साई रिसॉर्ट पाडायला उच्च नायायलायची स्थगिती

खेड तालुक्यातील भरणे येथील बहुचर्चित असलेले साई रिसॉर्टचे बांधकाम पडण्यास मा. उच्च न्यायालय मुंबई यांनी स्थगिती दिली आहे. रिसार्टवर कोणतीही कठोर कारवाई करु नये, असे निर्देश देत अतिरिक्त कोकण आयुक्तांना यावर उत्तर देण्याचे निर्देश देत हायकोर्टानं 2 फेब्रुवारीपर्यंत यासंदर्भातील सुनावणी तहकूब केली आहे. नाहक तक्रारी रोखण्यासाठी आम्हाला हस्तक्षेप करावाचा लागेल, असं परखड मत व्यक्त करत खेड येथील साई रिसॉर्टचे बांधकाम पाडण्याच्या नोटीसला मुंबई उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. न्यायमूर्ती मिलिंद जाधव यांच्या एकलपीठानं नुकतीच यावर सुनावणी झाली. तूर्तास या रिसार्टवर कोणतीही कठोर कारवाई करु नये, असे निर्देश देत अतिरिक्त कोकण आयुक्तांना यावर उत्तर देण्याचे निर्देश देत हायकोर्टानं 2 फेब्रुवारीपर्यंत यासंदर्भातील सुनावणी तहकूब केली आहे.

खेड येथील साई रिसॉर्टची जागा ही मेसर्स साई स्टार डिस्ट्रिब्युटर्स कंपनीने साल 2007 मध्ये खरेदी केली होती. या कंपनीत पाच भागीदार होते. या जागेवर बांधकाम करण्याआधी विभागीय कार्यालयाकडून एनए परवानगी घेण्यात आली होती. या एनए परवानगीचे उल्लंघन झाल्याची तक्रार अतिरिक्त जिल्हाधिकारी यांच्याकडे करण्यात आली. ही तक्रार कंपनीचे निवृत्त भागीदार विजय भोसले यांनी केली. या तक्रारीची दखल घेत अतिरिक्त जिल्हाधिकारी यांनी एनए परवानगी 24 नोव्हेंबर 2023 रोजी रद्द केली होती. त्या विरोधात सदानंद कदम यांनी अपील दाखल केलेलं आहे. 6 डिसेंबर 2023 रोजी रिसॉर्टचे बांधकाम पाडण्याची नोटीस देण्यात आली. या नोटीसलाही सदानंद कदम यांनी याचिकेद्वारे आव्हान दिलेलं आहे. या बाबत एनए परवानगीचे उल्लंघन झाल्याची तक्रार एका निवृत्त भागीदारानं केली होती. सध्या या जागेची मालकी कदम यांच्याकडेच आहे. त्यामुळे निवृत्त भागीदारानं केलेल्या तक्रारीत काहीच तथ्य राहत नाही. तसेच एनए परवानगी असतानाही बांधकाम पाडण्याची नोटीस देण्यात आली आहे. या सर्व गोष्टी धक्कादायक व गंभीर आहेत, असं निरीक्षण न्यायालयानं नोंदवलेलं आहे. त्यामुळे उगाच केल्या जाणा-या तक्रारी रोखण्यासाठी आम्हाला हस्तक्षेप करावाचा लागेल, असं परखड मत व्यक्त करत खेड येथील साई रिसॉर्टच्या बांधकाम पाडण्याच्या नोटीसला मुंबई उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे.