खेड उबाठा शहराध्यक्षांचा राजीनामा, शिंदेच्या शिवसेनेत करणार प्रवेश

Breaking News

खेड शहर उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे शहराध्यक्ष दर्शन अजित महाजन यांनी मंगळवारी सकाळी अचानक आपल्या शहराध्यक्ष पदाचा राजीनामा दिला असून मंगळवारीच ते शिवसेना पक्षात अधिकृत पक्ष प्रवेश करणार असल्याची माहिती खात्रीशीर सूत्रांकडून मिळत आहे. उबाठा गटाच्या शहराध्यक्षांनी अचानक राजीनामा देवून घेतलेल्या निर्णयामुळे खेड तालुक्यातील उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेला आणि जिल्हाप्रमुख सांजयराव कदम यांना मोठा धक्का बसला आहे. एक आक्रमक तरुण नेतृत्व, चांगले वक्ते यांच्या माध्यमातून शिवसेना उबाठा गटाने गमावले असून त्याचा फायदा आता शिवसेना शिंदे पक्षाला होणार आहे. शहराध्यक्ष म्हणून काम करीत असताना दर्शन महाजन यांनी अनेक आंदोलने आणि उपोषणे करून प्रशासनाचे लक्ष वेधून सर्व सामान्यांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांच्या राजीनाम्याने उबाठा पक्षाला खेड शहरात मोठा धक्का बसला असून आगामी विधान परिषद निवडणुकीत याचा फायाड शिवसेना पक्षाला व आ. योगेश कदम यांना मात्र नक्की होईल.

दुसऱ्या यादीतही गुहागरचा उमेदवार नाही, संभ्रम कायम

राज्यात सध्या विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असल्याचे पहावयास मिळत आहे. रत्नागिरी जिल्ह्यात देखील विविध राजकीय पक्षांकडून आपापले उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत. मात्र गुहागर विधानसभा जागेवर शिवसेनेकडून अद्यापही उमेदवारी जाहीर करण्यात आली नाही. उद्या 28 ऑक्टोबर रोजी राजेश बेंडल हे आपला उमेदवारी अर्ज सादर करणार असल्याची खात्रीशीर माहिती समोर येत आहे. मात्र या जागेवर यापूर्वी शिवसेनेकडून विपुल कदम यांच्या नावाची देखील चर्चा झाली होती.

शिवसेना पक्षाची दुसरी यादी रविवारी सायंकाळी जाहीर झाली असून यामध्ये विविध 20 जागांवर उमेदवार निश्चित करण्यात आले आहेत. मात्र या दुसऱ्या यादीत देखील गुहागर विधानसभा मतदारसंघाचा उमेदवार जाहीर न झाल्याने या ठिकाणी पुन्हा संभ्रम निर्माण झाला आहे. गुहागर विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचा उमेदवार नक्की कोण असा प्रश्न आता येथील जनतेसह शिवसैनिकांसमोर उपस्थित झाला आहे. गुहागर विधानसभेच्या जागेवर शिवसेना पक्षाकडून राजेश बेंडल की विपुल कदम कोणाची वर्णी लागते याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. 29 ऑक्टोबर ही उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख असून 28 ऑक्टोबर रोजी दुपारनंतर या जागेचा उमेदवार जाहीर होण्याची शक्यता देखील राजकीय वर्तुळातून वर्तवण्यात येत आहे.

©️2024 Times Marathi News, Media Network
Editor – Rakesh Koli
Rg.No.MH-28-0054845
Khed, Ratnagiri

ताज्या बातम्या आणि घडामोडींची माहिती मिळवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करून सबस्क्राईब करा

🪀 व्हाट्सअप ग्रुप लिंक
https://chat.whatsapp.com/CEeDRKqaMDTBB15bt7AuLg

👤 फेसबुक पेज लिंक
https://www.facebook.com/share/D44NdYnfuQVHqqY9/?mibextid=qi2Omg

🌀 इंस्टाग्राम लिंक
https://www.instagram.com/rakesh0946?igsh=emZodDkzc25peWVm

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
👉🏻 आपल्या परिसरातील बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क क्रमांक  8390380101

दापोली शिवसेनेत 70 पेक्षा अधिक जणांचा आम. योगेश कदम यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश

दापोली शहरातील खोंडा प्रभाग क्रमांक 4 व अहमदनगर प्रभाग क्रमांक 2 येथील जवळपास 70 हून अधिक नागरिकांनी आज दापोली खेडचे आमदार योगेश दादा कदम यांच्या विकासकामांवर प्रेरित होऊन आज शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला. यावेळी सर्व पक्ष प्रवेशकर्त्यांचे शिवसेना पक्षात आमदार योगेश दादा कदम यांनी स्वागत केले. दापोली येथील शहर शिवसेनेच्या शाखेमध्ये हा पक्षप्रवेश सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला.

यावेळी माजी समाजकल्याण सभापती भगवान घाटगे, तालुकाप्रमुख उन्मेषा राजे, माजी नगराध्यक्ष व माजी शहरप्रमुख राजेंद्र पेटकर, विधानसभा क्षेत्र संघटक प्रदीप सुर्वे, उपजिल्हाप्रमुख सुधीर कालेकर, महिला आघाडी शहर संघटिका रसिका पेटकर, माजी नगराध्यक्ष परवीन शेख, माजी नगरसेविका शबनम मुकादम, नगरसेविका रूपा घाग, प्रीती शिर्के, शिवानी खानविलकर, शहरप्रमुख प्रसाद रेलेकर, युवा सेना शहर अधिकारी स्वप्नील पारकर, माजी सभापती ममता शिंदे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष रोहिणी दळवी, कोकण कृषी विद्यापीठ कार्यकारिणी सदस्य सुनील दळवी, युवासेना उपजिल्हाधिकारी अमित पार्दुले, युवासेना सचिव किरण बांद्रे, माजी शहरप्रमुख सुहास खानविलकर, उप तालुकाप्रमुख चंद्रकांत कामथेकर, शहर समन्वयक प्रकाश साळवी, अल्पसंख्याक शहरप्रमुख नदीम मुकादम, जावेद भाई सारंग, दीपक सूर्यवंशी, शशांक घाग, राजू बोथरे, युवती शहर अधिकारी कीर्ती परांजपे, माजी समाजकल्याण सभापती चारुता कामठेकर आदिंसह शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमात नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना आमदार योगेश कदम यांच्या हस्ते नियुक्तिपत्र प्रदान करण्यात आले व पक्षात त्यांचे स्वागत करण्यात आले.

यावेळी मनोगत व्यक्त करताना आमदार योगेश कदम यांनी दापोली शहरातील विकासकामांवर भाष्य करताना नगरपंचायत निवडणुकीत मतदारांनी आपल्या उमेदवारांना दिलेल्या भरघोस प्रतिसादाबद्दल समाधान व्यक्त केले. तसेच आज ज्या नागरिकांनी आपल्या पक्षात प्रवेश केला आहे त्यांना कधीही विकासकामांची कमतरता भासू देणार नाही असा शब्द दिला. दापोली शहरातील प्रत्येक विकासकाम करण्याची धमक आमदार योगेश कदम यांच्यामध्ये आहे हा विश्वास जनतेने दाखवला आहे आणि हा विश्वास आमदार म्हणून मी नक्कीच सार्थ ठरवेन असे आश्वासन आमदार योगेश कदम यांनी उपस्थिताना केले. सर्व प्रवेशकर्त्यांचे पक्षात स्वागत करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमाला शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.