रत्नागिरी जिल्ह्यात 4 जानेवारी पासून स्कूल बसची वाहतूक देखील बंद होणार

संग्रहित फोटो

देशात नव्याने लागू झालेला हिट & रन कायदा लागू झाल्यानंतर देशातील ट्रक चालकांनी वाहतूक बंद करून आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनात सहभागी होत आता स्कूल बस धारकांनी देखील रत्नागिरी जिल्ह्यात सर्वत्र 4 जानेवारीपासून विद्यार्थ्यांची वाहतूक बंद करण्याचा निर्णय घेणार असल्याचे खात्रीलायक वृत्त समजते. उद्या या संदर्भात स्कूल बस चालक आपापल्या शाळेत याबाबतची कल्पना देणार असल्याचे ही समजते.

देशात लागू झालेला काळा कायदा हिट अँड रनला आता सर्व वाहन चालकमधून प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येत आहे. या कायद्याविरोधात केवळ ट्रक चालक एकत्र येवून त्यांनी स्टेरिंग छोडो आंदोलन सुरू केलेले आहे. आता या आंदोलनात सर्व स्तरातून पाठिंबा मिळत असून सर्वसामान्य जनता ही आता चालकांच्या पाठीशी उभी असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. आता या आंदोलनाला पाठिंबा देत त्या मध्ये स्टेरिंग छोडो आंदोलनात आता स्कूल बस चालक ही सहभागी होणार आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातील स्कूल बस चालक हे 3 जानेवारी रोजी सायंकाळ पर्यंत हा निर्णय रद्द होतो की बदलला जातोय याची वाट पाहणार आहेत. यानंतर मात्र ते ही या आंदोलनात सहभागी होवून स्कूल बसची वाहतूक थांबवणार असल्याचे खात्रीशीर वृत्त समोर येत आहे. या संदर्भात ते उद्या जिल्ह्यातील विविध शाळांमध्ये या संदर्भात कल्पना देणार आहेत. मात्र ही कल्पना ते लेखी स्वरूपात देणार की तोंडी स्वरूपात हे मात्र स्पष्ट झालेले नाही . जर सरकारने हे आंदोलन थांबवले नाही तर पुढे हे आंदोलन उग्र स्वरूप धारण करेल यात मात्र काही शंका नाही.

Leave a Comment