वंशाच्या दिवट्यासाठी दिरासोबत शारिरीक संबध ठेवण्यास भाग पाडले, बीड मधील धक्कादायक प्रकार

जग 21 व्या शतकात वावरत असताना आजही महाराष्ट्रात जुन्या आणि बुरसटलेल्या विचारसरणीचे लोक राहतात. अशाच घाणेरड्या विचारसरणीतून बीड मध्ये एक धक्कादायक प्रकार घडला. वंशाला दिवा मिळावा म्हणून सुनेला चक्क भावाच्या मुलासोबत शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडले. या विचित्र प्रकारामुळे सर्वत्र एकच खळबळ उडाली.

बीड जिल्ह्याच्या आष्टी तालुक्यात कडा भागात राहणाऱ्या मोठोबा भिसे यांचे 15 वर्षांपूर्वी फिर्यादी सोबत लग्न झाले. भिक्षा मागून उपजीविका चालवणाऱ्या भिसे कुटुंबातील सासू सासऱ्यानी 2016 साली देशपांडे हॉस्पिटलमध्ये फिर्यादीला न सांगता टेस्ट ट्यूब बेबीचा प्रयोग केला. यातून त्यांना मुलगी झाली. यानंतर 2020 मध्ये फिर्यादीच्या सासूने तुझा नवरा बाप होऊ शकत नाही, असे सांगितले. या नंतर फिर्यादीने खातरजमा करण्यासाठी स्वतःच्या नवऱ्याला विचारणा केली असता त्याने ही या गोष्टीचे समर्थान केले. यानंतर एका महिन्याने फिर्यादीचा पती कामानिमित्त बाहेरगावी गेल्यानंतर सासूने तिला तुझा पती कधीच बाप होऊ शकत नाही. पण आपल्या वंशाचा दिवा चालवण्यासाठी तुला एक मुलगा होणे गरजेचे आहे. यासाठी मी सांगते ते कर असे सासूने फिर्यादीला सांगितले. यासाठी माझ्या भावाचा मुलगा देव यादव सोबत शारिरीक संबंध ठेवून मुलगा दे. याला विरोध केला असता सासू सासऱ्यानी खूप मारहाण केली. या मारहाणीला कंटाळून शेवटी फिर्यादीने त्यांच्या विचित्र मागणीला होकार दिला. सासू सासऱ्यानी वंशाच्या दिव्यासाठी तिला दिरासोबत शारीरिक संबंध ठेवण्यास जबरदस्ती करून नात्याला काळिमा फासला आहे. या नंतर काही दिवसांनी यादव याने वेळोवेळी फिर्यादीवर जबरदस्ती देखील केली. काही दिवसानंतर फिर्यादी गरोदर ही राहिली. याची माहिती तिने घरच्यांना दिल्यानंतर त्यांनी हॉस्पिटलमध्ये नेऊन तपासणी करून घेतली व सर्वत्र पेढे देखील वाटले. दरम्यान हा सर्व प्रकार फिर्यादीच्या नवऱ्याला कळाला आणि त्याने पीडितेच्या भावाला बोलवून तिला माहेरी पाठवून दिले.

आता फिर्यादीचा नवरा तिला नादवंत नाही. सध्या ती 5 महिन्याची गर्भवती असून या प्रकरणी तीने आष्टी पोलिसात देखील तक्रार दाखल केली आहे. सासरच्या विचित्र मागणीचा पुरवठा करताना मात्र या पडितेचे तिच्या पोटातल्या बाळाचे आयुष्य उध्वस्त झाले आहे. गरोदर राहिली म्हणून गावभर पेढे वाटणाऱ्या व दारू पाजणार्या सासरच्यांनी आता तिला वाऱ्यावर सोडले आहे. त्यामुळे आता या बाळाला कुणाचे नाव द्यावे हा प्रश्न तिच्या समोर उभा आहे. या सर्व प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक राणी सानप करीआहेत.

Leave a Comment