आज रात्री 12 पासून स्टेरिंग छोडो करत चालकांचे चक्का जाम आंदोलन

भारत सरकारने काढलेल्या हिट अँड रन कायद्याविरोधात आक्रमक होत आता खेड तालुक्यातील ओन्ली ड्रायव्हर भाऊ मदत संघ सामाजिक संस्थेच्या सभासदांनी आज 9 जानेवारी रोजी रात्री 12 वाजल्यापासून स्टेरिंग छोडो आंदोलन पुकारले आहे.

यावेळी या वाहन चालकांनी स्टेरिंग बंद ठेवून चक्का जाम करण्याचा इशारा निवेदनाद्वारे प्रशासनाला दिला आहे. या संदर्भातील निवेदन त्यांनी आज खेड तहसीलदार, प्रांत कार्यालय खेड व पोलीस स्थानक खेड यांना दिले आहे. यावेळी ओन्ली ड्रायव्हर भाऊ संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उस्थित होते. तसेच त्यांनी या वेळी खेड तलुक्यातील इतर वाहन चालकांना भेटून त्यांनीही या आंदोलनाला पाठिंबा देण्याची विनंती केली. यावेळी इतर वाहन चालक संघटनेने त्यांना पाठिंबा देण्याचे कबूल केल्याचे ही ओन्ली ड्रायव्हर भाऊ संघटनेच्या खेड तालुका पदाधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.