खेड उबाठा शहराध्यक्षांचा राजीनामा, शिंदेच्या शिवसेनेत करणार प्रवेश

Breaking News

खेड शहर उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे शहराध्यक्ष दर्शन अजित महाजन यांनी मंगळवारी सकाळी अचानक आपल्या शहराध्यक्ष पदाचा राजीनामा दिला असून मंगळवारीच ते शिवसेना पक्षात अधिकृत पक्ष प्रवेश करणार असल्याची माहिती खात्रीशीर सूत्रांकडून मिळत आहे. उबाठा गटाच्या शहराध्यक्षांनी अचानक राजीनामा देवून घेतलेल्या निर्णयामुळे खेड तालुक्यातील उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेला आणि जिल्हाप्रमुख सांजयराव कदम यांना मोठा धक्का बसला आहे. एक आक्रमक तरुण नेतृत्व, चांगले वक्ते यांच्या माध्यमातून शिवसेना उबाठा गटाने गमावले असून त्याचा फायदा आता शिवसेना शिंदे पक्षाला होणार आहे. शहराध्यक्ष म्हणून काम करीत असताना दर्शन महाजन यांनी अनेक आंदोलने आणि उपोषणे करून प्रशासनाचे लक्ष वेधून सर्व सामान्यांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांच्या राजीनाम्याने उबाठा पक्षाला खेड शहरात मोठा धक्का बसला असून आगामी विधान परिषद निवडणुकीत याचा फायाड शिवसेना पक्षाला व आ. योगेश कदम यांना मात्र नक्की होईल.

हिट अँड रन कायद्याबाबत 9 जानेवारीपासून महाराष्ट्र बंदची हाक


मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेंना खेडमध्ये दिले निवेदन


हिट अँड रन कायद्याबाबत ओन्ली ड्रायव्हर भाऊ मदत संघ सामाजिक संस्था यांनी 9 जानेवारीपासून बेमुदत महारष्ट्र बंदची हाक दिली आहे. या संदर्भातील निवेदन संघटनेच्या खेड तालुक्यातील पदाधिकाऱ्यांनी दि. 5 जानेवारी रोजी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांना दिले. ते एका खासगी कार्यक्रमासाठी खेड येथे आले होते.

केंद्रीय गृहमंत्री मा. अमित शहा यांनी लागू केलेला हिट अँड रन चा जो नवीन नियम आहे त्या नुसार महामार्गावर कोणतीही दुर्घटना झाल्यानंतर ड्रायव्हर घटनास्थळावरून पळून गेल्यास त्याला 7 लाख रुपये दंड व 10 वर्षे कारावास अशी शिक्षा करण्याची तरतूद केली आहे. हा नियम चालक बांधवांना मान्य बसून तो रद्द करावा यासाठी ओन्ली ड्रायव्हर भाऊ मदत संघ सामाजिक संस्था 9 जानेवारी रोजी रात्री 12 वाजता जिथे असेल तिथे वाहन सोडून स्टेरिंग छोडो आंदोलन सुरू करणार आहे.

हिट अँड रन कायद्याबाबत ओन्ली ड्रायव्हर भाऊ मदत संघ सामाजिक संस्था यांनी 1 जानेवारी रोजी स्टेरिंग छोडो आंदोलनाची हाक दिली होती. यानंतर झालेल्या चर्चेतून काही संघटनेने संपातून माघार घेतली. मात्र ओन्ली ड्रायव्हर भाऊ मदत संघ सामाजिक संस्था यांनी चालकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने कोणतेही लेखी आश्वासन न मिळाल्यामुळे ओन्ली ड्रायव्हर भाऊ मदत संघ सामाजिक संस्था यांनी येत्या 9 जानेवारी रोजी रात्री 12 वाजल्यापासून बेमुदत महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. या संधर्भात अधिक माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला असता संघटनेचे संस्थापक अध्यक्ष श्री. हनुमंत माने यांनी महाराष्ट्रातील ट्रान्सपोर्ट व्यवसायिकांचा बंद असणार आहे. यासाठी ज्यांच्याकडे वाहन चालविण्याचा परवाना आहे त्यांनी देखील या आंदोलनाला पाठिंबा देण्याचे आवाहन टाईम्स मराठी न्यूज शी बोलताना केले. तसेच या निवेदनामध्ये स्टेरिंग छोडो आंदोलनातून केवळ रुग्णवाहिका आणि स्कूल बस यांना सोडण्यात येईल असे स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे. तसेच या आंदोलनाची दखल घेवून खासगी कार चालक, बस , रिक्षा चालक यांनी दक्षता घ्यावी असे आवाहन ही केले आहे. तसेच संघटनेच्या वतीने सर्व पदाधिकारी व सदस्यांना हे आंदोलन शांततेत करण्याची विनंती ही या निवेदनाद्वारे केली आहे.