शिवसैनिकाच्या कुटुंबाला एकनाथ शिंदेंचा मदतीचा हात

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दीर्घायुष्य लाभो हे साकडे घालण्यासाठी तिरुपतीला जाताना शिवसैनिक सुमंत रुईकर यांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबाला शिवसेनेकडून मदतीचा हात मिळाला आहे. नगर विकास मंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी रुईकर यांच्या संपूर्ण कुटुंबांची जबाबदारी घेतली असून आज प्राथमिक स्वरूपात त्यांना पाच लाख रुपयांची रोख मदत केली. मंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी व्हिडीओ कॉल द्वारे रुईकर यांच्या कुटुंबाशी संवाद साधत त्यांना आधार दिला. तसेच लवकरात लवकर घर देखील बांधून देण्यात येईल असे अश्वासन मंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी दिले आहे. आजची मदत मंत्री महोदय एकनाथजी शिंदे साहेबांचे प्रतिनिधी बाजीराव चव्हाण यांच्या हस्ते देण्यात आली. यावेळी त्यांच्या सोबत बीड येथील शिवसेनेचे अनिल दादा जगताप (मा.जिल्हाप्रमुख)
कुंडलिक खांडे (मा.जिल्हाप्रमुख), दिलीप गोरे (मा.नगराध्यक्ष),परमेश्वर सातपुते (किसान सेना जिल्हाप्रमुख ),पप्पू बरीदे, गोरख सिंघण, सुशील पिंगळे, बप्पा उगले, किशोर जगताप व सर्व शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते

भोस्ते घाटात अपघात, चालक ठार

मुंबई गोवा महामार्गावरील भोस्ते घाटात एका अवघड वळणावर चालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटून झालेल्या अपघातात चालक जागीच ठार झाला. हा अपघात सोमवारी सांयकाळी 4 वा. च्या सुमारास घडला. चालक नबी सरवर हे आपल्या ताब्यातील हजार्ड्स वेस्टचा ट्रक क्र. एम. एच. 04 डी. एस. 5975 हा घेऊन मुंबईच्या दिशेने निघाले होते. यावेळी त्यांचा ट्रक महामार्गावरील भोस्ते घटतील अवघड वळणावर आला असता ट्रकवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला. महामार्गावरील भोस्ते घाटातील अवघड वळणावर हा अपघात झाला. या अपघातावेळी नियंत्रण सुटलेला ट्रक हा घाटातील संरक्षक कठड्याला धडकला आणि ट्रकचा चक्काचूर झाला. यावेळी ट्रक चालक नबी सरवर (वय-53) याचे जागीच निधन झाले. या ठिकाणी असणाऱ्या शार्प कर्व्हमुळे अवजड वाहने वारंवार अपघातग्रस्त होत असल्याचे वाहन चालकामधून बोलले जात आहे. या अपघाताची माहिती मिळताच मदत ग्रुपचे प्रसाद गांधी यांनी आपल्या रुग्णवाहिकेसह अपघातस्थळी धाव घेतली.

राज्यात आजपासून पुन्हा जमावबंदी लागू, ओमायक्रोनच्या पार्श्वभूमीवर सरकरचा निर्णय

महाराष्ट्रात ओमयक्रोनच्या पार्श्वभूमीवर व वाढती रुग्णसंख्या पाहून सरकारने शुक्रवारपासून रात्रीची जमावबंदी लागू केली आहे. आज शुक्रवार 24 डिसेंबर पासून रात्री 9 ते सकाळी 6 वाजेपर्यंत जमावबंदी लागू करण्यात आली आहे. या जमावबंदी दरम्यान महाराष्ट्रात सर्व प्रकारच्या समारंभामध्ये उपस्थितांच्या संख्येवर निर्बंध घालण्यात येणार आहेत. केंद्रीय आरोग्य विभागाने देखील सर्व राज्यांसाठी संसर्ग रोखण्याकरिता पुरेशी काळजी घेण्यास व उपाययोजना करण्यास सांगितले आहे. सध्याच्या निर्बंधाचे स्वरूप हे प्राथमिक स्वरूपाचे असून ते आत्ताच न लावल्यास भविष्यात अधिक कठोर निर्बंध लावण्याची वेळ येऊ शकते असेही संसदीय कार्यमंत्री अनिल परब यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे. राज्यात गेल्या दोन दिवसात एक हजारापेक्षा जास्त पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत.  ख्रिसमस उत्सव, लग्न समारंभ, नवीन वर्षाचे स्वागत यामुळे गर्दी वाढून संसर्गाचा धोका वाढण्याची मोठी शक्यता असल्यामुळे आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 अन्वये संपूर्ण राज्यात काही अतिरिक्त निर्बंध लावण्याचे ठरवण्यात आल्याचे समजते.

काय आहेत निर्बंध – 1) राज्यात सर्व ठिकाणी 5 पेक्षा जास्त व्यक्तींना रात्री 9 ते सकाळी 6 वाजेपर्यंत एकत्र येण्यास बंदी असेल. 2) लग्न समारंभासाठी बंदीस्त सभागृहामध्ये 100 तर मोकळ्या ठिकाणी 250 किंवा क्षमतेच्या 25 % संख्येने उपस्थित राहता येणार आहे. 3) इतर सामाजिक व धार्मिक कार्यक्रमांना देखील हा नियम लागू असणार आहे. 4) या दोन्ही कार्यक्रमा व्यतिरिक्त होणाऱ्या कार्यक्रमात आसनक्षमतेच्या 50% तर जिथे आसन क्षमता निश्चित नाही अशा ठिकाणी 25% उपस्थिती असेल. 5) खुल्या जागेत होणाऱ्या सर्व कार्यक्रमांना 25% पेक्षा जास्त उपस्थिती नसेल. 6) क्रीडा स्पर्धा, खेळाचे समारंभ यासाठी कार्यक्रम स्थळाच्या आसन क्षमतेच्या 25 टक्क्यांपेक्षा जास्त उपस्थिती नसेल. 7) वरीलपैकी कोणत्याही प्रकारात न मोडणाऱ्या समारंभ किंवा एकत्र येण्याच्या कार्यक्रमात जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण उपस्थितांची संख्या किती असावी हे निश्चित करेल. असे करतांना 27 नोव्हेंबर 2021 च्या आपत्ती व्यवस्थापनाच्या आदेशाचे पालन होईल असे बघितले जाईल. 8) उपहारगृहे, जीम, स्पा, चित्रपटगृहे, नाट्यगृहे या ठिकाणी क्षमतेच्या 50 टक्के उपस्थिती राहील. या सर्वांना त्यांची संपूर्ण क्षमता तसेच 50 टक्के क्षमतेची संख्या जाहीर करावी लागेल. 9) याशिवाय जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणास आवश्यक वाटेल तिथे निर्बंध लावता येतील आणि ते करण्यापूर्वी  त्यानी जनतेस त्याची कल्पना देणे आवश्यक राहील. 10) जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणास स्थानिक परिस्थिती लक्षात घेऊन जिथे आवश्यक वाटेल तिथे अधिक कठोर निर्बंध लावता येतील. अशा परिस्थितीत देखील जनतेला निर्बंधाची योग्य ती माहिती देणे आवश्यक राहील.

प्रभोधनकार ठाकरे उद्यानाच्या सुशोभीकरण कामाचे लोकार्प

खेड नगर परिषद सुवर्ण जयंती जिल्हा नगरोत्थान अंतर्गत, वैशिष्टय़पूर्ण योजना १३ वा वित्त आयोग अंतर्गत खेड नगर परिषद प्रबोधनकार ठाकरे उद्यानाचे सुशोभिकरण कामाचे लोकार्पण सोहळा जेष्ठ नागरिकांच्या शुभहस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले.

यावेळी खेड नगर परिषदेचे कर्तव्यदक्ष नगराध्यक्ष व मनसे महाराष्ट्र राज्य सरचिटणीस वैभवजी खेडेकर,मा. शहराध्यक्ष तथा गटनेते भूषण चिखले, ऋषिकेश कानडे,खेड शहर उपाध्यक्ष गणेश बेलोसे, शहर उपाध्यक्ष रविंद्र उर्फ बाबू, नांदगांवकर, महिला व बालकल्याण समिती सभापती व नगरसेविका सौ. कल्याणी बेलोसे, मा. गटनेते तथा नगरसेवक अजय माने, नगरसेविका सौ. मानसी चव्हाण, सौ. जयमाला पाटणे, नगरसेवक तौसिफ खोत, नगरसेवक इलियास खतिब, जिल्हाध्यक्ष नंदु साळवी, तालुकाध्यक्ष प्रसाद शेट्ये, शहर उपाध्यक्ष आमीर महाडीक, सचिव नईम चौगुले, शहराध्यक्ष केतन उर्फ राजु आंब्रे, वाहतुक सेना जिल्हाध्यक्ष राजेश जोयसर, सांस्कृतिक सेना तालुकाध्यक्ष विनय माळी,पञकार राठोड सर, दादु नांदगांवकर, राजेंद्र चिखले, जयेश गुहागरकर, प्रदिप भोसले यांच्यासह नागरिक व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कशेडी घाटात कार दरीत कोसळून अपघात

मुंबई गोवा महामार्गावरील कशेडी घाटात कार रास्त्याशेजारील दरीत कोसळून अपघात झाला. हा अपघात सोमवार दि. 20 डिसेंबर रोजी सायंकाळी 7 वा. सुमारास घडला. या बाबत मिळालेल्या माहितीनुसार मुंबई ते शिव ता. खेड असा प्रवास करीत होते. या कारमध्ये 3 मोठ्या माणसांसह एक लहान मुलगी प्रवास करत होती. कशेडी घाटातील एका मोरीजवळ ही कार अपघातग्रस्त झाली. सुदैवाने या अपघातात कोणालाही इजा झाली नाही. कारमधून प्रवास करणाऱ्यांची नावे मात्र सामजू शकली नाहीत. यावेळी भरणे नाका खेड येथील रवींद्र पवार, बाळू चव्हाण, जयराम चव्हाण व राकेश जाधव या तरुणांनी अपघातग्रस्तांना मदतकार्य केले.

कार ट्रक अपघातातील जखमीचे निधन

मुंबई गोवा महामार्गावर सोमवरी पहाटे 4 वा. झालेल्या अपघातात रामचंद्र लक्ष्मण कदम (वय- 62) रा. बोरीवली हे गंभीर जखमी झाले होते. रविवारी रात्री रामचंद्र कदम हे आपल्या मुलांसह मालवणहून बोरीवली येथे जाण्यास निघाले होते. महाड येथील त्यांच्या फ्लॅटवर ते मुक्काम करून बोरीवलीकडे रवाना होणार होते. मात्र सोमवार पहाटे 4 च्या सुमारास त्यांची क्रेटा कार क्र. एम एच 47 बी बी 1577 ही रास्त्याशेजारी उभ्या असलेल्या जी जे 25 टी 9407 वर पाठीमागून आदळ्याने अपघात झाला. या अपघातात रामचंद्र लक्ष्मण कदम हे गंभीर झाले होते. त्यांना उपचारासाठी कलंबनी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असता डॉक्टर हजर नसल्याने उपचारास उशीर झाला. या ठिकाणी प्राथमिक उपचार केल्यानंतर त्यांना पुढील उपचारासाठी महाड व तेथून पनवेल येथे नेण्यात येत असताना वाटेतच त्यांचा मृत्यू झाला. महामार्गावर रविवारी मोठया प्रमाणात धुक्याची चादर पसरली होती. या दाट धुक्यामुळेच हा अपघात झाल्याचे बोलले जात आहे.

कार ट्रकचा अपघात, 1 गंभीर

मुंबई गोवा महामार्गावरील हॅपी पंजाबी ढाब्यासमोर ह्युंदाई क्रेटा कारने उभ्या असलेल्या ट्रकला पाठीमागून दिलेल्या धडकेत कारमधील एक जण गंभीर जखमी झाला. हा अपघात सोमवारी पहाटे 4 च्या सुमारास घडला.

मुंबई गोवा महामार्गावर गोव्याहून मुंबईच्या दिशेणी जाणारी ह्युंदाई क्रेटा कार क्र. एम एच 47 बी बी 1577 ही महामार्गावर उभ्या असलेल्या ट्रक क्र. जि जे 25 टी 9407 ला पाठीमागून धडकल्याने अपघात झाला. हा अपघात सोमवारी पहाटे 4 वा. सुमारास घडला. या अपघात कारमधून प्रवास करणारे श्री. कदम हे गंभीररित्या जखमी झाले. त्यांना उपचारासाठी कलंबणी उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र नेहमीप्रमाणे या ठिकाणी डॉक्टर रुग्णालयात उपस्थित नसल्याचे पहावयास मिळाले. श्री. कदम (पूर्ण नाव समजू शकले नाही) हे आपल्या मुलांसह मुंबईच्या दिशेने निघाले होते. रात्री पडलेल्या दाट धुक्यामुळे हा अपघात झाल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. या अपघाताची माहिती मिळताच 108 रुग्णवाहिका, मदत ग्रुपचे प्रसाद गांधी हे आपल्या रुग्णवाहिकेसह घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी अपघातग्रस्तांना मदतकार्य केले.

महाराष्ट्र परीट (धोबी) सेवा मंडळाची राज्य कार्यकारणी सभा संपन्न

महाराष्ट्र  परीट (धोबी) सेवा मंडळाची राज्य कार्यकारणीची सभा बुधवार दिनांक ८ डिसेंबर २०२१ रोजी सकाळी११वाजता श्री.संत गाडगे महाराज सभागृह, जरीमरी मंदिर ट्रस्ट वांद्रे ( पश्चिम ) मुंबई येथे प्रदेश अध्यक्ष श्री.राजेंद्र शेठ खैरणार यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. सभेची सुरुवात राष्ट्रसंत श्री. गाडगे महाराज यांच्या प्रतिमेचे पुजन पुष्पहार तसेच स्वर्गीय. रमाकांतशेठ कदम साहेब व स्वर्गीय. फाले गुरुजी  यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन करण्यात आली.

या सभेस उपस्थित श्री. राजेंदृशेठ खैरणार प्रदेश अध्यक्ष श्री. रवि राऊत, प्रदेश युवा अध्यक्ष श्री ज्ञानेश्वर गवळी, प्रदेश तंटामुक्ति अध्यक्ष सौ. सुषमाताई अमुतकर, महिला प्रदेश कार्यध्यक्षा श्री. रामदास शिंदे, प्रदेश महासचिव श्री. श्रीरंग मोरे, लांँन्डी प्रदेश कार्यध्यक्ष श्री.संतोष सवतिरकर, विभागीय महासचिव श्री. संतोष शिंदे, कोकण विभागीय युवा अध्यक्ष श्री. शांतीलाल करांडे, प्रदेश उपाध्यक्ष श्री. मुरलीधर शिंदे, वरिष्ठ प्रदेश उपाध्यक्ष श्री.राम पवार, प्रदेश उपाध्यक्ष/ अध्यक्ष  जरिमरी मंदिर ट्रस्ट श्री नागेश कालेकर, प्रदेश उपाध्यक्ष श्री. शाताराम (भाऊ) कदम, प्रदेश उपाध्यक्ष श्री. बी .डी सूर्यवंशी, प्रदेश उपाध्यक्ष श्री. सुधिरभाऊ खैरणार, कायदेशीर सल्लागार श्री. बापु ईशी, संघटक श्री. गिरीष राऊत, समाजसेवक श्री. विलास सांळुके, समाजसेवक श्री. राजु ननावरे, सोलापुर जिल्हा युवा अध्यक्ष श्री. अजय सोनट्के, सोलापुर जिल्हा  अध्यक्ष श्री. द्त्तायञ क्षिरसागर, सोलापुर जिल्हा सचिव श्री. दयानंद पवार, निम. सहकारी संस्था उपाध्यक्ष सौ. सुवणोतई सावैडे, समाजसेविका श्री अनंत वासकर, विभागीय अध्यक्ष  मुंबई -ठाणे श्री.अरविंद काटकर, सामाजिक कार्यकर्ते श्री. चेतन वरसकर, जिल्हा अध्यक्ष मुंबई -ठाणे श्री. सुधिर राऊत, कार्यध्यक्ष मुंबई  ठाणे श्री. कमलाकर राक्षे, समिती सदस्य मुंबई -ठाणे श्री. संजय सुवै, संघटक मुंबई -ठाणे श्री.संजय अंवावले, सहसचिव मुंबई ठाणे श्री. मंगेश गायकर, जिल्हा युवा अध्यक्ष मुंबई ठाणे श्री. यशवंत जांभुळकर, कार्यकारणी सदस्य मुंबई -ठाणे श्री. राजाराम कडू, खजिनदार मुंबई  ठाणे श्री. कृष्णा गायकर, कार्यकारणी सदस्य मुंबई श्री. संतोष जाधव, कार्यकारणी सदस्य सौ साधना वरसकर, महिला जिल्हा  अध्यक्षा मुंबई -ठाणे श्रीमती संगिता बामनोलकर, महिला उपाध्यक्षा मुंबई ठाणे श्रीमती जया घोडगे, महिला उपाध्यक्षा मुंबई ठाणे सौ सारिका कासेकर, महिला सचिव मुंबई  ठाणे श्रीमती उज्वला मांजगावकर, महिला सहसचिव मुंबई  ठाणे सौ. मिना घोंगडे, महिला कार्यकारणी सदस्य  मुंबई  ठाणे सौ. रेश्मा कडव, संघटक मुंबई  ठाणे सौ. कमलाताई ससाणे, महिला कार्यकारणी सदस्य सौ. विशाखा उजगावकर, समाजसेविका सौ रंजना पुरारकर, समाजसेविका श्री. रोहिदास पुरारकर, सामाजिक कार्यकर्ते श्री. मोहन आंबावले, विभागीय अध्यक्ष पालघर जिल्हा श्री. विनय महाडीक, जिल्हा अध्यक्ष पालघर जिल्हा श्री. निलेश पालशेतकर, सचिव पालघर जिल्हा श्री. सतिश टापरे, युवा अध्यक्ष पालघर जिल्हा श्री. सागर घाग, खजिनदार पालघर जिल्हा श्री. प्रकाश वरसकर, मार्गदर्शक  पालकर जिल्हा श्री.राजेंद् उजगावकर, कार्यकारणी सदस्य  पालघर जिल्हा सौ. निता कालवणाकर, महिला मार्गदशिका पालघर जिल्हा सौ. अक्षता सवतिरकर, महिला संघटक पालघर जिल्हा सौ. ऋतुजा उजगावकर, महिला सचिव पालघार जिल्हा सौ. निकिता पालशेतकर, उपाध्यक्षा पालघर जिल्हा श्री. रविद्र कदम, श्री.नदकिशोर पावसकर, श्री. विजय नाचणकर, श्री. राजाराम कनोजीया, सौ.जयश्री काटकर आदि समाजबांधव महिला पुरुष उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी मुबंई-ठाणे विभागीय शाखेच्या महिला पुरुष  पदाधिकारी व महासचिव श्री. संतोष सवतिरकर यांनी परिश्रम घेतले तसेच या सभेचे सुञसंचालन श्री. संतोष सवतिरकर महासचिव यांनी उत्तम  प्रकारे पार पाडले

चिपळूण न. प.च्या इमारतीवरून मुलांसह उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न

चिपळूण तालुक्यातील दळवटने व सध्या खेंड परिसरात राहणाऱ्या महेश नारायण नलावडे(वय-४५) याने आपल्या दोन मुलांसह चिपळूण न. प. च्या बिल्डिंगवरून उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मात्र न. प. कर्मचारी व चिपळूण पोलिसांनी या तिघांनाही वाचवले.

महेश नारायण नलवडे हा आपल्या पत्नी सोबत वाद झाल्याने सध्या विभक्त राहतो. शुक्रवारी दुपारी तो आपल्या दोन मुलांसह चिपळूण बाजारपेठ व नंतर सर्वांची नजर चुकवत चिपळूण नगरपरिषदेत दाखल झाला. यावेळी त्याने सर्वांची नजर चुकवत दुसऱ्या मजल्यावरील गच्चीवर चढून पहिल्यांदा मुलांना खाली टाकण्याचा प्रयत्न केला. मात्र चिपळूण न. प. चे अभियंते परेश पवार यांनी तात्काळ धाव घेत प्रसंगावधान दाखवत दोन्ही मुलांना त्यांच्या ताब्यातून खेचून घेतले. यावेळी महेश नलावडे यांनी मात्र दुसऱ्या माजल्यावरून खाली उडी टाकली. यावेळी न. प. कर्मचारी, पोलीस व नागरिकांनी खाली ताडपत्री धरून ठेवल्याने तो ताडपत्रीत पडला आणि बचावला. यावेळी चिपळूण न. प. च्या अधिकाऱ्यांनी त्याला चिपळूण पोलिसांच्या ताब्यात दिले.

3 कोटींची बिले ठेकेदाराने थकवली

खेड तालुक्यात सुरू असलेल्या रोलिंग स्टॉक कंपोनेट फॅक्टरीत काम करणाऱ्या स्थानिक कंत्राटदारांची सुमारे 3 कोटींची बिले मुख्य ठेकेदाराने थकवल्याने स्थानिक कंत्राटदार आक्रमक झाले असून त्यांनी फॅक्टरीबाहेर निदर्शने केली. बिलाची थकीत रक्कम तात्काळ मिळवण्यासाठी स्थानिक ठेकेदार आता आक्रमक झाल्याचे पहावयास मिळत आहेत.

सुमारे 4 वर्षांपूर्वी खेड तालुक्यातील लवेल व असगणी येथे केंद्र सरकारच्या रेल्वे मंत्रालयांतर्गत रेल्वे कारखाना सुरू झाला. या कारखान्याचे काम टाटा प्रोजेक्ट कंपनीने हाती घेतले. टाटा प्रोजेक्ट कंपनीचे पोट ठेकेदार असलेले एच. टी. सी. कंपनीने काही स्थानिकांना अत्यल्प दारात ही कामे दिलीत. तरीही स्थानिकांनी ही कामे पूर्ण केलीत मात्र पोट ठेकेदार असलेल्या कंपनीने स्थानिक ठेकेदारांना मोबदला मात्र दिल्याचे पहावयास मिळत नाही. सुमारे तीन कोटींची बिले थकवल्याने स्थानिक व्यवसायिक मात्र कोंडीत सापडले आहेत. अनेक ठेकेदारांनी ही कामे पूर्ण करण्यासाठी कर्ज काढून पैसे गुंतवल्याचे पहावयास मिळत आहेत. एकीकडे बिले थकल्याने व बँकेचा तगादा पाठीमागे लागल्याने आता या स्थानिक ठेकेदारावर उपासमारीची वेळ आली आहे. यामुळेच स्थानिक व्यावसायिकांनी लवेल येथील कंपनीच्या प्रवेशद्वारासमोर निदर्शने केलीत व येत्या काही दिवसात पोट ठेकेदार असलेल्या कंपनीने स्थानिक ठेकेदारांची बिले न दिल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा स्थानिकांचे प्रतिनिधित्व करनारे हुसेन ठाकूर व हुसेन घारे यांनी दिला.

Breking News – हेलिकॉप्टर दुर्घटनेत सी. डी. एस. बिपीन रावत यांचे निधन

तामिळनाडूतील कुन्नूरजवळ झालेल्या भारतीय वायुसेनेच्या हेलिकॉप्टर अपघातात चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल बिपिन रावत हे शहिद झाले आहेत. भारतीय वायू सेनेने ट्विट करत याची पुष्टी केली आहे. बिपीन रावत हे निलगिरी हिल्स येथील डिफेन्स सर्विस स्टाफ कॉलेज वेलिंग्टन येथे भेट देण्यास गेले होते.

31 डिसेंबर 2019 रोजी लष्करप्रमुख म्हणून निवृत्त झालेले बिपीन रावत यांनी सी. डी. एस. म्हणून 1 जानेवारी 2020 पासून पदभार स्वीकारला होता. भारतीय लष्कराचे ते 27 वे लष्करप्रमुख होते. जनरल बिपीन रावत हे सेंट एडवर्ड स्कूल शिमला आणि नॅशनल डिफेन्स अकॅडमीचे माजी विद्यार्थी आहेत. डिसेंबर 1978 मध्ये त्यांना आकरा गोरखा रायफलच्या 5 व्या बटालीयनमध्ये नियुक्त करण्यात आले होते. या ठिकाणी त्यांना “स्वार्ड ऑफ ऑनर” देऊन गौरवण्यात आले. दहशतवादविरोधी कारवायांमध्ये त्यांनी 10 वर्षांहून अधिक काळ त्यांना काम करण्याचा अनुभव होता. जनरल बिपिन रावत यांना उच्च उंचीवरील लढाऊ क्षेत्र आणि दहशतवाद विरोधी मोहिमेत काम करण्याचा अनुभव आहे. त्यांनी पूर्व सेक्टरमध्ये इन्फंट्री बटालियनचे नेतृत्व केलं आहे. काश्मीर खोऱ्यात राष्ट्रीय रायफल्स सेक्टर आणि इन्फंट्री डिव्हिजनचे नेतृत्वही केलं आहे. डिफेन्स सर्व्हिसेस स्टाफ कॉलेज, वेलिंग्टन आणि नॅशनल डिफेन्स कॉलेज कोर्सचे माजी विद्यार्थी, जनरल बिपिन रावत यांनी लष्करात 38 वर्षांहून अधिक काळ देशाची सेवा केली आहे.

प्रधानमंत्री रामबाण सुरक्षा योजनेच्या नावाखाली वायरल होतोय खोटा मेसेज

सध्या सोशल मीडिया वरून प्रधानमंत्री रामबाण सुरक्षा योजनेतुन 4000 रुपये मिळवा आताच रेजिस्ट्रेशन करा. आशा प्रकारचा संदेश सध्या सर्वत्र वायरल होताना पहावयास मिळत आहे. मात्र अशा कोणत्याही प्रकारची योजना प्रधानमंत्री कार्यालयाकडून जाहीर करण्यात आलेली नाही. यामुळे सध्या वायरल होणार हा मेसेज खोटा असून जर आपल्याला आशा प्रकारचा मेसेज आला असेल तर सावधान. या मेसेजमध्ये दिलेल्या लिंकला क्लीक करू नका. कारण अशी कोणत्याही प्रकारची योजना व स्कीम सध्या राबवली जात नसल्याचे समोर आले.

लष्कराच्या हेलिकॉप्टरचा अपघात, 4 ठार

लष्कराचे वरिष्ठ अधिकारी सी. डी. एस. बिपीन रावत व त्यांच्या पत्नी मधुलिका रावत प्रवास करत असलेले हेलिकॉप्टर दुर्घटनाग्रस्त होऊन कोसळले. हा अपघात तामिळनाडू येथील कन्नूर जवळ घडला. यावेळी लष्कराचे चीफ ऑफ डिफ्फेन्स स्टाफ बिपीन रावत आपल्या पत्नी मधुलिका रावत व काही अधिकारी व कामांडो या हेलिकॉप्टर मधून प्रवास करत होते. कन्नूर जवळील घनदाट जंगलात हे हेलिकॉप्टर कोसळले. या अपघातग्रस्त हेलिकॉप्टरने जंगलात कोसळताच पेट घेतला. आतापर्यंत 4 मृतदेह हाती लागले असून काही 80 टक्के भाजल्याचे पहावयास मिळाले. या अपघाताची माहिती मिळताच लष्कराची पथके व हवाई दल घटनास्थळी दाखल झाले असून रेस्क्यू ऑपरेशन युद्ध पातळीवर सुरु आहे.

दापोलीत मनसेचा स्वबळाचा नारा

मनसे राज्य सरचिटणीस व खेडचे नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांच्या हस्ते दापोली शहर निवडणूक कार्यालयाचे उद्घाटन व नगर पंचायत सार्वञिक निवडणुक – २०२१ च्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या उमेदवाराचा उमेदवारी अर्ज दाखल केला.

मंगळवार दिनांक ७ डिसेंबर २०२१ रोजी मनसे महाराष्ट्र राज्य सरचिटणीस व खेड नगर परिषदेचे नगराध्यक्ष श्री. वैभवजी खेडेकर साहेब यांच्या शुभहस्ते पक्षाच्या निवडणूक कार्यालयाचे उद्घाटन पार पडले. यावेळी दापोली नगर पंचायत सार्वञिक निवडणूक – २०२१ साठी पक्षाच्या वतीने प्रभु आळी वार्ड क्र. १ मधून प्रशांत जाधव, कोष्टा आळी वार्ड क्र. ६ मधुन वैष्णवी वेल्हाळ, कोकम आळी वार्ड. ७ किरण गायकवाड, फॅमिली माळ वार्ड- ८ अरविंद पुसाळकर यांचा अर्ज दाखल केले . यावेळी उपजिल्हाध्यक्ष व मा. नगरसेवक सचिन राजाराम गायकवाड, दापोली तालुकाध्यक्ष नितीन साठे, तालुका उपाध्यक्ष तथा नवशी ग्रामपंचायत सदस्य मिलींद गोरीवले,शहराध्यक्ष राकेश माली, उपजिल्हाध्यक्ष साईराज देसाई, ऋषिकेश कानडे, खेड तालुका प्रवक्ते देवकाते सर,वाहतूक सेना तालुकाध्यक्ष अरविंद पुसाळकर, मनविसे मा.जिल्हाध्यक्ष नंदु साळवी, खेड शहर उपाध्यक्ष सिद्धेश साळवी, काझी, राहुल प्रभु, उप प्रसिद्धी माध्यम प्रमुख सर्वेश पवार, प्रदिप भोसले यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते व महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते ,.

ब्रेकिंग न्युज – खेड पोलिसांची मोठी कारवाई, लाखोंचा गुटखा जप्त

खेड तालुक्यातील घाणेकुंठ येथे एका गोदमावर धाड टाकत खेड पोलिसांनी 8 लाख 640 रुपये किंमतीचा गुटखा जप्त केला असून एका आरोपीला ताब्यात ही घेतले आहे. ही कारवाई 2 डिसेंम्बर रोजी रात्री 8.10 मिनिटांनी करण्यात आली.

खेड पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार तालुक्यातील घाणेकुंठ येथील एका गोडाऊनमध्ये राज्यात बंदी असलेल्या गुटख्याचा साठा असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार जिल्हा पोलीस आधीक्षक मोहितकुमार गर्ग, उपविभागीय पोलीस अधिकारी शशिकिरण काशीद, पोलीस निरीक्षक निशा जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथक प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक सुजित गडदे, परी पोलीस उपनिरीक्षक योगेश मोरे, ए. एस. आय. घाणेकर, पोलीस शिपाई संकेत गुरव, पोलीस शिपाई विनायक येलकर, पोलीस शिपाई रुपेश पेंढामकर यांच्या पथकाने शुक्रवारी रात्री 8.10 वा. सुमारास घाणेकुंठ येथील गोदामात छापा टाकला असता सुमारे 8 लाख 640 रुपये किंमतीचा आर एम डी व विमल गुटखा आढळून आला. तो खेड पोलीस पथकाने जप्त करून गवळीवाडी घाणेकुंठ येथील तैयब सत्तर मेमन वय-39 वर्षे याला अटक केली. या प्रकरणी खेड पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला असून खेड पोलीस अधिक तपास करत आहेत.

भरणे नाका येथे टेम्पो कारचा अपघात

मुंबई गोवा महामार्गावरील भरणे नाका येथे टेम्पो व कारचा अपघात झाला. हा अपघात दुपारी 2.50 च्या सुमारास घडला. या अपघातामुळे भरणे नाका येथे काही काळ वाहतूक कोंडी झाली तर बघ्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी जमा झाल्याचे पहावयास मिळाले. या अपघातात दशमेश रोडलाइन्स कंपनीचा टेम्पो क्र. एम एच 03 डी व्ही 1899 हा खेडच्या दिशेने येत असताना मारुती कंपनीच्या कारने या टेम्पोला डाव्या बाजूने धडक दिल्याने हा अपघात झाला. या अपघातात कोणालाही इजा झाली नसली तरी कारचे किरकोळ प्रमाणात नुकसान झाले आहे. या अपघातानंतर हे प्रकरण आपापसात सामंजस्याने मिटवण्यात आले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते बुऱ्हाण टांके यांनी भरणे नाका येथील वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न केला.

कशेडी वाहतूक पोलिसांकडून प्रथमोपचाराचे प्रशिक्षण व स्ट्रेचरचे वाटप

महामार्गावर होणाऱ्या अपघातात रेस्क्यूकरते वेळी जखमींच्या जीवाशी खेळ होऊ नये म्हणून कशेडी वाहतूक पोलीस शाखेकडून व प्रथमोपचाराचे प्रशिक्षण व स्ट्रेचर वाटपाचा कार्यक्रम स्वामी समर्थ मठात पार पडला.

महाराष्ट्र राज्य अपर पोलीस महासंचालक वाहतुक मुंबई विभाग डॉ. भूषणकुमार उपाध्याय (भारतीय पोलीस सेवा) यांच्या मार्गदर्शनाखाली हायवे मृत्यूंजय दूत योजनेंतर्गत मृत्यूंजयदुत यांना कशेडी टॅप पोलीसांकडून प्रथमोपचाराबाबत प्रशिक्षण शिबीराचे आयोजन स्वामी समर्थ मठ कशेडी येथे करण्यात आले होते. यावेळी अपघात प्रसंगी घ्यावयाची दक्षता व सतर्कता यासह चुकीच्या रेस्क्यू पद्धतीमुकळे जखमींच्या जीवाशी खेळ होऊ शकतो असे स्पष्ट मत दि रेसिलेंन्ट फौंडेशन बोईसर-पालघरचे प्रशिक्षक भुपेंद्र मिश्रा यांनी व्यक्त केले. यावेळी कशेडी टॅप वाहतूक पोलीस उपनिरिक्षक अनिल चांदणे, एएसआय यशवंत बोडकर, शैलेश पालकर, मदत ग्रुप आणि मृत्यूंजय देवदुत खेडचे अध्यक्ष प्रसाद गांधी, नूरी उर्फ दादा हयातपीर पालोजी, दीपक उतेकर आदींसह वाहतूक पोलीस स्टाफ आणि मृत्यूंजय देवदुत मोठया संख्येने उपस्थित होते. या प्रसंगी शैलेश पालकर आणि दि रेसिलेन्ट फाऊंडेशन बोईसर-पालघरचे प्रशिक्षक भूपेंद्र मिश्रा यांच्याहस्ते खेड आणि पोलादपूर येथील मृत्यूंजय देवदुत सदस्यांना स्ट्रेचरचे मोफत वाटप करण्यात आले. यावेळी दि रेसिलेन्ट फाऊंडेशन बोईसर-पालघरचे प्रशिक्षक भूपेंद्र मिश्रा यांनी रस्ते अपघात, आग, बुडणारी व्यक्ती, मरणासन्न जखमी व्यक्ती, हात अथवा पायाला इजा झालेल्या जखमी व्यक्ती तसेच यांना स्ट्रेचर अथवा उपलब्ध कापडी ब्लँकेटसचा वापर करून जखमींना रूग्णवाहिकेपर्यंत पोहोचविणे, अर्धबेशुध्द व बेशुध्द व्यक्तींना शुध्दीवर आणण्यासाठी सीपीआर देण्याची योग्य पध्दत याविषयी प्रात्यक्षिकांसह मार्गदर्शन केले. कशेडी टॅप वाहतूक पोलीस आणि मृत्यूंजय देवदुत यांनी विविध प्रश्न विचारून दि रेसिलेन्ट फाऊंडेशन बोईसर-पालघरचे प्रशिक्षक भूपेंद्र मिश्रा यांना अपघातप्रसंगी घ्यावयाच्या दक्षतेची माहिती घेतली. याप्रसंगी कशेडी टॅप वाहतूक पोलीस उपनिरिक्षक अनिल चांदणे यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले

दोन्ही डोस घेऊनही, परदेश प्रवास न करता ओमीक्रोनची लागण

कोरोन प्रतिबंध लसीचे दोन्ही डोस घेतल्यानंतरही व कोणत्याही प्रकारची ट्रॅव्हल हिस्ट्री नसलेल्या एका आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यासह अन्य एकाला दक्षिण आफ्रिकेत सापडलेल्या ओमीक्रोन विषाणूची लागण झाल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे आता भारतातही ओमीक्रोनने शिरकाव केल्याचे समोर येत आहे. हा प्रकार महाराष्ट्राशेजारील कर्नाटक राज्यात आढळून आला.

महाराष्ट्रा शेजारील कर्नाटक राज्यात दोघीजनांना ओमीक्रोन या विषाणूची लागण झाल्याचे समोर आले आहे. यातील पहिला रुग्ण हा बरा होऊन परदेशी देखील परतला मात्र दुसऱ्या रुग्णाने कर्नाटकासह देशाची चिंता वाढवली. कारण दुसरी व्यक्ती ही आरोग्य कर्मचारी असून त्याने आतापर्यंत कधीच परदेश वारी केली नसल्याचे समोर आले. तर या आरोग्य कर्मचाऱ्यामुळे आणखी 5 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे समजते. त्यातील 3 जण प्रथिमिक तर 2 जण द्वितीय पद्धतीने त्यांच्या संपर्कात आले होते. आता या 5 ही जणांना झालेली लग्न फक्त करोना आहे की ओमीक्रोन हे मात्र अद्याप स्पष्ट झाले नसले तरी याचा तपास सूरु आहे. ओमीक्रोनची लग्न झालेल्या दोन्ही रुग्णांनी मात्र कोरोना प्रतिबंध लसीचे दोन्ही डोस घेतल्याचे समोर येत आहे. तर दुसऱ्या व्यक्तीला नेमकी ओमीक्रोनची लागण कशी झाली याचा तपास सुरू आहे. यामुळे ओमीक्रोन रुग्णांची संख्या वाढण्याची शक्यता सध्या वर्तविण्यात येत आहे.

शिवसेना नेते रामदास कदमांनी केले मुरली मनोहर पतसंस्थेचे अभिनंदन

शिवसेना नेते श्री. रामदासभाई कदम व दापोली विधानसभा मतदारसंघाचे आमदार श्री. योगेश कदम यांनी खेडमधील श्री मुरली मनोहर नागरी सहकारी पतसंस्थेने १०१ कोटी रुपयांच्या ठेवीचा टप्पा पार केल्याबाबत अभिनंदन केले. यावेळी शिवसेना नेते रामदास कदम यांनी माजी शिवसेना शहरप्रमुख, माजी नगरसेवक व श्री मुरली मनोहर नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन श्री. संजय मोदी तसेच माजी नगरसेवक व श्री मुरली मनोहर नागरी सहकारी पतसंस्थेचे संचालक श्री. राजेश बुटाला यांचे अभिष्टचिंतन केले व पतसंस्थेच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. सहकार क्षेत्राच्या माध्यमातून श्री मुरली मनोहर पतसंस्था अनेक होतकरुंना, सर्वसामान्य नागरिकांना व लहान मोठ्या व्यावसायिकांना अर्थसहाय्य करुन सक्षम करेल असा विश्वास शिवसेना नेते श्री. रामदास कदम व दापोली विधानसभा मतदारसंघाचे आमदार श्री. योगेश कदम यांनी व्यक्त केला. यावेळी माजी जि. प. बांधकाम समिती सभापती व विद्यमान सदस्य श्री. चंद्रकांत उर्फ अण्णा कदम, शिवसेना खेड तालुकाप्रमुख श्री. विजय जाधव, माजी नगरसेवक श्री. मिनार चिखले, शाखाप्रमुख श्री. कौशल चिखले यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

लवेल येथे वणवा, एम एस ई बीच्या सब स्टेशनला वणव्याचा गराडा

खेड तालुक्यातील लवेल येथील एम एस ई बी च्या सब स्टेशनच्या पाठीमागे असणाऱ्या मोकळ्या जागेत भीषण वणवा लागला. हा वणवा मोठ्या प्रमाणात लागला असून खूप मोठे क्षेत्र या वाणव्याच्या भक्षस्थानी पडले आहे. या परिसरात लागलेल्या वणव्यामुळे मोठ्या प्रमाणात धुराचे लोट निर्माण झाले होते. या वणव्याबाबत स्थानिकांकडून माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला असता हा वणवा पाठीमागील बाजूकडून लागला आहे. महामार्गालगत असणाऱ्या लवेल सब स्टेशनच्या तिन्ही बाजूला या वणव्याचा गराडा पडल्याचे पहावयास मिळत होते.

खेड तालुक्यातील लोटे एमआयडीसीच्या नवीन संपादित केलेल्या लवेल येथील मोकळ्या जागेत आज भीषण वणवा लागला होता. हा वणवा इतका भीषण होता की लवेल येथील महावितरणच्या सब स्टेशनला आगीने विळखा घातला होता. तब्बल २ ते ३ किलोमीटर अंतरावर हा वणवा लागला होता. रात्री उशिरा पर्यंत हा वणवा धगधगत असल्याने अनेक घरांना धोका देखील निर्माण झाला होता. सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास लोटे एमआयडीसी मधील नवीन संपादित जागेत गावातला मोठा वणवा लागला. तब्बल २ ते ३ किलोमीटर अनंतरवरून हा वणवा दिसत होता. अनेक भूचर प्राणी देखील या वणव्याच्या भक्षस्थानी गेल्याचा संशय देखील व्यक्त केला जात आहे. लवेल येथील महावितरणचे असणाऱ्या सब स्टेशन ला देखील या वनव्याने विळखा घातला होता. या वणव्याच्या धुराचे प्रचंड लोट मुंबई गोवा महामार्गावरून दिसत होते. गेल्या वर्षी देखील अस्गनी येथील वन विभागाच्या जंगलाला लागलेल्या वणव्यात अनेक औषधी आणि लागवड केलेली झाडे आगीच्या भक्षस्थानी पडल्याची घटना घडली होती .

1 डिसेंबरला शाळा सुरू होणार – आरोग्यमंत्री राजेश टोपे

महाराष्ट्र सरकारने एक डिसेंबरपासून शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, त्यानंतर काही दिवसांतच कोरोनाचा नवीन व्हेरियंट ओमिक्रॉन आढळल्याने खळबळ उडाली. राज्य सरकारनेही या व्हेरियंटच्या पार्श्वभूमीवर खबरदारीच्या उपाययोजना आखण्यास सुरुवात केली आहे. ओमिक्रॉनमुळे चिंतेचे वातावरण असताना दुसरीकडे आता पुन्हा शाळा सुरू होणार का, याबाबत  विद्यार्थ्यांसह पालक, शिक्षकांमध्ये संभ्रमाचे वातावरण तयार झाले होते. यावर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी शाळा 1 डिसेंमबरलाच सुरू होणार असल्याचे सूतोवाच केले.

सरकारने पहिली ते सातवीपर्यंतची शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला याला चाईल्ड टास्क फोर्सनेही हिरवा झेंडा दाखवला होता. आता मात्र ओमिक्रॉनमुळे सुरू असलेल्या घडामोडींमुळे शाळा सुरू करण्याबाबतच्या निर्णयावर शिक्षक, पालकांमध्ये मतमतांतरे असल्याचे दिसून येते. शाळा सुरू करण्याबाबत शिक्षण विभागाने वेट अँड वॉच ची भूमिका घ्यावी असे शिक्षक संघटनांचे मत आहे. 15 दिवसांनी या निर्णयाबाबत विचार करावा असेही शिक्षक संघटनांनी म्हटले. मुंबईतील शिक्षकांची दोन दिवसात पहिली ते सातवी या टप्प्यातील शाळा सुरू करण्याबाबत तयारी नसल्याचे काहींनी म्हटले आहे. आरोग्य विभागाच्या मार्गदर्शक सूचना पाहता आणि पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांची संख्या पाहता शाळा सुरू करण्याची तयारी दोन दिवसात होणे अशक्य असल्याचे मुंबईतील शिक्षकांनी म्हटले आहे. पालकांकडूनही शाळा सुरू करण्याच्या निर्णयाबाबत आता सावध पवित्रा घेतला जात आहे. शाळा सुरू करण्याच्या निर्णयाचे स्वागत करणाऱ्या काही पालकांनी बदललेल्या परिस्थितीत मुलांना शाळेत पाठवण्यास नकार दिला आहे. शाळा सुरू करण्याबाबत येत्या काही दिवसात निर्णय होण्याची शक्यता आहे. मात्र, शाळा सुरू झाल्या नाहीत तरी ऑनलाइन शिक्षण सुरू राहणार असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. 

शिवसेनाप्रमुखांच्या स्मृतीदिनी रक्तदान शिबिर

शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांनी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्याचे आवाहन केले होते. शिवसेना नेते व युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी दिलेल्या आदेशानुसार आम. भास्कर जाधव व आम. योगेश कदम यांच्या मार्गदर्शनाखाली युवासेना लोटे आयोजित “रक्तदानाचा महायज्ञ” हे रक्तदान शिबिर जि. प. आदर्श केंद्रीय शाळा क्र. 1 येथे 27 नोव्हेंबर रोजी पार पडला.

या शिबिराचे उद्घाटन आमदार मा. श्री. योगेश कदम व जिल्हा परिषद अध्यक्ष मा. श्री. विक्रांत जाधव यांनी केले. यावेळी माजी जि. प. बांधकाम समिती सभापती व विद्यमान सदस्य श्री. चंद्रकांत उर्फ अण्णा कदम, जि. प. सदस्य श्री. सुनिल मोरे, श्री. विनोद झगडे, श्री. अरविंद चव्हाण, पं. समिती उपसभापती श्री. जिवन आंब्रे, युवासेना जिल्हाअधिकारी अजिंक्य मोरे, माजी तालूकाप्रमुख श्री. मोहन आंब्रे, उद्योजक श्री. शैलेश कदम, खेड तालुका युवतीसेना अधिकारी सिध्दी शिंदे, लोटे  सरपंच श्री. चंद्रकांत चाळके, घाणेखुंटचे सरपंच श्री.अंकुश काते, उपतालुकाप्रमुख श्री. विष्णू आंब्रे, युवासेना तालूका सचिव श्री. राकेश सागवेकर, युवासेना चिपळूण शहर अधिकारी श्री. निहार कोवळे, उपतालुका अधिकारी श्री. चेतन वारणकर, श्री. सौरभ चाळके, श्री. विक्रांत साने, तालुका सह सचिव श्री. सूरज रेवणे, विभाग अधिकारी श्री.स्वप्नील सुर्वे, प्रणय ननावरे, श्री. साहिल मोरे, श्री. सूरज मोगरे, माजी विभाग अधिकारी डॉ. मच्छिंद्र गोवळकर, विभाग समन्वयक श्री. किरण ठसाळे, शाखा अधिकारी श्री. ओमाकर चाळके, माजी नगरसेवक श्री. पप्पू चिकणे, श्री. बुवा सावंत, श्री. मनोहर कालेकर, परशुराम हॉस्पिटल व रिसर्च सेंटरचचे डॉ. हिप्परकर, डॉ.अनुपम अलमान, श्री. अजित देशपांडे व रत्नागिरी जिल्हा रुग्णालयाच्या डॉ. जयश्री मॅथीव, डॉ. प्रकाश चौधरी, डॉ. सानिका पाटील यांसहित शिवसेना, युवासेना पदाधिकारी व रक्तदाते बहुसंख्येने उपस्थित होते. या रक्तदान शिबिरामध्ये १६० हून अधिक रक्तदात्यांनी सहभाग घेतला व ११२ रक्तदात्यांनी रक्तदान केले. परशुराम हॉस्पिटल व रिसर्च सेंटर तसेच जिल्हा रुग्णालय रक्तपेढी यांनीसूद्धा सदर शिबीर यशस्वी पार पडण्यासाठी सहभाग घेतला. या कार्यक्रमाच्या वेळेस आमदार योगेश कदम व जिल्हा परिषद अध्यक्ष विक्रांत जाधव यांनी स्वतः रक्तदान करून कार्यक्रमाची सुरुवात केली. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कार्यालय प्रमुख श्री. दीपक आंब्रे, युवासेना उपतालुका अधिकारी श्री. चेतन वारणकर युवासेना शाखा अधिकारी श्री. ओमकार चाळके, युवासेना माजी विभाग अधिकारी डॉक्टर मच्छिंद्र गोवळकर, रुपेश काते, सौरभ चाळके, ओमकार चिले, अमोल आंब्रे, सूरत काते, मयूर आंब्रे, शुभम सावंत, प्रणव शिगवण, शुभम सागवेकर, गौरव आंब्रे, रोहन कालेकर, अमर साळुंखे, राजन सिंग* तसेच सर्व युवासैनिकांनी व पदाधिकाऱ्यांनी विशेष मेहनत घेतली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. मोहनसर वारणकर यांनी केले. कार्यक्रम यशस्वी झाल्याबद्दल लोटे चे सरपंच चंद्रकांत चाळके यांनी आयोजकांचे आभार मानले.

खेडमध्ये एस टी बस सेवा सुरू, काही मोजक्या प्रवाशांसह एस टी बस रवाना

गेल्या 15 दिवसाहून अधिक काळ ठप्प झालेली महाराष्ट्राची जीवन वहिनी आता हळूहळू पूर्वपदावर येत असताना पहावयास मिळत आहे. आज शुक्रवार दि. 26 नोव्हेंबर रोजी दुपारी 12.50 च्या सुमारास खेड ते चिपळूण अशी जाणारी एस टी बस अवघ्या काही प्रवाशांना घेऊन मार्गस्थ झाली. आज दुपारी खेड चिपळूण व खेड दापोली मार्गावर एस बसच्या फेऱ्या सुरू करण्याचा मानस खेड स्थानकातील कर्मचाऱ्यांचा दिसून येत आहे. यामुळे आता हळूहळू महाराष्ट्राची जीवनवाहिनी पूर्वपदावर येण्यास सुरुवात झाल्याचे म्हटले तर वावगे ठरू नये.

लालपरीच्या इतिहासातील सर्वात मोठा निर्णय, 41% टक्के पगारवाढ, 93 हजार कर्मचाऱ्यांचा विजय, उदय सामंत यांची महत्वपूर्ण भूमिका

महाराष्ट्राची जीवनवाहिनी म्हणून ओळखली जाणारी लालपरी म्हणजे एस टी बस गेल्या 15 दिवसापासून ठप्प आहे. शासनात विलानीकरण करण्याच्या प्रमुख मागणीसह इतर मागण्यासाठी एस टी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला होता. त्यामुळेच आज लालपरीच्या इतिहासातील सर्वात मोठा निर्णय घेण्यात आला असून तब्बल 41% टक्के पगारवाढ करण्यात आली असून हा 93 हजार कर्मचाऱ्यांचा हा विजय झाला आहे. विलनीकरण न्यातलायच्या कक्षात असल्याने पगरवाढीच्या मुद्द्यावर हा संप मागे घेण्यात येणार का याचा निर्णय मात्र कर्मचारीच घेणार आहेत. या सर्व प्रकरणात आ. उदय सामंत यांनी महत्वपूर्ण भूमिका बजावली आहे.

गेले 15 दिवस एस टी कर्मचाऱ्यांचा संप सुरू होता. परिवहन मंडळाची शासनात विलनिकरण करण्याची प्रमुख मागणी घेऊन संप पुकारला होता. मात्र शासनात विलनीकरण करण्याची मागणी ही मा. उच्च न्यायालयात प्रलंबित आहे. त्यासाठी मा. उच्च न्यायालयाने त्री सदस्य समिती स्थापन करून त्यांच्याकडून अहवाल मागवला आहे. या समितीत मुख्य सचिव, वित्त सचिव व परिवहन विभागाचे सचिव यांचा समावेश असून या समितीने 12 आठवड्यात अहवाल मुख्यमंतत्र्यांकडे द्यावा. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या अहवालासह मा. उच्च न्यायालयात हा अहवाल देणार असल्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी पत्रकार परिषदेत दिली. तसेच विलनिकरणचा निर्णय हा मा. उच्च न्यायालयात आहे. त्यासाठी 12 आठवड्यांचा कालावधी मा. उच्च न्यायालयाने दिला असल्याने ग्रामीण जनतेची व विद्यार्थ्यांची अडचण लक्षात घेऊन आ. सदाभाऊ खोत, गोपीचंद पडळकर, उदय सामंत या सर्वांनी महत्वाची भूमिका बजावली. विलनिकरनाचा निर्णय जर समितिने अहवालातून राज्य शसनाला दिला तर तो मान्य असेल असे सूचक वक्तव्य परिवहन मंत्री अनिल परब यांनी केले. यावेळी परिवहन विभागाच्या इतिहासातील सर्वात मोठा निर्णय परिवहन मंत्री अनिल परब यांनी जाहीर केली. आता पर्यंतची सर्वात मोठी म्हणजे 41% टक्के इतकी पगारवाढ करण्याचा निर्णय सरकारने जाहीर केला. यामध्ये 1 ते 10 वर्षे नोकरी झालेल्या गटातील कर्मचाऱ्यांना 5 हजाराची, 10 ते 20 वर्षे नोकरी केलेल्या गटातील कर्मचाऱ्यांना 4 हजाराची तर 20 वर्षाहून आधी काळ नोकरी केलेल्या कर्मचाऱ्यांना 2.5 हजाराची पगारवाढ जाहीर करण्यात आली. तसेच एस टी कर्मचाऱ्यांचा पगार हा दर महिन्याच्या 10 तारखेच्या आत देण्याची हमी राज्य सरकारने घेतली. तसेच परिवहन विभागाचे उत्पन्न वाढवण्यास मदत करणाऱ्या कर्मचाऱ्यांना अतिरिक्त भत्ता देणार असल्याचे ही त्यांनी यावेळी जाहीर केले. राज्य शासनाकडून कर्मचार्यांना तात्काळ कामावर हजर होण्याची विनंती देखील केली आहे.

पतसंस्थेवर दरोडा, गोळीबारात व्यवस्थापकाचा मृत्यू

पुणे जिल्ह्यातील जुन्नर येथील एका पतसंस्थेवर बुधवार दि. 24 नोव्हेंबर रोजी दुपारी 1.30 वा. सुमारास शसत्र दरोडा पडला. यावेळी झालेल्या गोळीबारात पतसंस्थेच्या व्यवस्थापकाचा मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण जुन्नर परिसरात व तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.

बँकेचे फुटेज

जुन्नरच्या 14 नंबर येथे अनंत ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था आहे. ही पतसंस्था पुणे-नाशिक महामार्गालागत आहे. आज बुधवार दि. 24 नोव्हेंबर रोजी दुपारी 1.30 वा. सुमारास पतसंस्थेचे व्यवस्थापक राजेंद्र भोर व लिपिक अंकिता नेहरकर हे दोघेजण जेवण करत असताना हेल्मेट घातलेल्या दोन अज्ञातांनी पतसंस्थेत प्रवेश केला. यावेळी त्यांनी बंदुकीचा धाक दाखवत पैशाची मागणी केली. त्यांच्या या मागणीला नकार देताच या दोघा अज्ञातांनी त्यांच्यावर बंदुकीतून गोळीबार करण्यास सुरुवात केली. यावेळी झालेल्या गोळीबारात व्यवस्थापक राजेंद्र भोर (वय 52) हे जखमी झाले. त्यांना नारायणगाव येथे उपचारासाठी नेले असता उपचारापूर्वीच त्यांचेच निधन झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. या सर्व घटनाक्रमात दरोडेखोरांनी पतसंस्थेतील नेमक्या किती रकमेची लूट केली याची माहिती स्पष्ट झाली नसली तरी दरोडेखोरांनी दुचाकीवरून पळ काढला.

राज्यात पहिली ते चौथीचे वर्ग लवकरच सूरु होणार – राजेश टोपे

महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने शहरी भागातील 8 ते 12 वी आणि ग्रामीण भागातील 5 वी ते 12 वीचे वर्ग यापूर्वीच सुरू झाले आहेत. मात्र आता राज्यात प्राथमिक शाळा सुरू कऱण्याची मागणी जोर धरत असल्याने या संदर्भात टास्क फोर्सने सुद्धा महत्त्वाचा सल्ला राज्य सरकारला दिला आहे. शाळा सुरू करण्याच्या संदर्भात आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सुद्धा या गोष्टीला दुजोरा दिला आहे.

शालेय शिक्षणंत्री वर्षा गायकवाड यांच्या सोबतही शाळा सुरू करण्या संदर्भात चर्चा झाली आहे. शालेय शिक्षण विभागही शाळा सुरू कऱण्याच्या तयारीत आहे. आरोग्य विभागाने तर परवानगी दिली आहे. उद्या होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत या प्रस्तावावर चर्चा होईल, निश्चितपणे मुख्यमंत्री स्तरावर या संदर्भात अंतिम निर्णय घेतला जाईल. प्राथमिक शाळा, दिव्यांग शाळा आणि बोर्डिंग शाळा सुरू करता येतील असं टास्क फोर्सने राज्य सरकारला सल्ला दिला आहे. उद्या होणाऱ्या कॅबिनेट बैठकीत शाळा सुरू करण्यासंदर्भात निर्णय घेतला जाईल. पीडियाट्रिक टास्क फोर्स ने सुचवल्या काही उपाय योजना सुचवल्या आहेत. बोर्डिंग स्कुल म्हणजेच निवासी शाळा मध्ये येताना मात्र आरटीपीसीआर चाचणी रिपोर्ट बंधनकारक करावा असा सल्ला देण्यात आला आहे. राजेश टोपे पुढे म्हणाले की, आता राज्यात 700 ते 800 रुग्ण दैनंदिन आढळून येत आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रामाण 98 टक्के इतके आहे. मुले आजारी पडण्याचे प्रमाण जास्त नाही. पालकांनी चिंता करण्याचं कारण नाहीये. तिसऱ्या लाटेची शक्यता असली तरी ती सौम्य स्वरुपाची असेल, सध्यातरी फार काळजीचा विषय नाहीये, मात्र, असे असले तरी, काळजी घेणं आणि लसीकरण पूर्ण करणे आवश्यक आहे. राज्यातील पहिली ते सातवीच्या शाळा सुरु करण्यासाठी आरोग्य विभागाची कोणतीही अडचण नाही, असं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटलं आहे. मुख्यमंत्री आणि कॅबिनेटच्या बैठकीत यासंदर्भातील अंतिम निर्णय होईल. येत्या 10 दिवसात याबाबत निर्णय होईल, असही राजेश टोपे म्हणाले. पहिली ते चौथीचे वर्ग सोशल डिस्टन्सिंगचं पालन करुन सुरु करण्यास परवानगी द्यावी यासंदर्भात चाईल्ड टास्क फोर्सनं परवानगी द्यावी असं मत मांडलं आहे. यासंदर्भातील अंतिम निर्णय घेण्याचा अधिकार मुख्यमंत्र्यांना आणि कॅबिनेटला आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आरोग्य विभागाची पहिली ते चौथी वर्ग सुरु करण्यास कोणती अडचण नसल्याचं म्हटलं आहे. राज्य सरकारनं पहिली ते चौथीच्या वर्ग सुरु करण्यास परवागनगी दिल्यानंतर पालकांनी शाळा सुरु करण्यास परवानगी द्यावी, असे आवाहन ही राजेश टोपे यांनी केलं आहे.

10 वीच्या विद्यार्थ्यांचा मृत्यू, खेड शहरातील घटना

खेड शहरातील नामांकित आशा एल टी टी इंग्लिश मिडियम स्कूलच्या 10 वी.च्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचा वर्गातच चक्कर येऊन पडल्याने मृत्यू झाला. ही घटना बुधवार दि. 24 नोव्हेंबर रोजी सकाळी 8.10 च्या सुमारास घडली.

या बाबत मिळालेल्या माहितीनुसार खेड शहरातील नामांकित अशी एल टी टी इंग्लिश मीडियम स्कूलच्या इयत्ता 10 वी. च्या वर्गात शिकणारा हुसैनेन शरीफ शेख वय. 16 सध्या रा. कुंभारआळी खेड (मूळचा- जळगाव) हा सकाळी 8.10 वा. सुमारास शाळेत आला. आज बुधवार रोजी शाळेत सराव परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. हुसैनेन शेख हा वर्गात आल्यानंतर परीक्षा सुरू होण्यापूर्वी आपले साहित्य ठेवत असताना तो चक्कर येऊन कोसळला. त्याला प्रशाला व्यवस्थापनाने तात्काळ शहरातील एका नामांकित खासगी रुग्णालयात उपचारासाठी नेले. तेथून त्याला कलंबनी उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले मात्र उपचारापूर्वीच त्याचे निधन झाल्याचे रुग्णालय प्रशासनाने जाहीर केले.

पप्पू चिकणेंची कबड्डीच्या निवड चाचणीत सदस्यपदी निवड

खेड शहरातील सतीश उर्फ पप्पू चिकणे यांची जिल्हास्तरीय खेलो इंडिया क्रीडा स्पर्धा 2021-22 सालच्या निवड चाचणी समितीच्या सदस्य पदी नियुक्ती करण्यात आली. ही निवड जिल्हा क्रीडा अधिकारी रत्नागिरी यांच्या वतीने करण्यात आली. क्रीडा व युवक सेवा संचनालयाच्या व जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्या मार्फत जिल्हास्तरीय खेलो इंडिया मुलांची कबड्डी स्पर्धा व निवड चाचणीचे आयोजन S. V. J. C. T. चे क्रीडा संकुल डेरवण येथे दि. 25 नोव्हेंबर 2021 रोजी होणाऱ्या निवड चाचणीत सदस्य म्हणून उपस्थित राहण्याचे पत्र जिल्हा क्रीडा अधिकारी किरण बोरवडेकर यांनी दिले आहे.

आ. योगेश कदम यांच्या माध्यमातून महिला बचत गटांना व्यावसायिक प्रशिक्षण

खेड दापोली मंडणगड मतदार संघाचे आमदार योगेश कदम व सौ श्रेयाताई कदम यांच्या प्रेरणेने व महिला आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्षा सौ. ज्योतीताई ठाकरे यांच्या माध्यमातून महिला बचत गटांना व्यवसायिक प्रशिक्षण देण्यात आले.

खेड तालुका महिला आघाडी व महिला आर्थिक विकास महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने महिला बचत गटांना व्यवसायिक प्रशिक्षण देण्यात आले. हे प्रशिक्षण खेड शहरातील शिवतेज आरोग्य संस्थेच्या हॉलमध्ये पार पडले. यावेळी महिलांना केक तयार करणे, ज्वेलरी मेकिंग व अगरबत्ती तयार करण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. या प्रशिक्षणाचा लाभ तालुक्यासह शहरातील महिलांनी घेतला. यावेळी महिला आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्या उपस्थित होत्या. या शिबिरात आमदार योगेश कदम, सौ. श्रेयाताई कदम व सौ. ज्योतीताई ठाकरे यांनी मार्गदर्शन केले.

साताऱ्यात राष्ट्रवादीच्या कार्यालयावर दगडफेक केली.

सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे यांचा केवळ एका मताने पराभव झाला. यावेळी शशिकांत शिंदे यांच्या समर्थकांनी चक्क राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्ष कार्यालयावर दगडफेक केली. या कार्यकर्त्याना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मात्र कार्यकर्त्यांनी केलेली दगडफेक ही पक्षालाच पक्ष्यातून घरचा आहेर दिल्यासारखे आहे.

जिल्हा बँकेच्या निवडणुकीत जावळी विकास सेवा सोसायटीच्या मतदार संघातून विद्यमान आमदार शशिकांत शिंदे व ज्ञानदेव रांजणे हे एकमेकांसमोर उभे होते. रविवारी मतदानाच्या दिवशी दोन्ही उमेदवारांची हमरीतुमरी झाली. पोलिसांसमोर अगदी एकमेकांना अपशब्द देखील उच्चारले गेले. यावेळी दोन्ही उमेदवारांनी समंजसपणा दाखवत हा वाद मिटवल्याने मोठा अनर्थ टळला. मात्र आज मंगळवार रोजी मतमोजणी झाली आसता विद्यमान आमदार शशिकांत शिंदे यांचा एका मताने पराभव झाला. यावेळी जावळी मतदार संघासाठी 49 मतदारांनी मतदान केले होते. त्यापैकी शशिकांत शिंदेंना 24 तर ज्ञानदेव रंजणेना 25 मते मिळाली. अवघ्या एका मताने विद्यमान आमदार शशिकांत शिंदेंना पराभव स्वीकारावा लागला. यावेळी संतप्त झालेल्या कार्यकर्त्यांनी स्वतःच्याच पक्ष कार्यालयावर दगडफेक करत निषेध व्यक्त केला.

कशेडी घाटात टँकर अपघातात चालक जागीच ठार

मुंबई गोवा महामार्गावरील कशेडी घाटातील आंबा स्टॉप येथे टँकरला झालेल्या अपघातात चालकाचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात सोमवारी पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास घडला.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार टँकर चालक वसीम हा आपल्या ताब्यातील टँकर क्र. एम एच 04 जे के 7717 हा घेऊन वापी ते लोटे असा प्रवास करत होता. मुंबई गोवा महामार्गावरील कशेडी घाटातील आंबा स्टॉप येथे हा टँकर पहाटे 4 वा. सुमारास आला असता चालकाचा टँकरवरील नियंत्रण सुटल्याने अपघात झाला. यावेळी टँकर चालक वसीम याचा केबिनमध्ये अडकल्याने मृत्यू झाला. या टँकरमध्ये हायड्रोक्लोरिक ऍसिड असून ते ज्वलनशील नसल्याने मोठा अनर्थ टळला. या अपघाताची माहिती मिळताच खेड पोलीस स्थानकाचे पोलिस उपनिरीक्षक गडदे यांच्यासह महामार्ग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अग्निशामक दलाला ही यावेळी पाचारण करण्यात आले होते. या अपघाताची माहिती मिळताच मदत ग्रुपचे प्रसाद गांधी यांनी आपल्या टीमसोबत घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य केले. यावेळी मदत ग्रुपने अग्निशामक दलाच्या जवानांच्या व क्रेनच्या साह्याने केबिनमध्ये अडकलेल्या चालकाचा मृतदेह बाहेर काढला.

खेड येथे जिल्हास्तरीय कबड्डी पंच शिबिर संपन्न

रत्नागिरी जिल्हा कब्बड्डी असोसिएशनच्या मान्यतेने खेड तालुका कब्बड्डी असोसिएशन आयोजित जिल्हास्तरीय कबड्डी पंच शिबिर आज  रविवार दिनांक २१ नोव्हेंबर २०२१ रोजी  ग. द. तटकरे सभागृह खेड येथे संपन्न झाले. या शिबिराचे उद्घाटन दापोली, खेड, मंडणगड मतदार संघाचे आमदार श्री. योगेश कदम यांच्या शुभ हस्ते पार पडले.

या कार्यक्रमाला मा. अँड. श्री. आस्वाद पाटील सरकार्यवाह महाराष्ट्र राज्य कब्बड्डी असोसिएशन, मा. श्री. रवींद्र देसाई संयुक्त कार्यवाहक  महाराष्ट्र राज्य कब्बड्डी असोसिएशन, मा. श्री. विश्वासराव मोरे अध्यक्ष, पंच मंडळ महाराष्ट्र राज्य कब्बड्डी असोसिएशन, मा. श्री. दत्ता झिंगुर्डे सचिव, पंच मंडळ महाराष्ट्र राज्य कब्बड्डी असोसिएशन, मा. श्री. मनोहर इंदुलकर माजी अध्यक्ष पंच मंडळ, महाराष्ट्र राज्य कब्बड्डी असोसिएशन, मा. श्री. सदानंद माजलकर सदस्य, पंच मंडळ महाराष्ट्र राज्य कब्बड्डी असोसिएशन, रत्नागिरी पंच मंडळ प्रमुख नितीन बांद्रे, रत्नागिरी जिल्हा कबड्डी असोसिएशनचे खजिनदार जोशी काका, खेड पंचायत समिती सभापती मानसी जगदाळे, माजी सभापती विजय कदम, सुप्रिया पवार, शशिकांत चव्हाण, विजयराव जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक खेड तालुका कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष श्री. सतीश उर्फ पप्पू चिकणे यांनी प्रास्ताविकामध्ये कार्यक्रमाची रूपरेषा मांडली.  यानंतर रत्नागिरी जिल्हा कबड्डी असोसिएशनचे प्रमुख कार्यवाह रवींद्र देसाई यांनी जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या वतीने शिबिराला शुभेच्छा दिल्या.  यानंतर श्री.विश्वासराव मोरे यांनी आपल्या मनोगतामध्ये राज्य पंच मंडळाच्या वतीने सदर शिबिराला मार्गदर्शन करताना नवीन नियम व मैदानात घडणाऱ्या घडामोडी याविषयी याविषयी मार्गदर्शन केले या नंतर महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन चे सरकार्यवाह मा. श्री. आस्वाद पाटील यांनी पंचांच्या मानधनाविषयी व महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनची भूमिका स्पष्ट केली. शिबिराचे प्रमुख उद्घाटक खेड दापोली मंडणगडचे सन्माननीय आमदार श्री. योगेश कदम यांनी उद्घाटक म्हणून आपले मनोगत व्यक्त करताना खेड तालुका आणि रत्नागिरी जिल्हा कबड्डी कबड्डी असल्याच्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहू व तालुक्याला आमदार निधीतून मॅट देण्याची घोषणा सदर प्रसंगी केली त्याचबरोबर कबड्डीसाठी जे काही सहकार्य लागेल ते करण्याचा मनोदय व्यक्त केला. रत्नागिरी जिल्ह्यातील 90 पंचांनी या शिबिराचा लाभ घेतला. या शिबिराला मा. श्री. विश्वासराव मोरे अध्यक्ष, पंच मंडळ महाराष्ट्र राज्य कब्बड्डी असोसिएशन, मा. श्री. दत्ता झिंगुर्डे सचिव, पंच मंडळ महाराष्ट्र राज्य कब्बड्डी असोसिएशन, मा. श्री. मनोहर इंदुलकर माजी अध्यक्ष पंच मंडळ, महाराष्ट्र राज्य कब्बड्डी असोसिएशन, मा. श्री. सदानंद माजलकर सदस्य, पंच मंडळ महाराष्ट्र राज्य कब्बड्डी असोसिएशन ससुहास पाटील पंच मंडळ सदस्य, महाराष्ट्र् राज्य कबड्डी असो, नितीन बांद्रे जिल्हा पंच मंडळ प्रमुख रत्नागिरी यांचे प्रमुख मार्गदर्शन मिळाले. राष्ट्रीय प्रो कबड्डीचे पंच श्री. आशुतोष साळुंखे, आंतरराष्ट्रीय दिव्यांग खेळाडू श्री. प्रशांत सावंत यांनी 24 ते 26 ऑगस्ट 2021 रोजी मालदीव येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करताना गोळाफेक स्पर्धेत गोल्ड मेडल व थाळीफेक प्रकारात सिल्वर मेडल मिळवल्या बद्दल आमदार श्री. योगेश कदम यांच्या शुभहस्ते सन्मानित करण्यात आले. हे शिबीर यशस्वी करण्यासाठी खेड तालुका कब्बड्डी असोसिएशन अध्यक्ष श्री. सतीश उर्फ पप्पूशेठ चिकणे,  श्री. समद बुरोंडकर, उपाध्यक्ष श्री. महेश भोसले, श्री. आनंद हंबीर, कोषाध्यक्ष श्री. दाजी राजगुरू, सहचिटणीस श्री. शरद भोसले कार्यकारिणी सदस्य श्री. सुभाष आंबेडे, मंगेश खेडेकर, सुखदेव पवार, दिपक यादव अमोल दळवी  सल्लागार श्री.अँड. संदेश चिकणे, रवींद्र बैकर,आत्माराम बैकर,दिलीप कारेकर यांनी प्रयत्न केले.

आय एन एस डिस्ट्रॉयर नौदलात दाखल

भारतीय नौदलाचे नवीन नाशक INS डिस्ट्रॉयर आज नौदलाच्या ताफ्यात सामील झाले. मुंबईतील एका कार्यक्रमात याची औपचारिकता पूर्ण करण्यात आली. या सोहळ्याला संरक्षण मंत्री राजनाथ सिंह देखील उपस्थित होते. यावेळी राजनाथ सिंह म्हणाले की, भारत लवकरच संपूर्ण जगासाठी जहाजे तयार करणार आहे. INS कमांडिंग ऑफिसर कॅप्टन बिरेंदर सिंग बैंस म्हणाले की, INS विशाखापट्टणमच्या समावेशामुळे भारताच्या सागरी सामर्थ्यात लक्षणीय वाढ होईल. आत्मनिर्भर भारत मोहिमेअंतर्गत 75 टक्के स्वदेशी उपकरणांनी ते बनवण्यात आले आहे.

INS विशाखापट्टणमच्या बांधकामाबद्दल बोलायचे झाले तर तिची लांबी १६३ मीटर, रुंदी १७ मीटर आणि एकूण वजन ७४०० टन आहे. त्यात बसवण्यात आलेली ७५ टक्के उपकरणे स्वदेशी आहेत. त्याची रचना नौदलाच्या नेव्हल डिझाईन संचालनालयाने तयार केली आहे. त्याच वेळी, ते मुंबईतील माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड (MDL) येथे बांधले गेले आहे. आयएनएस विशाखापट्टणमचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे शत्रू देशाच्या रडारचा माग काढू शकणार नाही. याचे कारण म्हणजे त्याची बाह्य पृष्ठभाग एका विशेष स्टील धातूपासून बनलेली आहे. INS विशाखापट्टणम हे देशातील पहिले P-15B वर्ग स्टेल्थ गाईडेड क्षेपणास्त्र विनाशक आहे. त्याचा कमाल वेग 55.56 किलोमीटर प्रति तास आहे. यामध्ये मध्यम श्रेणीच्या पृष्ठभागावरून हवेत मारा करणारे क्षेपणास्त्र, पृष्ठभागावरून पृष्ठभागावर मारा करणारे ब्रह्मोस, L&T कंपनीचे टॉर्पेडो ट्यूब लाँचर, L&T चे अँटी सबमरीन रॉकेट लाँचर आणि BHEL ची 76mm सुपर रॅपिड गन यांचा समावेश आहे. INS विशाखापट्टणम शत्रूचे जहाज पाहताच त्याच्या डेकवरून विमानविरोधी क्षेपणास्त्रे डागण्यास सक्षम आहे. या युद्धनौकेमध्ये टॉर्पेडो ट्यूब आणि लाँचर्ससोबतच अँटी सबमरीन रॉकेट लाँचर, सुपर रॅपिड गन माऊंट्स, कॉम्बॅट मॅनेजमेंट सिस्टीम, इंटिग्रेटेड प्लॅटफॉर्म मॅनेजमेंट सिस्टीमही बसवण्यात आली आहे.

अज्ञातांनी एस टी बस फोडली

पैठण आगाराची बस क्र. एम एच 20 बी एल 2174 ही काही अज्ञातांनी बसच्या पाठीमागील बाजूची काच फोडली. पैठण आगाराचे आगरप्रमुख तरवडे यांनी शनिवारी सायंकाळी 6 वाजता चालक शुभम बळावते व वाहक पगारे यांना पोलीस बंदोबस्तात पैठण ते पाचोरा या मार्गावर पाठवली. विना प्रवासी ही पाचोड वरून पैठणकडे परतत असताना काही अज्ञातांनी या बसच्या पाठीमागील काच फोडली. पोलीस बंदोबस्तात धावणाऱ्या बसची झालेली तोडफोड या आंदोलन बाबत अनेक प्रश्नचिन्ह उभे करत आहे.

खेड शहराचा 3 स्टार अवॉर्ड देऊन गौरव, शहरवासीयांचे आभार – नगराध्यक्ष

खेड शहरात ओल्या व सुक्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी राबवलेल्या विविध उपाययोजनांमुळे खेड नगर परिषदेला राष्ट्रीय पातळीवरील ‘कचरामुक्त शहर’ हा पुरस्कार प्राप्त झाला असून त्यासाठी देशपातळीवर ३६ वे मानांकन प्राप्त झाले आहे. दि २० नोव्हेंबर रोजी नवी दिल्ली येथे समारंभपूर्वक हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यामुळे आता स्वच्छतेमध्ये खेडला 3 स्टार अवॉर्ड मिळाला असून नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांनी शहरवासीयांचे व सर्व नगरसेवकांचे आभार मानले आहेत. हा पुरस्कार स्वीकारण्यास मुख्याधिकारी प्रसाद शिंगटे, स्वछता निरीक्षक शिरगावकर, लियाज भाई खतीब व नगराध्यक्ष वैभव खेडेकर उपस्थित होते.

घनकचरा व्यवस्थापनात अग्रेसर राहिलेल्या येथील नगर परिषदेने अथक परिश्रमातून ‘कचरामुक्त शहर’ हा शासनाचा पुरस्कार प्राप्त केला आहे. या मानांकनाचा दुसऱ्यांदा बहुमान खेड पालिकेला प्राप्त झाला आहे. राज्यातील २५७ नगर परिषदा असून त्यापैकी ६९ नगर परिषदांची निवड या पुरस्कारासाठी करण्यात आली होती. शहरातील कचऱ्याची विल्हेवाट लावायची कशी, याचे उत्तर शोधण्याचा प्रामाणिक प्रयत्न खेड नगर परिषद करत आहे. उपलब्ध साधनसामुग्रीसह स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या सहभागाने नगर परिषद ओल्या व सुक्या कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावून शहर स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. नगराध्यक्ष वैभव खेडेकर, उपनगराध्यक्ष सुनील दरेकर, स्वच्छता व आरोग्य सभापती प्रशांत कदम, प्रभारी मुख्याधिकारी देवानंद ढेकळे, स्वच्छता निरीक्षक महेंद्र शिरगावकर यांसह सर्व नगरसेवक व स्वच्छता विभागाचे कर्मचारी ‘स्वच्छ खेड- सुंदर खेड’ संकल्पना सत्यात उतरवण्यासाठी झटत आहेत. तत्कालीन मुख्याधिकारी प्रसाद शिंगटे यांच्या योगदानातून विविध योजना राबवण्यावर भर देण्यात आल्याने घनकचरा व्यवस्थापनात ही नगर परिषद सरस ठरली. दिल्ली येथून आलेल्या सर्वेक्षण समितीने याबाबतचा अहवाल वरिष्ठ पातळीवर सादर केल्यामुळेच न.प. कचरामुक्त शहर मानांकन प्राप्त झाले. यापूर्वीही नगर परिषदेने विविध मानांकने प्राप्त केली आहेत. या पुरस्काराबद्दल शहरासह तालुक्यातून खेड न. पं.चे अभिनंदन होत आहे.

…. तब्बल 14 वर्षानंतर आली लाईट

दापोली शहरातील कोकंबा आळीमधील विनीता विनायक खळे हे कुटुंबासह गेली १४ वर्षे विज नसल्याने अंधारात होते. ही बाब स्थानिक नगरसेवक श्री. केदार परांजपे, शाखाप्रमुख श्री. सुयोग घाग, श्री. निलेश राऊत व पदाधिकारी यांनी आमदार श्री. योगेशदादा कदम यांच्या निदर्शनास आणून दिली. यानंतर आमदार श्री. योगेशदादा कदम यांनी त्वरीत विद्युत मंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे संपर्क साधून श्री. खळे कूटुंबीयांस नव्याने विद्युत पुरवठा जोडून देण्यास सांगितले. यामुळे तब्बल 14 वर्षानंतर घरात लाईट आल्याने खळे कुटुंबियांनी आमदार योगेश कदम यांचे आभार व्यक्त केले.

दापोली शहरातील कोकंबाआळीमधील विनीता विनायक खळे हे कुटुंबासह गेली १४ वर्षे विज नसल्याने अंधारात होते. सदर बाब स्थानिक नगरसेवक श्री. केदार परांजपे, शाखाप्रमुख श्री. सुयोग घाग, श्री. निलेश राऊत व पदाधिकारी यांनी आमदार श्री. योगेशदादा कदम यांच्या निदर्शनास आणून दिली. आमदार श्री. योगेशदादा कदम यांच्यामुळे आज सदर कूटुंबीयांस विज पुरवठा सूरु झाला. एकंदरीत तिमिराकडून तेजाकडे असा योग जुळून आणल्याबद्दल श्री. खळे कूटुंबीयांनी आमदार श्री. योगेशदादा कदम व स्थानिक नगरसेवक, पदाधिकारी यांचे मन:पूर्वक आभार मानले. यावेळी उपजिल्हाप्रमुख श्री. सुधीर कालेकर, तालुकाप्रमुख श्री. प्रदिप सुर्वे, उपतालुकाप्रमुख श्री. प्रकाश कालेकर, शहरप्रमुख श्री. राजेंद्र पेठकर, नगरसेवक श्री. केदार परांजपे, माजी नगरसेवक श्री. सचिन जाधव, युवा सेना शहरअधिकारी श्री. स्वप्निल पारकर, युवती सेना शहर अधिकारी सौ. किर्ती परांजपे, शाखाप्रमुख श्री. सुयोग घाग, श्री. निलेश राऊत, श्री. कौस्तुभ परांजपे उपस्थित होते.

मुंबईत मॉलला आग, 10 गाड्या घटनास्थळी दाखल

मुंबईतील विले पार्ले परिसरातील प्राइम मार्केट या मॉलला भीषण आग लागली आहे. ही आग इतकी भीषण आहे जी दूरवरून धुराचे लोट दिसत आहेत. या आगीची तीव्रता लक्षात घेता इर्ला मार्केट परिसरातील रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला आहे. या परिसरात अनेक दुकाने असून हा परिसर नेहमी गजबजलेला असतो. विशेषतः हा परिसर इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या विक्रीसाठी ओळखला जातो. ही आग अतिशय वेगाने पसरत असून अग्निशामक दलाचे जवान या आगीवर 10 अग्निशामक बंबाद्वारे नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. ही तिसऱ्या लेवलची आग असल्याचे अग्निशामक दलाने जाहीर केले आहे. नेमकी ही आग कशाने लागली हे अद्यापही स्पष्ट झाले नाही.

तिरुपतीतील मंदिरे व संपूर्ण शहर पाण्याखाली, गेल्या 50 वर्षातील सर्वात मोठा पूर

बंगालच्या महासागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे गुरुवारी आंध्रप्रदेशाच्या काही भागाला मुसळधार पावसाने अक्षरशः झोडपून काढले. चित्तूर जिल्ह्यातील तिरुपतीला देखील मुसळधार पावसाने जलमय करून टाकले. गुरुवारी पडलेल्या मुसळधार पावसाने गेल्या 50 वर्षातील सर्वात मोठा आल्याचे बोलले जात आहे.

या पावसाने मंदिराचे शहर म्हणून ओळखले जाणारे तिरुमल्ला तिरुपती पाण्याखाली गेले. मुसळधार पडणाऱ्या पावसामुळे व होणाऱ्या भुस्कलनामुळे तिरुमल्ला तिरुपती देवस्थानने शनिवार व रविवारी तिरुमल्ला घाट रात्री 8 ते सकाळी 6 वाजेपर्यंत वाहतुकीस बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच तिरुपती कपालेश्वर स्वामी मंदिरातील धबधब्याने विक्राळ रूप धारण केले असून मोठ्या प्रमाणात वेगाने पाणी वाहत असल्याने सर्व भक्तांसाठी प्रवेशास बंदी घालण्यात आली आहे. मुख्यमंत्री वायएस जगन मोहन रेड्डी यांनी अधिकाऱ्यांना सतर्क राहण्याचे आणि प्रतिकूल हवामानाच्या पार्श्वभूमीवर आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश दिले. तिरुमला येथील जपाली अंजनेय स्वामी मंदिर पाण्याखाली गेले आणि देवाची मूर्ती पाण्यात बुडाली. तिरुमला तिरुपती देवस्थानमच्या अधिकाऱ्यांनी पवित्र टेकड्यांवर अडकलेल्या यात्रेकरूंसाठी मोफत भोजन आणि निवासाची व्यवस्था केली. पूर आणि भूस्खलनामुळे तिरुमला हिल्सकडे जाणारे दोन घाट रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात आले तर अलीपिरीहून मंदिराकडे जाणारा पादचारी जिनाही बंद करण्यात आल्याचे अधिकृत सूत्रांनी सांगितले.

तिरुपती येथें झालेल्या अवकाळी पावसाने संपूर्ण शहर जलमय झाले. त्याचे काही धक्कादायक विडिओ

मंडणगड येथे शिवसेनेचा रास्ता रोको

मंडणगड तालुक्यातील रस्त्यांची कामे गेल्या दोन वर्षांपासून रखडल्याने भूमी पुत्राच्या न्याय हक्कासाठी खेड दापोली मंडनगडचे शिवसेना आमदार योगेश कदम यांनी गुरुवार 18 नोव्हेंबर रोजी म्हाप्रळ येथे रस्त्यावर उतरून जनआक्रोश आंदोलन केले.

भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुळ गावी जाणारा राजेवाडी ते आंबड़वे रस्त्याचे काम गेले दोन वर्ष रखडल्याने राष्ट्रीय महमार्ग प्राधिकरण व केंद्र शासनाच्या विरोधात तसेच भूमिपुत्रांच्या न्याय हक्कासाठी जोरदार घोषणा बाजी करत आमदार योगेश दादा कदम यांनी म्हाप्रळ येथे रस्त्यावर उतरून जनाक्रोश आंदोलन केले. भूमिपुत्र व जनतेच्या न्याय हक्कासाठी आमदार योगेश कदम आक्रामक झाले होते. आमदार योगेश कदम यांनी अधिकाऱ्यांना चांगलेच फैलावर घेतले. यावेळी कार्यकारी अभियंता श्री बांगर यांनी लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.२२ नोव्हेबर पासून खड्डे भरण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर आमदार योगेश कदम यांनी आंदोलन स्थगित केले तसेच जर दिलेल्या वेळेत खड्डे भरले गेले नाहीत तर पेण येथील तुमच्या कार्यालया समोर ठिय्या आंदोलन करू असे आमदार योगेश कदम यांनी स्पष्ट केले. यावेळी शिवसेना मंडणगड तालुका प्रमुख प्रताप घोसाळकर, तालुका संघटक अनंत लाखन, ज्येष्ठ शिवसैनिक सुलतान भाई मुकादम, उपतालुका प्रमुख हरिश्चन्द्रजी कोदेरे, रामदासजी रेवाळे, माजी सभापती आदेशजी केने, विभागप्रमुख दीपक मालुसरे, राजेश भवने, महिला विभाग संघटक सौ सुप्रिया ताई ढोंडगे, उपविभागप्रमुख राम जगताप दिनेश गायकवाड़, पांडुरंग माने, शहर प्रमुख विनोद जाधव, उपशहर प्रमुख निलेश गोवळे, शिवसेना तालुका सचिव सिद्धेश देशपांडे, इराफ़न बुरोंडकर उपजिल्हाधिकारी चेतन सातोपे, तालुकाधिकारी जितेंद्र पाटिल सचिव युवासेना प्रतीक पोतनिस, शहराधिकारी शिवप्रसाद कामेरकर, शिवसेना शाखाप्रमुख सीमाप मुकादम, उपसरपंच म्हाप्रळ अजहर मुकादम, अहमद मुकादम,म्हाप्रळ,चिंचाळी, पन्हळी,लोकरवण,कुंभारली, येथील भूमिपुत्र ग्रामस्थ तसेच जयराम राठोड आजिम कडवेकर, सर्व शिवसेना, युवासेना मालवाहतुक संघटना पदाधिकारी तहसीलदार व पोलिस निरीक्षक उपस्थित होते.

घरात आढळले मगरीचे पिल्लू

खेड तालुक्यातील असगणी येथे एका घराचे काम सुरू असताना त्या ठिकाणी एक मगरीचे पिल्लू आढळून आले. असगणी गावात मगरीचे पिल्लू सापडल्यानंतर बघ्यांची एकच गर्दी झाली. मात्र या घराच्या जवळपास ओढा नाला नसतानाही ही मगर आढळून आल्याने ही मगर आली कोठून हा प्रश्न सर्वांसमोर उपस्थित झाला. या मगरीला पकडण्यासाठी वनविभागाला पाचारण करण्यात आले.

खेड तालुक्यातील असगणी येथे शोएब घारे यांच्या घराचे काम सुरू होते. बुधवार दि. 17 नोव्हेंबर रोजी 12 वाजण्याच्या सुमारास मगरीचे पिल्लू आढळून आले. या ठिकाणी घराचे काम सुरू असल्यामुळे लोक उपस्थित होते. कामाच्या ठिकाणी मगरीचे दर्शन झाल्याने ही बातमी वाऱ्यासारखी गावभर पसरली. यामुळे या ठिकाणी बघ्यांची गर्दी जमली होती. यावेळी असगणी येथील फरहान घारे, मुजाहिद्दीन घारे, बिलाल घारे, महेश मोहिते, सकीब घारे, मुराद धामनस्कर, दयानंद मोहिते व शोएब घारे यांनी तात्काळ वनविभागाशी संपर्क करून घटनेची महिती दिली. वन परिक्षेत्र अधिकारी वैभव बोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली वनरक्षक परमेश्वर डोईफोडे यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेऊन मगरीच्या पिल्लाला ताब्यात घेऊन तिला जंगल अधिवासात सोडले.

स्मृतिदिनी शिवसेनाप्रमुखांना अभिवादन

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा स्मृतिदिनी खेड शहर शिवसेनेच्या वतीने हिंदुहृदयसम्राट शिवसेना प्रमुख मा. बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यात आले. शिवसेना प्रमुखांना अभिवादन करण्यासाठी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे सायंकाळी 6 वा. सर्व आजी माजी पदाधिकारी, युवासेना, महिला आघाडी, युवतीसेना पदाधिकारी, आजी माजी लोकप्रतिनिधी यांच्यासह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी उपस्थित शिवसैनिकांनी हिंदुहृदय सम्राटांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. शिवसेना प्रमुखांच्या स्मृतिदिनानिमित्त सायंकाळी भजनाच्या कार्यक्रमाचे आयोजन ही करण्यात आले होते.

प्रत्येक राज्यांना मिळणार 47,541 कोटींचा अतिरिक्त निधी, केंद्रीय अर्थमंत्र्यांची घोषणा

कोरोना महामारीनंतर आर्थिक सुधारणा विषयावर सोमवारी झालेल्या विडिओ कॉन्फरसिंगच्या बैठीकीत देशातील 15 राज्यांचे मुख्यमंत्री, तीन राज्यांसह जम्मू काश्मीरचे उपमुख्यमंत्री तसेच इतर राज्यांचे अर्थमंत्री सहभागी झाले होते. यावेळी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी प्रत्येक राज्यांना 47 हजार 541 कोटी रुपयांचा अतिरिक्त निधी देणार असल्याचे जाहीर केले. यावेळी त्यांनी सांगितले की, 47,541 कोटी रुपयांचा सामान्य निधी देण्याऐवजी एक महिन्याचा आगाऊ हफ्ताही देण्याचे जाहीर केले. यामुळे 22 नोव्हेंबर रोजी एक महिन्याच्या आगाऊ हाफत्यासह प्रत्येक राज्यांना एकूण 95 हजार 82 कोटी रुपयांच्या निधीची रक्कम दिली जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यामुळे राज्यांना भांडवली खर्चासाठी अतिरिक्त निधी मिळणार असून त्याचा वापर पायाभूत सुविधांच्या उभारणीसाठी करता येणार असल्याचे ही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

कांजूरमार्ग येथे इंडस्ट्रीला भीषण आग, 20 गाड्या घटनास्थळी दाखल

मुंबईच्या कांजूरमार्ग परिसरातील हेवी इंडस्ट्रील इस्टेटमध्ये भिषण आग लागली असून अग्निशामक दलाच्या 20 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. या आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न युद्ध पातळीवर सुरू आहेत. डब्बावाला कंपौंड जवळ ही आग लागल्याचे समजते. एका नामांकित इलेक्ट्रॉनिक्स कंपनीला ही आग लागल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे काळाच्या पडद्याआड, वयाच्या 100 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्यावर पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरू होते. मंगळवारी पहाटे 5 वा. 7 मिनिटांनी उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते 100 वर्षाचे होते. बाबासाहेबांचे पार्थिव सकाळी 8.30 वा. पर्वती येथील त्यांच्या निवासस्थानी नेण्यात येणार आहे. त्यानंतर 10.30 वा. सुमारास वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. गेल्या काही दिवसांपासून बाबासाहेब पुरंदरे यांची प्रकृती खालावली होती. त्यांना न्युमोनिया झाला होता. त्यामुळे पुण्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. बाबासाहेब पुरंदरे काही दिवसांपूर्वी घरात पडले होते. त्यांच्या डोक्याला मार लागला होता. त्यानंतर दिनानाथ रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आलं होतं, तेव्हापासून त्यांची प्रकृती चिंताजनक होती, अशी माहिती बाबासाहेब यांचा मुलगा अमृत पुरंदरे यांनी दिली. पण उपचारादरम्यान रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

बळवंत मोरेश्वर पुरंदरे ऊर्फ बाबासाहेब पुरंदरे असं त्यांचं पूर्ण नाव होते. पुणे सासवडमध्ये 29 जुलै 1922 रोजी त्यांचा जन्म झाला. तरुणपणापासून ते पुण्यातच स्थायिक झाले. त्यानंतर भारत इतिहास संशोधक मंडळ या संस्थेतून कामाला सुरुवात केली. पुणे विद्यापीठाच्या ’मराठा इतिहासाची शकावली- सन 1740 ते 1761’ या भारत इतिहास संशोधन मंडळात झालेल्या संशोधन प्रकल्पात बाबासाहेब पुरंदरे संशोधक म्हणून सहभागी झाले होते. 2015 सालापर्यंत त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर बारा हजाराहून अधिक व्याख्याने दिली आहेत. बाबासाहेब पुरंदरे यांनी महाराष्ट्रातील गडकिल्ल्यांचा आणि मराठा साम्राज्य आणि शिवकालीन ऐतिहासिक दस्तऐवजांचा सखोल अभ्यास केला. बाबासाहेब पुरंदरे यांनी मुख्यत्वे ऐतिहासिक विषयांवर वर्णनात्मक लेखन, ललित कादंबरी लेखन तसेच नाट्यलेखन आणि जाणता राजा या नाटकाचे दिग्दर्शन केले. त्यांना 2015 साली महाराष्ट्रभूषण तर 2019 साली पद्मविभूषण पुरस्कार मिळाला आहे. बाबासाहेब पुरंदरे यांच्या जाणता राजा या महानाट्याचे गेल्या 27 वर्षांत 1250 हून अधिक प्रयोग झाले आहेत. हे नाटक हिंदी-इंग्रजीसह 5 अन्य भाषांत भाषांतरित केले गेले आहे. जाणता राजा मध्ये 150 कलावंत काम करतात आणि शिवाय हत्ती घोडेही असतात. प्रयोग करण्यासाठी मोठे मैदान लागते आणि तिथे फिरता रंगमंच उभारण्यासाठी 10 दिवस आणि उतरवण्यासाठी 5 दिवस लागतात. बाबासाहेब पुरंदरे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर 2015 सालापर्यंत 12 हजारांहून अधिक व्याख्याने दिलीत. बाबासाहेब पुरंदरे यांनी महाराष्ट्रातील गडकिल्ल्यांचा आणि मराठा साम्राज्य आणि शिवकालीन ऐतिहासिक दस्तऐवजांचा सखोल अभ्यास केलाय. भारताच्या स्वातंत्र्यानंतर पोर्तुगीजांच्या ताब्यातील भारताचा उर्वरित भाग परत मिळविण्यासाठी लढल्या गेलेल्या दादरा नगर हवेली मुक्ती संग्रामात बाबासाहेब पुरंदरे हे सुधीर फडकेंबरोबर हिरिरीने सहभागी झाले होते. बाबासाहेब पुरंदरे यांनी मुख्यत्वे ऐतिहासिक विषयांवर वर्णनात्मक लेखन, ललित कादंबरी लेखन तसेच नाट्यलेखन व जाणता राजा या नाटकाचे दिग्दर्शन केले. पुरंदऱ्यांची दौलत, पुरंदऱ्यांची नौबत, गड-किल्ल्यांची ऐतिहासिक माहिती देणारे साहित्य (गडसंच), शेलारखिंड आणि राजा शिवछत्रपती हे बाबासाहेबांचे आजवर साहित्य प्रकाशित झालेय. शिवचरित्र हे घरोघरी पोहोचावे हे ध्येय ठेवून बाबासाहेबांनी अथक संशोधनातून आणि परिश्रमांतून राजा शिवछत्रपती हा ग्रंथ साकार केला. या ग्रंथाच्या 16 आवृत्ती आजपर्यंत सुमारे 5 लाख घरांमध्ये पोहोचल्यात. या पुस्तकाची 17 वी आवृत्ती 31 मार्च 2014 ला प्रसिद्ध झाली. बाबासाहेब पुरंदरे यांना महाराष्ट्र सरकारने 2015 साली महाराष्ट्र भूषण हा सर्वोच्च पुरस्कारही दिलाय, तर 2019 साली त्यांना पद्मविभूषण पुरस्कारानं गौरविण्यात आले. डी. वाय. पाटील यांच्या अभिमत विद्यापीठाने इतिहास संशोधनातील योगदानाबद्दल शरद पवार यांच्याच हस्ते त्यांना ‘डी.लिट’ ही सन्माननीय पदवी देऊन गौरविले होते. 29 जुलै 1922 रोजी बाबासाहेबांचा जन्म झालाय, तर 15 नोव्हेंबर 2021 रोजी त्यांचं निधन झाले. त्यांच्या पश्चात चिरंजीव अमृत आणि प्रसाद तसेच कन्या माधुरी असा परिवार आहे. 

रत्नागिरीत रस्त्यावरील खड्डयात वृक्षारोपण

रत्नागिरी नगरपरिषदेच्या हद्दीतील व शहरातील प्रमुख मार्गावर शनिवारी रात्री तरुणांनी चक्क रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यात वृक्षारोपण केले. रस्त्यावरील खड्ड्यांचा व झोपलेल्या प्रशासनाला जागे करण्याचा एक वेगळा प्रयोगच या तरुणांनी केला आहे. या वृक्षारोपणाची चर्चा केवळ रत्नागिरी शहरात न थांबता संपूर्ण जिल्ह्यात वाऱ्यासारखी पसरली. या वृक्षारोपनाचे विडिओ सर्वत्र सोशल मीडियावर वायरल होत आहेत. एका वेगळ्या पद्धतीने केलेल्या निषेधामुळे आता तरी प्रशासनाचे व लोकप्रतिनिधींचे डोळे उघडतील का? याची संपूर्ण रत्नागिरीसह जिल्हावासीय आतुरतेने वाट पाहणार आहेत यात मात्र शंकाच नाही.

दापोलीत दिड लाखांच्या गुटख्यासह दोन बंदुकी जप्त

दापोली तालुक्यातील हर्णे बाजारपेठ येथे स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने टाकलेल्या धाडीत दिड लाखांचा गुटखा व खेर्डी येथून 50 हजार रुपये किमंतीच्या दोन सिंगल बॅरेलच्या बंदुकी जप्त केल्या. शनिवारी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने ही कारवाई केली. यावेळी हर्णे बाजारपेठ येथून अरमान आरिफ अकबाणी ( वय 26) तर खेर्डी पानवाडी येथून वेनेश विश्राम बर्जे ( वय 40) यांना अटक करून न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना 15 नोव्हेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. ही कारवाई पोलीस उपनिरीक्षक संदीप वांगणेकर, पोलीस हवालदार मिलिंद कदम, बाळू पालकर, विजय आंबेकर व चालक पोलीस नाईक दत्ताराम कांबळे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

एसटीची वाहतूक पूर्वपदावर आणण्यासाठी महामंडळ प्रयत्नशील,आज ३६ गाड्या धावल्या,१५०० कर्मचारी कामावर परतले,एसटी महामंडाळाचे उपाध्यक्ष शेखर चन्ने यांची माहिती

संप मागे घेण्याबाबत माननीय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष अनिल परब यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत एसटी कर्मचाऱ्यांनी कामावर परतण्यास सुरुवात केली आहे. त्यानुसार आतापर्यंत १ हजार ५३२ कर्मचारी कामावर परतले आहेत. त्यामुळे एसटीची वाहतूक आता पूर्वपदावर येत असून आज विविध आगारातून ३६ गाड्या धावल्या, अशी माहिती एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी दिली. दरम्यान, संपामुळे एसटी महामंडळाचे सुमारे १२५ कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचेही त्यांनी सांगितले.

एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाच्या पार्श्वभूमिवर एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी आज पत्रकारांशी संवाद साधला. पत्रकारांनी विचारलेल्या विविध प्रश्नांना त्यांनी थेट उत्तरे दिली. संपामुळे प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी वाहतूक सुरू करण्याची आमची इच्छा आहे. ज्या कर्मचाऱ्यांना कामावर यायचे आहे, त्याची कुठेही अडवणूक होता कामा नये यासाठी स्थानिक पोलीस प्रशासनाची मदत घेतली जात आहे. त्याला आता चांगला प्रतिसाद मिळू लागला आहे. कामगारांच्या उपस्थितीमुळे आज ३६ बसेस रवाना केल्या. सुमारे ८०० ते ९०० प्रवाशांनी प्रवासदेखील केला आहे. याशिवाय खासगी वाहनेदेखील आगारातून सोडल्या जात आहेत, असेही श्री. चन्ने यांनी सांगितले. एसटीचे कर्मचारी कामावर परतावे यासाठी मुख्यमंत्री माननीय उद्धव ठाकरे, परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष अॅड. अनिल परब तसेच एसटी महामंडळ प्रशासनानेही आवाहन केले आहे. त्यानुसार अनेकांना कामावर परतायचे आहे. जे कामावर येतील त्यांना संरक्षण दिले जाईल, असे सांगतानाच अनेक कर्मचारी डेपो सुरू करण्यास इच्छुक आहेत. त्यामुळे लवकरच एसटीची वाहतूक सुरु होईल. त्यामुळे हा संप सुरू न ठेवता सर्व कामगारांनी तात्काळ कामावर रुजू व्हावे, असे आवाहनही श्री. शेखर चन्ने यांनी केले.

तिकिटीसाठी ट्रायमॅक्सला कंत्राट पत्रकार परिषदेदरम्यान ट्रायमॅक्स तिकिट कंत्राटाबाबत होत असलेल्या आरोपाबाबत श्री. चन्ने यांनी महामंडळाची भूमिका मांडली. ट्रायमॅक्स मशीन आपण भाड्याने घेतली नसून तीचे कंत्राट दिले आहे. करारामध्ये सर्व गोष्टींचा उल्लेख केलेला आहे. मशीन घ्यायच्या झाल्या तर त्याला मनुष्यबळ, सॉफ्टवेअर लागणार. परंतु महामंडळाकडे तांत्रिक मुनष्यबळ नसल्याने ती विकत घेतलेली नाही. त्यासाठी वेगळा खर्च करावा लागेल म्हणून प्रत्येक तिकिट विक्री नुसार हे त्यांना कंत्राट दिलेले असते, असेही चन्ने यांनी सांगितले.

रोपे लावण्यासाठी २५ कोटी खर्च नाही एसटी महामंडळाच्यावतीने राज्यभरात लावण्यात आलेल्या रोपांसाठी २५ कोटींचा खर्च केल्याचा आरोप श्री. चन्ने यांनी फेटाळून लावला. रोपांसाठी महामंडळाने वेगळे बजेट केले नव्हते. वनविभागाने मोफत रोपे पुरवली होती, त्यानुसार महामंडळाच्या विभाग नियंत्रकांनी आगारांच्या आवारात जेवढी जागा उपलब्ध होती तेथे झाडे लावली. २०१९ मध्ये ८ हजार झाडे लावली होती, असे सांगतानाच त्यासाठी वेगळा खर्च केला नव्हता, असेही त्यांनी स्पष्ट केले.

गणवेशासाठी क्वालिटी जपली                   एसटी कामगारांना यापूर्वी कापड आणि शिलाई भत्ता दिला जात होता. २०१८ साली त्यामध्ये बदल करून तयार गणवेश देण्यासाठी रीतसर निविदा प्रक्रीया राबविण्यात आली. तत्पूर्वी कर्मचाऱ्यांचा गणवेशाचा नमुना राष्ट्रीय फॅशन संशोधन संस्थेकडून बनवून घेण्यात आला. त्याची गुणवत्ता पूर्वीच्या गणवेशापेक्षा निश्चतच चांगली होती. पूर्वीच्या गणवेशामध्ये पॉलीस्टरचे प्रमाण जास्त असल्याने आरामदायी नव्हता. त्याऐवजी नव्या गणवेशाची गुणवत्ता अधिक चांगले असून त्यामध्ये पॉलिस्टरपेक्षा कॉटनचे प्रमाण जास्त आहे. तसेच गणेवशाबरोबरच बेल्ट शुज याबरोबरच इतर वस्तूंचाही समावेश होता. त्यामुळे त्याची किंमत तुलनेने वाढली होती. त्यासाठी ५० कोटी रुपये वाचतील, असा दावा चुकीचा वाटतो, असे श्री. चन्ने म्हणाले.

बसच्या पुर्नबांधणीमध्ये प्रवाशांच्या सुरक्षिततेची तडजोड नाही जुन्या गाड्यांवर रंगरंगोटी करून नव्या भासवल्या जातात, या आरोपासंदर्भात बोलताना श्री. चन्ने म्हणाले, वाहनांचे ठराविक आयुर्मान पूर्ण झालेनंतर प्रवाशांना चांगल्या सुविधा देण्यासाठी बसची पुर्नबांधणी करण्याची महामंडळामध्ये पद्धत आहे. महामंडळाच्या धोरणानुसार ८ वर्षानंतर अॅल्युमिनियम ऐवजी मजबूत अशा माईल्ड स्टीलचा बस पुर्नबांधणीसाठी वापर करण्यास सुरुवात झाली. त्यामुळे बसेसचे आयुर्मान पाच वर्षांनी वाढले. तसेच पूर्वीच्या बसपेक्षा या बसेसमध्ये प्रवासीभिमुख सोयीसुविधा देण्यात आल्या आहेत. नवीन बस खरेदी करण्यासाठी तब्बल ३० लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. त्या तुलनेत पुर्नबांधणी केलेल्या बसेसचा खर्च अत्यल्प असल्याने महामंडळाच्या खर्चामध्ये बचतच झाली आहे. तसेच माईल्ड स्टीलच्या वापरामुळे बसेस मजबूत झाल्या आहेत, असे सांगतानाच प्रवाशांच्या सुरक्षिततेबाबत कोणतीही तडजोड केलेली नाही, असेही चन्ने यांनी स्पष्ट केले.

टायर पुर्न: स्थिरीकरण पारंपारिक पद्धत जुने टायर वापरून बसेस चालवल्या जातात, या गंभीर आरोपाबाबत बोलताना चन्ने म्हणाले, टायर झिजल्यानंतर त्याचे वरचे आवरण काढून दुसरे नवीन आवरण लावून सदर टायरचे आर्युमान वाढवले जाते. या पद्धतीला टायर पुर्नः स्थिरीकरण म्हणतात. ही पारंपारिक पद्धत आहे. ही पद्धत महामंडळामध्ये गेली अनेक वर्षे वापरली जात आहे. ही प्रक्रीया करण्यासाठी महामंडळाचे ९ टायर पुर्न: स्थिरीकरण प्रकल्प आहेत. त्यामुळे जुने टायर वापरून धोकादायक पद्धतीने प्रवास केला जातो हा आरोप चुकीचा आहे, असे चन्ने म्हणाले.

व्यथा एस टी कर्मचाऱ्यांच्या व प्रवाशांच्या

सध्या राज्यात सर्वत्र एस टी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी एस टी चे शासनात विलीनीकरण करण्यात यावे यासाठी काम बंद आंदोलन सुरू केले आहे. मात्र आंदोलन करूनही राज्य सरकार त्यांच्याकडे लक्ष देत नसल्याचे दिसून येत आहे. यावेळी समाजातील विविध स्तरावरून विविध प्रकारच्या प्रतिक्रिया समोर येत आहेत. सध्या सोशल मीडियावर या संदर्भात विविध प्रकारच्या प्रतिक्रिया समोर येत आहेत. सोशल मीडियावर त्या तुफान वायरल देखील होत आहेत. या मध्ये एक एस टी कर्मचारी आपली व्यथा कवितेच्या माध्यमातून तर प्रवासी आंदोलन ठिकाणी एस टी कर्मचार्यांशी संवाद साधून आपली व्यथा मांडताना दिसत आहेत. पाहूया नेमके काय आहे त्या व्हिडिओत….

खोट्या अफवांवर विश्वास ठेवू नये – एकनाथ शिंदे

आज संध्याकाळपासून सोशल मीडियावर मुख्यमंत्री पदाचा तात्पुरता करभार नगर विकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सोपविण्यात आल्याचे मेसेज सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. मात्र अशा प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नये. यामध्ये कोणत्याही प्रकारचे तथ्य नसल्याचे एकनाथ शिंदे यांनी सांगितले आहे. त्यामुळे समाज माध्यमावर फिरणाऱ्या खोट्या आणि खोडसाळ मेसेजेस आणि पोस्टवर कोणीही विश्वास ठेवू नये असे आवाहन राज्याचे नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी ट्विट करत केले आहे.

डी ए देऊन मेहरबानी करता काय आ. प्रसाद लाड यांचा सवाल

राज्यात एस टी कर्मचाऱ्यांच्या संपाचा 3 दिवस असूनही राज्य शासनाकडून एस टी कर्मचाऱ्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष केले जात आहे. शासनात विलीनीकरण करण्याच्या प्रमुख मागणीसाठी संपूर्ण राज्यात महाराष्ट्राची जीवनवाहिनी म्हणून ओळखली जाणारी एस टी बस सेवा ठप्प झाली आहे. याचा नाहक त्रास सर्वसामान्य जनतेला सोसावा लागत आहे. तरीही हे महाविकास आघाडीचे सरकार कर्मचाऱ्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष करत आहेत. या उलट काही ठिकाणी राज्यात एस टी कर्मचाऱ्यांना निलंबित देखील करण्यात आले आहे. तुटपुंज्या पगारात संसार कसा करायचा या प्रश्नासमोर हतबल होत 36 कर्मचाऱ्यांनी आपला जीवन प्रवास आत्महत्या करत संपवला. या कर्मचऱ्याना खंबीरपणे आधार देत या लढ्यात आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. या लढ्यात सर्वतोपरी एस टी कर्मचाऱ्यांना मदत करून त्यांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन आमदार प्रसाद लाड यांनी केले. त्यांनी गुरुवारी दुपारी खेड शहरातील एस टी बस डेपोसमोर आंदोलनासाठी जमलेल्या एस टी कर्मचाऱ्यांची भेट घेऊन आश्वासन दिले. यावेळी त्यांनी परिवहन मंत्री अनिल परब यांनी डी ए देतो, उत्सव भत्ता देतोय आशा प्रकारचे विधान केले होते. त्यावर आमदार प्रसाद लाड यांनी डी ए देऊन मेहरबानी करता काय असा रोखठोक प्रश्न उपस्थित केला. तसेच सर्व सामान्यांच्या जिवाभावाची असणारी लालपरी आजतागायत सर्व परिस्थितीत जनतेची सेवा करत आहे. मात्र तिच्या कर्मचाऱ्यांना अन्यायाला समोरे जावे लागत आहे. या प्रकरणी एस टी कर्मचाऱ्यांनी सर्व राजकीय पक्ष, संगठना व हेवेदावे बाजूला ठेवून एकत्रित आल्याबद्दल त्यांनी सर्व कर्मचाऱ्यांचे आभार मानले. तसेच आपण भाजपचे असलो तरी या ठिकाणी महाराष्ट्रातल्या 13 कोटी जनतेचे लोकप्रतिनिधींत्व करत असल्याने या ठिकाणी आल्याचे ही त्यांनी स्पष्ट केले. यावेळी भाजपचे खेड शहराध्यक्ष अनिकेत कानडे, रोहन राठोड, प्रवीण चव्हाण, अविनाश माने, भूषण काणे यांच्यासह कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.