा जिल्ह्यात ही 7 जणांचा आत्मदहणाचा प्रयत्न

सातारा

कोरेगाव तालुक्यातील आसरे येथे जमीन बाळकावल्या प्रकरणी आज स्वातंत्र्यदिनी जिल्हाधिकारी कार्यलयासमोर 7 जणांनी आत्मदहणाचा प्रयत्न केला. 2018 साली गावतील एका प्रतिष्टीत व्यक्तीने ही जमीन हडपली आहे. प्रशासन याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप आत्मदहन कर्त्यांनी केला. या साथ ही आत्मदहन कर्त्याना सातारा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

सातारा

तुळजापुरात ही आत्मदहणाचा प्रयन्त

तुळजापूर

तुळजापूरच्या वेताळनगर परिसरात राहणाऱ्या 18 वर्षीय प्रतीक्षा पुनकेर यांचा उपचारा दरम्यान डॉक्टरच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाइकांनी केलेत. तुळजापूर शहरातील एका खासगी रुग्णालयात प्रतिक्षा याना उपचारासाठी 4 फेब्रुवारी रोजी दाखल करण्यात आले. मात्र 8 फेब्रुवारी 2020 रोजी पहाटे अचानक सोलापूर येथे हलवण्यास सांगितले. मात्र दुर्दैवाने प्रतीक्षा हिचा त्याचदिवशी मृत्यू झाला. मुलीच्या मृत्यूस कारणीभूत असलेल्या डॉक्टरवर वारंवार तक्रारी देऊन कोणत्याही प्रकारची कायदेशीर कारवाई होत नसल्याने मुलीच्या आई वडिलांनी आत्मदहणाचा मार्ग स्वीकारला. प्रकाश पुणेकर व संजीवनी पुणेकर यांनी आज स्वातंत्र्यदिनी जिल्हाधिकारी कार्यालया समोर अंगावर रॉकेल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला.

*आमच्या TIMES MARATHI NEWS च्या अपडेट तुमच्या Whatsapp वर मिळवण्यासाठी आम्हाला जाॅईन व्हा किंवा 8390380101 या क्रमांकावर HI मेसेज करा*
https://chat.whatsapp.com/H0byh80Nekn2VHl0oUz2tN
https://t.me/joinchat/wy0fp8dr-ts4Mjll
https://wordpress.com/notifications
https://profile.dailyhunt.in/timesmarathinews
https://chat.whatsapp.com/H0byh80Nekn2VHl0oUz2tN

वंशाच्या दिवट्यासाठी दिरासोबत शारिरीक संबध ठेवण्यास भाग पाडले, बीड मधील धक्कादायक प्रकार

जग 21 व्या शतकात वावरत असताना आजही महाराष्ट्रात जुन्या आणि बुरसटलेल्या विचारसरणीचे लोक राहतात. अशाच घाणेरड्या विचारसरणीतून बीड मध्ये एक धक्कादायक प्रकार घडला. वंशाला दिवा मिळावा म्हणून सुनेला चक्क भावाच्या मुलासोबत शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडले. या विचित्र प्रकारामुळे सर्वत्र एकच खळबळ उडाली.

बीड जिल्ह्याच्या आष्टी तालुक्यात कडा भागात राहणाऱ्या मोठोबा भिसे यांचे 15 वर्षांपूर्वी फिर्यादी सोबत लग्न झाले. भिक्षा मागून उपजीविका चालवणाऱ्या भिसे कुटुंबातील सासू सासऱ्यानी 2016 साली देशपांडे हॉस्पिटलमध्ये फिर्यादीला न सांगता टेस्ट ट्यूब बेबीचा प्रयोग केला. यातून त्यांना मुलगी झाली. यानंतर 2020 मध्ये फिर्यादीच्या सासूने तुझा नवरा बाप होऊ शकत नाही, असे सांगितले. या नंतर फिर्यादीने खातरजमा करण्यासाठी स्वतःच्या नवऱ्याला विचारणा केली असता त्याने ही या गोष्टीचे समर्थान केले. यानंतर एका महिन्याने फिर्यादीचा पती कामानिमित्त बाहेरगावी गेल्यानंतर सासूने तिला तुझा पती कधीच बाप होऊ शकत नाही. पण आपल्या वंशाचा दिवा चालवण्यासाठी तुला एक मुलगा होणे गरजेचे आहे. यासाठी मी सांगते ते कर असे सासूने फिर्यादीला सांगितले. यासाठी माझ्या भावाचा मुलगा देव यादव सोबत शारिरीक संबंध ठेवून मुलगा दे. याला विरोध केला असता सासू सासऱ्यानी खूप मारहाण केली. या मारहाणीला कंटाळून शेवटी फिर्यादीने त्यांच्या विचित्र मागणीला होकार दिला. सासू सासऱ्यानी वंशाच्या दिव्यासाठी तिला दिरासोबत शारीरिक संबंध ठेवण्यास जबरदस्ती करून नात्याला काळिमा फासला आहे. या नंतर काही दिवसांनी यादव याने वेळोवेळी फिर्यादीवर जबरदस्ती देखील केली. काही दिवसानंतर फिर्यादी गरोदर ही राहिली. याची माहिती तिने घरच्यांना दिल्यानंतर त्यांनी हॉस्पिटलमध्ये नेऊन तपासणी करून घेतली व सर्वत्र पेढे देखील वाटले. दरम्यान हा सर्व प्रकार फिर्यादीच्या नवऱ्याला कळाला आणि त्याने पीडितेच्या भावाला बोलवून तिला माहेरी पाठवून दिले.

आता फिर्यादीचा नवरा तिला नादवंत नाही. सध्या ती 5 महिन्याची गर्भवती असून या प्रकरणी तीने आष्टी पोलिसात देखील तक्रार दाखल केली आहे. सासरच्या विचित्र मागणीचा पुरवठा करताना मात्र या पडितेचे तिच्या पोटातल्या बाळाचे आयुष्य उध्वस्त झाले आहे. गरोदर राहिली म्हणून गावभर पेढे वाटणाऱ्या व दारू पाजणार्या सासरच्यांनी आता तिला वाऱ्यावर सोडले आहे. त्यामुळे आता या बाळाला कुणाचे नाव द्यावे हा प्रश्न तिच्या समोर उभा आहे. या सर्व प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक राणी सानप करीआहेत.

पुण्यात ग्रामपंचायतीने वाटले कोंडोम

राज्यात कोरोना पाठोपाठ झिंक व्हायरसचे रुग्ण पुण्यात आढळून आल्याने एकच खळबळ उडाली. या व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ग्रामपंचायतीने चक्क कंडोमचे वाटप केले. आता कोरोना आणि कोंडोमचा काय संबंध असा प्रश्न तुम्हाला नक्की पडला असणार यात शंका नाही. पण नेमकं प्रकरण काय हे, गावामध्ये कंडोम का वाटले गेले हे जाणून घेण्यासाठी हा लेख पूर्ण वाचा आणि times marathi च्या नवनवीन पोस्ट वाचण्यासाठी like आणि follow करायला विसरू नका.

पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यात झिंक व्हायरसचा पहिला रुग्ण आढळला. यामुळे आरोग्य यंत्रणा सतर्क झाली असून याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध उपाय योजनांचे आयोजन करण्यात येत आहे. आरोग्य विभागाने त्या ठिकाणी जाऊन नागरिकांच्या विविध प्रकारच्या चाचण्या करत आहेत. यासाठी विविध प्रतिबंधात्मक उपाय योजना करण्यात येत आहे. याचाच भाग म्हणून ग्रामपंचायतीने गावकऱ्यांना कंडोमचे वाटप केले. पुरुषांच्या विर्यात झिंका व्हायरसचे विषाणू आढळत असल्याने पुढील 4 महिने लैंगिक संबंध टाळावेत किंवा सुरक्षा साधनांचा वापर करावा असे आरोग्य विभागाकडून सांगण्यात येत असल्याने ग्रामपंचायतीने कंडोमचे वाटप केले.

झिंका व्हायरसची लागण एडिस इजिप्त या डांसापासून होते. त्याचा सर्वाधिक धोका हा गरोदर महिलांना असून पोटातील बाळावर त्याचा अत्यंत वाईट परिणाम होण्याची शक्यता आहे. यामुळे बाळाच्या मेंदूची वाढ खुंटू शकते व अकाली प्रसुतिचा धोका ही अधिक आहे. झिंका व्हायरसचा विषाणू हा पुरुषांच्या विर्यात 4 महिने जिवंत राहू शकतो. यामुळे गावातील महिलांनी पुढील 3 महिने गर्भधारणा टाळण्याची गरज असल्याचे मत आरोग्य विभागाने व्यक्त केले. यासाठी गावात विविध ठिकाणी फलक लावून जनजागृती करण्याचा प्रयत्न ही करत आहेत.

*आमच्या TIMES MARATHI NEWS च्या अपडेट तुमच्या Whatsapp वर मिळवण्यासाठी आम्हाला जाॅईन व्हा किंवा 8390380101 या क्रमांकावर HI मेसेज करा*
https://chat.whatsapp.com/H0byh80Nekn2VHl0oUz2tN
https://t.me/joinchat/wy0fp8dr-ts4Mjll
https://wordpress.com/notifications
https://profile.dailyhunt.in/timesmarathinews
https://chat.whatsapp.com/H0byh80Nekn2VHl0oUz2tN

धावपट्टीवर पेट्रोलची बाटली फेकल्याने खळबळ, मुंबई विमान तळावरील प्रकार

स्वातंत्र्यदिन अवघ्या दोन दिवसावर आला असताना बुधवारी सायंकाळी मुंबई विमान तळावरील धावपट्टीवर अज्ञातांनी पेट्रोलने भरलेली बाटली फेकण्यात आल्याचे आढळून आले. या नंतर तात्काळ बॉम्ब शोधक व नाशक पथकाला पाचारण करण्यात आले.

मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज विमानतळाच्या धावपट्टीवर बुधवारी रात्री काही संशयास्पद वस्तू टाकल्याचे CISF च्या अधिकाऱ्यांना आढळून आले. अज्ञतानी पेट्रोल ने भरलेली बाटली फेकल्याचे निदर्शनास आल्यानंतर CISF ने तात्काळ बॉम्ब शोधक व नाशक पथकाला पाचरण करण्यात आले. ही बॉटल गावदेवी झोपडपटीच्या संरक्षक भिंतीवरून फेकल्याचे स्पष्ट झाल्याचे समजते. यामुळे CISF ने स्थानिक पोलिसांशी संपर्क साधून संरक्षक भिंत व झोपडपट्टी परिसर पिंजून काढला. मात्र संशयितांचा काही थांगपत्ता लागला नाही.

*आमच्या TIMES MARATHI NEWS च्या अपडेट तुमच्या Whatsapp वर मिळवण्यासाठी आम्हाला जाॅईन व्हा किंवा 8390380101 या क्रमांकावर HI मेसेज करा*
https://chat.whatsapp.com/H0byh80Nekn2VHl0oUz2tN
https://t.me/joinchat/wy0fp8dr-ts4Mjll
https://wordpress.com/notifications
https://profile.dailyhunt.in/timesmarathinews
https://chat.whatsapp.com/H0byh80Nekn2VHl0oUz2tN

शरद पवारांच्या नावाने फोन करणाऱ्या दोघांना अटक

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरदचंद्रजी पवार यांच्या नावाने फोन करून व त्यांचा आवाज काढून फसवणुकीचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना मुंबई गुन्हे अन्वेषण विभागाने पुण्यातून अटक केली.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नावाने फोन करून व त्यांचा आवाज काढून फसवण्याचा प्रयत्न दोघा जणांनी केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार विकास गुरव(51) आणि किरण काकडे(26) या दोघांनी मंत्रालयात फोन करून एक अधिकाऱ्याची बदली करा असा आदेश सोडत आपण चक्क सिल्व्हर ओक वरून बोलत असल्याचे सांगितले. मात्र याच कालावधीत नेमके शरद पवार दिल्लीत असल्याने अधिकाऱ्यांना संशय आला व त्यांनी याची चौकशी केली असता हा बनाव असल्याचा उघड झाला. यानंतर या प्रकारचा गावदेवी पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आणि तपासाला सुरवात झाली. या दोन्ही आरोपींना पोलिसांनी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने 20 ऑगस्ट पर्यंत दोघांची ही रवानगी पोलीस कोठडीत केली.

*आमच्या TIMES MARATHI NEWS च्या अपडेट तुमच्या Whatsapp वर मिळवण्यासाठी आम्हाला जाॅईन व्हा किंवा 8390380101 या क्रमांकावर HI मेसेज करा*
https://chat.whatsapp.com/H0byh80Nekn2VHl0oUz2tN
https://t.me/joinchat/wy0fp8dr-ts4Mjll
https://wordpress.com/notifications
https://profile.dailyhunt.in/timesmarathinews
https://chat.whatsapp.com/H0byh80Nekn2VHl0oUz2tN

डेल्टा प्लसने रायगड मध्ये 3 रा मृत्यू

रत्नागिरी, मुंबई पाठोपाठ आता रायगड मध्येही डेल्टा प्लस व्हेरिएंटचा 3 बळी गेल्याची घटना समोर आली आहे. 69 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाल्याची माहिती जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी दिली.

रायगड जिल्ह्यातील नागोठणे येथील 69 वर्षीय व्यक्तीचा डेल्टा प्लसने मृत्यू झाल्याचे समोर आले. यापूर्वी रत्नागिरी जिल्ह्यात जून मध्ये पहिला तर 27 जुलैला मुंबईत दुसरा तर रायगड जिल्ह्यायील नागोठणे येथे 3 रा बळी गेल्याचे समोर आले आहे. या 69 वर्षीय इसमाने कोरोना प्रतिबंधात्मक लसीचे दोन्ही डोस घेतल्याचे समोर येत असून त्याच्यावर घरातच उपचार सुरू होते. त्यांना घरातच ऑक्सिजनची ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. मात्र दुर्देवाने उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

भरणे नाका येथे सापडला पुरुषाचा मृतदेह

खेड तालुक्यातील भरणे नाका येथील बस स्टॉप जवळ शुक्रवारी सकाळी एका पुरुषाचा मृतदेह सापडला. याची माहिती मिळताच खेड पोलीस घटनास्थळी दाखल झाले. यावेळी पोलिसांना या मृताजवळ सापडलेल्या कागद पत्रानुसार याचे नाव संजय शंकर जगताप असून तो अलिबाग येथील मुरड जंजिरा येथील असल्याचे समोर येत आहे. खेड पोलीस याच्या नातेवाईकांना शोधून संपर्क करण्याचा प्रयत्न करीत आहेत. सदरची व्यक्ती कोणाच्या ओळखीची असेल तर त्यांनी खेड पोलिसांना संपर्क साधावा.

डेल्टा प्लसचा राज्यात दुसरा तर मुंबईत पहिला बळी

कोरोना रुग्णसंख्या आटोक्यात येत असतानाच राज्यात डेल्टा प्लस या व्हेरिएंटचे रुग्ण सापडू लागले आहेत. यामुळे तिसऱ्या लाटेचा धोका निर्माण होऊ शकतो असे मत तज्ञाकडून व्यक्त करण्यात येत आहे. या विषाणूचे संक्रमण वाढत असताना राज्यातील दुसरा तर मुंबईतील पहिला बळी आज गेला.

27 जुलै रोजी राज्यात डेल्टा प्लस या व्हेरिएंटचा दुसरा बळी गेला आहे. यापूर्वी ही जून महिन्यात राज्यात पहिला बळी हा रत्नागिरी संगमेश्वर येथे गेला होता. तर दुसरा बळी हा मुंबईतील 60 वर्षीय महिलेचा गेला आहे.

खासगी शाळांच्या फीमध्ये 15 टक्के कपात, शासन आदेश जाहीर

कोरोना महामारीमुळे सर्वत्र ताळेबंदी असल्यामुळे शाळा कॉलेज ही बंद होतीत. राज्य सरकारने पालकांना दिलासा देत यापूर्वीच फी कपातीची घोषणा केली होती. मात्र अद्याप या निर्णयाचा अध्यादेश जाहीर करण्यात आला नव्हता. मात्र आज झालेल्या बैठकीत खासगी शाळांच्या फीमध्ये 15 टक्के कपातीचा शासन आदेश जाहीर करण्यात आला.

राज्य सरकारने यापूर्वीच खासगी शाळांच्या फीमध्ये 15 टक्के कपात करण्याचे जाहीर केले होते. मात्र याचा जी आर काढण्यात आला न्हवता. सण 2021-22 या शैक्षणिक वर्षासाठी राज्य सरकारने खासगी शाळांना 15 टक्के फी कपातीचा आदेश देऊन पालकांना दिलासा दिला आहे. या वर्षाची शैक्षणिक फी ज्या पालकांनी संपूर्ण भरली आहे त्यांना ही आता शाळेकडून 15 टक्के कपातीची रक्कम शाळेकडून परत मिळेल. या संदर्भात सुप्रीम कोर्टाने आदेश दिले होते की राजस्थान सारकरप्रमाणे महाराष्ट्र सरकारने ही खासगी शाळांच्या फीमध्ये 15 टक्के कपात करावी. कोरोना कालावधीत झालेली फी वाढ ही रद्द करण्याचे आदेश मा. सुप्रीम कोर्टाने राज्य सरकारला दिले होतेत. त्यानुसार राज्य सरकारने 15 टक्के फी कपातीचा निर्णय घेतला होता. मात्र या बाबत अधिकृतरित्या अधिसूचना जाहीर करण्यात आली न्हवती. आज गुरुवारी मात्र या बाबत अधिकृत अधिसूचना जरी करून हा निर्णय घेण्यात आला.

मात्र महाराष्ट्र इंग्लिश स्कूल ट्रस्टी या असोसिएशने राज्य सरकारच्या निर्णयांचा विरोध केला आहे. राज्य सरकारला खासगी शाळांच्या फी बाबत निर्णय घेण्याचा अधिकार नसून केवळ मतांच्या राजकारणासाठी त्यांनी हा निर्णय घेतल्याचा आरोप ही केला आहे. पालकांप्रमाणे शाळा ही गेली 2 वर्षे आर्थिक संकटात असून शालेय शिक्षण मंत्र्यांनी एकतर्फी हा निर्णय घेतल्याचे ही सांगितले. राज्य सरकारने हा निर्णय मागे न घेतल्यास शाळा बंद करण्याचा इशाराही त्यांनी दिला. तसेच या निर्णया विरोधात न्यायालयात धाव घेणार असल्याचे ही सांगितले.

*आमच्या TIMES MARATHI NEWS च्या अपडेट तुमच्या Whatsapp वर मिळवण्यासाठी आम्हाला जाॅईन व्हा किंवा 8390380101 या क्रमांकावर HI मेसेज करा*
https://chat.whatsapp.com/H0byh80Nekn2VHl0oUz2tN
https://t.me/joinchat/wy0fp8dr-ts4Mjll
https://wordpress.com/notifications
https://profile.dailyhunt.in/timesmarathinews
https://chat.whatsapp.com/H0byh80Nekn2VHl0oUz2tN

17 ऑगस्टला शाळा सुरू होणार नाहीत, टास्क फोर्सच्या बैठकीनंतर स्थगिती

गेल्या 2 वर्षांपासून कोरोना महामारीमुळे शाळांचे दरवाजे बंद झाले होते. ते उघडण्यास राज्य सरकारने अनुकूलता दाखवत 17 ऑगस्ट पासूण शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र बुधवारी सायंकाळी झालेल्या टास्क फोर्सच्या बैठकीनंतर हा अध्यादेश स्थगित करण्यात आला आहे. यामुळे पुढील आदेश येईपर्यंत आता शाळा सुरू होणार नाहीत.

शालेय शिक्षण विभागाने 2 दिवसापूर्वी शाळा सुरू करण्यास अनुकूलता दाखवली होती. या संदर्भात शासन परिपत्रक ही जारी करण्यात आले होते. मात्र बुधवारी झालेल्या बैठकीत शाळा सुरू करण्याच्या निर्णयावर फेरविचार करण्याची गरज असल्याचे मत काही मंत्र्यांनी व्यक्त केले होते. तसेच गेले वर्षभर राज्य सरकारने लहान मुलांच्या बाबतीत काळजी घेऊन शाळा बंद ठेवल्या होत्या मात्र आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असून रुग्ण संख्या ही आटोक्यात आली आहे. यामुळे राज्य सरकारने काही वर्ग सुरू करण्याचा विचार करून तसे परिपत्रक ही जाहीर केले होते. यावेळी मात्र टास्क फोर्स व पीडियाट्रिक टास्क फोर्स यांनी सर्वानीच शाळा व कॉलेज सुरू करण्याच्या निर्णयाला विरोध दर्शविला आहे. कारण दहावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांचे अद्यापही लसीकरण झालेल नाही. इतर राज्यातील परीस्थिती पाहता टास्क फोर्स ने ही भीती व्यक्त करत शाळा कॉलेज सुरू करण्याला विरोध दर्शविला आहे.

याच अनुषंगाने आज सांयकाळी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी टास्क फोर्स व शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेण्याचा निर्णय घेतला असल्याचे समजते. या बैठकीमध्येच शाळा कॉलेज सुरू करण्याबाबत अंतिम निर्णय घेण्यात येणार असून जो काही निर्णय होईल तो आज रात्री उशिरा किंवा उद्या सकाळीच स्पष्ट होईल. मात्र तोपर्यंत तरी 17 ऑगस्ट रोजी शाळा सुरू होणार नाही हे निश्चित.

*आमच्या TIMES MARATHI NEWS च्या अपडेट तुमच्या Whatsapp वर मिळवण्यासाठी आम्हाला जाॅईन व्हा किंवा 8390380101 या क्रमांकावर HI मेसेज करा*
https://chat.whatsapp.com/H0byh80Nekn2VHl0oUz2tN
https://t.me/joinchat/wy0fp8dr-ts4Mjll
https://wordpress.com/notifications
https://profile.dailyhunt.in/timesmarathinews
https://chat.whatsapp.com/H0byh80Nekn2VHl0oUz2tN

खेड मधील तरुणांचा मनसेत जाहिर प्रवेश

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संथापक अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विचाराने प्रेरित होवून व राज्य सारचिटणीस श्री वैभव खेडेकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून खेडमधील तरुणांनी मनसेत जाहीर प्रवेश केला.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक अध्यक्ष हिंदुजननायक मा. राजसाहेब ठाकरे यांच्या विचारांनी प्रेरित होऊन पक्षाचे महाराष्ट्र राज्य सरचिटणीस तथा नगराध्यक्ष श्री. वैभवजी खेडेकर नेतृत्वावर विश्वास ठेऊन म.न.वि.से. वेरळ विभाग अध्यक्ष साई साळुंखे, सौरभ चव्हाण, यांच्या माध्यमातून साहिल फिरफिरे, सिद्धेश कडू, यांनी मनसेत जाहिर प्रवेश केला. यावेळी मनविसे जिल्हाध्यक्ष नंदू साळवी, साहिल शेलार, सार्थक खेडेकर यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी त्यांचे स्वागत केले.

*आमच्या TIMES MARATHI NEWS च्या अपडेट तुमच्या Whatsapp वर मिळवण्यासाठी आम्हाला जाॅईन व्हा किंवा 8390380101 या क्रमांकावर HI मेसेज करा*
https://chat.whatsapp.com/H0byh80Nekn2VHl0oUz2tN
https://t.me/joinchat/wy0fp8dr-ts4Mjll
https://wordpress.com/notifications
https://profile.dailyhunt.in/timesmarathinews
https://chat.whatsapp.com/H0byh80Nekn2VHl0oUz2tN

ESO-3 मध्ये तांत्रिक बिघाड, लॉचिंगनंतर फेल

पृथ्वीच्या निरीक्षणासाठी भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (ISRO) सॅटेलाईट ESO-3 चे यशस्वी प्रक्षेपण केले. श्रीहरी कोटा येथील सतीश धवन अंतराळ संशोधन केंद्रातून गुरुवारी सकाळी 5.43 ला यशस्वी प्रक्षेपण केले. मात्र काही वेळातच क्रायोजेनिक इंजिनमधील आकडे बंद झाल्याने हे मिशन अयशस्वी झाल्याची घोषणा करण्यात आली.

GSLV-F10 ESO-03 या सॅटेलाइटने पहाटे 5.43 ला यशस्वी लॉचिंग केल्यानंतर काही मिनिटांतच तांत्रिक बिघाड झाल्याने संचालकांनी हे मिशन अयशस्वी झाल्याचे जाहीर केले. क्रायोजेनिक स्टेजमध्ये बिघाड झाल्याने ही मोहिम असफल झाल्याचे सांगण्यात आले. ISRO चे अध्यक्ष के सिवन यांनीही या गोष्टीला दुजोरा दिला. ESO सॅटेलाईटच्या मदतीने एकाचवेळी सद्यस्थितीची परिस्थितीच चित्र पाहता आले असते. या सॅटेलाइटचा उपयोग आपत्कालीन परिस्थितीत मोठता प्रमाणावर झाला असता. नैसर्गिक आपत्तीची माहिती व त्याच्याशी सामना करण्यासाठी या उपग्रहाचा वापर करण्यात आला असता.

*आमच्या TIMES MARATHI NEWS च्या अपडेट तुमच्या Whatsapp वर मिळवण्यासाठी आम्हाला जाॅईन व्हा किंवा 8390380101 या क्रमांकावर HI मेसेज करा*
https://chat.whatsapp.com/H0byh80Nekn2VHl0oUz2tN
https://t.me/joinchat/wy0fp8dr-ts4Mjll
https://wordpress.com/notifications
https://profile.dailyhunt.in/timesmarathinews
https://chat.whatsapp.com/H0byh80Nekn2VHl0oUz2tN

कोविड काळात सेवा देणाऱ्या निवासी डॉक्टरांना शुल्क माफी आणि प्रोत्साहन भत्ता देण्याबाबत शासन सकारात्मक – वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख

गेल्या दीड वर्षांहून अधिक काळ महाराष्ट्रातील वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे विद्यार्थी म्हणजेच निवासी डॉक्टर कोविड काळात अहोरात्र काम करीत आहे. या निवासी डॉक्टरांना वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे शैक्षणिक शुल्क माफी आणि प्रोत्साहन भत्ता देण्याबाबत शासन सकारात्मक असल्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी सांगितले.

मंत्रालयात महाराष्ट्र निवासी डॉक्टर्स राज्यव्यापी संघटने (सेंट्रल मार्ड)च्या पदाधिकाऱ्यांनी वैद्यकीय शिक्षण मंत्री श्री. देशमुख यांची भेट घेतली. यावेळी वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. दिलीप म्हैसेकर, सेंट्रल मार्डचे अध्यक्ष डॉ.ज्ञानेश्वर ढोबळे- पाटील, उपाध्यक्ष डॉ. प्रणव जाधव, जनरल सेक्रेटरी डॉ.धनराज गीते, ॲडीशनल जनरल सेक्रेटरी डॉ. अक्षय चावरे, राज्य समन्वयक डॉ. निखील कांबळे, जॉईट सेक्रेटरी डॉ. चेतनकुमार आद्रट उपस्थित होते. यावेळी वैद्यकीय शिक्षण मंत्री श्री. देशमुख म्हणाले की, गेल्या दीड वर्षापासून निवासी डॉक्टर रात्र दिवस कोविड -19 परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी काम करीत आहे. त्यामुळे या डॉक्टरांना शैक्षणिक शुल्क माफी आणि प्रोत्साहन भत्ता देण्याबाबत वैद्यकीय शिक्षण विभाग सकारात्मक असून याबाबत तसा प्रस्ताव तयार करण्यात येईल. वैद्यकीय संचालकांमार्फत प्रस्ताव सादर करुन वित्त विभागाला मंजुरीसाठी पाठविण्यात येईल. आपल्या घरापासून दूर राहत अनेक विद्यार्थी वसतीगृहांमध्ये राहून वैद्यकीय शिक्षण घेत असतात. अशा वेळी वसतीगृहांची स्थिती चांगली असणे आवश्यक आहे. त्यामुळेच वसतीगृहांचा प्रश्न सोडविण्यासाठी वैद्यकीय शिक्षण संचालक याबाबत माहिती घेतील, असेही श्री. देशमुख यांनी यावेळी सांगितले.

सेंट्रल मार्ड मार्फत शैक्षणिक शुल्क माफी, कोविड काळात  बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयातील निवासी डॉक्टरांना देण्यात येत असलेल्या प्रोत्साहन भत्त्याप्रमाणे  राज्यातील सर्व  शासकीय वैद्यकीय रुग्णालयातील निवासी डॉक्टरांना प्रोत्साहन भत्ता देणे, वसतीगृहांमध्ये चांगल्या पायाभूत सुविधा निर्माण करणे, निवासी डॉक्टरांची सुरक्षितता या मागण्यांचे निवेदन यावेळी वैद्यकीय शिक्षण मंत्री श्री. देशमुख यांना देण्यात आले.

*आमच्या TIMES MARATHI NEWS च्या अपडेट तुमच्या Whatsapp वर मिळवण्यासाठी आम्हाला जाॅईन व्हा किंवा 8390380101 या क्रमांकावर HI मेसेज करा*
https://chat.whatsapp.com/H0byh80Nekn2VHl0oUz2tN
https://t.me/joinchat/wy0fp8dr-ts4Mjll
https://wordpress.com/notifications
https://profile.dailyhunt.in/timesmarathinews
https://chat.whatsapp.com/H0byh80Nekn2VHl0oUz2tN

Breaking News लॉकडाऊनचे निर्बंध शिथिल

कोरोना महामारीमुळे सर्वत्र लॉकडाऊन सुरू होते. राज्यातील काही भागात निर्बंध शिथील करण्याचे आले होते. तर काही ठिकाणी निर्बंध कायम होते. राज्य सरकारने नव्या गाईडलाइन्स जारी करून निर्बंध शिथिल करून सर्वांनाच दिलासा दिला आहे.

बुधवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या नव्या गाईडलाइन नुसार आता सर्व निर्बंध शिथील करण्यात आले आहेत. यामध्ये काही अटी शर्थीसह राज्यातील सर्व दुकाने, शॉपिंग मॉल हे रात्री 10 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. तसेच लसीचे डोन्ही डोस घेऊन 14 दिवसांचा कालावधी पूर्ण झालेल्यांसाठी यावेळी राज्य सरकारने मुभा दिली आहे. पाहूया कोणत्या प्रकारे निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. काय आहे नवीन गाईडलाइन….

*आमच्या TIMES MARATHI NEWS च्या अपडेट तुमच्या Whatsapp वर मिळवण्यासाठी आम्हाला जाॅईन व्हा किंवा 8390380101 या क्रमांकावर HI मेसेज करा*
https://chat.whatsapp.com/H0byh80Nekn2VHl0oUz2tN
https://t.me/joinchat/wy0fp8dr-ts4Mjll
https://wordpress.com/notifications
https://profile.dailyhunt.in/timesmarathinews
https://chat.whatsapp.com/H0byh80Nekn2VHl0oUz2tN

खेड न. प. च्या मुख्याधिकाऱ्यांची चिपळूणला बदली

खेड न. प. चे मुख्याधिकारी श्री. प्रसाद शिंगटेची चिपळूण नगरपालिकेत बदली झाली असून उद्या सकाळी ते आपल्या कार्याचा पदभार स्वीकारणार आहेत. कोरोना महामारीच्या काळात तळागाळात पोहचून काम करणारे अधिकारी म्हणून त्यांची ओळख होती. एक चांगला अधिकारी म्हणून ही त्यांची ओळख आहे. उद्या गुरुवार 12 ऑगस्ट रोजी ते चिपळूनच कार्यभार स्वीकारणार असले तरी खेड न. प. अद्याप ही कोणाची ही नियुक्ती करण्यात आली नाही.

*आमच्या TIMES MARATHI NEWS च्या अपडेट तुमच्या Whatsapp वर मिळवण्यासाठी आम्हाला जाॅईन व्हा किंवा 8390380101 या क्रमांकावर HI मेसेज करा*
https://chat.whatsapp.com/H0byh80Nekn2VHl0oUz2tN
https://t.me/joinchat/wy0fp8dr-ts4Mjll
https://wordpress.com/notifications
https://profile.dailyhunt.in/timesmarathinews
https://chat.whatsapp.com/H0byh80Nekn2VHl0oUz2tN

इंडिया@75 चे आयोजन करावे – मुख्य सचिव सीताराम कुंटे

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त राज्यभर स्वातंत्र्याचा सोहळा साजरा करण्यात येणार आहे. या सोहळ्यानिमित्त राज्यभर शिक्षण, सांस्कृतिक, पर्यटन, नगर विकास, सार्वजनिक बांधकाम, सहकार, कृषी व महिला व बालकल्याण इत्यादी विभागांतर्गत कार्यक्रमांचे आयोजन करण्यात यावे. त्यामध्ये विद्यार्थी, नागरिक, विविध संस्था यांच्या सहभागातून कार्यक्रमांचे आयोजन करण्यात यावे, असे निर्देश मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी सर्व विभागांच्या सचिवस्तरीय अधिकाऱ्यांना दिले. हे सर्व कार्यक्रम इंडिया@75 च्या अंतर्गर्त करण्यात येणार असल्याचे ही त्यांनी सांगितले.

भारताच्या स्वातंत्र्य लढ्याला पुढील वर्षी 75 वर्षे पूर्ण होत आहेत. या निमित्ताने 15 ऑगस्ट 2023 पर्यंत राज्यभर विविध कार्यक्रम राबवून अमृतमहोत्सवी वर्ष सोहळा साजरा करणे अपेक्षित आहे. त्यासंदर्भात आज मंत्रालयातील परिषद सभागृहात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मुख्य सचिव यांनी राज्यातील सर्व विभागांच्या सचिवस्तरीय अधिकाऱ्यांशी संवाद साधला. या बैठकीस सर्व विभागाचे अपर मुख्य सचिव, प्रधान सचिव, सचिव आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते. यावेळी सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव सौरभ विजय यांनी तपशीलवार सादरीकरण केले. यावेळी मुख्य सचिव आपल्या मार्गदर्शनात पुढे म्हणाले की,  इंडिया@75 या अंतर्गत विविध कार्यक्रम राबवावयाचे असून, स्वातंत्र्य लढा, संकल्प, संकल्पना, साध्य व कार्यवाही या बाबींवर आधारित कार्यक्रमाची आखणी करण्यात यावी. कार्यक्रमांची संकल्पना स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव या भोवती गुंफलेली असावी. भारताचा स्वातंत्र्यसंग्राम, नाविन्यपूर्ण कल्पना, नवे संकल्प, स्वातंत्र्योत्तर फलनिष्पत्ती आणि अंमलबजावणी या संकल्पनेवर कार्यक्रम आधारलेले असावेत. स्वातंत्र्य चळवळीतील अज्ञात नायकांना आदरांजली वाहण्यासाठी त्यांचा इतिहास जतन करणे, त्यांच्या निवासस्थानी भेट देणे, संबंधित जिल्ह्यातील स्वातंत्र्यलढ्यातील  निगडीत महत्वाची ठिकाणे, स्वातंत्र्य चळवळींशी संबंधित व्यक्तीमत्वे यांचा इतिहास जतन करणे, पथनाट्य, महानाट्य, चर्चासत्र, प्रदर्शन मेळावे, लोककलेचे सादरीकरण, हेरिटेज वॉक, सायकल वॉक या कार्यक्रमांचे लोकसहभागातून आयोजन करण्यात यावे, असेही निर्देश मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी दिले.

*आमच्या TIMES MARATHI NEWS च्या अपडेट तुमच्या Whatsapp वर मिळवण्यासाठी आम्हाला जाॅईन व्हा किंवा 8390380101 या क्रमांकावर HI मेसेज करा*
https://chat.whatsapp.com/H0byh80Nekn2VHl0oUz2tN
https://t.me/joinchat/wy0fp8dr-ts4Mjll
https://wordpress.com/notifications
https://profile.dailyhunt.in/timesmarathinews
https://chat.whatsapp.com/H0byh80Nekn2VHl0oUz2tN

नेत्याला गाडीच्या डिक्कीत घालून जिवंत जाळले,

तेलंगणा येथील मेडकमध्ये काही लोकांनी स्थानिक नेत्याला त्याच्याच कारच्या डिक्कीत भरून जिवंत जाळल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेची माहिती मेडक जिल्ह्याच्या पोलिस अधीक्षक चांदना दिप्ती यांनी दिली.

भारतीय जनता पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष व्ही. श्रीनिवास प्रसाद यांचा मृतदेह त्यांच्याच जळलेल्या कारच्या डिक्कीत सापडला. बुधवारी पहाटेच्या सुमारास मेडक पोलिसांना जळलेल्या कारच्या डिक्कीत मृतदेह असल्याची माहिती मिळाली. मेडकच्या पोलीस अधीक्षक चांदना दीप्ती यांनी दिलेल्या महितीनुसार काही अज्ञातांनी श्रीनिवास यांना त्यांच्या कारसह आग लावली. या आगीत श्रीनिवास यांचा मृत्यू झाला. या प्रकरणाचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. श्रीनिवास यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी स्थानिक रुग्णालयात पाठविला असून अज्ञाताविरोधात भादंवि कलम 302 नुसार गुन्ह दाखल करण्यात आला आहे.

*आमच्या TIMES MARATHI NEWS च्या अपडेट तुमच्या Whatsapp वर मिळवण्यासाठी आम्हाला जाॅईन व्हा किंवा 8390380101 या क्रमांकावर HI मेसेज करा*
https://chat.whatsapp.com/H0byh80Nekn2VHl0oUz2tN
https://t.me/joinchat/wy0fp8dr-ts4Mjll
https://wordpress.com/notifications
https://profile.dailyhunt.in/timesmarathinews
https://chat.whatsapp.com/H0byh80Nekn2VHl0oUz2tN

अतिवृष्टीतील मृतांच्या वारसांना 23 लाखांचे वाटप

खेड आणि चिपळूण येथे झालेल्या अतिवृष्टीतील मृतांच्या वारसांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून 1 लाखांची मदत देण्याचे काम प्रशासनाने सुरु केले आहे. आजपर्यंत यातील 23 लाखांचे वाटप पूर्ण झाल्याची माहिती जिल्हा महिती अधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली.

रत्नागिरी जिल्ह्यात झालेल्या नैसर्गिक आपत्तीत मृत पावलेल्यांच्या वारसांना 1 कोटी 8 लाख रुपयांचे तर जखमीना 1 लाख 53 हजार रुपयांची मदत देण्यात आली आहे. तसेच आपत्तीत बाधित गावामध्ये अन्न व नागरी पुरवठा विभागातर्फे मोफत गहू आणि तांदुळ पुरवठा करण्यात येत आहे. आजपर्यंत 207 गावातील 6446 कुटुंबांना 644.60 क्विंटल गहू आणि 644.60 क्विंटल तांदळाचे वाटप करण्यात आले आहे. या नैसर्गिक आपत्तीतील बाधितांसाठी ऑनलाईन आणि ऑफलाईन पध्दतीने मोफत शिवभोजन थाळीचे वाटप करण्यात येत आहे. यात ऑनलाईन पध्दतीने आजर्यंत 50386 व ऑफलाईन पध्दतीने 3121 अशा एकूण 53507 शिवभोजन थाळींचे वाटप झालेले आहे. तसेच 64 बाधित गावांतील 2560 कुटुंबांना 12 हजार  800 लिटर केरोसीन वाटप करण्यात आल्याची माहिती जिल्हा माहिती अधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली.

संगमेश्वरात 2 गव्यांचा मृत्यू

संगमेश्वर तालुक्यातील किरबेट येथे शिंगामध्ये शिंग अडकून राहिल्याने व ते न सुटल्याने 2 गाव रेड्यांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली. ही घटना तालुक्यातील किरबेटमधील उदगिरीच्या डोंगराजवळ घडल्याचे मंगळवारी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास घडली.

संगमेश्वर तालुक्यातील किरबेट येथील मनोज जयगडे हे मंगळवारी सकाळी आपल्या गुरांना चरण्यासाठी रानात घडवून जास्त असताना उदगिरीच्या डोंगराजवळ 2 गवे मृतावस्थेत पडल्याचे दिसून आले. या घटनेची माहिती त्यांनी तात्काळ पोलीस पाटील प्रदीप अडबल व वनविभाग देवरुख यांना दिली. या घटनेची महिती मिळताच पोलीस पाटील, सरपंच व ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी यावेळी शिंगात शिंग अडकलेल्या या गव्यांना बाजूला केले. घटनास्थळी वनविभागाने पंचनामे करून ग्रामस्थां सामोर 2 ही गवा रेड्यांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. वनपाल तौफिक मुल्ला यांनी शिंगात शिंग अडकून राहिल्यानेच या गव्यांचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविला. तसेच या दोन्ही गव्यांचा वय साधारण 7 ते 8 वर्षे असल्याचे ही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

एन एच 5 वर दरड कोसळली, अनेक गाड्या व माणसे गाडली गेल्याची शक्यता, एन डी आर एफला पाचारण

हिमाचल प्रदेशच्या सुदोर किंनौर जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्ग क्र. 5 वर मोठी दरड कोसळून अपघात झाला. या दरडीखाली अनेक गाड्या दबल्या गेल्याने माणसे ही गाडली गेल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. हा अपघात दुपारी 12.45 वा. सुमारास घडला. या दुर्घटनेत बचाव कार्यासाठी एन डी आर एफ च्या पथकाला पाचारण करण्यात आले आहे.

याबाबत मिळालेल्या महितीनुसार किंनौर जिल्हातील रिकांग पियो शिमला मार्गावरील निगुलसरी जवळ दरड कोसळल्याने ही दुर्घटना घडली. यावेळी राष्ट्रीय महामार्ग क्र. 5 वरून प्रवास करणारी हिमाचल राज्य परिवहन मंडळाची बस, एक मालवाहू ट्रक व खी गाड्या दरडीखाली दबल्या गेल्याची माहिती आई. टी. बी. पी.ने आपल्या ट्विटर वरून प्रसिद्ध केले. हा अपघात बुधवारी दुपारी 12.45 वाजता दरड कोसळल्याने झाला. या दुर्घटनेत अनेकजण दरडीखाली अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार बसमधून सुमारे 40 प्रवाशी प्रवास करत असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र या अपघातातील जखमी व मृतांबाबत हिमाचल प्रदेश सरकारकडून कोणत्याही प्रकारची अधिकृत आकडेवारी जाहीर करण्यात आली नाही. घटनास्थळी आई टी बी पीचे जवान मदत कार्य करीत असून एन डी आर एफला ही पाचारण करण्यात आले आहे.

*आमच्या TIMES MARATHI NEWS च्या अपडेट तुमच्या Whatsapp वर मिळवण्यासाठी आम्हाला जाॅईन व्हा किंवा 8390380101 या क्रमांकावर HI मेसेज करा*
https://chat.whatsapp.com/H0byh80Nekn2VHl0oUz2tN
https://t.me/joinchat/wy0fp8dr-ts4Mjll
https://wordpress.com/notifications
https://profile.dailyhunt.in/timesmarathinews
https://chat.whatsapp.com/H0byh80Nekn2VHl0oUz2tN

कशेडी घाटात टॅंकरची कंटेनरला धडक ; चालक जखमी

मुंबई गोवा महामार्गावरील कशेडी घाटातील कशेडी बंगला येथे मुंबई दिशेने जाणाऱ्या टँकरची कंटेनरला धडक बसून अपघात झाला. या अपघातात टँकर चालक जखमी झाल्याची घटना मंगळवार रात्री १०.२० च्या सुमारास घडली.

चालक जुबेर मोहम्मद अहमद हा आपल्या ताब्यातील कंटेनर क्र. एम. एच. 43 वाय. 6967 हा घेऊन मुंबईहून गोव्याच्या दिशेने जात होता. तर आष्टी जिल्हा सांगली येथील चालक बापू सा साप्ते हे आपल्या ताब्यातील दुधाचा टॅंकर क्र. एम. एच. 13 टी.सी. 014 हा घेऊन चिपळूण ते मुंबई असा प्रवास करीत होते. त्यांची गाडी राष्ट्रीय महामार्ग क्र. 66 वरील कशेडी घाटतील कशेडी बंगला येथे आली असता समोरून येणाऱ्या कंटेनरच्या पाठीमागील चाकाला धडक दिल्याने अपघात झाला. या अपघातात टॅंकर चालक हा जखमी झाला असून हा अपघात मंगळवारी रात्री 10.20 च्या सुमारास घडला. या अपघाताची माहिती मिळताच महामार्ग पोलीस कशेडी यांनी घटनास्थळी धाव घेऊन गड अडकलेल्या टॅंकर चालकाला बाहेर काढून उपचारासाठी नरेंद्र महाराज संस्थांच्या रुग्णवाहिकेतून पोलादपूर येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.

*आमच्या TIMES MARATHI NEWS च्या अपडेट तुमच्या Whatsapp वर मिळवण्यासाठी आम्हाला जाॅईन व्हा किंवा 8390380101 या क्रमांकावर HI मेसेज करा*
https://chat.whatsapp.com/H0byh80Nekn2VHl0oUz2tN
https://t.me/joinchat/wy0fp8dr-ts4Mjll
https://wordpress.com/notifications
https://profile.dailyhunt.in/timesmarathinews
https://chat.whatsapp.com/H0byh80Nekn2VHl0oUz2tN

महाबळेश्वर घाट कोसळला

राज्यात सर्वदूर सुरू असलेल्या पावसामुळे सर्वत्र हाहाकार उडाला आहे. सातारा जिल्ह्यातही नैसर्गिक आपत्तींची मालिका सुरूच आहे. पाटण येथील भुस्कलनानंतर जिल्ह्यातील महाबळेश्वर येथील घाटच पूर्णपणे कोसळला आहे. यामुळे प्रतपगडचा महाबळेश्वरशी संपर्क तुटला आहे.

कोकणला पश्चिम महाराष्ट्राशी जोडणारा महत्वाचा मार्ग म्हणून पोलादपूर महाबळेश्वर रस्त्याकडे पाहिले जाते. कोंकणात येणारा भाजीपाला बहुतांशी याच मार्गाने येतो. यामुळे या मार्गवर नेहमीच वाहनांची वर्दळ असते. दापोली, मंडणगड, खेड, महाड, पोलादपूर व रोहा या ठिकाणाहून या मार्गावर धावणाऱ्या अनेक बस आहेत. महाबळेश्वर हे पर्यटन स्थळ असल्याकारणाने महाराष्ट्रातून अनेक पर्यटक या ठिकाणी येत आसतात. दूरवरून आलेल्या पर्यटकांची महाबळेश्वर भटकंती संपली की त्यांची पावले आपोआप कोंकणातील समुद्र किनाऱ्याकडे वळतात. कोंकणात येण्यासाठी प्रामुख्याने याच मार्गचा वापर करण्यात येतो. याच महाबळेश्वर तालुक्यातील प्रतापगड किल्ला देखील याच मार्गावर आहे. या किल्ल्याला भेट देण्यासाठी महाबळेश्वर मध्ये येणारा प्रत्येक पर्यटक जातोच जातो. आता या मार्गावरील रस्ताच पूर्णपणे वाहून गेल्याने प्रतापगड भागाचा महाबळेश्वरशी असणारा संपर्क तुटला आहे. याचा त्रास आता पर्यटकासह स्थानिकांना सहन करावा लागणार आहे. हा मार्ग आता अनिश्चित काळासाठी बंद झाला आहे.

ताम्हिणीतला पूल खचला,

कोकणात येणा जणारी अवजड वाहतूक बंद

ताम्हिणी-कोलाड महामार्गावरील गोणवडी, ता.मुळशी येथील पूल खचल्याने जड वाहतूक बंद करण्यात आली आहे. मुळशी धरणाजवळील गोणवडी गावाजवळ हा जुना असलेला पूल पायापासून खचला आहे. वरून डांबरी दिसणारा हा रस्ता पायालगतचे दगड निखळल्याने धोकादायक झाला आहे. तो कमकुवत झाल्याने वाहतूक बंद करण्याशिवाय प्रशासनापुढे कोणताही पर्याय उरला नाही. गेल्या तीन दिवसांपासून मुळशी तालुक्यामध्ये होत असलेल्या ढगफुटी सदृश्य पावसामुळे पुणे-कोलाड राष्ट्रीय महामार्गावर मुळशीच्या गोणवडी हद्दीतील रस्त्यावरचा  दगडीपूल सततच्या पाण्याच्या  प्रवाहामुळे खचल्याने केव्हाही ढासळू शकतो, ही शक्यता लक्षात घेऊन संभाव्य अपघात टाळण्याच्या दृष्टीने या महामार्गावरील वाहतूक आवजड वाहनासाठी पुढील ४८ तासांकरिता माणगाव ते चांदणी चौकापर्यंत बंद करण्यात येत आहे. हलक्या वाहनांना सदरचा रस्ता पोलीस नियंत्रणामध्ये वाहतुकीसाठी उपलब्ध असेल.

पर्यटकांना आणि या महामार्गावरून प्रवास करू इच्छिणाऱ्या नागरिकांना पुढील दोन दिवस या महामार्गावरून प्रवास करू नये असे आवाहन मुळशी प्रशासनातर्फे करण्यात येत आहे. त्यामुळे कोकणात ताम्हिणी मार्गे जाणे किंवा कोकणातून पुण्यात येणे टाळावे, असे प्रशासनाच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे.

वरंध (भोर) घाट ही बंद

महाड येथून भोर मार्गे पुन्यात जाण्यासाठी वापरण्यात येणारा वरंध घाट ही दरड कोसळून माती रस्त्यावर आल्यामुळे बंद करण्यात आला आहे. कोकणातून पुणे येथे जाण्यासाठी वापरण्यात येणारे हे तिन्ही मार्ग बंद झाल्याने पर्यटक व वाहनधारकांचे हाल होणार आहेत.

*आमच्या TIMES MARATHI NEWS च्या अपडेट तुमच्या Whatsapp वर मिळवण्यासाठी आम्हाला जाॅईन व्हा किंवा 8390380101 या क्रमांकावर HI मेसेज करा*

https://chat.whatsapp.com/H1bXCMqHUYV2v1SygtgWWg

https://t.me/joinchat/wy0fp8dr-ts4Mjll

https://wordpress.com/notifications

हिरकणी गावात दरड कोसळली, लाइव्ह थरार कॅमेऱ्यात कैद

महाड तालुक्यातील तळीये गावात दरड कोसळून अनेक लोक मृत्युमुखी पडल्याची घटना ताजी असतानाच पुन्हा एकदा महाड तालुकतातील हिरकणी येथे दरड कोसळली. त्याचे लाइव्ह चित्रीकरण स्थानिकांनी मोबाईल मध्ये रेकॉर्ड केले. महाड तालुक्यात सध्या मुसळधार पाऊस पडत आहे. थोडीशी विश्रांती घेतल्यानंतर आज शनिवारी पावसाने पुन्हा जोर धरला असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. या पावसमुळे दरड कोसळण्याचा धोका वाढल्याचे पाहवास मिळत आहे. रायगड किल्ल्याच्या पायथ्याशी असणाऱ्या हिरकणी गावात ही आज असाच प्रकार घडल्याने येथील नागरीक भयभीत झाले आहेत. यामुळे प्रशासनाने आता धोकादायक भागातील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्याची गरज निर्माण झाली आहे. तलीये गावतील दुर्घटनेमुळे धोकादायक भागातील नागरिक सध्या भयभीत झाले आहेत. पाहूया दरड कोसळतानाचा धक्कादायक विडिओ.

*आमच्या TIMES MARATHI NEWS च्या अपडेट तुमच्या Whatsapp वर मिळवण्यासाठी आम्हाला जाॅईन व्हा किंवा 8390380101 या क्रमांकावर HI मेसेज करा*

https://chat.whatsapp.com/H1bXCMqHUYV2v1SygtgWWg

https://t.me/joinchat/wy0fp8dr-ts4Mjll

https://wordpress.com/notifications