उध्दव ठाकरे यांच्या अज्ञानाचा पराभव – आम. योगेश कदम

उध्दव ठाकरे यांना त्यांच्या आजूबाजूला असलेल्या बडव्यांमुळे पक्ष घटना कधी समजली नाही किंवा त्यांच्या अज्ञानाने त्यांनी कधी समजूनच घेतली नाही. आज त्यांच्या अड्यानांमुळेच त्यांचा पराभव झाला असल्याचे मत खेड दापोली मंडणगडचे आमदार योगेश रामदास कदम यांनी X या सोशल मीडियावर ट्विट करत व खेड येथे पत्रकारांशी संवाद साधताना व्यक्त केले.

आमदार योगेश कदम यांना पेढा भरवून आनंदोत्सव साजरा करताना खेड भाजप चे शहराध्यक्ष अनिकेत कानडे

आदरणीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख मा. बाळासाहेब ठाकरे यांनी 1999 साली जी पक्ष घटना पक्षाला दिली होती. तीच पक्ष घटना ग्राह्य धरून आजची सुनावणी करण्यात आल्याचे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सांगितले. उध्दव ठाकरे यांनी त्यांच्या अज्ञानामुळे किंवा त्यांच्या आजू बाजूला असलेल्या भडव्यांमुळे पक्ष घटना त्यांना कधी समजलीच नाही. अज्ञानी बनून पक्ष चालवल्यामुळे किंवा आजूबाजूच्या अकार्यक्षम बडव्यांवर विश्वास ठेवल्याने त्यांचा आज पराभव झाल्याचे मत देखील त्यांनी व्यक्त केले. या सुनावणी दरम्यान माझे मत मांडताना मी खूप जबाबदारीने बोललो होतो. उध्दवजींनी पक्षप्रमुख काम करताना स्वतःच्या पक्षाची घटना जर ते निवडणूक आयोगाकडे रजिस्टर करू शकले नसतील तर त्यांच्या ह्या घोडचुकीमुळे त्यांना हा आजचा पराभव स्वीकारावा लागला असल्याचे मत आमदार योगेश कदम यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले. तसेच हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचे रक्षण करण्यासाठी ज्या प्रयत्नांची पराकाष्ठा केली होती त्याचाच हा विजय असल्याचे मत देखील त्यांनी व्यक्त केले.

खरी शिवसेना शिंदेचीच – राहुल नार्वेकर

भरत गोगावले यांचा व्हिप वैद्य

महाराष्ट्राच्या इतिहासात प्रथमच विधासभा अध्यक्षांच्या हातात निकाल दिल्याची पहिलीच वेळ असून यांच्या निकालानंतर शिवसेना हा पक्ष कोणाचा हे निश्चित होणार होते. आज दि. 10 जानेवारी रोजी सायंकाळी 5 वा. सुमारास या निकालाचे वाचन विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सुरू केले. यावेळी त्यांनी खरी शिवसेना ही एकनाथ शिंदे यांचीच असल्याचे जाहीर करत भरत गोगावले यांनी बजावलेला व्हिप वैद्य असल्याचे ही सांगितले. विधसभा अध्यक्षांच्या निकालामुळे शिंदे गटाला दिलासा तर ठाकरे गटाला जबरदस्त धक्का बसला आहे.

या निकालाचे वाचन सुरू करण्यापूर्वी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मा. सुप्रीम कोर्टाचे आभार मानले. यावेळी मा. सुप्रीम कोर्ट यांनी महत्वाचे मार्गदर्शन केल्याबद्दल आभार मानले. तसेच यावेळी त्यांनी दोन्ही गटाच्या वकिलांचे आभार मानले. तसेच यावेळी त्यांनी पक्ष ठरवताना त्यांनी घटना, नेतृत्व आणि विधिमंडळ बहुमत हे घटक महत्वाचे असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. दोन्ही गटांमध्ये पक्षप्रमुख कोण यावरून मतांतर असून 2018 मधील शिवसेना पक्षाची घटना महत्वाची आहे. तसेच दोन्ही गटांनी मात्र वेगवेगळ्या घटना दिल्या आहेत. मात्र निवडणूक आयोगाने एक घटनेची प्रत दिली असून त्यावर कोणतीही तारिक नसल्याचे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी निकाल वाचना वेळी सांगितले. तसेच श्री. उध्दव ठाकरे यांनी दिलेल्या घटनेवर तारीख नसल्याचे ही त्यांनी यावेळी सांगितले. तसेच 2018 ला शिवसेना पक्षाची ठाकरेंकडून दिलेली घटना ही चुकीची आहे म्हणून निवडणूक आयोगाने दिलेली घटना वैद्य मनात असल्याचे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सांगितले. तसेच शिवसेना पक्षाची 1999 ची घटना मान्य करणार असल्याचे ही नार्वेकर यांनी यावेळी सांगितले. तसेच खरी शिवसेना कुणाची हे ठरविण्याचा अधिकार त्यांना स्वतःला असल्याचे ही यावेळी स्पष्ट केले.

निकाल वाचन करताना अध्यक्ष म्हणाले कि, २१ जून २०२२ रोजी शिवसेनेत दोन गट पडले. सेनेत २ गट पडल्याचं २२ जूनला निदर्शनास आले. पक्षात पक्षप्रमुखांपेक्षा राष्ट्रीय कार्यकारणी महत्त्वाची असते. पक्षप्रमुख एकटेच निर्णय घेऊ शकत नाही. पक्षप्रमुख कुणालाही पदावरून हटवू शकत नाही. कार्यकारणी ही पक्षात सर्वोच्च असते. त्यामुळे राष्ट्रीय कार्यकारणीचा निर्णय अंतिम असेल. त्यामुळे एकनाथ शिंदेंची हकालपट्टी मान्य करता येत नाही. पक्षप्रमुखाला सर्वोच्च अधिकार देणे हे लोकशाहीसाठी घातक आहे. पक्ष कुणाचा हे ठरवण्याचा अधिकार बहुमताला आहे. त्यामुळे केवळ ठाकरे किंवा शिंदे यांचे मत ग्राह्य धरता येणार नाही. सध्याच्या परिस्थितीनुसार एकनाथ शिंदेंकडे बहुमत असल्यानं शिंदे गटाला पक्ष म्हणून मान्यता देतो. भरत गोगावले यांची नियुक्ती वैध असल्याचा निकाल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सुनावला आहे.

विधानभवनातील सेंट्रल हॉलमध्ये या निकालाचे वाचन करण्यात आले. यावेळी ठाकरे-शिंदे या दोन्ही गटाचे आमदार उपस्थित होते. हे निकालपत्र १२०० पानांचे असले तरी त्यातील ठळक मुद्दे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी सभागृहात वाचून दाखवले. या प्रकरणाची सुनावणी घेताना माझ्यासमोर खरी शिवसेना कुणाची आणि व्हिप कुणाचा हा मुद्दा होता. घटना, नेतृत्व आण विधिमंडळ पक्ष हे तीन घटक महत्त्वाचे होते. माझ्यासमोर दोन्ही गटाने पुरावे सादर केले. शिवसेनेच्या पक्ष घटनेचाही विचार निकषात केला गेला आहे. निकाल देताना शिवसेनेची २०१८ ची घटना लक्षात घेतली. विधिमंडळातील बहुमतदेखील ग्राह्य धरले गेले. दोन्ही गटात पक्षप्रमुखपदावरून मतभेद आहेत. त्यामुळे राजकीय पक्ष कोणता हे प्रथमदर्शनी ठरवले गेले. पक्ष कुणाचा याबाबत निवडणूक आयोगाने घेतलेला निर्णय विचारात घेतला गेला.

तसेच निवडणूक आयोगाच्या निर्णयानुसार एकनाथ शिंदे गटाकडे असलेली शिवसेना खरी आहे. निवडणूक आयोगाचा हा निर्णय मी लक्षात ठेवला. २०१८ मध्ये पक्षात निवडणूक न घेता नियुक्त्या करण्यात आल्या. त्यामुळे २०१८ मधील बदल ग्राह्य धरता येत नाही. निवडणूक आयोगाने २०२३ मध्ये घटना देण्यात आली. माझी न्यायकक्षा मर्यादित असल्याने पक्षाचा प्रमुख कोण हे मी ठरवणार आहे. पक्षप्रमुख नव्हे तर राष्ट्रीय कार्यकारणीचा फैसला अंतिम असल्याचं सांगत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी ठाकरे गटाचा दावा फेटाळला. पक्षप्रमुखांचे मत अंतिम यावर मी सहमत नाही. त्यामुळे उद्धव ठाकरेंकडून एकनाथ शिंदेंची झालेली हकालपट्टी अमान्य आहे असंही राहुल नार्वेकरांनी सांगितले.

खेडमध्ये स्टेरिंग छोडो आंदोलनाचा पहिला दिवस शांततेत पार


चालकांचा हार आणि श्रीफळ देत अनोखे आंदोलन

ओन्ली ड्रायव्हर भाऊ मदत संघ सामाजिक संस्थेच्या खेडच्या पदाधिकारी व सदस्यांनी 9 जानेवारी पासून स्टेरिंग छोडो आंदोलन सुरू केले आहे.

आज आंदोलनाच्या पहिल्या दिवशी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी खेड भरणे मार्गावर एकत्र येवून प्रवास करणाऱ्या वाहन चालकांना या काळ्या कायद्याची माहिती दिली. तसेच यावेळी त्यांनी चालकांचा हार आणि श्रीफळ देवून सत्कार करत त्यांना आंदोलनाचे महत्व पटवून दिले.

यावेळी खेड शहरातील चालक मालक तसेच विविध चालक संघटना सहभागी झाल्या होत्या. या काळ्या कायद्याला विरोध करण्यासाठी खेड शहरातील विविध संघटना एकत्र आल्याचे चित्र यानिमित्ताने पहावयास मिळाले. या आंदोलनावेळी त्यांनी खेड भरणे मार्गावरून प्रवास करणाऱ्या मालवाहू चालकांना या कायद्याची माहिती पटवून दिली.

कोणत्याही प्रकारचा गोंधळ गडबड व वादविवाद न करता हे आंदोलन शांततेत पार पडावे यासाठी संघटनेचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते प्रयत्न करत असल्याचे पहावयास मिळाले. या आंदोलनामुळे प्रशासनाला व सर्वसामान्य जनतेला तसेच वाहन धारकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये याची विशेष काळजी घेतली जात होती.

Continue reading “खेडमध्ये स्टेरिंग छोडो आंदोलनाचा पहिला दिवस शांततेत पार”

आज रात्री 12 पासून स्टेरिंग छोडो करत चालकांचे चक्का जाम आंदोलन

भारत सरकारने काढलेल्या हिट अँड रन कायद्याविरोधात आक्रमक होत आता खेड तालुक्यातील ओन्ली ड्रायव्हर भाऊ मदत संघ सामाजिक संस्थेच्या सभासदांनी आज 9 जानेवारी रोजी रात्री 12 वाजल्यापासून स्टेरिंग छोडो आंदोलन पुकारले आहे.

यावेळी या वाहन चालकांनी स्टेरिंग बंद ठेवून चक्का जाम करण्याचा इशारा निवेदनाद्वारे प्रशासनाला दिला आहे. या संदर्भातील निवेदन त्यांनी आज खेड तहसीलदार, प्रांत कार्यालय खेड व पोलीस स्थानक खेड यांना दिले आहे. यावेळी ओन्ली ड्रायव्हर भाऊ संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उस्थित होते. तसेच त्यांनी या वेळी खेड तलुक्यातील इतर वाहन चालकांना भेटून त्यांनीही या आंदोलनाला पाठिंबा देण्याची विनंती केली. यावेळी इतर वाहन चालक संघटनेने त्यांना पाठिंबा देण्याचे कबूल केल्याचे ही ओन्ली ड्रायव्हर भाऊ संघटनेच्या खेड तालुका पदाधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.

राज ठाकरे यांनी केले काही क्षणात ट्रॉफिक केले क्लिअर

पुणे येथील पिंपरी चिंचवड येथे सुरू असलेल्या शंभराव्या अखिल भारतीय नाट्य संमेलनाचा कार्यक्रम आटोपून मुबईच्या दिशेने परतत असताना खालापूर टोल नाक्यावर हजारो वाहने अडकून पडली होती.

त्यामध्ये एक रुग्णवाहिका देखील अडकली होती. सुमारे 5 किलोमीटर पर्यंत लाबंच लांब रांगा पुणे मुंबई एक्स्प्रेस वे वरील खालापूर टोलनाक्याजवळ लागल्या होत्या. या ट्रॉफीक जाम मध्ये रुग्ण वाहिका देखील अडकल्याने नागरिकांसह रुग्णांना व त्यांच्या नातेवाइकांना नाहक त्रास सहन करावा लागत असल्याचे मनसे अध्यक्ष श्री. राजसाहेब ठाकरे यांनी पाहिले. यावेळी त्यांना नागरिकांना व रुग्णांना होणार नाहक त्रास न पहवल्याने त्यांनी स्वतः आपल्या गाडीतून खाली उतरून खलापुर टोल नाक्यावरील ट्रॅफिक काही क्षणात मोकळे केले. यावेळी त्यांनी खास आपल्या शैलीत ठाकरी बाणा दाखवून नागरिकांची होणारी गैरसोय दूर केली. तसेच यावेळी टोलनाका प्रशासनाला मनसे स्टाईलने दणका देत चांगलाच ठाकरी बाणा दाखवला.

या सर्व घटनेचे साक्षीदार असलेले अभिनेते सिद्धार्थ जाधव यांनी देखील राज साहेबांच्या भूमिकेवर आणि या सर्व प्रकारावर आपले मत व्यक्त केले आहे.

खेड शिवतर रोडवर ट्रक जळून खाक

खेड तालुक्यातील अंबये येथे खेड शिवतर मार्गावर खेड शहरातील ट्रान्सपोर्ट व्यवसायिकाचा ट्रक जळून खाक झाल्याची घटना घडली.

ही घटना शनिवारी सायंकाळच्या सुमारास घडली.

या घटनेत ट्रक जळून खाक झाल्यामुळे ट्रान्सपोर्ट व्यवसायिकाचे मोठे नुकसान झाले आहे.

ही आग नेमकी कशामुळे लागली हे स्पष्ट झाले नसले तरी शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचे बोलले जात आहे.

खुप छान आहेत कोंकणकर – गौतमी पाटील

खुप छान आहेत कोंकणकर असे म्हणत प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटील यांनी आपली प्रतिक्रिया दिली. त्या खेड शहरातील लायन्स फेस्टिवल या कार्यक्रमात उपस्थित राहण्यासाठी आल्या असता त्यांनी पत्रकारांशी बोलताना हे मत व्यक्त केले.यावेळी त्यांनी सध्या माझे कोंकणात बरेचसे कार्यक्रम झाले असून कोणत्याही कार्यक्रमात गडबड गोंधळ झाला नसल्याचे सांगत कोंकणात खुप चांगला प्रतिसाद मिळतो. खुप छान आहेत कोंकणकर म्हणत त्यांनी कोंकणी लोकांनी मला खूप प्रेम दिले असून यापुढे ही त्यांचे प्रेम व सहकार्य मिळावे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

गौतमी पाटील

हिट अँड रन कायद्याबाबत 9 जानेवारीपासून महाराष्ट्र बंदची हाक


मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेंना खेडमध्ये दिले निवेदन


हिट अँड रन कायद्याबाबत ओन्ली ड्रायव्हर भाऊ मदत संघ सामाजिक संस्था यांनी 9 जानेवारीपासून बेमुदत महारष्ट्र बंदची हाक दिली आहे. या संदर्भातील निवेदन संघटनेच्या खेड तालुक्यातील पदाधिकाऱ्यांनी दि. 5 जानेवारी रोजी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांना दिले. ते एका खासगी कार्यक्रमासाठी खेड येथे आले होते.

केंद्रीय गृहमंत्री मा. अमित शहा यांनी लागू केलेला हिट अँड रन चा जो नवीन नियम आहे त्या नुसार महामार्गावर कोणतीही दुर्घटना झाल्यानंतर ड्रायव्हर घटनास्थळावरून पळून गेल्यास त्याला 7 लाख रुपये दंड व 10 वर्षे कारावास अशी शिक्षा करण्याची तरतूद केली आहे. हा नियम चालक बांधवांना मान्य बसून तो रद्द करावा यासाठी ओन्ली ड्रायव्हर भाऊ मदत संघ सामाजिक संस्था 9 जानेवारी रोजी रात्री 12 वाजता जिथे असेल तिथे वाहन सोडून स्टेरिंग छोडो आंदोलन सुरू करणार आहे.

हिट अँड रन कायद्याबाबत ओन्ली ड्रायव्हर भाऊ मदत संघ सामाजिक संस्था यांनी 1 जानेवारी रोजी स्टेरिंग छोडो आंदोलनाची हाक दिली होती. यानंतर झालेल्या चर्चेतून काही संघटनेने संपातून माघार घेतली. मात्र ओन्ली ड्रायव्हर भाऊ मदत संघ सामाजिक संस्था यांनी चालकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने कोणतेही लेखी आश्वासन न मिळाल्यामुळे ओन्ली ड्रायव्हर भाऊ मदत संघ सामाजिक संस्था यांनी येत्या 9 जानेवारी रोजी रात्री 12 वाजल्यापासून बेमुदत महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. या संधर्भात अधिक माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला असता संघटनेचे संस्थापक अध्यक्ष श्री. हनुमंत माने यांनी महाराष्ट्रातील ट्रान्सपोर्ट व्यवसायिकांचा बंद असणार आहे. यासाठी ज्यांच्याकडे वाहन चालविण्याचा परवाना आहे त्यांनी देखील या आंदोलनाला पाठिंबा देण्याचे आवाहन टाईम्स मराठी न्यूज शी बोलताना केले. तसेच या निवेदनामध्ये स्टेरिंग छोडो आंदोलनातून केवळ रुग्णवाहिका आणि स्कूल बस यांना सोडण्यात येईल असे स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे. तसेच या आंदोलनाची दखल घेवून खासगी कार चालक, बस , रिक्षा चालक यांनी दक्षता घ्यावी असे आवाहन ही केले आहे. तसेच संघटनेच्या वतीने सर्व पदाधिकारी व सदस्यांना हे आंदोलन शांततेत करण्याची विनंती ही या निवेदनाद्वारे केली आहे.

खेडमध्ये गादी कारखाना आगीत जाळून खाक


सुसेरी नंबर 2 येथील घटना

खेड शहरानजीक असणाऱ्या सुसरी नंबर 2 येथील गादी कारखान्याला आज गुरुवार दिनांक 4 जानेवारी सायंकाळच्या सुमारास आग लागून दुर्घटना घडली.

या दुर्घटनेत हा गादी कारखाना जळून पूर्णपणे खाक झाला. या आगीत कारखान्याचे नेमके किती रुपयांचे नुकसान झाले याची माहिती मिळू शकली नाही. मात्र शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचे प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे. या आगीची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थांनी ही आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. सायंकाळी 5.30 वा. च्या सुमारास ही दुर्घटना घडल्याचे समजते.

खवटी येथे टेम्पो ट्रॅव्हलरला भीषण अपघात, 10 गंभीर जखमी

मुंबई गोवा महामार्गावर खावटी येथे गोव्याहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या टेम्पो ट्रॅव्हलरला सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास अपघात झाला.

या अपघात 10 जण गंभीर जखमी झाले असून त्यांना अधिक ऊपचारासाठी पनवेल येथील MGM रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

या टेम्पो ट्रॅव्हल्स मधून प्रवास करणारे सर्वजण अमरावती येथील असल्याचे समजते. हे सर्वजण गोव्याहून अमरावतीत परतत असताना हा अपघात झाला.

या अपघातातील जखमींना तत्काळ कलंबनी उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असता येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना अधिक उपचारासाठी इतरत्र हलविण्यास सांगितले.

ताज्या घडामोडींची माहिती मिळवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

https://chat.whatsapp.com/GLTelFIlDpf6jmG3psLC8Z

वाहन चालकांच्या संपला यश, हिट अँड रन कायदा लागू होणार नाही, संप मागे

केंद्रीय गृह मंत्रालय आणि ट्रान्सपोर्ट संघटनेच्या बैठकी नंतर हिट अँड रन चा कायदा अद्याप लागू झालेला नसून ट्रान्सपोर्ट संघटनांनी चालकांना कामावर येण्याचं आवाहन केलं आहे. सरकारसोबतच्या बैठकीनंतर हा संप मागे घेण्यात आलाय.

केंद्र सरकारने ‘हिट अँड रन’ कायद्यात केलेल्या बदलांविरोधात देशभरात ट्रक चालकांनी संप पुकारला होता. या संपामुळे गेल्या दोन दिवसांपासून देशभरातील लोकांचे हाल झाले. याबाबत केंद्रीय गृहसचिव अजय भल्ला यांच्यासमवेत गृह मंत्रालयात राष्ट्रीय परिवहन संघटनेची बैठक झाली. यावेळी सरकारकडून आश्वासन मिळाल्यानंतर संघटनेने संप मागे घेण्याचे मान्य केले आहे. अखेर या वाहन चालकांच्या संपामुळे सरकारला आपला निर्णय मागे घेण्यास भाग पडल्याने वाहन चालकांच्या संपला यश आले आहे.

ताज्या घडामोडींची माहिती मिळवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

https://chat.whatsapp.com/GLTelFIlDpf6jmG3psLC8Z

रत्नागिरी जिल्ह्यात 4 जानेवारी पासून स्कूल बसची वाहतूक देखील बंद होणार

संग्रहित फोटो

देशात नव्याने लागू झालेला हिट & रन कायदा लागू झाल्यानंतर देशातील ट्रक चालकांनी वाहतूक बंद करून आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनात सहभागी होत आता स्कूल बस धारकांनी देखील रत्नागिरी जिल्ह्यात सर्वत्र 4 जानेवारीपासून विद्यार्थ्यांची वाहतूक बंद करण्याचा निर्णय घेणार असल्याचे खात्रीलायक वृत्त समजते. उद्या या संदर्भात स्कूल बस चालक आपापल्या शाळेत याबाबतची कल्पना देणार असल्याचे ही समजते.

देशात लागू झालेला काळा कायदा हिट अँड रनला आता सर्व वाहन चालकमधून प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येत आहे. या कायद्याविरोधात केवळ ट्रक चालक एकत्र येवून त्यांनी स्टेरिंग छोडो आंदोलन सुरू केलेले आहे. आता या आंदोलनात सर्व स्तरातून पाठिंबा मिळत असून सर्वसामान्य जनता ही आता चालकांच्या पाठीशी उभी असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. आता या आंदोलनाला पाठिंबा देत त्या मध्ये स्टेरिंग छोडो आंदोलनात आता स्कूल बस चालक ही सहभागी होणार आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातील स्कूल बस चालक हे 3 जानेवारी रोजी सायंकाळ पर्यंत हा निर्णय रद्द होतो की बदलला जातोय याची वाट पाहणार आहेत. यानंतर मात्र ते ही या आंदोलनात सहभागी होवून स्कूल बसची वाहतूक थांबवणार असल्याचे खात्रीशीर वृत्त समोर येत आहे. या संदर्भात ते उद्या जिल्ह्यातील विविध शाळांमध्ये या संदर्भात कल्पना देणार आहेत. मात्र ही कल्पना ते लेखी स्वरूपात देणार की तोंडी स्वरूपात हे मात्र स्पष्ट झालेले नाही . जर सरकारने हे आंदोलन थांबवले नाही तर पुढे हे आंदोलन उग्र स्वरूप धारण करेल यात मात्र काही शंका नाही.

आमच्या व्हॉट्स ॲप ग्रुपमध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंक क्लिक करा https://chat.whatsapp.com/GLTelFIlDpf6jmG3psLC8Z

रत्नागिरी जिल्ह्यात 4 जानेवारी पासून स्कूल बसची वाहतूक देखील बंद होणार

संग्रहित फोटो

देशात नव्याने लागू झालेला हिट & रन कायदा लागू झाल्यानंतर देशातील ट्रक चालकांनी वाहतूक बंद करून आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनात सहभागी होत आता स्कूल बस धारकांनी देखील रत्नागिरी जिल्ह्यात सर्वत्र 4 जानेवारीपासून विद्यार्थ्यांची वाहतूक बंद करण्याचा निर्णय घेणार असल्याचे खात्रीलायक वृत्त समजते. उद्या या संदर्भात स्कूल बस चालक आपापल्या शाळेत याबाबतची कल्पना देणार असल्याचे ही समजते.

देशात लागू झालेला काळा कायदा हिट अँड रनला आता सर्व वाहन चालकमधून प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येत आहे. या कायद्याविरोधात केवळ ट्रक चालक एकत्र येवून त्यांनी स्टेरिंग छोडो आंदोलन सुरू केलेले आहे. आता या आंदोलनात सर्व स्तरातून पाठिंबा मिळत असून सर्वसामान्य जनता ही आता चालकांच्या पाठीशी उभी असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. आता या आंदोलनाला पाठिंबा देत त्या मध्ये स्टेरिंग छोडो आंदोलनात आता स्कूल बस चालक ही सहभागी होणार आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातील स्कूल बस चालक हे 3 जानेवारी रोजी सायंकाळ पर्यंत हा निर्णय रद्द होतो की बदलला जातोय याची वाट पाहणार आहेत. यानंतर मात्र ते ही या आंदोलनात सहभागी होवून स्कूल बसची वाहतूक थांबवणार असल्याचे खात्रीशीर वृत्त समोर येत आहे. या संदर्भात ते उद्या जिल्ह्यातील विविध शाळांमध्ये या संदर्भात कल्पना देणार आहेत. मात्र ही कल्पना ते लेखी स्वरूपात देणार की तोंडी स्वरूपात हे मात्र स्पष्ट झालेले नाही . जर सरकारने हे आंदोलन थांबवले नाही तर पुढे हे आंदोलन उग्र स्वरूप धारण करेल यात मात्र काही शंका नाही.

रत्नागिरी जिल्ह्यात 4 जानेवारी पासून स्कूल बसची वाहतूक देखील बंद होणार

संग्रहित फोटो

देशात नव्याने लागू झालेला हिट & रन कायदा लागू झाल्यानंतर देशातील ट्रक चालकांनी वाहतूक बंद करून आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनात सहभागी होत आता स्कूल बस धारकांनी देखील रत्नागिरी जिल्ह्यात सर्वत्र 4 जानेवारीपासून विद्यार्थ्यांची वाहतूक बंद करण्याचा निर्णय घेणार असल्याचे खात्रीलायक वृत्त समजते. उद्या या संदर्भात स्कूल बस चालक आपापल्या शाळेत याबाबतची कल्पना देणार असल्याचे ही समजते.

देशात लागू झालेला काळा कायदा हिट अँड रनला आता सर्व वाहन चालकमधून प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येत आहे. या कायद्याविरोधात केवळ ट्रक चालक एकत्र येवून त्यांनी स्टेरिंग छोडो आंदोलन सुरू केलेले आहे. आता या आंदोलनात सर्व स्तरातून पाठिंबा मिळत असून सर्वसामान्य जनता ही आता चालकांच्या पाठीशी उभी असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. आता या आंदोलनाला पाठिंबा देत त्या मध्ये स्टेरिंग छोडो आंदोलनात आता स्कूल बस चालक ही सहभागी होणार आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातील स्कूल बस चालक हे 3 जानेवारी रोजी सायंकाळ पर्यंत हा निर्णय रद्द होतो की बदलला जातोय याची वाट पाहणार आहेत. यानंतर मात्र ते ही या आंदोलनात सहभागी होवून स्कूल बसची वाहतूक थांबवणार असल्याचे खात्रीशीर वृत्त समोर येत आहे. या संदर्भात ते उद्या जिल्ह्यातील विविध शाळांमध्ये या संदर्भात कल्पना देणार आहेत. मात्र ही कल्पना ते लेखी स्वरूपात देणार की तोंडी स्वरूपात हे मात्र स्पष्ट झालेले नाही . जर सरकारने हे आंदोलन थांबवले नाही तर पुढे हे आंदोलन उग्र स्वरूप धारण करेल यात मात्र काही शंका नाही.

खेडमध्ये चालकांचे चक्का जाम आंदोलन, 4 तारखेनंतर आंदोलन तीव्र होणार

https://bit.ly/3NMcvhk

केंद्र सरकारने लागू केलेला हिट अँड रन या काळ्या कायद्याविरोधात देशभर सर्वत्र चालकांचे आंदोलन सुरू असल्याचे पहावयास मिळत आहे. यामध्ये खेड तालुक्यातील चालक ही मोठ्या संख्येने सहभागी झाले आसुन त्यांनी ही चक्का जाम आंदोलनात स्टेरिंग छोडो करत आपापल्या गाड्यांना ब्रेक लावत या आंदोलनात सहभाग नोंदवला आहे. 3 तारखेला या आंदोलनाबाबत अंतिम निर्णय होणार असून हा निर्णय शासनाने मागे न घेतल्यास 4 तारखेनंतर मात्र हे आंदोलन तीव्र होणार असल्याचे मत वाहनचालकांनी व्यक्त केले आहे.

केंद्र सरकारने जाहीर केलेल्या हिट अँड रन कायद्याला विरोध करण्यासाठी खेड तालुक्यातील चालकांनी एकत्रित येत आज 2 जानेवारी रोजी सकाळी तहसील कार्यालय खेड येथून भरणे नका पर्यंत निषेध रॅली काढत निषेध नोंदवला. यावेळी त्यांनी भरणे नाका येथील विविध वाहन चालकांशी बोलून त्यांना या कायद्याविषयी माहिती दिली. यावेळी त्यांनी हा कायदा लायसन्स असणाऱ्या प्रत्येकाला लागू होणार असून तो मग ट्रक चालक आसो की दुचाकी चालक सर्वानाच लागू होणार असल्याचे सांगितले. त्यामुळे या कायद्यानुसार होणाऱ्या शिक्षेची तरतूद ही सर्वांसाठी सारखी असल्याचे सांगत हा कायदा रद्द होण्याची मागणी केली.

https://bit.ly/3NP0wzI

तसेच यावेळी त्यांनी आमदार खासदार यांच्या चालकांनी सर्वप्रथम स्टेरिंग छोडो या आंदोलनात सहभागी होण्याची गरज असल्याचे मत यावेळी व्यक्त केले. तसेच स्वतः आमदार खासदार मत्र्यांनी आपली वाहने स्वतः चालवावी म्हणजे त्यांना ड्रायव्हरच्या वेदना काय असतात ते समजून येतील. तसेच कोणताही ड्रायव्हर हा जाणीवपूर्वक अपघात करत नसून अपघात हा अचानकपणे घडतो. त्यावेळी मोठ्या वाहनचालकांना अपघात स्थळावरून पळून गेले नाही तर जनतेचा रोष ओढवून घेवून मार खवा लागतो. त्यामुळे सरकारने अपघातानंतर चालकांना होणाऱ्या मारहानीबाबत कठोर कायदा बनवावा म्हणजे कोणताही ड्रायव्हर अपघात स्थळा वरून पलायन करणार नाही असे मत ही त्यांनी यावेळी व्यक्त केले.

आमच्या what’s app ग्रुपमध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक क्लिक करा https://chat.whatsapp.com/GLTelFIlDpf6jmG3psLC8Z

आता झटपट कर्ज मिळवा ते ही तुमच्या मोबाईलवरून https://track.skro.in/l1/IT218JWSUJ/250ELY?ln=English

खेड मधील चालकांचे “स्टेरिंग छोडो” आंदोलन करीत चक्का जाम करण्याचा इशारा

Hit &Run कायद्याविरोधात खेड तालुक्यातील चालकांनी हा कायदा रद्द करावा अशी मागणी करणारे निवेदन आज दि. 1 जानेवारी रोजी खेड तहसील कार्यालात दिले. या निवेदनाद्वारे त्यांनी हा काळा कायदा रद्द केला नाही तर चालकांनी “स्टेरिंग छोडो” आंदोलन करीत चक्का जाम करण्याचा इशारा प्रशासनाला दिला.

वर्तमान गृहमंत्र्यांनी अचानक हा हिट अँड रन कायदा पारित केला असून या कायद्यानुसार अचानक झालेल्या अपघाताला जबाबदार असलेल्या ड्रायव्हरला 10 वर्षे कारावास आणि 7 लाख रुपये दंड अशा स्वरूपाची शिक्षा असल्याने हा कायदा वाहन चालक बांधवांना मान्य नसल्याचे त्यांनी निवेदनात नमूद केला आहे. कारण कोणताही चालक अपघात हा जाणून बुजून करीत नाही. तर चालक हा देशाच्या अर्थ व्यवस्थेचा कणा आहे. या कायद्यामुळे चालकांचे कुटुंब उद्ध्वस्त होतील तर देशाची अर्थव्यवस्था ही ढासळू शकते. यामुळे हा काळा कायदा रद्द करण्यात यावा यासाठी “ड्रायव्हर भाऊ महिला कुटुंब आधार सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य” व “ड्रायव्हर भाऊ मदत संघ सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य” च्या सभासदांच्या वतीने खेड येथील तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी कार्यालयात निवेदन सादर करण्यात आले. तसेच या निवेदनाद्वारे त्यांनी हा काळा कायदा रद्द झाला नाही तर “स्टेरिंग छोडो” आंदोलन करत चक्का जाम करण्याचा इशारा ही त्यांनी यावेळेस दिला.

https://chat.whatsapp.com/GLTelFIlDpf6jmG3psLC8Z

आता मिळावा झटपट कर्ज https://track.skro.in/l1/ITC91664024/250ELY?ln=English

रत्नागिरीत एस. टी. पथसंस्थेवर महाराष्ट्र एस. टी. कामगार संघटनेची बाजी

उमेश खेडेकर यांची संचालकपदी निवड

रत्नागिरी जिल्हयातील एस. टी .कर्मचारी सहकारी पतसंस्थेच्या निवडणुकीत ॲड. गुणरत्न सदावर्ते यांच्या स्वाभिमानी कष्टकरी जनसंघाच्या पॅनलचा दारुण पराभव करीत महाराष्ट्र एस.टी. कामगार संघटनेने विजय मिळवला आहे. यावेळी पॅनलमधील ११ उमेदवार प्रचंड मतांनी विजयी झाले आहेत. यामध्ये खेड स्थानकाचे कर्मचारी उमेश खेडेकर यांची ही संचालकपदी निवड झाली आहे.

रत्नागिरी एस.टी. कर्मचारी पतसंस्थेच्या निवडणुकीची मतदान प्रक्रिया सकाळी ९ वाजता रत्नागिरी येथील सहाय्यक निबंधक कार्यालयात पार पडली होती. गेल्या एस. टी. बँक निवडणुकीत सदावर्तेनी आमिषं देऊन, खोटं बोलून सत्ता मिळवली होती. एसटी को-ऑप बँकेत सभासदांना निवडणुकी पूर्वी दिलेली सर्व वचने फोल ठरल्याने तसेच ठेवीदारांचा देखील एसटी बँकेवर निवडून आलेल्या संचालक मंडळ तसेच सदावर्तेवर विश्वास नसल्याने मोठ्या प्रमाणात बँकेतील ठेवी मुदत पूर्व काढल्याने बँक आर्थिक अडचणीत आली असून लवकरच प्रशासक बसण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. तसेच सदावर्ते वर त्यांच्याच संचालकांचा देखील विश्वास राहिला नसल्याचे चित्र दिसत आहे. याचं पार्श्वभूमीवर एसटी कर्मचारी पतसंस्थेच्या निवडणुकीत सभासदांनी कुठल्याही भूलथापांना बळी न पडता मान्यताप्राप्त कामगार संघटनेच्या सर्व उमेदवारांना बहुमताने निवडून दिले आहे.

कर्मचारी पतसंस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आहे. या निवडणुकीत मान्यताप्राप्त एसटी कामगार संघटनेचे सर्व उमेदवार मोठ्या मताधिक्याने निवडून आले आहेत. तर सदावर्ते पॅनल मधील सर्व उमेदवारांचा मोठ्या फरकाने पराभव झालेला आहे.सदर निवडणुकीत संघटनेचे सरचिटणीस मा. ताटे साहेब, केंद्रीय अध्यक्ष मा. संदीप शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली श्री रवी लवेकर (विभागीय सचिव), श्री राजू नाना मयेकर, (विभागीय अध्यक्ष), श्री शेखर सावंत (विभागीय कार्याध्यक्ष), श्री संदेश सावंत या सर्व पदाधिकाऱ्यांनी संघटनेचे दिशा-धोरणे योग्य पद्धतीने सभासदां पर्यंत पोहचवले. अनेक कार्यकर्त्यांनीही बरीच मेहनत घेतली. या सर्व सांघिक चळवळी मुळे आजचा निकाल संघटनेच्या बाजूने लागला आहे. या निवडणुकीत एस. टी. कामगार संघटनेच्या कामाच्या बळावर मान्यताप्राप्त असलेल्या एस. टी. कामगार संघटनेचे रत्नागिरी पतसंस्थेच्या निवडणुकीत आरिफ काझी, अनिल चव्हाण, अभय जुवले, राजेंद्र पाटोळे, समीर शिंदे, निलेश इंदुलकर, रमेश राठोड, उमेश खेडेकर, मनाली साळवी, दिप्ती झेपले आदी 11 उमेदवार भरघोस मतांनी निवडून आले.

सदर निवडणुकीत संघटनेचे सरचिटणीस मा. ताटे साहेब, केंद्रीय अध्यक्ष मा. संदीप शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली श्री रवी लवेकर (विभागीय सचिव), श्री राजू नाना मयेकर, (विभागीय अध्यक्ष), श्री शेखर सावंत (विभागीय कार्याध्यक्ष), श्री संदेश सावंत या सर्व पदाधिकाऱ्यांनी संघटनेचे दिशा-धोरणे योग्य पद्धतीने सभासदां पर्यंत पोहचवले. अनेक कार्यकर्त्यांनीही बरीच मेहनत घेतली. या सर्व सांघिक चळवळी मुळे आजचा निकाल संघटनेच्या बाजूने लागला आहे. या निवडणुकीत एस. टी. कामगार संघटनेच्या कामाच्या बळावर मान्यताप्राप्त असलेल्या एस. टी. कामगार संघटनेचे रत्नागिरी पतसंस्थेच्या निवडणुकीत आरिफ काझी, अनिल चव्हाण, अभय जुवले, राजेंद्र पाटोळे, समीर शिंदे, निलेश इंदुलकर, रमेश राठोड, उमेश खेडेकर, मनाली साळवी, दिप्ती झेपले आदी 11 उमेदवार भरघोस मतांनी निवडून आले.

किती वेळ मोबाईल वापरता याची माहिती नवीन वर्षात सरकार गोळा करणार

भारत सरकारने आता देशातील नागरिकांच्या जीवनमानाचा अभ्यास करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे आता तुमची खासगी माहिती राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाच्या माध्यमातून गोळा केली जाणार असून याची सुरवात नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी म्हणजेच 1 जानेवारी 2024 रोजी होणार आहे. 1 जानेवारी पासून संपूर्ण देशभरातून माहिती गोळा करण्यास सुरवात करण्यात येणार असून हा उपक्रम संपूर्ण वर्षभर चालणार आहे. यासाठी एक विशेष तयार केले जाणार आहे.

1 जानेवारी ते 31 डिसेंबर 2024 पर्यंत चालणाऱ्या या सर्वेक्षणाला “वेळेचा उपयोग सर्वेक्षण” असे नाव देण्यात आले आहे. या सर्वेक्षणामध्ये प्रत्येक गावातील तसेच मोठ्या शहरातील प्रत्येक वार्डमधील 14 कुटुंबांचे सर्वेक्षण केले जाणार आहे. यासाठी जनगणने प्रमाणे प्रत्येक घरात जावून माहिती जमा न करता प्रातिनिधिक स्वरूपात ठराविक घरामधील व्यक्तींची माहिती गोळा केली जाणार असल्याचे समजते. तसेच हे सर्वेक्षण Random Sampling पद्धतीत होणार असल्याचे ऐकावयास मिळत आहे. या सर्व्हेमध्ये निवडलेल्या घरातील व्यक्ती पहाटे 4 वाजल्यापासून दुसऱ्या दिवशी पहाटे 4 वाजेपर्यंत किती वेळ कोणते काम करते याची माहिती घेतली जाणार असून त्यासोबत दिवसभरातील किती वेळ मोबाईलवर घालवते याची देखील माहिती गोळा केली जाणार आहे. या सर्वेक्षणासाठी राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाच्या माध्यमातूनगोळा केल्या जाणाऱ्या माहितीची प्रश्नावली देखील तयार करण्यात आल्याचे समजते.

खेड शहरातील अनधिकृत विनापरवाना उभारलेले बॅनर न. प. काढणार

खेड शहरात लावण्यात विनापरवाना बॅनर खेड नगर पालिका लवकरच काढणार आसून या बाबत खेड शहरातील काही सुज्ञ आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी खेड नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांच्याकडे दूरध्वनीवरून चर्चा करून विनंती केली आहे.

खेड शहर आणि परिसरात सध्या सर्वत्र विविध प्रकारचे बॅनर झळकत असताना पहावयास मिळत आहेत. या बॅनरमुळे विविध ठिकाणी अतिक्रमण केले आहे. हे बॅनर उभारणारे मात्र बॅनर उभारताना खेड नगर पालिकेचे परवानगी घेण्यास मात्र विसरत असल्याचे चित्र समोर येत आहे. आता हे बॅनर उभारणारे खेड न. प. ची परवानगी घेण्यास विसरत आहेत की जाणीवपूर्वक घेत नाहीत हे बॅनर उभरणाऱ्यानाच माहीत. मात्र या सर्व गोष्टींची कल्पना खेड शहरातील काही सुज्ञ नागरिकांनी खेड न. प. चे. मुख्याधिकारी यांना दुरध्वनीवरून दिली. यावेळी त्यांनी या गोष्टीची दखल घेवून लवकरात लवकर कारवाई करून खेड शहरात उभारण्यात आलेले विनापरवाना बॅनर उतरविण्याचे आश्वासन दिले. यामुळे खेड शहरात सर्वत्र दिसत असलेले बॅनर उतरणार की फक्त विनापरवाना बॅनर हटविणार हे मात्र खेड न. प. च्या कारवाई नंतरच स्पष्ट होईल.

बॅनर वादामागे विविध कारणे चर्चेत

गेल्या काही दिवसांपूर्वी खेड बस स्थानक परिसरात झालेल्या दोन सामाजिक संस्थेमधील वादाचे मुख्य कारण अद्यापही अस्पष्ट असले तरी विविध करणे मात्र नाक्या नाक्यावर चर्चिली जात आहेत.

गेल्या काही दिवसांपूर्वी खेड शहरातील बस स्थानक परिसरात दोन सामाजिक संस्थेचे कार्यकर्ते व एका राजकीय पक्षाचे पदाधिकारी हे वाद करताना दिसून आले होते. मात्र या प्रकरणी दोन्ही सामाजिक संस्थेकडून कोणत्याही प्रकारचा अधिकृतपणे खुलासा करण्यात आलेला नाही. यामुळे या वादाचे नेमके कारण काय? याचे उत्तर खेड वासियांना अद्यापही मिळालेले नसले तरी विविध चर्चांना मात्र नाक्या नाक्यावर ऊत आलेला पहावयास मिळत आहे. यामध्ये काहीजण दोन्ही संस्थेत असलेले राजकीय पदाधिकारी यांच्यातील मनोरंजनाच्या कार्यक्रमाच्या उद्घाटनाचा श्रेयवाद, तर काही ठिकाणी जुने वैचारिक मतभेद तसेच या बॅनर वादावेळी एकच समाजातील कार्यकर्ते असणाऱ्यांनी सामाजिक मत भेदमुळे हा वाद झाल्याचे चर्चिले जात आहे. यामध्येच एका संस्थेच्या सदस्यांनी आमचे एकमेकांना सहकार्य असून त्यांचा पहिलाच कार्यक्रम आहे. त्यांना आम्ही मदत करीत आहोत असे सांगत असले तरी त्यांचे बोलणे एक आणि वागणे एक असल्याचे चर्चिले जात आहे. मात्र या सर्व प्रकरणी दोन्ही संस्थेपैकी किमान एकाने तरी यावर आपली भूमिका स्पष्ट करून खेड वासियांना या वादामागचे खरे कारण स्पष्ट करणे गरजेचे असल्याचे मत खेड वासियांमधून व्यक्त करण्यात येत आहे.

https://chat.whatsapp.com/GLTelFIlDpf6jmG3psLC8Z

खेडमध्ये खोटे दागिने ठेवून बँकेतून 37.5 लाखांच्या कर्जप्रकरणी 10 जणांवर गुन्हा दाखल

खेड शहरातील आय. डी. बी. आय. बँकेत खोटे बनावट दागिने ठेवून सोने तरण कर्ज घेवून 37.5 लाखांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी बँकेच्या सोनारसह 10 जणांवर खेड पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी जितेंद्र नारायणदास शहा यांनी खेड पोलीस स्थानकात फिर्याद दाखल केली आहे.

सोन्याचे खोटे अलंकार खरे आसल्याचे भासवून खोटे दागिने बँकेत ठेवून सोने कर्ज घेवून बँकेची फसवणूक केल्याचे निदर्शनास आले. बँकेचे सोने परीक्षक यांनी खोटे दागिने खरे असल्याचे भासवून तसे प्रमाणपत्र देवून बँकेची 37,35,580/- रुपयांची सोने तरण कर्ज घेवून फसवणूक केल्याप्रकरणी बँकेचे सोनार प्रदीप रामचंद्र सागवेकर यांच्यासह गौरव विष्णू सागवेकर, सौ. नीलिमा निलेश सागवेकर, सागर रमेश सागवेकर, निलेश रमेश सागवेकर, सुधीर परशुराम राणीम, सौ. अक्षता सुधीर राणीम, समीर रघुनाथ म्हसलकर, राहुल अनंत सकपाळ, कमलाकर हरिश्चंद्र पालकर अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. ही घटना 14 फेब्रुवारी 2022 ते 8 डिसेंबर 2023 या कालावधीत घडली असून याप्रकरणी खेड पोलीस स्थानकात गुन्हा रजिस्टर क्र. 381/2023 भा. द. वि. सं. कलम 409, 420, 34 अन्वये फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी बँकेचे सोनार प्रदीप रामचंद्र सागवेकर यांनी आरोपींना गैरलाभ व्हावा व बँकेची गैरहानी व्हावी या उद्देशाने अप्रामाणिकपणे 37 लाख 35 हजार 580 रुपयांचे बनावट सोने तारण कर्ज घेवून फसवणूक केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

https://chat.whatsapp.com/GLTelFIlDpf6jmG3psLC8Z

लायन्स फेस्टिवल मधून मिळणाऱ्या निधीतून खेडमध्ये साकारणार डायलेसिस सेंटर – लायन्स क्लब खेड

खेड शहरातील गोळीबार मैदान येथे लायन्स क्लबच्या वतीने लायन्स फेस्टिव्हलचे आयोजन करण्यात आले असून या फेस्टिवल मधून मिळणाऱ्या उत्पन्नातून खेड शहरात एक डाय लेसिस सेंटर उभारण्याचा माणसं असल्याचे मत लायन्स क्लब खेड ने पत्रकार परिषदेत स्पष्ट केले

खेड शहरातील गोळीबार मैदान येथे 2 जानेवारी ते 7 जानेवारी या कालावधीत लायन्स फेस्टिव्हलचे आयोजन करण्यात आले आहे. या फेस्टिव्हलमध्ये 6 दिवस विविध प्रकारच्या सांस्कृतिक कार्यक्रमाची रेलचेल आसणार आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने सध्या महाराष्ट्रात नावाजलेली नृत्यांगणा गौतमी पाटील उपस्थित राहणार आहे. यासाठी स्वतः गौतमी पाटील यांनी खेड वासियांना व्हिडिओच्या माध्यमातून जाहीर आवाहन देखील केले आहे. तसेच या फेस्टिवल मधून मिळणाऱ्या निधीतून खेड शहरासाठी कायमस्वरूपी एक डायलेसिस सेंटर व नेत्र रुग्णालय उभारण्याचा मानस असल्याचे लायन्स क्लब खेडने पत्रकार परिषद घेवून स्पष्ट केले. या फेस्टिवल साठी लायन्स क्लब खेडचे 46 पदाधिकारी अहोरात्र मेहनत घेत असून खेड वासियांना मनोरंजनाचा पुरेपूर आस्वाद घेता यावा यासाठी प्रयत्नशील असल्याचे देखील लायन्स क्लब कडून स्पष्ट करण्यात आले. तसेच या 6 दिवसांच्या कालावधीत विविध सामाजिक संस्थांना अन्नधान्य व त्यांना आवश्यक असणाऱ्या गोष्टींचे वाटप देखील करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच या महोत्सवाला खेड वासियांसह जिल्हा वासियानी उत्सुफुर्त प्रतिसाद द्यावा असे आवाहन देखील खेड लायन्स कडून करण्यात आले आहे.

https://chat.whatsapp.com/GLTelFIlDpf6jmG3psLC8Z

5 तारखेला गौतमी पाटील, 6 तारखेला घरवाली कातील

गेल्या काही वर्षात सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर एक नारा ऐकावयास मिळत आहे. “सबसे कातिल गौतमी पाटील”. मात्र येत्या 5 तारखेला खेड शहरात होणाऱ्या लायन्स फेस्टिव्हलमध्ये गौतमी पाटील यांच्या नृत्याविष्काराचा कार्यक्रम सादर होणार आहे. त्या अनुषंगाने सध्या नक्या नाक्यावर 5 ला गौतमी पाटील आणि 6 घरवाली कातील. अशा प्रकारच्या चर्चा ऐकावयास मिळत आहेत.

खेड शहरात होणाऱ्या लायन्स फेस्टिव्हलमध्ये विविध प्रकारच्या कार्यक्रमाची रेलचेल पहावयास मिळणार आहे. मात्र या सर्व कार्यक्रमात गौतमी पाटील यांची उपस्थिती व त्यांचा नृत्याविष्कार सादर होणार असून हे प्रमुख आकर्षण आहे. हा कार्यक्रम पाहण्यासाठी शहरातील व तालुक्यातील नगिरक मोठ्या संख्यने उपस्थित राहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. मात्र एकीकडे या कार्यक्रमाची चर्चा सुरू असताना दुसरीकडे मात्र हा कार्यक्रम पाहायला जाणाऱ्यांच्या घरात 6 तारखेला नक्की भांड्याचा आवाज येण्याची शक्यता. वर्तविण्यात येत आहे. याच मुळे कदाचित 5 तारखेला गौतमी 6 तारखेला घरवाली कातील अशा प्रकारच्या चर्चांना उत आल्याचे पहावयास मिळत आहे.

https://chat.whatsapp.com/GLTelFIlDpf6jmG3psLC8Z

युवकाची राहत्या घरी गळफास घेवून आत्महत्या

खेड शहरातील सामाजिक, राजकीय व दिलखुलास व्यक्तिमत्त्व म्हणून ओळख असणारे श्री. अमोल जनार्दन मोरे यांनी त्यांच्या भरणे नका घडशेवाडी येथील राहत्या घरी गळफास घेवून आत्महत्या केली. हा प्रकार शुकरवरी रात्री उघडकीस आला. खेड लायन्सचे माजी पदाधिकारी तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सक्रिय कार्यकर्ते म्हणून त्यांची ओळख होती. तसेच एक निवेदक म्हणून त्यांनी आपली वेगळी ओळख देखील खेड शहरात निर्माण केली होती. मात्र त्यांनी आत्महत्या का केली याचे कारण अद्यापही स्पष्ट झालेले नाही. त्यांच्या अशा प्रकारे जाण्याने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

बॅनरवरून दोन सामाजिक संस्थेमध्ये वाद

खेड शहरात सामाजिक कार्य करणाऱ्या म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दोन नामांकित सामाजिक संस्थेत नुकताच कार्यक्रमाच्या जाहिरातीचा बॅनर लावण्यवरून बस स्थानक परिसरात वाद झाला होता. यावेळी दोन्ही सामाजिक संस्थेचे पदाधिकारी व राजकीय पक्षाचे पदाधिकारी याठिकाणी उपस्थित होते.

खेड शहरात विविध उपक्रम राबविणाऱ्या सामाजिक संस्थांमध्ये वेगवेगळे नवीन उपक्रम राबिण्याबाबत नेहमीच चढा-ओढ आसल्याचे पहावयास मिळाले आहे. आशाच एका मनोरंजनाच्या उपक्रमावरून सध्या खेड शहरात चढाओढ सुरू झाल्याचे पहावयास मिळत आहे. यामध्ये सलग 19 वर्षे मनोरंजनाचा उपक्रम राबविणारे व यंदा प्रथमच खेड वासियांसाठी मनरोजनाचा उपक्रम घेवून आलेली संस्था सध्या शहरवासीयांच्या चर्चेचा विषय झाली आहे.

गेल्या काही दिवसांपूर्वी खेड शहरातील बस स्थानक परिसरात असणाऱ्या होर्डिंग्जवर नुकतीच मनोरंजनाच्या कार्यक्रमाची सुरवात करणाऱ्या संघटनेने आपल्या कार्यक्रमाच्या प्रसिद्धीसाठी जाहिरात लावली होती. मात्र या ठिकाणी गेली 19 वर्षे मनोरंजन करणारी संस्था म्हणून ओळखली जाणाऱ्या संस्थेने ही या ठिकाणावर फेब्रुवारी महिन्यात होणाऱ्या कार्यक्रमाची जाहिरात लावली. या जाहिरात लवण्यावरून शहरात सभ्य आणि सुसंस्कृत म्हणून ओळखले जाणारे या दोन्ही संगठणेचे पदाधिकारी आमने सामने येवून वादविवाद करताना शहरवासीयांना पहावयास मिळाले. नेहमी वेगवेगळे उपक्रम करणाऱ्या या संघटना मात्र या मनोरंजनाच्या कार्यक्रमामुळे एकमेकांना भिडल्याने सर्वत्र चर्चेचा विषय ठरले. या वादविवादात मात्र 19 वर्षे जुनी असलेल्या संगठणेनी या होर्डींगच्या जागेवर ताबा मिळवत गेल्या 2 ते 3 दिवसापासून आपल्या कार्यक्रमाचा झळकावला. मात्र आता यावर सारवासारव करताना दोन्ही संगठणेचे पदाधिकारी काही दिवसात पहावयास मिळतील. मात्र सभ्य आणि सुसंस्कृत म्हणून मिरवणाऱ्या या पदाधिकाऱ्यांना आपल्या कार्यक्रमाची जाहिरात त्याच ठिकाणी लावण्याचा अट्टाहास का धरला होत? या प्रश्नांचे उत्तर मात्र अनु उत्तरितच राहिले. तसेच या संघटना जे उपक्रम राबवितात ते शहरवासीयांसाठी की आणखी कशासाठी असा प्रश्न मात्र या रस्त्यावरच्या वादामुळे उपस्थित झाला आहे.

मुंबई – गोवा महामार्गावरील सर्वात मोठा ब्रिज कोसळला, ब्रिज कोसळतानाचे लाईव्ह दृष्य

मुंबई – गोवा महामार्गावरील सर्वात मोठा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बहादूरशेख नाका येथील उड्डाणपुलाचे गर्डर सोमवारी सकाळी ८ वाजता मधोमध खचल्याचा प्रकार घडला होता. मात्र दुपारी हा पूल लाँचरच्या यंत्रणेसह अचानक कोसळला. मोठा आवाज झाल्याने परिसरातील नागरिकांची पळापळ झाली. या घटनेने चिपळुणसह संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली असून घटनास्थळी प्रशासकीय यंत्रणेसह नागरिकांची मोठी गर्दी झाली आहे.

ब्रिज कोसळतानाचे लाईव्ह दृष्य बातमीच्या शेवटी

सकाळी सुमारे ८ वाजण्याच्या सुमारास मुंबई- गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणा अंतर्गत चिपळूण येथे उभारण्यात येत असलेल्या पुलाचा गर्डर कोसळला होता. मात्र काही कालावधीनंतर दुपारच्या सुमारास उड्डाण पूलाचा काही भाग खाली कोसळून दुर्घटना घडली.या दुर्घटनेत पुलाचे काम करणारी क्रेन देखील दुर्घटनाग्रस्त झाल्याने पूर्णपणे खराब झाली आहे. दरम्यान सकाळी ८.३० वाजता अचानक पुलाच्या मध्यवर्ती भागातील दोन गर्डर तुटले होते. दरम्यान बहादुरशेख नाक्यातील उड्डाणपुलामध्ये एकूण ४६ पिलर असून ६ व्या पिलरपर्यंतचे काम पूर्ण होत आले होते. मात्र अचानक सोमवारी सकाळी उड्डाणपुलाचा गर्डर खचल्याने मोठा आवाज झाला. त्यानंतर थोडा वेळ काही झाले नाही. मात्र आता मात्र उड्डाणपुलाचा काही भागच खाली कोसळला आहे. सकाळी आठ ते साडे आठच्या दरम्यान काम सुरु असलेल्या उड्डाणपुलावरील गर्डर कोसळला होता. मात्र त्यावेळेस एवढे नुकसान झाले नव्हते. मात्र दुपारी सव्वा दोन ते अडीच वाजण्याच्या सुमार त्या उड्डाणपुलाचा एक गाळा खाली कोसळला. तसेच त्यावर काम करत असणारी करेन देखील पूर्णपणे खराब झाली आहे. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र उड्डाणपुलाचा कोसळलेला गाळा उचलण्यासाठी दोन अधिक महिन्यांचा कालावधी लागू शकतो असे  रत्नागिरी  सार्वजनिक बांधकाम विभागातील एका उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी सांगितले.

https://chat.whatsapp.com/JaIUFJSIbfP88Zy8R3X5Hn

जगात भारी भारताची व्हिस्की, 2023 ची सर्वात्कृष्ट व्हिस्की म्हणून मिळवले स्थान

व्हिस्की ऑफ द वर्ल्ड अवॉर्डस2023 मध्ये भारतातील हरियाणा येथील पिक्याडिली समूहाची “इंद्री” या विस्कीची सर्वात्कृष्ट व्हिस्की म्हणून निवड करण्यात आली. दरवर्षी जागतिक स्तरावर हा कार्यक्रम आयोजित केला जातो. या कार्यक्रमामध्ये जगाच्या कानाकोपऱ्यातून 100 हून अधिक व्हिस्की ब्रँड सहभागी झाले होते. या स्पर्धेत जागतिक स्तरावरील प्रतिष्ठित आणि सर्वात मोठी विस्किची चव घेण्याची स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत भारतातील इंद्री या विस्कीने स्कॉच, बोरबॉन, कॅनेडियन, ऑस्ट्रेलियन आणि ब्रिटिश सिंगल माल्ट्सह विविध देशातील विस्कीना मागे टाकत प्रथम स्थान मिळवले. 2021 मध्ये या समूहाने भारतातील पहिली ट्रिपल – बॅरल सिंगल माल्ट व्हिस्की “इंद्री – त्रिनी” लाँच करून आपला प्रवास सुरू केला. द संडे गार्डियनच्या म्हणण्यानुसार इंद्रीने 14 आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळवले आहेत. भारतातील विस्किसाठी ही अत्यंत महत्वपूर्ण बाबा मानली जात आहे.

महाराष्ट्राचे आयुर्मान वाढवण्यासाठी सरकारने प्रयत्न करावेत – राज ठाकरे

नांदेड मधील सरकारी रुग्णालयात गेल्या २४ तासात २४ जणांचा मृत्यू होण्याची दुर्देवी घटना घडली. यामध्ये १२ नवजात बालकांसह २४ जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. सरकारी रुग्णालयात औषधांचा तुटवडा आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी ठाणे महानगरपालिकेच्या कळवा येथील रुग्णालयात देखील एकाच रात्रीत १८ जणांचा मृत्यू होण्याची दुर्देवी घटना घडली होती. केवळ रुग्णांना औषधांचा पुरवठा न झाल्याने त्यांना आपला जीव गमवावा लागल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. या औषधांच्या तुटवड्यामुळे मुंबई तर चक्क टी. बी. ची औषधे पुरवून वापरा असे कळल्याचा आरोप मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ट्विटरवरून ट्विट करत केला आहे. तसेच तीन तीन इंजिन लागून पण राज्याचे आरोग्य व्हेंटिलेटरवर असल्यासारखी परिस्थिती आसेल तर उपयोग काय? त्यामुळे सरकारने स्वतःचे आयुर्मान वाढवण्याची धडपड कमी करून महाराष्ट्राचे आयुर्मान कसे वाढेल याकडे लक्ष द्यावे असा सल्लाही त्यांनी यावेळी ट्विट करत दिला आहे.

या सर्व घटनेवर रुग्णालय प्रशासनाकडून आता खुलासा करण्यात आला आहे. नांदेड येथील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात 24 तासात 24  रुग्णांचे मृत्यू झाले हे मृत्यू का झाले याची काय करणे आहेत खरच रुग्णालयात औषध नाहीत ? डॉक्टर नाहीत का? इतर 70 अत्यवस्थ रुग्ण का झाले या सर्व प्रश्नांची उत्तरे रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉक्टर एस. आर. वाकोडे आणि वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर संजय मदनुरकर यांनी दिलीत. यावेळी त्यांनी सांगितले की, रुग्णालयात अत्याधिक गंभीर अवस्थेत दररोज 12 ते 14 रुग्ण दाखल होतात आणि त्यात काहींचा मृत्यू होतो असे रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. वाकोडे यांनी सांगितले. लहान मुलांचा मृत्यू हा नैसर्गिक आणि प्रौढ रुग्णांचा मृत्यू हा व्याधी आणि वय झाल्यामुळे झाला असल्याचे सांगण्यात आले. त्याशिवाय,  मृतांमधील इथे आलेले रुग्ण हे अतिशय गंभीर होते.  सर्वतोपरी प्रयत्न करून ही अशा रुग्णांना वाचवता येत नसल्याचेही डॉ. वाकोडे यांनी सांगितले. गंभीर आजारामुळे 12 रुग्णांचा मृत्यू झाला. तर, लहान मुले ही अतिशय क्रिटिकल परिस्थितीत इथे दाखल झाली होतीत असे रुग्णालयाच्या अधिकाऱ्यांनी बचावात म्हटले.  रुग्णालयात कुठल्याही औषधांची कमतरता नसल्याचे डॉ. वाकोडे यांनी म्हटले. डॉक्टर आणि कर्मचारी वर्गदेखीलही पुरेसा आहे. आमच्या रुग्णालयात 5 जिल्ह्यातून रुग्ण येतात. सर्व रुग्णांच्या प्रकृतीबाबत आम्ही पूर्ण काळजी घेतो. तसेच सापाने दंश केल्यावर उपचारासाठी अँटी स्नेक वेनोम औषध उपलब्ध आहेत. महागडी औषध ही आम्ही स्थानिक स्तरावर खरेदी करत असल्याचे डॉ. वाकोडे यांनी म्हटले

त्यानुसार नांदेड येथील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात  30 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबर 2023 या कालावधीत 24 रुग्णांचा मृत्यू झाला. यामध्ये 12 प्रौढ रुग्ण (5 पुरुष, 7 महिला) व 12 नवजात शिशु रुग्ण होते. प्रौढ रुग्णामध्ये 4 हृदयविकार, 1 विषबाधा, 1 जठरव्याधी, 2 किडनी व्याधी, 1 प्रसूती गुंतागुंत, 3 अपघात आणि इतर आजाराने तर  बालकांपैकी 4 अंतिम अवस्थेत खाजगीतून संदर्भित झाले होते. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात अत्यावश्यक औषध साठा उपलब्ध आहे. जिल्हा नियोजन माध्यमातून या आर्थिक वर्षासाठी 12 कोटी रुपये निधी देण्यात आला आहे. त्याशिवाय, अजून 4 कोटी रुपये मंजूर झाला आहे असे जिल्हा रुग्णालय प्रशासनाच्यावतीने कळविण्यात आलेले आहे.

1 ऑक्टोबर रोजी झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसामुळे निर्माण झालेली परिस्थिती

Bharane naka

मराठी तरुणाला मारहाण करणाऱ्या परप्रांतिय फेरीवाल्यांना मनसे कार्यकर्त्यांचा बेदम चोप

कल्याण स्टेशनवरील स्कायवॉक वर मराठी तरुणाशी मराठी भाषेत बोलण्यावरून वाद घालत त्याला परप्रांतिय फेरीवाल्यांच्या टोळक्याने गैरवर्तन करत मारहाण केली होती. याची तक्रार या तरुणाने मनसे सैनिकाकडे करताच त्यांनी तात्काळ कल्याण स्टेशन गाठून या परप्रांतिय फेरीवाल्यांना बेदम चोप देत पोलिसांच्या स्वाधीन केले.

या बाबत सविस्तर माहिती अशी की, वाशिंद येथे राहणारा एक विद्यार्थी कल्याणमध्ये काही कामानिमित्त आला होता. त्यावेळी त्याने कल्याण रेल्वे स्थानकाजवळ असलेल्या स्कायवॉकवर बसलेल्या फेरीवाल्याकडून एक वस्तू विकत घेतली होती. ती वस्तू खराब असल्याने तो विद्यार्थी पुन्हा कल्याणमध्ये आल्यानंतर विद्यार्थ्याने ती वस्तू बदलून देण्यासाठी फेरीवाल्याकडे विनंती केली. मात्र फेरीवाल्यांनी ती वस्तू बदलून देण्यास नकार दिला. यावेळी त्या फेरीवाल्या ने “तुम मराठी लोक ऐसे ही होते हो”, असे बोलून मराठी भाषेचा आणि मराठी माणसाचा अपमान केला. या विद्यार्थ्याने या घटनेची माहिती कल्याण पूर्वमधील मनसे कार्यकर्त्यांना दिली व घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर कल्याणमधील मनसे कार्यकर्त्यांनी स्टेशन परिसरात जावून त्या फेरीवाल्याला जोरदार चोप देत पोलिसांच्या स्वाधीन केले

खेडमध्ये मुसळधार पाऊस, भरणे नका येथे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी

अरभी समुद्रात तयार झालेल्या चक्रीवादळामुळे कोंकण किनारपट्टीवर जोरदार पाऊस बरसात आहे. रविवारी दुपारी सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे खेड शहर व भरणे नाका परिसरात मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी जमले.

या पाण्यामुळे काही व्यापाऱ्यांच्या दुकानात v नागरिकांच्या घरात ही पाणी शिरल्याने सर्वांची धावपळ उडाली. भरणे नाका येथील परकार कॉम्प्लेक्स येथे सर्व्हिस रोड व मुख्य महामार्गावर पाणी आल्याने नदीचे स्वरूप प्राप्त झाले होते. या पाण्यातूनच महामार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनधारकांना आपला मार्ग काढावा लागत होता.

पुढील 48 तासात कोंकण व गोव्यात मुसळधार पावसाचा इशारा

अरबी समुद्रात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याचे रुपतर आता अती तीव्र कमिदाबाच्या क्षेत्रात झाल्याने कोंकण व गोव्यात अती मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाकडून वर्तविण्यात आली आहे.

https://whatsapp.com/channel/0029Va5hOLUJUM2Z6aRJ613C

World Cup 2023 : स्पर्धेसाठी सर्व 10 संघ फायनल!

आयसीसी एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक 2023 सुरू होण्यासाठी आता अवघे काही दिवस उरले आहेत. यंदाचा विश्वचषक भारतात 5 ऑक्टोबर ते 19 नोव्हेंबर दरम्यान होणार असून संपूर्ण विश्वचषक भारताने एकट्याने आयोजित करण्याची ही पहिलीच वेळ आहे. याआधी झालेल्या 1987, 1996 आणि 2011 च्या विश्वचषकाचे संयुक्तपणे आयोजन केले होते. विश्वचषक 2023 मध्ये एकूण 10 संघ सहभागी होणार आहेत. यापैकी 8 संघांना थेट प्रवेश मिळाला आहे. तर श्रीलंका आणि नेदरलँड्सने विश्वचषक पात्रता स्पर्धेद्वारे यांनी मेगा स्पर्धेसाठी जागा निश्चित केली. विश्वचषक स्पर्धेसाठी सर्व संघांचे संघही निश्चित करण्यात आले असून आयसीसीच्या परवानगीशिवाय 15 सदस्यीय संघात कोणताही बदल करता येणार नाही. विश्वचषक स्पर्धेत सहभागी होणारे संघ पुढील प्रमाणे –

टीम इंडिया (World Cup 2023)

रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, जसप्रीत बुमराह, शुबमन गिल, केएल राहुल, हार्दिक पंड्या (उपकर्णधार), श्रेयस अय्यर, रवींद्र जडेजा, इशान किशन, सूर्यकुमार यादव, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, मोहम्मद. शमी, रवीचंद्रन अश्विन आणि शार्दुल ठाकूर.

ऑस्ट्रेलिया (World Cup 2023)

पॅट कमिन्स (कर्णधार), स्टीव्ह स्मिथ, अॅलेक्स कॅरी, जोश इंग्लिस, शॉन अॅबॉट, मार्नस लाबुशेन, कॅमेरून ग्रीन, जोश हेझलवूड, ट्रॅव्हिस हेड, मिचेल मार्श, ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टॉइनिस, डेव्हिड वॉर्नर, अॅडम झाम्पा, मिचेल स्टार्क.

इंग्लंड (World Cup 2023)

जोस बटलर (कर्णधार), मोईन अली, गुस ऍटकिन्सन, जॉनी बेअरस्टो, सॅम करन, लियाम लिव्हिंगस्टोन, डेविड मलान, आदिल रशीद, जो रूट, हॅरी ब्रूक, बेन स्टोक्स, रीस टोपली, डेव्हिड विली, मार्क वुड, ख्रिस वोक्स.

न्यूझीलंड (World Cup 2023)

केन विल्यमसन (कर्णधार), ट्रेंट बोल्ट, मार्क चॅपमन, डेव्हॉन कॉनवे, लॉकी फर्ग्युसन, मॅट हेन्री, टॉम लॅथम (उपकर्णधार/विकेटकीपर), डॅरिल मिशेल, जिमी नीशम, ग्लेन फिलिप्स, रचिन रवींद्र, मिचेल सँटनर, ईश सोधी, टिम साऊदी, विल यंग.

दक्षिण आफ्रिका (World Cup 2023)

टेम्बा बावुमा (कर्णधार), गेराल्ड कोएत्झी, क्विंटन डी कॉक, रीझा हेंड्रिक्स, मार्को जॅन्सेन, हेनरिक क्लासेन, केशव महाराज, एडन मार्कराम, डेव्हिड मिलर, लुंगी एनगिडी, अँडिले फेहलुक्वायो, कगिसो रबाडा, तबरेझ शम्सी, रासी व्हॅन डर ड्यूसेन, लिझार्ड विल्यम्स.

पाकिस्तान (World Cup 2023)

बाबर आझम (कर्णधार), शादाब खान (उपकर्णधार), अब्दुल्ला शफीक, फखर जमान, हसन अली, इफ्तिखार अहमद, इमाम उल हक, मोहम्मद नवाज, मोहम्मद रिझवान, सलमान आगा, शाहीन आफ्रिदी, उसामा मीर, सौद शकील, हारिस रौफ, मोहम्मद वसीम जूनियर.राखीव : मोहम्मद हरिस, अबरार अहमद, जमान खान. राखीव : मोहम्मद हरिस, अबरार अहमद, जमान खान.

श्रीलंका (World Cup 2023)

दासुन शनाका (कर्णधार), कुसल मेंडिस (उपकर्णधार), कुसल परेरा, पाथुम निसांका, लाहिरू कुमारा, दिमुथ करुणारत्ने, सदिरा समरविक्रमा, चारिथ असलंका, धनंजय डी सिल्वा, महिष थिक्षणा, दुनिथ वेलालागे, कासुन रजिथा, मथिशा पाथिराना, दिलशान मदुशंका, दुशान हेमंथा.

बांगलादेश (World Cup 2023)

शाकिब अल हसन (कर्णधार), लिटन दास, तनजीद हसन, नजमुल हुसेन शांतो (उपकर्णधार), तौहीद हृदोय, मुशफिकुर रहीम, महमुदुल्लाह रियाद, मेहदी हसन मिराज, नसुम अहमद, महेदी हसन, तस्किन अहमद, मुस्तफिजुर. रहमान, हसन महमूद, शोरीफुल इस्लाम, तन्झीम हसन साकिब.

अफगाणिस्तान (World Cup 2023)

हशमतुल्ला शाहिदी (कर्णधार), रहमानउल्ला गुरबाज, इब्राहिम झद्रान, रियाझ हसन, रहमत शाह, नजीबुल्ला झदरन, मोहम्मद नबी, इक्रम अलीखिल, अजमतुल्ला उमरझाई, रशीद खान, मुजीब उर रहमान, नूर अहमद, फजलहक अब्दुल रहमान फारुकी, नवीन उल हक.

नेदरलँड्स (World Cup 2023)

विक्रमजित सिंह, साकिब झुल्फिकर, सायब्रंट एंगलब्रेट, कॉलिन एकरमन, तेजा निदरमनुरु, मॅक्स ऑडवड, बास डी लीड, शारिझ अहमद, रोलेफ वॅन डर मार्वे, स्कॉट एडवर्ड्स, वीस्ली बरेसी, लोगान वॅन बीक, रायन क्लेन, आर्यन दत्त, पॉल वॅन मीकेरेन.

‘एक तारीख – एक तास’ स्वच्छता उपक्रमात महाराष्ट्राला अव्वल आणूया – मुख्यमंत्री


स्वच्छतेसाठी ‘एक तारीख, एक तास’ या १ ऑक्टोबर रोजी देशात राबवण्यात येणाऱ्या उपक्रमात उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन महाराष्ट्राला देशात अव्वल स्थान मिळवून देऊया, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे.

‘स्वच्छता पंधरवडा- स्वच्छता ही सेवा” या अभियानांतर्गत राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीच्या आदल्या दिवशी रविवारी १ ऑक्टोबर रोजी राज्यात सर्वत्र नागरी तसेच ग्रामीण भागात ‘एक तारीख- एक तास’ या उपक्रमांतर्गत प्रत्येकाला ते जिथे कुठे असतील तिथे स्वच्छता, साफ-सफाई करून या अभियानात सहभाग नोंदवू शकणार आहेत. गावा-गावांमध्ये, शहरात, प्रत्येक वार्डात सकाळी १० पासून या मोहिमेची सुरवात होईल. यात सफाई मित्र ही सहभागी होतील. काही ठिकाणी स्वच्छतेचे महत्व पटवून देणारी विशेष शिबिरे-प्रदर्शने आयोजित केली जातील. ज्यातून स्वच्छतेची गरज, त्यांचे फायदे, महत्व पटवून दिले जाईल.

याबाबतच्या आवाहनात मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी म्हटले आहे की, स्वच्छता आपल्या सर्वाच्या दैनंदिनीतील महत्वाची गोष्ट आहे. स्वच्छता आपल्या आयुष्यात समृद्धी आणते. आरोग्य आणि परिसराची स्वच्छता यांचा दृढ संबंध आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्यापासून ते अनेक थोर राष्ट्र पुरूष साधू-संतानीही स्वच्छतेबाबत आपल्याला धडे घालून दिले आहेत. याच अनुषंगाने आपल्या सर्वांना ‘स्वच्छता पंधरवडा-स्वच्छता ही सेवा’ हे अभियान यशस्वी करायचं आहे. ‘एक तारीख एक तास’ या उपक्रमाला स्वच्छता लोकचळवळीचे रूप द्यायचे आहे. त्यासाठी प्रत्येकाला आपला एक तास तास स्वच्छतेसाठी द्यायचा आहे. आपण, आपले कुटुंबिय किंवा सहकारी जिथे कुठे असाल, तिथे आपण स्वच्छता मोहिम राबवून या अभियानात योगदान द्यायचे आहे, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले आहे.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी वर्षभरापूर्वी आपल्या राज्यात स्वच्छ महाराष्ट्र नागरी अभियान-२ चा शुभारंभ केला. त्यातून महाराष्ट्र कचरामुक्त आणि स्वच्छ असावा असे ध्येय घेऊन आता वाटचाल करत असल्याचे नमूद करून मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे की, “महाराष्ट्राला अनेक थोरा-मोठ्यांनी परिसर स्वच्छता आणि आरोग्यदायी सवयीचा मंत्र दिला आहे. संत गाडगेबाबांनी हाती झाडू घेऊन स्वच्छतेचे धडे दिले आहेत. आता या धड्यांची आपल्याला उजळणी करायची आहे. आपआपल्या परिसरात महापालिका, नगरपालिका, नगरपंचायत तसेच गावा-गावांमध्ये ग्रामपंचायतींच्या पुढाकारांनी स्वच्छता मोहिम राबवायची आहे. साचलेला कचरा, राडा-रोडा-डेब्रीज हटवायचे आहेत. यात आपल्या सर्वांच्या मदतीसाठी स्थानिक स्वराज्य संस्था, महसूल आणि जिल्हा प्रशासन सज्ज राहील, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे

“स्वच्छता ही सवय आहे. आपल्याला स्वच्छतेची शिस्त अंगिकारायची आहे. त्याला संस्काराचे रूप द्यायचे आहे. या अभियानानंतर आपल्याला १५ डिसेंबर २०२३ पर्यंत मुख्यमंत्री सक्षम शहर स्पर्धा आणि मुख्यमंत्री सक्षम वॉर्ड स्पर्धा ही देखील यशस्वी करायची आहे. हे अभियान शंभर टक्के यशस्वी करून देशात आपल्या महाराष्ट्राला अव्वल स्थान मिळवून द्याल. चला महाराष्ट्र कचरा मुक्त करूया. स्वच्छ, सुंदर करूया. आरोग्य आणि समृद्धीला गवसणी घालूया. स्वच्छतेचा जागर करूया,” असेही मुख्यमंत्र्यानी आवाहन केले आहे.

मुंबईतून येणारी संकटे सीमेबाहेर ठेव – वैभव खेडेकर

खेडच्या राजाला जल्लोषात निरोप

खेडचे माझी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांनी अनंत चतुर्थीला खेडच्या राजाच्या विसर्जनावेळी गणरायाला साकडे घातले. यावेळी त्यांनी मुंबईची पिडा सीमेबाहेर ठेव तसेच खेडची नगरपालिका पुन्हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला मिळू दे असे साकडे घालत गणरायाला निरोप दिला. नेमके त्यांनी काय साकडे घातले ते पाहूया….

https://whatsapp.com/channel/0029Va5hOLUJUM2Z6aRJ613C

खेडमध्ये येणार सायबर क्राईमचे पथक

लग्न जमवणाऱ्या संकेतस्थळावर सुंदर मुलींचे फोटो टाकून लोकांची हजारो रुपयांची फसवणूक करणाऱ्या दोघांना खेड पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या दोघांची चौकशी करण्यासाठी जिल्हा सायबर क्राईमचे पथक खेडमध्ये येवून आणखी काही जणांची फसवणूक केली आहे का? याचा तपास करणार आहेत. तसेच या प्रकरणी आणखी काही पुरावे मिळतात का याचा तपास करणार आहेत. या प्रकरणी हे दोघेजण सुंदर मुलींचे फोटो प्रोफाइलवर वापरुन अनेक अविवाहितना तसेच विधूरांना फसवत होते. खेडमधील एका ३४ वर्षीय विधूराला या दोघांनी ७७ हजारांचा गंडा घातला होता. त्यानंतर त्याने खेड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. तपास केल्यावर मुळचा राजस्थान येथील मनोज छोटूराम योगी (४१, रा. डोंबिवली) याला खेड पोलिसांनी अटक केली होती. त्याच्याकडे चौकशी करत असताना पोलादपूर येथील एका महिलेची माहिती खेड पोलिसांच्या हाती लागली. ती मुंबईत पळण्याच्या तयारीत असताना तिला खेड पोलिसांनी ताब्यात घेतले होते. ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेकांची फसवणूक या जोडीने केली आहे. त्याची चौकशी सध्या सुरु असून त्यांची अधिक चौकशी करण्यासाठी रत्नागिरी जिल्हा सायबर क्राईमचे पथक जिल्हा पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांच्या सुचनेनुसार खेड ठाण्यात दाखल होणार आहेत. ते या प्रकरणी आणखी काही धागेदोरे मिळतात का याचा तपास करणार आहेत. तसेच या दोघांनी आणखी किती जणांची फसवनूक करून त्यांना लुबाडले आहे. फेक प्रोफाईल वापरुन फसवणूक केलेल्या प्रकरणांचा छडा लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

https://whatsapp.com/channel/0029Va5hOLUJUM2Z6aRJ613C

खेड येथील ज्येष्ठ पत्रकार दिलीप जाधव यांचे निधन

खेड येथील ज्येष्ठ पत्रकार व दैनिक सामनाचे तालुका प्रतिनिधी दिलीप धोंडू जाधव यांचे आज अल्पशा आजाराने निधन झाले. खेड तालुका पत्रकार संघात नेहमी सक्रिय असणारे व पत्रकारांवरिल् अन्यायला वाचा फोडणारे पत्रकार दिलीप जाधव यांच्या निधानानंतर तालुक्यातील सर्वच क्षेत्रातून हळहळ व्यक्त केली जात आहे. पत्रकार दिलीप जाधव यांनी आपल्या पत्रकारितेच्या कारकिर्दीत समाजातील अन्यायग्रस्त लोकांना न्याय मिळवून देण्याचे महत्वपूर्ण काम केले आहे. समाजिक व सांस्कृतिक क्षेत्रातही पत्रकार दिलीप जाधव यांचे भरीव योगदान होते.

महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेनेतर्फे हळदी कूंकु समारंभ संपन्न.

हळदी कुंकू कार्यक्रमात सख्यांची सोबत ….!! सन्मान स्त्रीत्वाचा, अभिमान स्त्री जातीचा ..!! लेण सौभाग्याच …..!!

एकमेकांबद्दल आपलेपण सलोखा प्रेम लळा जिव्हाळा ओलावा जपणाऱ्या या नात्यांच्या गुंफनाला घट्ट करणाऱ्या आणि सांस्कृतिक उंची वाढवणारा कार्यक्रम म्हणजे हळदी कुंकू . खेड शहरातील महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रणित महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेना खेड यांच्यातर्फे छञपती शिवाजी महाराज चौक येथे हळदी कुंकू समारंभाचे आयोजन करण्यात आले होते .यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यासह महिला वर्ग प्रचंड उत्साहात आणि मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

बांद्रा येथे 5 मजली इमारत कोसळली

मुंबई बांद्रा येथील बेहरांनागर येथे 5 मजली इमारत कोसळून दुर्घटना घडली. ही दुर्घटना बुधवारी दुपारी 3.30 वा.च्या सुमारास घडली. या दुर्घटनेतून 6 जणांना वाचविण्यात यश आले असून आद्यप ही मदत कार्य सुरू आहे. घटनास्थळी बचाव पथकासह अग्निशामक व रुग्णवाहिका दाखल झाल्या आहेत. या दुर्घटनेत आजून कितीजण ढिगाऱ्याखाली अडकलेत हे स्पष्ट झाले नसले मदतकार्य वेगाने सुरू आहे.

युवा पत्रकार चंद्रकांत बनकर यांचे रामदास कदमांनी केले अभिनंदन

नागोठणे ग्रामीण विभाग पत्रकार असोसिएशनच्या दहाव्या  वर्धापन दिनानिमित्त खेड मधील वृत्तवाहिनीचे पत्रकार चंद्रकांत बनकर यांना रत्नागिरी रायगड जिल्ह्याचे खासदार सुनील तटकरे यांच्या हस्ते युवा पत्रकार पुरस्कार नुकताच नागोठणे येथे जोगेश्वरी माता मंदिराच्या प्रांगणात प्रदान करण्यात आला. या बद्दल शिवसेना नेते रामदास कदम यांनी आज जमगे येथे झालेल्या पत्रकार परिषदेत शाल श्रीफळ देऊन अभिनंदन केले. तसेच यावेळी खेड तालुका पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी किशोर साळवी यांची निवड झाल्याबद्दल त्यांचे ही शिवसेना नेते रामदास कदम यांनी अभिनंदन केले.

MP Sunil Tatkare presents Young Journalist Award to Chandrakant Bankar, a journalist from Khed

On the occasion of the 10th anniversary of Nagothane Rural Division Journalists Association, Khed news channel journalist Chandrakant Bankar was recently awarded the Young Journalist Award by Ratnagiri Raigad District MP Sunil Tatkare at the premises of Jogeshwari Mata Mandir at Nagothane.
Nagothane Rural Division Journalists Association has been carrying out various social activities in the last ten years and also honors the journalists working in the social sector. Came. MLA Mahendra Sheth Dalvi Raigad District Congress President Mahendra Gharat Raigad Nagothane Rural Division Journalists Association Founder Shyamkant Nerpagar President Advocate Mahesh Pawar and other dignitaries were present on the occasion.

बदनामी करणाऱ्या पुढाऱ्यांचा रामदास कदमांनी केला पंचनामा

शिवतेज आरोग्य सेवा संस्थेच्या खेड शहरातील इमारतीची जागा शासनाला परत करावी या मागणीसाठी उपोषण करणाऱ्या विरोधकांचा समाचार शिवसेना नेते रामदास कदम यांनी आज जमगे येथे पत्रकार परिषद घेऊन घेतला आहे.

खेड शहरातील शिवतेज आरोग्य संस्थेच्या इमारतीची जागा लाटल्याचा आरोप करत व ती जागा शासनाने ताब्यात घ्यावी या मागणीसाठी खेडचे नगराध्यक्ष व मनसे राज्य सरचिटणीस वैभव खेडेकर यांनी प्रांताधिकारी कार्यालयासमोर उपोषण केले होते. मात्र या उपोषणाला व जागा लाटल्याच्या आरोपाचे खंडन करीत शिवसेना नेते रामदास कदम यांनी आपली व संस्थेची बदनामी करणाऱ्या पुढाऱ्यांचा पंचनामा पत्रकार परिषद घेऊन उघड केला. सदर प्रस्ताव देताना सन 2006 साली मनसे राज्य सरचिटणीस वैभव खेडेकर हे शिवसेनेतच होते. ते आपल्या सोबतच काम करत होते असे ही रामदास कदम यांनी यावेळी स्पष्ट केले. ही जागा देण्याचे आदेश प्रधान सचिव नगरविकास यांनी 30/05/2006 ला जिल्हाधिकाऱ्यांना दिले होते. 11/07/2006 रोजी खेड नगरपालिकेने एकमताने हा ठराव देखील मंजूर केला होता. तर 07/06/2006 ला महाराष्ट्र शासनाने 99 वर्षाच्या कराराने शिवतेज आरोग्य संस्थेला भाडेतत्वावर जागा देण्याचा शासन निर्णय देखील झाल्याचे रामदास कदम यांनी या पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. यानुसार 05/12/2006 रोजी खेड न. प. च्या मालकीची 1600 चौरस मीटर जागा शिवतेज आरोग्य संस्थेला देण्याचा निर्णय शासनाने घेतला. 08/06/2007 मध्ये जिल्हाधिकारी रत्नागिरी यांनी त्रिसदस्यीय समिती नेमून सादर जागेची किमंत 11.20 लक्ष इतकी निश्चित केली होती. त्यानुसार शिवतेज आरोग्य संस्थेला 50% रक्कम म्हणजेच 5.60 लक्ष इतकी रक्कम भरण्याचे आदेश दिलेत. या आदेशानुसार 05/12/2015 रोजी शिवतेज आरोग्य संस्थेने ही रक्कम भरली. या जागेच्या भाड्यापोटी खेड न. प. व शिवतेज आरोग्य संस्था यांच्यामध्ये 100 रुपये प्रतिमाह या दराने भाडे नक्की करण्याबाबत 25/05/2007 रोजी करारनामा झाला. या जागे संदर्भात खेड नगर पालिकेने 06/01/2014 रोजी अधिसूचना प्रसिद्ध केली होती. या अधिसूचनेला पुढील 90 दिवसात एक ही हरकत न आल्याचे प्रमाणपत्र नागरपालिकेकडून शिवतेज आरोग्य संस्थेला देण्यात आले. या जागेवर 15/09/2017 रोजी खेड नगर पालिकेने शिवतेज आरोग्य संस्थेला बांधकामास परवानगी दिल्याचे ही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. तसेच 22/10/2018 रोजी खेड न. प. चे मुख्याधिकारी व नागराध्यक्ष वैभव खेडेकर यांनी ही जमीन बहुउद्देशीय सभागृह व व्यायाम शाळा या उद्देशासाठी शासनाने आरक्षित करण्याची मागणी ठरावद्वारे आपल्या स्वाक्षरीने शासनाकडे केली होती. त्यानुसार महाराष्ट्र शासनाच्या नगरविकास विभागाने ही जागा व्यायाम शाळा व बहुउद्देशीय सभागृहासाठी आरक्षित केल्याचा निर्णय 06/12/2018 रोजी घेऊन राजपत्रामध्ये प्रसिद्ध ही केल्याचे रामदास कदम यांनी स्पष्ट केले. यावेळी ते म्हणाले की, खेड नगरपालिकेत झालेला भ्रष्टाचार उगडकीस आल्यामुळे खेड न. प. चे नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांनी वैफल्यग्रस्त होऊन आपल्या व आपल्या शिवतेज आरोग्य संस्थेची बदनामी करण्याचा डाव आखल्याचे त्यांनी सांगितले. यावर सर्व पुराव्यासह न्यायालयात धाव घेणार असल्याचे शिवसेना नेते रामदास कदम यांनी स्पष्ट केले.

उद्यापासून रत्नागिरी जिल्ह्यायील सर्व शाळा बंद

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता रत्नागिरी जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यातील सर्व प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय बुधवार दि. 5 जानेवारी रोजी सायंकाळी उशिरा घेण्यात आला असून रत्नागिरीचे जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांनी कळवले आहे. उद्या दि. 6 जानेवारी पासून शाळा पुढील आदेश येईपर्यंत बंद राहणार असून ऑनलाइन शिक्षण मात्र सुरू राहणार आहे. विद्यार्थी लस घेण्यासाठी मात्र शाळेत येऊ शकतात.

खेड शहरातील उनाड कुत्र्यांमुळे नागरिक हैराण

खेड शहरात उनाड कुत्र्यांच्या संख्येत दिवसंदिवस वाढ होत आहे. याचा नाहक त्रास नागरिकांसह व्यापारी व ग्राहकांना सहन करावा लागत आहे.

खेड शहरासह बाजारपेठेत उनाड कुत्र्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. ही कुत्री मोठया संख्येत टोळक्याने वावरत असल्याचे पहावयास मिळत आहे. या कुत्र्यांच्या वावराणे महिला व मुलींना रस्त्यावरून फिरताना भीतीच्या छायेखाली वावरावे लागत आहे. अनेकदा या कुत्र्यांच्या टोळक्यानी बाजारात येणाऱ्या ग्राहकांवर धाव घेतल्याच्या घटना देखील घडल्या आहेत. या संदर्भात नागरपलीका प्रशासनाला विविध राजकीय पक्षांनी निवेदने देऊन या भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी केली होती. मात्र नगरपालिका प्रशासनाने एकडे दुर्लक्ष केल्याचे वारंवार दिसून येत आहे. 10 ते 15 जणांच्या टोळक्याने फिरणाऱ्या कुत्र्यांनी एखाद्या नागरिकांवर हल्ला केल्यानंतरच नगरपालिका प्रशासनाला जाग येणार का? असा प्रश्न खेड वासीयांकडून उपस्थित करण्यात येत आहे.

दापोलीत 7 विद्यार्थी कोरोनाबधित

रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली येथील कोंकण कृषी विद्यापीठात शिकणारे 40 विद्यार्थ्यांची कोरोना चाचणी करण्यात आली. यावेळी कृषी विद्यापिठात शिकणारे 7 विद्यार्थी कोरोना बधित आढळून आल्याने एकच खळबळ उडाली. या विद्यार्थ्यांना कोंकण कृषी विद्यापीठातील किसान भवन येथे आयसोलेशन करण्यात आले आहे. एकाच वेळेस कृषी विद्यापीठातील 7 विद्यार्थी कोरोन बाधित आढळल्याने आरोग्य विभागाचे धाबे दणाणले आहेत.

अनाथांची माय हरपली

अनाथांची माय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या समाजसेविका सिंधुताई सकपाळ यांचे हृदयविकाराच्या झटक्याने मंगळवारी रात्री 8.10 वा. निधन झाले. त्यांचे पुण्यातील Galaxy रुग्णालयात निधन झाले. त्या 73 वर्षाच्या होत्या. महिन्याभरापूर्वी हर्नियाचे ऑपरेशन झाल्याने त्यांच्यावर उपचार सुरू होते. आज अखेर त्यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.

समाजसेविका सिंधुताई यांच्या कार्याचा गौरव 2012 साली डॉ. बाबासाहेब आंबेडकर तर 2021 साली पद्मश्री पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. मराठी शाळेत चौथी पर्यंत शिक्षण झालेल्या सिंधुताईंचे वयाच्या 9 व्या वर्षी लग्न झाले होते. आयुष्यात आलेल्या संघर्षामुळे त्या समाजसेवेकडे वळल्या. अनाथ मुलांचा सांभाळ करण्यासाठी त्यांनी 1994 साली पुण्यातील पुरंदर येथील कुंभारवळण येथे ममता बाल सदनची स्थापना करण्यात आली. हजारो अनाथांना मायेची ऊब देणारी अखंड महाराष्ट्राची माय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सिंधुताईंनी आज पुण्यात Galaxy रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. त्यामुळे खऱ्या अर्थाने आज महाराष्ट्र पोरका झाला. अखंड महाराष्ट्राची माय आज हरपली यामुळे महाराष्ट्रावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

अज्ञात वाहनाची दुचाकीला धडक, उपचारादरम्यान पर्यवेक्षकाचा मृत्यू

मुंबई गोवा महामार्गावरील जांबुर्डे येथे अज्ञात वाहनाने दुचाकीला धडक दिल्याने हा अपघात झाला. शुक्रवारी सायंकाळी 4.30 वा. सुमारास हा अपघात झाला. या अपघातात रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या पशुधन विभागात काम करणारे पर्यवेक्षक दीपक केशव गमरे यांना गंभीर स्वरूपाची दुखापत झाली होती. आपले कार्यालयीन कामकाज आटपून घरी जात असताना हा अपघात झाल्याचे बोलले जात आहे. यावेळी त्यांना 108 रुग्णवाहिकेने घरडा रुग्णालयात उपचचासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

लोटे येथे वायुगळती

खेड तालुक्यातील लोटे येथे टँकरमधून गॅस अनलोंडिंग करत असताना गॅस लिकेज झाल्याने वायुगळती झाली. लोटे एम आय डी सीतील योजना इंटेमिडीएट प्रायव्हेट लिमिटेड कंपनीत टँकरमधून गॅस अनलोडींग करत असताना पाईपचा होज लिकेज होऊन गॅस गळती झाली. हा गॅस भोवतालच्या लोटे चाळकेवाडी व तलारीवाडी परिसरात पसरला.

बेंगलोर येथे महाराजांच्या पुतळ्याच्या विटंबनेचा खेड मराठा समाजाकडून जाहीर निषेध

छत्रपती शहाजीराजे भोसले यांनी स्थापन केलेल्या कर्नाटकातील बेंगलोर येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना होणे ही अतिशय दुर्देवी गोष्ट आहे. या घटनेचा खेड मराठा समाजाच्या वतीने जाहीर निषेध करत असल्याचे निवेदन खेड प्रताधिकाऱ्यांना देण्यात आले.

बेंगलोर शहरात पाहू दिवसापूर्वी छत्रपती शिवाजी महाराज यांचया पुतळ्याची विटंबना केल्याची बाब समोर आली होती. यामुळे महाराष्ट्रातील असंख्य शिवप्रेमींच्या व शिवभक्तांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. ही बाब अतिशय हीन व निदणीय असून यामुळे मराठा समाजाच्या अस्मितेचे प्रतीक असणाऱ्या महापुरुषांचे बिटबंन करणाऱ्यांना तात्काळ अटक करण्याची मागणी खेड मराठा समाजाच्यावतीने निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. या समाज कंठाकवर अतिशय कठोर कारवाई होणे गरजेचे असल्याचे मत मराठा समाजाच्या वतीने निवेदनाद्वारे व्यक्त करण्यात आले. तसेच या प्रवृत्तीवर कारवाई न झाल्यास मराठा समाजाच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रात निषेधासह वेगळ्या मार्गाने विरोध दर्शविणार असल्याचा इशारा ही खेड मराठा समाजाच्या वतीने निवेदनाद्वारे दिला आहे.