
मुंबई – गोवा महामार्गावरील सर्वात मोठा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बहादूरशेख नाका येथील उड्डाणपुलाचे गर्डर सोमवारी सकाळी ८ वाजता मधोमध खचल्याचा प्रकार घडला होता. मात्र दुपारी हा पूल लाँचरच्या यंत्रणेसह अचानक कोसळला. मोठा आवाज झाल्याने परिसरातील नागरिकांची पळापळ झाली. या घटनेने चिपळुणसह संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली असून घटनास्थळी प्रशासकीय यंत्रणेसह नागरिकांची मोठी गर्दी झाली आहे.
ब्रिज कोसळतानाचे लाईव्ह दृष्य बातमीच्या शेवटी



सकाळी सुमारे ८ वाजण्याच्या सुमारास मुंबई- गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणा अंतर्गत चिपळूण येथे उभारण्यात येत असलेल्या पुलाचा गर्डर कोसळला होता. मात्र काही कालावधीनंतर दुपारच्या सुमारास उड्डाण पूलाचा काही भाग खाली कोसळून दुर्घटना घडली.या दुर्घटनेत पुलाचे काम करणारी क्रेन देखील दुर्घटनाग्रस्त झाल्याने पूर्णपणे खराब झाली आहे. दरम्यान सकाळी ८.३० वाजता अचानक पुलाच्या मध्यवर्ती भागातील दोन गर्डर तुटले होते. दरम्यान बहादुरशेख नाक्यातील उड्डाणपुलामध्ये एकूण ४६ पिलर असून ६ व्या पिलरपर्यंतचे काम पूर्ण होत आले होते. मात्र अचानक सोमवारी सकाळी उड्डाणपुलाचा गर्डर खचल्याने मोठा आवाज झाला. त्यानंतर थोडा वेळ काही झाले नाही. मात्र आता मात्र उड्डाणपुलाचा काही भागच खाली कोसळला आहे. सकाळी आठ ते साडे आठच्या दरम्यान काम सुरु असलेल्या उड्डाणपुलावरील गर्डर कोसळला होता. मात्र त्यावेळेस एवढे नुकसान झाले नव्हते. मात्र दुपारी सव्वा दोन ते अडीच वाजण्याच्या सुमार त्या उड्डाणपुलाचा एक गाळा खाली कोसळला. तसेच त्यावर काम करत असणारी करेन देखील पूर्णपणे खराब झाली आहे. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र उड्डाणपुलाचा कोसळलेला गाळा उचलण्यासाठी दोन अधिक महिन्यांचा कालावधी लागू शकतो असे रत्नागिरी सार्वजनिक बांधकाम विभागातील एका उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी सांगितले.