
संगमेश्वर तालुक्यातील किरबेट येथे शिंगामध्ये शिंग अडकून राहिल्याने व ते न सुटल्याने 2 गाव रेड्यांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली. ही घटना तालुक्यातील किरबेटमधील उदगिरीच्या डोंगराजवळ घडल्याचे मंगळवारी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास घडली.

संगमेश्वर तालुक्यातील किरबेट येथील मनोज जयगडे हे मंगळवारी सकाळी आपल्या गुरांना चरण्यासाठी रानात घडवून जास्त असताना उदगिरीच्या डोंगराजवळ 2 गवे मृतावस्थेत पडल्याचे दिसून आले. या घटनेची माहिती त्यांनी तात्काळ पोलीस पाटील प्रदीप अडबल व वनविभाग देवरुख यांना दिली. या घटनेची महिती मिळताच पोलीस पाटील, सरपंच व ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी यावेळी शिंगात शिंग अडकलेल्या या गव्यांना बाजूला केले. घटनास्थळी वनविभागाने पंचनामे करून ग्रामस्थां सामोर 2 ही गवा रेड्यांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. वनपाल तौफिक मुल्ला यांनी शिंगात शिंग अडकून राहिल्यानेच या गव्यांचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविला. तसेच या दोन्ही गव्यांचा वय साधारण 7 ते 8 वर्षे असल्याचे ही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
