महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे महाराष्ट्र राज्य सरचिटणीस व खेड नगर परिषदेचे नगराध्यक्ष श्री. वैभवजी खेडेकर यांच्या माध्यमातून खेड, दापोली वासियांच्या सोयीसाठी २ सुसज्ज अशा कार्डियाक रूग्णवाहिका सेवेत येणार असून यांचा लोकार्पण सोहळा मनसे अध्यक्ष हिंदुजननायक मा. श्री. राजसाहेब ठाकरे यांच्या हस्ते 26 ऑगस्ट रोजी कृष्णकुंज येथे पार पडला.

वैभवजी खेडेकर यांनी सामाजिक बांधिलकी जपत जनहितासाठी सदैव तत्पर आहेत. याच जाणिवेतून जनतेला आरोग्यसेवा पुरविण्यासाठी विविध उपाययोजना करणे. याच कर्तव्यातून खेड, दापोली वासियांच्या सेवेत रुग्णवाहिका अर्पण व्हावी हीच त्यांची सदिच्छा होती. वैभवजी खेडेकर यांच्या पुढाकाराने खेड, दापोली या शहरासाठी रुग्णवाहिका आयसीयू, व्हेंटिलेटर व ऑक्सिजनयुक्त सुविधांनी सुसज्ज असून नक्कीच या रुग्णवाहिकेंचा फायदा नागरिकांना वेळेवर उपचार उपलब्ध व्हावेत यासाठी होईल. या रुग्णवाहिका संकटात असलेल्या व्यक्तींच्या जीवन तारणारी माऊली म्हणून नावारूपास येतील. या दोन्ही रुग्णवाहिकेचे नियोजन व सेवा सुविधा पुरविण्याचे काम खेड सामाजिक कार्यकर्ते बुरान टांके यांच्याकडे असणार आहे.
या प्रसंगी मनसे नेते मा. आमदार श्री. नितीन सरदेसाई साहेब, रत्नागिरी जिल्हा संपर्क अध्यक्ष अनिलजी खानविलकर, महिला सेना उपाध्यक्ष व कोकण संपर्क नेत्या स्नेहल ताई जाधव, परिवहन कामगार सेना उपाध्यक्ष सुनिल साळवी, खेड शहर अध्यक्ष तथा गटनेते भूषण चिखले, मनविसे रत्नागिरी संपर्क प्रमुख अमोल साळुंखे, मा. जिल्हाध्यक्ष नंदु साळवी, जिल्हा उपाध्यक्ष सचिन गायकवाड, ऋषिकेश कानडे, मनविसे जिल्हाध्यक्ष पुष्पेंन दिवटे, जिल्हाध्यक्ष गुरुप्रसाद चव्हाण, उपजिल्हाध्यक्ष साईराज देसाई, खेड तालुकाध्यक्ष प्रसाद शेट्ये, शहराध्यक्ष राजु आंब्रे, उपशहर अध्यक्ष सिद्धेश साळवी, वाहतूक सेना जिल्हाध्यक्ष चेतन धामणकर, रहिम सहिबोले, विभाग अध्यक्ष सागर कवळे, दादु नांदगांवकर, दापोली तालुकाध्यक्ष नितीन साठे, वाहतूक सेना तालुकाध्यक्ष अरविंद पुसाळकर, स्वरुप माजलेकर, बुरान टाके, जयेश गुहागरकर, शैलेश गायकवाड, दापोली प्रसिद्धी माध्यम प्रमुख सुजित गायकवाड, उप प्रसिद्धी माध्यम प्रमुख सर्वेश पवार, दिनेश सकपाळ,साहिल शेलार व पदाधिकारी व महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते

*आमच्या TIMES MARATHI NEWS च्या अपडेट तुमच्या Whatsapp वर मिळवण्यासाठी आम्हाला जाॅईन व्हा किंवा 8390380101 या क्रमांकावर HI मेसेज करा*
https://chat.whatsapp.com/H0byh80Nekn2VHl0oUz2tN
https://t.me/joinchat/wy0fp8dr-ts4Mjll
https://wordpress.com/notifications
https://profile.dailyhunt.in/timesmarathinews
https://chat.whatsapp.com/H0byh80Nekn2VHl0oUz2tN