
रत्नागिरी जिल्हा वैष्य वाणी समाज संघ यांच्याकडून समाजात भरीव कामगिरी करणाऱ्या व सामाजिक स्तरावर स्वतःचे व समाजाचे नाव रोशन करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान करण्यात येणार आहे. समाजाच्या वतीने विविध पुरस्कार देवून समाजातील या सामजिक व्यक्तिमत्त्वाना गौरविण्यात येणार आहे. हा पुरस्कार प्राप्त झालेल्या मान्यवर व्यक्तिंचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज्य सरचिटणीस वैभव खेडेकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी भेट घेवून अभिनंदन केले.

रत्नागिरी जिल्हा वैष्य वाणी समाज संघ यांच्याकडून समाजात भरीव कामगिरी करणाऱ्या व सामाजिक स्तरावर स्वतःचे व समाजाचे नाव रोशन करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान दि. 21 जानेवारी रोजी चिपळूण येथे होणाऱ्या महामेवळव्यात करण्यात येणार आहे. यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून वैश्य भूषण, वैश्य उद्योजक व वैश्य रत्न पुरस्कार प्राप्त झालेले बिपिन दादा पाटणे, अरविंद शेठ तोडकरी, परागजी चिखले व मिनारजी चिखले यांची भेट घेवून पुष्पगुच्छ देवून अभिनंदन करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज्य सरचिटणीस वैभवजी खेडेकर, शैलेशजी धारिया, ॲड. मिलींदजी नांदगावकर, प्रदीप भोसले यांच्यासह कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.