
नांदेड मधील सरकारी रुग्णालयात गेल्या २४ तासात २४ जणांचा मृत्यू होण्याची दुर्देवी घटना घडली. यामध्ये १२ नवजात बालकांसह २४ जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. सरकारी रुग्णालयात औषधांचा तुटवडा आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी ठाणे महानगरपालिकेच्या कळवा येथील रुग्णालयात देखील एकाच रात्रीत १८ जणांचा मृत्यू होण्याची दुर्देवी घटना घडली होती. केवळ रुग्णांना औषधांचा पुरवठा न झाल्याने त्यांना आपला जीव गमवावा लागल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. या औषधांच्या तुटवड्यामुळे मुंबई तर चक्क टी. बी. ची औषधे पुरवून वापरा असे कळल्याचा आरोप मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ट्विटरवरून ट्विट करत केला आहे. तसेच तीन तीन इंजिन लागून पण राज्याचे आरोग्य व्हेंटिलेटरवर असल्यासारखी परिस्थिती आसेल तर उपयोग काय? त्यामुळे सरकारने स्वतःचे आयुर्मान वाढवण्याची धडपड कमी करून महाराष्ट्राचे आयुर्मान कसे वाढेल याकडे लक्ष द्यावे असा सल्लाही त्यांनी यावेळी ट्विट करत दिला आहे.
या सर्व घटनेवर रुग्णालय प्रशासनाकडून आता खुलासा करण्यात आला आहे. नांदेड येथील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात 24 तासात 24 रुग्णांचे मृत्यू झाले हे मृत्यू का झाले याची काय करणे आहेत खरच रुग्णालयात औषध नाहीत ? डॉक्टर नाहीत का? इतर 70 अत्यवस्थ रुग्ण का झाले या सर्व प्रश्नांची उत्तरे रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉक्टर एस. आर. वाकोडे आणि वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर संजय मदनुरकर यांनी दिलीत. यावेळी त्यांनी सांगितले की, रुग्णालयात अत्याधिक गंभीर अवस्थेत दररोज 12 ते 14 रुग्ण दाखल होतात आणि त्यात काहींचा मृत्यू होतो असे रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. वाकोडे यांनी सांगितले. लहान मुलांचा मृत्यू हा नैसर्गिक आणि प्रौढ रुग्णांचा मृत्यू हा व्याधी आणि वय झाल्यामुळे झाला असल्याचे सांगण्यात आले. त्याशिवाय, मृतांमधील इथे आलेले रुग्ण हे अतिशय गंभीर होते. सर्वतोपरी प्रयत्न करून ही अशा रुग्णांना वाचवता येत नसल्याचेही डॉ. वाकोडे यांनी सांगितले. गंभीर आजारामुळे 12 रुग्णांचा मृत्यू झाला. तर, लहान मुले ही अतिशय क्रिटिकल परिस्थितीत इथे दाखल झाली होतीत असे रुग्णालयाच्या अधिकाऱ्यांनी बचावात म्हटले. रुग्णालयात कुठल्याही औषधांची कमतरता नसल्याचे डॉ. वाकोडे यांनी म्हटले. डॉक्टर आणि कर्मचारी वर्गदेखीलही पुरेसा आहे. आमच्या रुग्णालयात 5 जिल्ह्यातून रुग्ण येतात. सर्व रुग्णांच्या प्रकृतीबाबत आम्ही पूर्ण काळजी घेतो. तसेच सापाने दंश केल्यावर उपचारासाठी अँटी स्नेक वेनोम औषध उपलब्ध आहेत. महागडी औषध ही आम्ही स्थानिक स्तरावर खरेदी करत असल्याचे डॉ. वाकोडे यांनी म्हटले
त्यानुसार नांदेड येथील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात 30 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबर 2023 या कालावधीत 24 रुग्णांचा मृत्यू झाला. यामध्ये 12 प्रौढ रुग्ण (5 पुरुष, 7 महिला) व 12 नवजात शिशु रुग्ण होते. प्रौढ रुग्णामध्ये 4 हृदयविकार, 1 विषबाधा, 1 जठरव्याधी, 2 किडनी व्याधी, 1 प्रसूती गुंतागुंत, 3 अपघात आणि इतर आजाराने तर बालकांपैकी 4 अंतिम अवस्थेत खाजगीतून संदर्भित झाले होते. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात अत्यावश्यक औषध साठा उपलब्ध आहे. जिल्हा नियोजन माध्यमातून या आर्थिक वर्षासाठी 12 कोटी रुपये निधी देण्यात आला आहे. त्याशिवाय, अजून 4 कोटी रुपये मंजूर झाला आहे असे जिल्हा रुग्णालय प्रशासनाच्यावतीने कळविण्यात आलेले आहे.