शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांनी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्याचे आवाहन केले होते. शिवसेना नेते व युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी दिलेल्या आदेशानुसार आम. भास्कर जाधव व आम. योगेश कदम यांच्या मार्गदर्शनाखाली युवासेना लोटे आयोजित “रक्तदानाचा महायज्ञ” हे रक्तदान शिबिर जि. प. आदर्श केंद्रीय शाळा क्र. 1 येथे 27 नोव्हेंबर रोजी पार पडला.

या शिबिराचे उद्घाटन आमदार मा. श्री. योगेश कदम व जिल्हा परिषद अध्यक्ष मा. श्री. विक्रांत जाधव यांनी केले. यावेळी माजी जि. प. बांधकाम समिती सभापती व विद्यमान सदस्य श्री. चंद्रकांत उर्फ अण्णा कदम, जि. प. सदस्य श्री. सुनिल मोरे, श्री. विनोद झगडे, श्री. अरविंद चव्हाण, पं. समिती उपसभापती श्री. जिवन आंब्रे, युवासेना जिल्हाअधिकारी अजिंक्य मोरे, माजी तालूकाप्रमुख श्री. मोहन आंब्रे, उद्योजक श्री. शैलेश कदम, खेड तालुका युवतीसेना अधिकारी सिध्दी शिंदे, लोटे सरपंच श्री. चंद्रकांत चाळके, घाणेखुंटचे सरपंच श्री.अंकुश काते, उपतालुकाप्रमुख श्री. विष्णू आंब्रे, युवासेना तालूका सचिव श्री. राकेश सागवेकर, युवासेना चिपळूण शहर अधिकारी श्री. निहार कोवळे, उपतालुका अधिकारी श्री. चेतन वारणकर, श्री. सौरभ चाळके, श्री. विक्रांत साने, तालुका सह सचिव श्री. सूरज रेवणे, विभाग अधिकारी श्री.स्वप्नील सुर्वे, प्रणय ननावरे, श्री. साहिल मोरे, श्री. सूरज मोगरे, माजी विभाग अधिकारी डॉ. मच्छिंद्र गोवळकर, विभाग समन्वयक श्री. किरण ठसाळे, शाखा अधिकारी श्री. ओमाकर चाळके, माजी नगरसेवक श्री. पप्पू चिकणे, श्री. बुवा सावंत, श्री. मनोहर कालेकर, परशुराम हॉस्पिटल व रिसर्च सेंटरचचे डॉ. हिप्परकर, डॉ.अनुपम अलमान, श्री. अजित देशपांडे व रत्नागिरी जिल्हा रुग्णालयाच्या डॉ. जयश्री मॅथीव, डॉ. प्रकाश चौधरी, डॉ. सानिका पाटील यांसहित शिवसेना, युवासेना पदाधिकारी व रक्तदाते बहुसंख्येने उपस्थित होते. या रक्तदान शिबिरामध्ये १६० हून अधिक रक्तदात्यांनी सहभाग घेतला व ११२ रक्तदात्यांनी रक्तदान केले. परशुराम हॉस्पिटल व रिसर्च सेंटर तसेच जिल्हा रुग्णालय रक्तपेढी यांनीसूद्धा सदर शिबीर यशस्वी पार पडण्यासाठी सहभाग घेतला. या कार्यक्रमाच्या वेळेस आमदार योगेश कदम व जिल्हा परिषद अध्यक्ष विक्रांत जाधव यांनी स्वतः रक्तदान करून कार्यक्रमाची सुरुवात केली. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कार्यालय प्रमुख श्री. दीपक आंब्रे, युवासेना उपतालुका अधिकारी श्री. चेतन वारणकर युवासेना शाखा अधिकारी श्री. ओमकार चाळके, युवासेना माजी विभाग अधिकारी डॉक्टर मच्छिंद्र गोवळकर, रुपेश काते, सौरभ चाळके, ओमकार चिले, अमोल आंब्रे, सूरत काते, मयूर आंब्रे, शुभम सावंत, प्रणव शिगवण, शुभम सागवेकर, गौरव आंब्रे, रोहन कालेकर, अमर साळुंखे, राजन सिंग* तसेच सर्व युवासैनिकांनी व पदाधिकाऱ्यांनी विशेष मेहनत घेतली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. मोहनसर वारणकर यांनी केले. कार्यक्रम यशस्वी झाल्याबद्दल लोटे चे सरपंच चंद्रकांत चाळके यांनी आयोजकांचे आभार मानले.