खेडचे शिवसैनिक नेमके भाईंचे की भास्कर जाधवांचे?

सन्माननीय भास्कर शेठ जाधव म्हणून केला उल्लेख

खेड तालुक्यातील सुसेरी जिल्हापरिषद गटात आयोजित जाहीर सभेत गुहागर विधानसभा मतदार संघाचे आमदार भास्कर जाधव यांनी शिवसेना नेते रामदास भाई कदम यांच्यावर एकेरी भाषेत टीकाटिप्पणी केली. नुसती एकेरी भाषेत टीका करून थांबले नाहीत तर अगदी खालच्या पातळीवर जाऊन प्रश्न देखील उपस्थित केला. यावर प्रत्युत्तर देताना मात्र खेड तालुका शिवसेना पक्षाच्या पत्रकार परिषदेमध्ये जिल्हाप्रमुख शशिकांत चव्हाण यांनी मात्र त्यांना सावरून घेत आदरार्थी टीका केल्याचे पहावयास मिळाले. यामुळे भाईंचे शिवसैनिक नेमके भाईंचे की भास्कर जाधवांचे असा प्रश्न निर्माण झाला आहे.

खेड तालुका शिवसेना कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेवेळी शिवसेना जिल्हाप्रमुख शशिकांत चव्हाण यांनी शिवसेना नेते रामदास कदम यांच्यावर एकेरी टीका करणाऱ्या भास्कर जाधवांचा मात्र जिल्हाप्रमुखांनी आदरणीय भास्कर शेठ म्हणत उल्लेख केला. यामुळे जिल्हाप्रमुख नेमके भाईंचे की भास्कर जाधवांचे असा प्रश्न उपस्थित झाला. नेमके काय म्हणाले हे पुढील व्हिडिओमध्ये पहावयास मिळेल. https://youtube.com/shorts/dpgDe0_PNfA?feature=share

शिवसेना किंवा शिवसैनिक म्हटले की आक्रमक व्यक्तिमत्व डोळ्यासमोर उभे राहतें. शिवसैनिक म्हटले की शिवसेनाप्रमुखांचे वाघ. मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी झगडणारी संघटना म्हणजे शिवसेना. पक्षाच्या, नेत्याच्या किंवा शिवसैनिकांच्या अंगावर येणाऱ्या प्रत्येकाला शिंगावर घेणाऱ्या वाघांची संघटना म्हणून शिवसेना पक्षाची आणि कार्यकर्त्यांची एक वेगळी ओळख आहे. मात्र काही दिवसापूर्वी खेड तालुक्यातील सुसेरी जिल्हा परिषद गटात झालेल्या सभेत आ. भास्कर जाधव यांनी आक्रमक होत शिवसेना नेते रामदास कदम, गृहराज्यमंत्री योगेश कदम आणि माजी जि. प. सभापती चंद्रकांत कदम यांच्यावर टीकास्त्र सोडले. या टीकेला प्रत्युत्तर देण्यासाठी दोन दिवसानंतर शिवसेनेच्या वतीने पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. मात्र ही पत्रकार परिषद बघितल्यानंतर खेडचे शिवसैनिक शेळी झाल्याचे चित्र पाहावयास मिळाले. ही आयोजित पत्रकार परिषद म्हणजे केवळ औपचारिकता होती की काय? असा प्रश्न या पत्रकार परिषदेनंतर उपस्थित झाला आहे.

सध्या महाराष्ट्रात शिवसेना वि. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आमने सामने असल्याचे पहावयास मिळत आहे. गेल्या काही दिवसापूर्वी दसरा मेळाव्यात शिवसेना नेते रामदास भाई यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नामुळे राज्यातील राजकारणात खळबळ उडाली होती. यानंतर गुहागर विधानसभेचे आ. भास्कर जाधव यांनी सातत्याने शिवसेना नेते रामदास कदम यांच्यावर एकेरी आणि खालच्या शब्दात टीका टिपण्णी करणे सुरू केली आहे. मात्र ही मुंबईसह महाराष्ट्रात त्यांनी केल्याचे पहावयास मिळत होते. मात्र आता गेल्या काही दिवसापासून त्यांनी भाईंच्या बालेकिल्ल्यात म्हणजे खेडमध्ये येऊन टीका टिपण्णी करणे सुरू केली आहे. त्यावर देखील खेडमधील शिवसेना पदाधिकारी मुग गिळून गप्प बसल्याचे पहावयास मिळत होते. आधी तळे विभागात मग सुसेरी इथे झालेल्या सभेत अगदी खालच्या शब्दात टीका टिपण्णी केली होती. त्यावर मात्र तब्बल दोन दिवसानंतर उत्तर देऊन शिवसैनिकांनी आपल्या नेत्याविषयी आपल्या मनात किती प्रेम आहे हे आधीच दाखवून दिले होते आणि या मिळमिळीत पत्रकार परिषदेनंतर यावर शिक्कामोर्तब देखील त्यांनी केले.

खरेतर शिवसेना नेते रामदास भाई कदम आणि गृहराज्यमंत्री योगेश दादा कदम खेड तालुक्यात आले असता त्यांच्या सभोवताली शेंकडोंच्या संख्येने कार्यकर्त्यांची गर्दी असते. मात्र जेव्हा त्यांच्यावर टीका केली जाते तेव्हा मात्र हे कार्यकर्ते नेमके कुठे गायब झालेले असतात याचे उत्तर मात्र अद्याप समोर आलेले नाही. त्यामुळे नक्की या कार्यकर्त्यांची आपल्या नेत्यावर निष्ठा आहे की नाही असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे. काल झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये शिवसेना जिल्हाप्रमुखांनी आरोप करणाऱ्या विरोधकांचा सन्माननीय भास्कर शेठ जाधव असा उल्लेख करून या सर्व प्रश्नांना जागा निर्माण करून दिली आहे.

खालच्या आणि एकेरी भाषेत टीका करणाऱ्या भास्कर जाधव यांचा खरेतर खेड मधील शिवसैनिकांनी अत्यंत कठोर आणि कडक शब्दात समाचार घेणे अपेक्षित होते. ज्या नेत्यांना बघून तुम्ही राजकारणात सक्रिय झाला कमीत कमी त्या नेत्यांचा आक्रमकपणा तरी खेडमधील शिवसैनिकांनी अंगिकारला पाहिजे होता असे मत चक्क विरोधकांमधून व्यक्त करण्यात येत आहे. तर पक्षातील इतर पदाधिकाऱ्यांकडून हे काय बोलले, असे उत्तर देतात का? नक्की काय प्रकार आहे? असे प्रश्न देखील उपस्थित करण्यात आले. तर या पत्रकार परिषदे वेळी जिल्हा प्रमुख शशिकांत चव्हाण यांच्या सोबत असलेल्या सहकार्यानी देखील आपल्याला काही बोलणे पटलेले नाही, एवढ्या सौम्य शब्द कुठे उत्तर देतात का? नक्की जिल्हाप्रमुखांची भूमिका काय? असे एक ना अनेक प्रश्न उपस्थित देखील केले जात आहेत.

नक्की कशी होती त्यांची ही पत्रकार परिषद पाण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा – https://youtu.be/0WKQm1zvqEs

खेडमध्ये जेसी आणि लायन्सचा वाद चव्हाट्यावर,लायन्स कडून जेसीआय ला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न

एकाच वेळी दोन्ही संस्थांचे समोरासमोर कार्यक्रम

राकेश कोळी –

खेड सारख्या अधूनिक शहरात जिथे लहान मुलांच्या मनोरंजना साठी साधा बगीचा उपलब्ध नसलेल्या शहरात होणारे फेस्टिवल हेच केवळ शहरवासीयांच्या मनोरंजनाचे साधन शिल्लक राहिले आहे. यापूर्वी शहरात केवळ जेसीआय खेड यांच्याकडून जेसी फेस्टिव्हलचे आयोजन करण्यात येत होते. मात्र सन 2024  जानेवारीमध्ये लायन्स फेस्टिव्हलचे देखील लायन्स या सामाजिक संस्थेकडून आयोजन करण्यात आले होते. त्यामुळे शहरवासीयांना ह्या वर्षी दोन वेगवेगळ्या फेस्टिवलच्या माध्यमातून मनोरंजनाचा लाभ घेता आला होता. मात्र या दोन संस्थेमध्ये डिसेंबर 2023 मध्ये बॅनर लावण्याच्या शुल्लक कारणावरून वाद झाल्याचे शहरवासीयांनी पाहिले होते. त्यावेळे पासून या दोन्ही संस्था एकमेकांसोबत स्पर्धा करीत असल्याचे चित्र दिसून येत आहे. याबाबतचे वृत्त देखील टाईम्स मराठी न्यूज ने प्रसिद्ध केले होते. मात्र यंदा आयोजित करण्यात येत असलेल्या फेस्टिवल दरम्यान या दोन संस्थांमध्ये आता जोरदार स्पर्धा सुरू झाल्याचे चित्र दिसून येत आहे. यावेळी दोन्ही संस्थांनी वेगवेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन केले असले तरी दोन्ही कार्यक्रम एकाच वेळी होणार असल्याने यांच्यातील स्पर्धा किंवा वाद आता जगजाहीर झाला असे म्हटले तरी वावगे ठरू नये. कारण शहरात गेल्या वर्षभरात विविध सामाजिक उपक्रम राबवून खेड लायन्सचे माजी अध्यक्ष रोहन विचारे यांनी लायन्स संघटनेचे महत्त्व वाढवले होते. या उपक्रमातून त्यांना चांगली प्रसिद्धी आणि नावलौकिक देखील प्राप्त झाले होते. मात्र यंदा होणाऱ्या जेसी फेस्टिवल वेळी त्यांनी आपल्या क्रीडा मोहत्सवाचे आयोजन करून त्यांनी जेसी सोबत स्पर्धा करीत असल्याचे दाखवून दिले. खरेतर दोन्ही संघटनेने काल गुरुवार 26 डिसेंबर रोजी सायंकाळी विविध माध्यमातून आपले कार्यक्रम जाहीर केले.

लायन्स क्लब पत्रकार परिषद
जेसीआय खेड पत्रकार परिषद

यामध्ये जेसीसने आपल्या फेस्टिवल कार्यालयाचे उद्घाटन करून तर लायन्सने पत्रकार परिषद घेवून क्रीडा मोहत्सव जाहीर केला. मात्र जेसीस या सामाजिक संस्थेने खेड शहरात विविध ठिकाणी बॅनरबाजी करून आपल्या तारखा यापूर्वीच म्हणजे 17 डिसेंबरला जाहीर केल्या होत्या. तर लायन्सने 26 डिसेंबर रोजी पत्रकार परिषद घेवून आपल्या तारखा जाहीर केल्या. हा वाद एवढ्या पुरता मर्यादित न राहता दोन्ही संघटनांनी आपले कार्यक्रम शहरातील एकच मैदानावर घेतल्याने यांच्यातील स्पर्धा आता टोकाला पोहचल्याचे पहावयास मिळत आहे. खरेतर शहरतील महाड नाका येथील एस टी डेपोचे ग्राउंड म्हणजे गोळीबार मैदान म्हणून परिचित असणाऱ्या मैदानात हे फेस्टिवल आयोजित केले जातात. तर त्या बाजूलाच असणाऱ्या क्रीडा संकुलाच्या जागेत फेस्टीवलसाठी येणारे नागरिक आपली वाहने पार्किंग करीत असतात. फेस्टिवलच्या कालावधीत नेहमी अंधारात असलेले हे मैदान मात्र झगमगुन उठते. मात्र यंदा सर्वात आधी जेसी फेस्टिवलने आपल्या कार्यक्रमाची तारीख जाहीर केली असताना देखील लायन्सने आपला क्रीडा मोहत्सव याच दरम्यान जाहीर केला. एवढ्यावरच न  थांबता जेसी फेस्टिवल होणाऱ्या ग्राउंड समोरील क्रीडा संकुलाचे ग्राऊंडवर ही क्रीडा स्पर्धा आयोजित केली. खरेतर या क्रीडा संकुलाच्या मैदानाचा वापर गेले अनेक वर्षे जेसीआय ने फेस्टीवलसाठी येणाऱ्या नागरिकांच्या वाहनांच्या पार्किंग केला होता. इतकेच नव्हे तर 2024 मध्ये पार पडलेल्या लायन्स मोहत्सवामध्ये देखील याच जागेचा वापर वाहन पार्किंग साठी करण्यात आला होता. मात्र आता ही जागा क्रीडा मोहत्सवास घेवून एकप्रकारे लायन्सने जेसीआय खेडची कोंडी करण्याचा प्रयत्न केल्याचे पहावयास मिळत आहे.

याबाबत दोन्ही संघटनेच्या पदाधिकाऱ्यां कडून अधिक माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला असता दोन्ही संघटनेने आपले कार्यक्रम हे पूर्व नियोजित असल्याचे स्पष्टपणे सांगितले. तर खेड जेसिस फेस्टिवल देखील पूर्व नियोजित असून 5 ऑक्टोंबर रोजी सर्व प्रथम फेस्टिवलच्या तारखांची माहिती शहरातील व्हॉट्स ऍप या सोशल मीडियावर जाहीर केल्याचे पदाधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. तर लायन्सच्या पदाधिकाऱ्यांनी देखील आपले वर्षभरातील कार्यक्रम जुलै मध्ये शेड्युल्ड केल्याचे सांगितले. सर्व प्रथम आम्ही सोशल मीडियाच्या माध्यमातून लायन्स मिसळ फेस्टिव्हलचे आयोजन केल्याचे सांगत असताना त्यांनी जेसी फेस्टिव्हलची तारीख जाहीर झाल्याने आपला मिसळ फेस्टिवल रद्द करून मोठ्या प्रमाणात साजरा होणाऱ्या जेसी फेस्टीवलसाठी आम्ही एक पाऊल मागे घेवून आमचा मिसळ फेस्टिवल रद्द केल्याचे देखील त्यांनी यावेळी बोलताना आठवणीने सांगितले. तर यावेळी बोलताना दोन्ही संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी एकमेकांच्या संघटनेची नावे देखील आपल्या तोडत घेणे टाळल्याचे पहावयास मिळत होते. तसेच दोन्ही संघटनेच्या पदाधिकाऱ्यांकडून आमच्या कोणतेही मतभेद नसून आमच्यात सलोखा आहे हेही त्यांनी आवर्जुन सांगितले. माञ बोलणे आणि कृती यातून त्यांच्यातील मतभेद हे स्पष्ट पणे जाणवत होते. यावेळी या दोन्ही संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना एकमेकांशी चर्चा करून हे कार्यक्रम रिषेड्युल्ड करता येतात का पाहा असे सांगताच त्यांनी मात्र आता आमचे नियोजन पूर्ण झाले असून आता कार्यक्रम आम्ही रिषेड्युल्ड करू शकत नसल्याचे देखील सांगितले. मात्र मिसळ मोहत्सव्
रिश्येड्युल्ड होता तर क्रीडा मोहत्त्सव कुठून आला. जर लायन्स ने एक पाऊल मागे घेवून मिसळ मोहत्सव रद्द केला तर मग क्रीडा मोहत्सव का? असा प्रश्न देखील या निमित्त उपस्थित होत आहे. यावेळी दोन्ही संघटनेच्या पदाधिकाऱ्यांकडून ठीक आहे आम्ही विचार करतो काही करता येते का ते पाहतो असे सांगण्याचे  साधे औपचारिकता देखील न दाखवल्याने यांच्यातील स्पर्धा, संघर्ष किंवा वाद याच्यावर शिक्कामोर्तब होतो हे मात्र निश्चित.


या दोन्ही संघटनेतील वादामुळे किंवा अपापसातल्या स्पर्धेमुळे नुकसान मात्र या दोन्ही संघटनेचे व तालुका वसियांचे होणार हे मात्र निश्चित. कारण हे दोन्ही कार्यक्रम एकच वेळी आयोजित केल्याने क्रीडा वासियांना व तालुकावासियांना एकावेळी एकच कार्यक्रमाचा लाभ घेता येणार आहे. क्रीडाप्रेमी आपल्या कुटुंबासह फेस्टीवलला भेट देतील की क्रीडा स्पर्धांचा आनंद घेतील हा प्रश्न आता सर्वसामान्य जनतेला पडल्यावाचून राहणार नाही. तर हे दोन्ही कार्यक्रम एकाच वेळी आयोजित केल्याने कार्यक्रमंना येणारे पब्लिक देखील विभागले जाण्याची शक्यता देखील वर्तविण्यात येत आहे. यांच्या आपसातील स्पर्धेमुळे उत्कृष्ठ काम करणाऱ्या सामाजिक संस्थांच्या नावाला देखील हानी पोहचण्याची शक्यता असल्याचे सध्या चर्चिले जात आहे. त्यामुळे या दोन्ही संस्थांनी एकमेकांशी पुन्हा समन्वय साधून आपल्या कार्यक्रमाच्या तारखा ऍडजस्ट होतात का हे पाहावे जेणेकरून तालुकावासियांना या दोन्ही कार्यक्रमाचा लाभ घेता येईल असे मत सध्या शहरातील नागरिकांमधून व्यक्त करण्यात येत आहे.

©️2024 Times Marathi News, Media Network

Editor – Rakesh Koli

Rg.No.MH-28-0054845

Khed, Ratnagiri 

ताज्या बातम्या आणि घडामोडींची माहिती मिळवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करून सबस्क्राईब करा 

रामदास कदमांसह शिवसेनेचे ४० स्टार प्रचारक मैदानात..

राज्यात विधानसभा निवडणुकीची जोरदार रणधुमाळी सुरू आहे. आज निवडणुकीसाठी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता. त्यानंतर आता प्रचाराला खऱ्या अर्थाने सुरूवात देखील झाली आहे. प्रचारासाठी सर्वच राजकीय पक्षांच्या स्टार प्रचारकांची यादी तयार झाली आहे. सेलिब्रिटींपासून ते वरिष्ठ राजकीय नेत्यांचा या स्टार प्रचारकांच्या यादीमध्ये समावेश आहे. शिवसेना शिंदे गटाच्या स्टार प्रचारकांची यादी समोर आली आहे.

रविवारपासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रचाराला सुरूवात करणार आहे. मुंबईतल्या कुर्ला येथे मुख्यमंत्र्यांची पहिली सभा होणार आहे. शिवसेना उमेदवारांच्या प्रचारासाठी एकूण ४० स्टार प्रचारक मैदानात उतरले आहेत. या सर्वाची तोफ राज्यभर धडाडणार आहे. स्वत: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अभिनेता गोविंदा, अभिनेते शरद पोंक्षेसह अनेक राजकीय नेत्यांचा या यादीमध्ये समावेश आहे. प्रचाराचे दिवस शिवसेनेसाठी खूपच महत्वाचा असणार आहे. जास्तीत जास्त मतदारसंघातील मतदारांपर्यंत पोहण्याचा प्रयत्न यावेळी केला जाणार आहे.

एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या स्टार प्रचारकांची यादी

१.एकनाथ शिंदे
२.रामदास कदम
३.गजानन किर्तीकर
४.आंदनराव आडसूळ
५.प्रताप जाधव
६.गुलाबराव पाटील
७.निलम गोऱ्हे
८.मिना कांबळी
९.उदय सामंत
१०.शंभूराज देसाई
११.दीपक केसरकर
१२.तानाजी सावंत
१३.दादा भुसे
१४.संजय राठोड
१५.अब्दुल सत्तार
१६.भरत गोगावले
१७.संजय शिरसाट
१८.श्रीकांत शिंदे
१९.धैर्यशील माने
२०.नरेश मस्के
२१.श्रीरंग बारणे
२२.मिलिंद देवरा
२३.किरन पावसकर
२४.राहुल शेवाळे
२५.शरद पोंक्षे
२६.मनीषा कायंदे
२७.गोविंदा
२८.कृपाल तुमाणे
२९.दीपक सावंत
३०.अनंद जाधव
३१.ज्योती वाघमारे
३२.शीतल म्हात्रे
३३.राहुल लोंढे
३४.हेमंत पाटील
३५.हेमंत गोडसे
३६.राजू वाघमारे
३७.मिनाक्षी शिंदे
३८.ज्योती मेहर
३९.अक्षय भोसले
४०.तेजस्विनी केंद्रे

खेड उबाठा शहराध्यक्षांचा राजीनामा, शिंदेच्या शिवसेनेत करणार प्रवेश

Breaking News

खेड शहर उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे शहराध्यक्ष दर्शन अजित महाजन यांनी मंगळवारी सकाळी अचानक आपल्या शहराध्यक्ष पदाचा राजीनामा दिला असून मंगळवारीच ते शिवसेना पक्षात अधिकृत पक्ष प्रवेश करणार असल्याची माहिती खात्रीशीर सूत्रांकडून मिळत आहे. उबाठा गटाच्या शहराध्यक्षांनी अचानक राजीनामा देवून घेतलेल्या निर्णयामुळे खेड तालुक्यातील उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेला आणि जिल्हाप्रमुख सांजयराव कदम यांना मोठा धक्का बसला आहे. एक आक्रमक तरुण नेतृत्व, चांगले वक्ते यांच्या माध्यमातून शिवसेना उबाठा गटाने गमावले असून त्याचा फायदा आता शिवसेना शिंदे पक्षाला होणार आहे. शहराध्यक्ष म्हणून काम करीत असताना दर्शन महाजन यांनी अनेक आंदोलने आणि उपोषणे करून प्रशासनाचे लक्ष वेधून सर्व सामान्यांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांच्या राजीनाम्याने उबाठा पक्षाला खेड शहरात मोठा धक्का बसला असून आगामी विधान परिषद निवडणुकीत याचा फायाड शिवसेना पक्षाला व आ. योगेश कदम यांना मात्र नक्की होईल.

दुसऱ्या यादीतही गुहागरचा उमेदवार नाही, संभ्रम कायम

राज्यात सध्या विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असल्याचे पहावयास मिळत आहे. रत्नागिरी जिल्ह्यात देखील विविध राजकीय पक्षांकडून आपापले उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत. मात्र गुहागर विधानसभा जागेवर शिवसेनेकडून अद्यापही उमेदवारी जाहीर करण्यात आली नाही. उद्या 28 ऑक्टोबर रोजी राजेश बेंडल हे आपला उमेदवारी अर्ज सादर करणार असल्याची खात्रीशीर माहिती समोर येत आहे. मात्र या जागेवर यापूर्वी शिवसेनेकडून विपुल कदम यांच्या नावाची देखील चर्चा झाली होती.

शिवसेना पक्षाची दुसरी यादी रविवारी सायंकाळी जाहीर झाली असून यामध्ये विविध 20 जागांवर उमेदवार निश्चित करण्यात आले आहेत. मात्र या दुसऱ्या यादीत देखील गुहागर विधानसभा मतदारसंघाचा उमेदवार जाहीर न झाल्याने या ठिकाणी पुन्हा संभ्रम निर्माण झाला आहे. गुहागर विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचा उमेदवार नक्की कोण असा प्रश्न आता येथील जनतेसह शिवसैनिकांसमोर उपस्थित झाला आहे. गुहागर विधानसभेच्या जागेवर शिवसेना पक्षाकडून राजेश बेंडल की विपुल कदम कोणाची वर्णी लागते याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. 29 ऑक्टोबर ही उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख असून 28 ऑक्टोबर रोजी दुपारनंतर या जागेचा उमेदवार जाहीर होण्याची शक्यता देखील राजकीय वर्तुळातून वर्तवण्यात येत आहे.

©️2024 Times Marathi News, Media Network
Editor – Rakesh Koli
Rg.No.MH-28-0054845
Khed, Ratnagiri

ताज्या बातम्या आणि घडामोडींची माहिती मिळवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करून सबस्क्राईब करा

🪀 व्हाट्सअप ग्रुप लिंक
https://chat.whatsapp.com/CEeDRKqaMDTBB15bt7AuLg

👤 फेसबुक पेज लिंक
https://www.facebook.com/share/D44NdYnfuQVHqqY9/?mibextid=qi2Omg

🌀 इंस्टाग्राम लिंक
https://www.instagram.com/rakesh0946?igsh=emZodDkzc25peWVm

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
👉🏻 आपल्या परिसरातील बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क क्रमांक  8390380101

दापोली शिवसेनेत 70 पेक्षा अधिक जणांचा आम. योगेश कदम यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश

दापोली शहरातील खोंडा प्रभाग क्रमांक 4 व अहमदनगर प्रभाग क्रमांक 2 येथील जवळपास 70 हून अधिक नागरिकांनी आज दापोली खेडचे आमदार योगेश दादा कदम यांच्या विकासकामांवर प्रेरित होऊन आज शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला. यावेळी सर्व पक्ष प्रवेशकर्त्यांचे शिवसेना पक्षात आमदार योगेश दादा कदम यांनी स्वागत केले. दापोली येथील शहर शिवसेनेच्या शाखेमध्ये हा पक्षप्रवेश सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला.

यावेळी माजी समाजकल्याण सभापती भगवान घाटगे, तालुकाप्रमुख उन्मेषा राजे, माजी नगराध्यक्ष व माजी शहरप्रमुख राजेंद्र पेटकर, विधानसभा क्षेत्र संघटक प्रदीप सुर्वे, उपजिल्हाप्रमुख सुधीर कालेकर, महिला आघाडी शहर संघटिका रसिका पेटकर, माजी नगराध्यक्ष परवीन शेख, माजी नगरसेविका शबनम मुकादम, नगरसेविका रूपा घाग, प्रीती शिर्के, शिवानी खानविलकर, शहरप्रमुख प्रसाद रेलेकर, युवा सेना शहर अधिकारी स्वप्नील पारकर, माजी सभापती ममता शिंदे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष रोहिणी दळवी, कोकण कृषी विद्यापीठ कार्यकारिणी सदस्य सुनील दळवी, युवासेना उपजिल्हाधिकारी अमित पार्दुले, युवासेना सचिव किरण बांद्रे, माजी शहरप्रमुख सुहास खानविलकर, उप तालुकाप्रमुख चंद्रकांत कामथेकर, शहर समन्वयक प्रकाश साळवी, अल्पसंख्याक शहरप्रमुख नदीम मुकादम, जावेद भाई सारंग, दीपक सूर्यवंशी, शशांक घाग, राजू बोथरे, युवती शहर अधिकारी कीर्ती परांजपे, माजी समाजकल्याण सभापती चारुता कामठेकर आदिंसह शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमात नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना आमदार योगेश कदम यांच्या हस्ते नियुक्तिपत्र प्रदान करण्यात आले व पक्षात त्यांचे स्वागत करण्यात आले.

यावेळी मनोगत व्यक्त करताना आमदार योगेश कदम यांनी दापोली शहरातील विकासकामांवर भाष्य करताना नगरपंचायत निवडणुकीत मतदारांनी आपल्या उमेदवारांना दिलेल्या भरघोस प्रतिसादाबद्दल समाधान व्यक्त केले. तसेच आज ज्या नागरिकांनी आपल्या पक्षात प्रवेश केला आहे त्यांना कधीही विकासकामांची कमतरता भासू देणार नाही असा शब्द दिला. दापोली शहरातील प्रत्येक विकासकाम करण्याची धमक आमदार योगेश कदम यांच्यामध्ये आहे हा विश्वास जनतेने दाखवला आहे आणि हा विश्वास आमदार म्हणून मी नक्कीच सार्थ ठरवेन असे आश्वासन आमदार योगेश कदम यांनी उपस्थिताना केले. सर्व प्रवेशकर्त्यांचे पक्षात स्वागत करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमाला शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

रत्नागिरीतील बचत गट मॉल राज्यभर राविण्याच्या सूचना – मुख्यमंत्री शिंदे

राज्यातील महिलांच्या सबलीकरणासाठी महिला सशक्तीकरण अभियान राबविण्यात येत आहे. महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी त्यांना बाजारातील मागणी असणाऱ्या वस्तुंच्या निर्मितीचे प्रशिक्षण देणे, भांडवल उपलब्ध करणे आणि त्या वस्तुंचे ब्रांडिंग, मार्केटिंग करणे यासाठी मदत करण्यात येणार आहे. तसेच बचत गटांना त्यांच्या मालाची विक्री करता यावी याकरिता जिल्हा प्रशासनाद्वारे तात्पुरते स्टॉल उपलब्ध करुन द्यावेत. राज्यातील बस स्थानक, रेल्वे स्थानक आणि मॉल्स मध्ये काही स्टॉल तातडीने बचत गटांना कसे उपलब्ध करुन देता येतील, याचे नियोजन करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी दिल्या. दीर्घकालीन उपाययोजना म्हणून रत्नागिरी जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या बचत गट मॉल ही संकल्पना सुद्धा इतर जिल्ह्यात राबविण्याचे निर्देशही त्यांनी दिले. या अभियानातून जास्तीत जास्त महिलांना बचत गटांच्या चळवळीत सहभागी करुन घेण्याचे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले. राज्यातील महिला सशक्तीकरण अभियान राबविण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक वर्षा शासकीय निवासस्थान येथे झाली. यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. या बैठकीला उद्योगमंत्री उदय सामंत यांच्यासह, विविध विभागांचे सचिव, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, महापालिकांचे आयुक्त दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.

आमच्या ताज्या बातम्या मिळवण्यासाठी पुढील चॅनल लिंकवर क्लिक करा https://whatsapp.com/channel/0029Va5hOLUJUM2Z6aRJ613C

उध्दव ठाकरे यांच्या अज्ञानाचा पराभव – आम. योगेश कदम

उध्दव ठाकरे यांना त्यांच्या आजूबाजूला असलेल्या बडव्यांमुळे पक्ष घटना कधी समजली नाही किंवा त्यांच्या अज्ञानाने त्यांनी कधी समजूनच घेतली नाही. आज त्यांच्या अड्यानांमुळेच त्यांचा पराभव झाला असल्याचे मत खेड दापोली मंडणगडचे आमदार योगेश रामदास कदम यांनी X या सोशल मीडियावर ट्विट करत व खेड येथे पत्रकारांशी संवाद साधताना व्यक्त केले.

आमदार योगेश कदम यांना पेढा भरवून आनंदोत्सव साजरा करताना खेड भाजप चे शहराध्यक्ष अनिकेत कानडे

आदरणीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख मा. बाळासाहेब ठाकरे यांनी 1999 साली जी पक्ष घटना पक्षाला दिली होती. तीच पक्ष घटना ग्राह्य धरून आजची सुनावणी करण्यात आल्याचे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सांगितले. उध्दव ठाकरे यांनी त्यांच्या अज्ञानामुळे किंवा त्यांच्या आजू बाजूला असलेल्या भडव्यांमुळे पक्ष घटना त्यांना कधी समजलीच नाही. अज्ञानी बनून पक्ष चालवल्यामुळे किंवा आजूबाजूच्या अकार्यक्षम बडव्यांवर विश्वास ठेवल्याने त्यांचा आज पराभव झाल्याचे मत देखील त्यांनी व्यक्त केले. या सुनावणी दरम्यान माझे मत मांडताना मी खूप जबाबदारीने बोललो होतो. उध्दवजींनी पक्षप्रमुख काम करताना स्वतःच्या पक्षाची घटना जर ते निवडणूक आयोगाकडे रजिस्टर करू शकले नसतील तर त्यांच्या ह्या घोडचुकीमुळे त्यांना हा आजचा पराभव स्वीकारावा लागला असल्याचे मत आमदार योगेश कदम यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले. तसेच हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचे रक्षण करण्यासाठी ज्या प्रयत्नांची पराकाष्ठा केली होती त्याचाच हा विजय असल्याचे मत देखील त्यांनी व्यक्त केले.

खरी शिवसेना शिंदेचीच – राहुल नार्वेकर

भरत गोगावले यांचा व्हिप वैद्य

महाराष्ट्राच्या इतिहासात प्रथमच विधासभा अध्यक्षांच्या हातात निकाल दिल्याची पहिलीच वेळ असून यांच्या निकालानंतर शिवसेना हा पक्ष कोणाचा हे निश्चित होणार होते. आज दि. 10 जानेवारी रोजी सायंकाळी 5 वा. सुमारास या निकालाचे वाचन विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सुरू केले. यावेळी त्यांनी खरी शिवसेना ही एकनाथ शिंदे यांचीच असल्याचे जाहीर करत भरत गोगावले यांनी बजावलेला व्हिप वैद्य असल्याचे ही सांगितले. विधसभा अध्यक्षांच्या निकालामुळे शिंदे गटाला दिलासा तर ठाकरे गटाला जबरदस्त धक्का बसला आहे.

या निकालाचे वाचन सुरू करण्यापूर्वी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मा. सुप्रीम कोर्टाचे आभार मानले. यावेळी मा. सुप्रीम कोर्ट यांनी महत्वाचे मार्गदर्शन केल्याबद्दल आभार मानले. तसेच यावेळी त्यांनी दोन्ही गटाच्या वकिलांचे आभार मानले. तसेच यावेळी त्यांनी पक्ष ठरवताना त्यांनी घटना, नेतृत्व आणि विधिमंडळ बहुमत हे घटक महत्वाचे असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. दोन्ही गटांमध्ये पक्षप्रमुख कोण यावरून मतांतर असून 2018 मधील शिवसेना पक्षाची घटना महत्वाची आहे. तसेच दोन्ही गटांनी मात्र वेगवेगळ्या घटना दिल्या आहेत. मात्र निवडणूक आयोगाने एक घटनेची प्रत दिली असून त्यावर कोणतीही तारिक नसल्याचे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी निकाल वाचना वेळी सांगितले. तसेच श्री. उध्दव ठाकरे यांनी दिलेल्या घटनेवर तारीख नसल्याचे ही त्यांनी यावेळी सांगितले. तसेच 2018 ला शिवसेना पक्षाची ठाकरेंकडून दिलेली घटना ही चुकीची आहे म्हणून निवडणूक आयोगाने दिलेली घटना वैद्य मनात असल्याचे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सांगितले. तसेच शिवसेना पक्षाची 1999 ची घटना मान्य करणार असल्याचे ही नार्वेकर यांनी यावेळी सांगितले. तसेच खरी शिवसेना कुणाची हे ठरविण्याचा अधिकार त्यांना स्वतःला असल्याचे ही यावेळी स्पष्ट केले.

निकाल वाचन करताना अध्यक्ष म्हणाले कि, २१ जून २०२२ रोजी शिवसेनेत दोन गट पडले. सेनेत २ गट पडल्याचं २२ जूनला निदर्शनास आले. पक्षात पक्षप्रमुखांपेक्षा राष्ट्रीय कार्यकारणी महत्त्वाची असते. पक्षप्रमुख एकटेच निर्णय घेऊ शकत नाही. पक्षप्रमुख कुणालाही पदावरून हटवू शकत नाही. कार्यकारणी ही पक्षात सर्वोच्च असते. त्यामुळे राष्ट्रीय कार्यकारणीचा निर्णय अंतिम असेल. त्यामुळे एकनाथ शिंदेंची हकालपट्टी मान्य करता येत नाही. पक्षप्रमुखाला सर्वोच्च अधिकार देणे हे लोकशाहीसाठी घातक आहे. पक्ष कुणाचा हे ठरवण्याचा अधिकार बहुमताला आहे. त्यामुळे केवळ ठाकरे किंवा शिंदे यांचे मत ग्राह्य धरता येणार नाही. सध्याच्या परिस्थितीनुसार एकनाथ शिंदेंकडे बहुमत असल्यानं शिंदे गटाला पक्ष म्हणून मान्यता देतो. भरत गोगावले यांची नियुक्ती वैध असल्याचा निकाल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सुनावला आहे.

विधानभवनातील सेंट्रल हॉलमध्ये या निकालाचे वाचन करण्यात आले. यावेळी ठाकरे-शिंदे या दोन्ही गटाचे आमदार उपस्थित होते. हे निकालपत्र १२०० पानांचे असले तरी त्यातील ठळक मुद्दे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी सभागृहात वाचून दाखवले. या प्रकरणाची सुनावणी घेताना माझ्यासमोर खरी शिवसेना कुणाची आणि व्हिप कुणाचा हा मुद्दा होता. घटना, नेतृत्व आण विधिमंडळ पक्ष हे तीन घटक महत्त्वाचे होते. माझ्यासमोर दोन्ही गटाने पुरावे सादर केले. शिवसेनेच्या पक्ष घटनेचाही विचार निकषात केला गेला आहे. निकाल देताना शिवसेनेची २०१८ ची घटना लक्षात घेतली. विधिमंडळातील बहुमतदेखील ग्राह्य धरले गेले. दोन्ही गटात पक्षप्रमुखपदावरून मतभेद आहेत. त्यामुळे राजकीय पक्ष कोणता हे प्रथमदर्शनी ठरवले गेले. पक्ष कुणाचा याबाबत निवडणूक आयोगाने घेतलेला निर्णय विचारात घेतला गेला.

तसेच निवडणूक आयोगाच्या निर्णयानुसार एकनाथ शिंदे गटाकडे असलेली शिवसेना खरी आहे. निवडणूक आयोगाचा हा निर्णय मी लक्षात ठेवला. २०१८ मध्ये पक्षात निवडणूक न घेता नियुक्त्या करण्यात आल्या. त्यामुळे २०१८ मधील बदल ग्राह्य धरता येत नाही. निवडणूक आयोगाने २०२३ मध्ये घटना देण्यात आली. माझी न्यायकक्षा मर्यादित असल्याने पक्षाचा प्रमुख कोण हे मी ठरवणार आहे. पक्षप्रमुख नव्हे तर राष्ट्रीय कार्यकारणीचा फैसला अंतिम असल्याचं सांगत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी ठाकरे गटाचा दावा फेटाळला. पक्षप्रमुखांचे मत अंतिम यावर मी सहमत नाही. त्यामुळे उद्धव ठाकरेंकडून एकनाथ शिंदेंची झालेली हकालपट्टी अमान्य आहे असंही राहुल नार्वेकरांनी सांगितले.

हिट अँड रन कायद्याबाबत 9 जानेवारीपासून महाराष्ट्र बंदची हाक


मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेंना खेडमध्ये दिले निवेदन


हिट अँड रन कायद्याबाबत ओन्ली ड्रायव्हर भाऊ मदत संघ सामाजिक संस्था यांनी 9 जानेवारीपासून बेमुदत महारष्ट्र बंदची हाक दिली आहे. या संदर्भातील निवेदन संघटनेच्या खेड तालुक्यातील पदाधिकाऱ्यांनी दि. 5 जानेवारी रोजी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांना दिले. ते एका खासगी कार्यक्रमासाठी खेड येथे आले होते.

केंद्रीय गृहमंत्री मा. अमित शहा यांनी लागू केलेला हिट अँड रन चा जो नवीन नियम आहे त्या नुसार महामार्गावर कोणतीही दुर्घटना झाल्यानंतर ड्रायव्हर घटनास्थळावरून पळून गेल्यास त्याला 7 लाख रुपये दंड व 10 वर्षे कारावास अशी शिक्षा करण्याची तरतूद केली आहे. हा नियम चालक बांधवांना मान्य बसून तो रद्द करावा यासाठी ओन्ली ड्रायव्हर भाऊ मदत संघ सामाजिक संस्था 9 जानेवारी रोजी रात्री 12 वाजता जिथे असेल तिथे वाहन सोडून स्टेरिंग छोडो आंदोलन सुरू करणार आहे.

हिट अँड रन कायद्याबाबत ओन्ली ड्रायव्हर भाऊ मदत संघ सामाजिक संस्था यांनी 1 जानेवारी रोजी स्टेरिंग छोडो आंदोलनाची हाक दिली होती. यानंतर झालेल्या चर्चेतून काही संघटनेने संपातून माघार घेतली. मात्र ओन्ली ड्रायव्हर भाऊ मदत संघ सामाजिक संस्था यांनी चालकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने कोणतेही लेखी आश्वासन न मिळाल्यामुळे ओन्ली ड्रायव्हर भाऊ मदत संघ सामाजिक संस्था यांनी येत्या 9 जानेवारी रोजी रात्री 12 वाजल्यापासून बेमुदत महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. या संधर्भात अधिक माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला असता संघटनेचे संस्थापक अध्यक्ष श्री. हनुमंत माने यांनी महाराष्ट्रातील ट्रान्सपोर्ट व्यवसायिकांचा बंद असणार आहे. यासाठी ज्यांच्याकडे वाहन चालविण्याचा परवाना आहे त्यांनी देखील या आंदोलनाला पाठिंबा देण्याचे आवाहन टाईम्स मराठी न्यूज शी बोलताना केले. तसेच या निवेदनामध्ये स्टेरिंग छोडो आंदोलनातून केवळ रुग्णवाहिका आणि स्कूल बस यांना सोडण्यात येईल असे स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे. तसेच या आंदोलनाची दखल घेवून खासगी कार चालक, बस , रिक्षा चालक यांनी दक्षता घ्यावी असे आवाहन ही केले आहे. तसेच संघटनेच्या वतीने सर्व पदाधिकारी व सदस्यांना हे आंदोलन शांततेत करण्याची विनंती ही या निवेदनाद्वारे केली आहे.

‘एक तारीख – एक तास’ स्वच्छता उपक्रमात महाराष्ट्राला अव्वल आणूया – मुख्यमंत्री


स्वच्छतेसाठी ‘एक तारीख, एक तास’ या १ ऑक्टोबर रोजी देशात राबवण्यात येणाऱ्या उपक्रमात उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन महाराष्ट्राला देशात अव्वल स्थान मिळवून देऊया, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे.

‘स्वच्छता पंधरवडा- स्वच्छता ही सेवा” या अभियानांतर्गत राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीच्या आदल्या दिवशी रविवारी १ ऑक्टोबर रोजी राज्यात सर्वत्र नागरी तसेच ग्रामीण भागात ‘एक तारीख- एक तास’ या उपक्रमांतर्गत प्रत्येकाला ते जिथे कुठे असतील तिथे स्वच्छता, साफ-सफाई करून या अभियानात सहभाग नोंदवू शकणार आहेत. गावा-गावांमध्ये, शहरात, प्रत्येक वार्डात सकाळी १० पासून या मोहिमेची सुरवात होईल. यात सफाई मित्र ही सहभागी होतील. काही ठिकाणी स्वच्छतेचे महत्व पटवून देणारी विशेष शिबिरे-प्रदर्शने आयोजित केली जातील. ज्यातून स्वच्छतेची गरज, त्यांचे फायदे, महत्व पटवून दिले जाईल.

याबाबतच्या आवाहनात मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी म्हटले आहे की, स्वच्छता आपल्या सर्वाच्या दैनंदिनीतील महत्वाची गोष्ट आहे. स्वच्छता आपल्या आयुष्यात समृद्धी आणते. आरोग्य आणि परिसराची स्वच्छता यांचा दृढ संबंध आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्यापासून ते अनेक थोर राष्ट्र पुरूष साधू-संतानीही स्वच्छतेबाबत आपल्याला धडे घालून दिले आहेत. याच अनुषंगाने आपल्या सर्वांना ‘स्वच्छता पंधरवडा-स्वच्छता ही सेवा’ हे अभियान यशस्वी करायचं आहे. ‘एक तारीख एक तास’ या उपक्रमाला स्वच्छता लोकचळवळीचे रूप द्यायचे आहे. त्यासाठी प्रत्येकाला आपला एक तास तास स्वच्छतेसाठी द्यायचा आहे. आपण, आपले कुटुंबिय किंवा सहकारी जिथे कुठे असाल, तिथे आपण स्वच्छता मोहिम राबवून या अभियानात योगदान द्यायचे आहे, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले आहे.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी वर्षभरापूर्वी आपल्या राज्यात स्वच्छ महाराष्ट्र नागरी अभियान-२ चा शुभारंभ केला. त्यातून महाराष्ट्र कचरामुक्त आणि स्वच्छ असावा असे ध्येय घेऊन आता वाटचाल करत असल्याचे नमूद करून मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे की, “महाराष्ट्राला अनेक थोरा-मोठ्यांनी परिसर स्वच्छता आणि आरोग्यदायी सवयीचा मंत्र दिला आहे. संत गाडगेबाबांनी हाती झाडू घेऊन स्वच्छतेचे धडे दिले आहेत. आता या धड्यांची आपल्याला उजळणी करायची आहे. आपआपल्या परिसरात महापालिका, नगरपालिका, नगरपंचायत तसेच गावा-गावांमध्ये ग्रामपंचायतींच्या पुढाकारांनी स्वच्छता मोहिम राबवायची आहे. साचलेला कचरा, राडा-रोडा-डेब्रीज हटवायचे आहेत. यात आपल्या सर्वांच्या मदतीसाठी स्थानिक स्वराज्य संस्था, महसूल आणि जिल्हा प्रशासन सज्ज राहील, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे

“स्वच्छता ही सवय आहे. आपल्याला स्वच्छतेची शिस्त अंगिकारायची आहे. त्याला संस्काराचे रूप द्यायचे आहे. या अभियानानंतर आपल्याला १५ डिसेंबर २०२३ पर्यंत मुख्यमंत्री सक्षम शहर स्पर्धा आणि मुख्यमंत्री सक्षम वॉर्ड स्पर्धा ही देखील यशस्वी करायची आहे. हे अभियान शंभर टक्के यशस्वी करून देशात आपल्या महाराष्ट्राला अव्वल स्थान मिळवून द्याल. चला महाराष्ट्र कचरा मुक्त करूया. स्वच्छ, सुंदर करूया. आरोग्य आणि समृद्धीला गवसणी घालूया. स्वच्छतेचा जागर करूया,” असेही मुख्यमंत्र्यानी आवाहन केले आहे.