राज्यात सर्वदूर सुरू असलेल्या पावसामुळे सर्वत्र हाहाकार उडाला आहे. सातारा जिल्ह्यातही नैसर्गिक आपत्तींची मालिका सुरूच आहे. पाटण येथील भुस्कलनानंतर जिल्ह्यातील महाबळेश्वर येथील घाटच पूर्णपणे कोसळला आहे. यामुळे प्रतपगडचा महाबळेश्वरशी संपर्क तुटला आहे.
कोकणला पश्चिम महाराष्ट्राशी जोडणारा महत्वाचा मार्ग म्हणून पोलादपूर महाबळेश्वर रस्त्याकडे पाहिले जाते. कोंकणात येणारा भाजीपाला बहुतांशी याच मार्गाने येतो. यामुळे या मार्गवर नेहमीच वाहनांची वर्दळ असते. दापोली, मंडणगड, खेड, महाड, पोलादपूर व रोहा या ठिकाणाहून या मार्गावर धावणाऱ्या अनेक बस आहेत. महाबळेश्वर हे पर्यटन स्थळ असल्याकारणाने महाराष्ट्रातून अनेक पर्यटक या ठिकाणी येत आसतात. दूरवरून आलेल्या पर्यटकांची महाबळेश्वर भटकंती संपली की त्यांची पावले आपोआप कोंकणातील समुद्र किनाऱ्याकडे वळतात. कोंकणात येण्यासाठी प्रामुख्याने याच मार्गचा वापर करण्यात येतो. याच महाबळेश्वर तालुक्यातील प्रतापगड किल्ला देखील याच मार्गावर आहे. या किल्ल्याला भेट देण्यासाठी महाबळेश्वर मध्ये येणारा प्रत्येक पर्यटक जातोच जातो. आता या मार्गावरील रस्ताच पूर्णपणे वाहून गेल्याने प्रतापगड भागाचा महाबळेश्वरशी असणारा संपर्क तुटला आहे. याचा त्रास आता पर्यटकासह स्थानिकांना सहन करावा लागणार आहे. हा मार्ग आता अनिश्चित काळासाठी बंद झाला आहे.
ताम्हिणीतला पूल खचला,
कोकणात येणा जणारी अवजड वाहतूक बंद
ताम्हिणी-कोलाड महामार्गावरील गोणवडी, ता.मुळशी येथील पूल खचल्याने जड वाहतूक बंद करण्यात आली आहे. मुळशी धरणाजवळील गोणवडी गावाजवळ हा जुना असलेला पूल पायापासून खचला आहे. वरून डांबरी दिसणारा हा रस्ता पायालगतचे दगड निखळल्याने धोकादायक झाला आहे. तो कमकुवत झाल्याने वाहतूक बंद करण्याशिवाय प्रशासनापुढे कोणताही पर्याय उरला नाही. गेल्या तीन दिवसांपासून मुळशी तालुक्यामध्ये होत असलेल्या ढगफुटी सदृश्य पावसामुळे पुणे-कोलाड राष्ट्रीय महामार्गावर मुळशीच्या गोणवडी हद्दीतील रस्त्यावरचा दगडीपूल सततच्या पाण्याच्या प्रवाहामुळे खचल्याने केव्हाही ढासळू शकतो, ही शक्यता लक्षात घेऊन संभाव्य अपघात टाळण्याच्या दृष्टीने या महामार्गावरील वाहतूक आवजड वाहनासाठी पुढील ४८ तासांकरिता माणगाव ते चांदणी चौकापर्यंत बंद करण्यात येत आहे. हलक्या वाहनांना सदरचा रस्ता पोलीस नियंत्रणामध्ये वाहतुकीसाठी उपलब्ध असेल.
पर्यटकांना आणि या महामार्गावरून प्रवास करू इच्छिणाऱ्या नागरिकांना पुढील दोन दिवस या महामार्गावरून प्रवास करू नये असे आवाहन मुळशी प्रशासनातर्फे करण्यात येत आहे. त्यामुळे कोकणात ताम्हिणी मार्गे जाणे किंवा कोकणातून पुण्यात येणे टाळावे, असे प्रशासनाच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे.
वरंध (भोर) घाट ही बंद
महाड येथून भोर मार्गे पुन्यात जाण्यासाठी वापरण्यात येणारा वरंध घाट ही दरड कोसळून माती रस्त्यावर आल्यामुळे बंद करण्यात आला आहे. कोकणातून पुणे येथे जाण्यासाठी वापरण्यात येणारे हे तिन्ही मार्ग बंद झाल्याने पर्यटक व वाहनधारकांचे हाल होणार आहेत.
*आमच्या TIMES MARATHI NEWS च्या अपडेट तुमच्या Whatsapp वर मिळवण्यासाठी आम्हाला जाॅईन व्हा किंवा 8390380101 या क्रमांकावर HI मेसेज करा*
https://chat.whatsapp.com/H1bXCMqHUYV2v1SygtgWWg






