कुत्रा आडवा येऊन स्वार जखमी

Tmes marathi news

मुंबई गोवा महामार्गावरील भरणे शिंदेवाडी येथे दुचाकीच्या आडवा कुत्रा आल्याने अपघात झाला. या अपघातात रघु भंगरवाला हा परप्रांतीय दुचाकीवरून पडून जखमी झाला. त्याला मनसे च्या विशाल कापडी आणी त्यांच्या सहकाऱ्यांनी 108 रुग्णवाहिकेतून कलंबनी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.

*आमच्या TIMES MARATHI NEWS च्या अपडेट तुमच्या Whatsapp वर मिळवण्यासाठी आम्हाला जाॅईन व्हा किंवा 8390380101 या क्रमांकावर HI मेसेज करा*
https://chat.whatsapp.com/H0byh80Nekn2VHl0oUz2tN
https://t.me/joinchat/wy0fp8dr-ts4Mjll
https://wordpress.com/notifications
https://profile.dailyhunt.in/timesmarathinews
https://chat.whatsapp.com/H0byh80Nekn2VHl0oUz2tN

पोलिसांनी सोडल की आम्ही मारणार – राज ठाकरे

परप्रांतीय फेरीवाल्यांनी मुबई ठाणे महानगर पालिकेच्या माजीवडा मानपाडा प्रभाग समितीच्या साहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे यांच्यावर 30 ऑगस्ट रोजी कासारवडवली येथे फेरी वाल्याने चाकु हल्ला केला होता. यामध्ये त्यांच्या हाताची दोन बोटे तुटून पडल्याची घटना घडली. आशा प्रकारे अनधिकृत पणे धंदा करणाऱ्या फेरीवल्याने एक महिला अधिकाऱ्यावर हल्ला करण्याची कदाचित महाराष्ट्रातील ही पहिलीच घटना आहे. त्या फेरी वाल्याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून तो बाहेर आला की महाराष्ट्र नवनिर्माण सेना त्याला मारणार असे वक्तव्य मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत केले.

*आमच्या TIMES MARATHI NEWS च्या अपडेट तुमच्या Whatsapp वर मिळवण्यासाठी आम्हाला जाॅईन व्हा किंवा 8390380101 या क्रमांकावर HI मेसेज करा*
https://chat.whatsapp.com/H0byh80Nekn2VHl0oUz2tN
https://t.me/joinchat/wy0fp8dr-ts4Mjll
https://wordpress.com/notifications
https://profile.dailyhunt.in/timesmarathinews
https://chat.whatsapp.com/H0byh80Nekn2VHl0oUz2tN

एन एच 5 वर दरड कोसळली, अनेक गाड्या व माणसे गाडली गेल्याची शक्यता, एन डी आर एफला पाचारण

हिमाचल प्रदेशच्या सुदोर किंनौर जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्ग क्र. 5 वर मोठी दरड कोसळून अपघात झाला. या दरडीखाली अनेक गाड्या दबल्या गेल्याने माणसे ही गाडली गेल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. हा अपघात दुपारी 12.45 वा. सुमारास घडला. या दुर्घटनेत बचाव कार्यासाठी एन डी आर एफ च्या पथकाला पाचारण करण्यात आले आहे.

याबाबत मिळालेल्या महितीनुसार किंनौर जिल्हातील रिकांग पियो शिमला मार्गावरील निगुलसरी जवळ दरड कोसळल्याने ही दुर्घटना घडली. यावेळी राष्ट्रीय महामार्ग क्र. 5 वरून प्रवास करणारी हिमाचल राज्य परिवहन मंडळाची बस, एक मालवाहू ट्रक व खी गाड्या दरडीखाली दबल्या गेल्याची माहिती आई. टी. बी. पी.ने आपल्या ट्विटर वरून प्रसिद्ध केले. हा अपघात बुधवारी दुपारी 12.45 वाजता दरड कोसळल्याने झाला. या दुर्घटनेत अनेकजण दरडीखाली अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार बसमधून सुमारे 40 प्रवाशी प्रवास करत असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र या अपघातातील जखमी व मृतांबाबत हिमाचल प्रदेश सरकारकडून कोणत्याही प्रकारची अधिकृत आकडेवारी जाहीर करण्यात आली नाही. घटनास्थळी आई टी बी पीचे जवान मदत कार्य करीत असून एन डी आर एफला ही पाचारण करण्यात आले आहे.